माझा होशील ना? भाग -74

सावनी ची कथा
मागील भागात आपण पाहिलं कि, अजिंक्य ला समजत कि विहंग हा अनुराधा आणि त्याचा मुलगा नसून.... सावनी आणि त्याचा आहे.... डॉक्टर सतीश त्याला त्याच्या चुकांची जाणीव तर करून देतात पण त्याला जाणीव होईल का?? आता पाहुया पुढे......,


"बाबा....., मला मान्य आहे की त्या रात्री आम्ही एक झालो होतो.. आणि  मी अनुराधा अणि माझ्या नात्याचा माझ्या पोझिशन चा विचार करून झाली गोष्ट काहीच न झाल्या प्रमाणे रिएक्ट झालो. पण मग सावनी  तरी का गप्प बसली..?
तिनेही स्वतःहून काही सांगितले नाही त्यावर...."

अजूनही अजिंक्य पूर्णपणे आपली चूक मान्य करत नव्हता....

"कसे सांगावे तिने? तूच सांग.... तु सकाळी तुला काहीच आठवत नाही असे दाखवलेस.... आणि अनुराधा तिची चांगली मैत्रीण होती..... तिचं घर तिला तोडायचं नव्हत...


पण अजिंक्य बेटा....,  आता तर सांगितले ना की त्या रात्री तुमच्यात जे काही घडले आहे त्यातून आज विहंग  सारख्या गोड मुलाला तिने जन्म दिलाय आणि तिला आधी ही मातृत्व प्राप्त झाले होते ही गोष्ट तिच्या आठवणी तून पूर्णपणे पुसली गेली आहे.
आणि खरं सांगायचं तर हे सगळे होण्याला कुठे ना कुठे तू जबाबदार आहेस...!

तेव्हा मी हात जोडतो आणि म्हणतो आतातरी ती जबाबदारी पार पाड...!

डॉक्टर सतीश हात जोडत त्याला म्हणाले.....,

"बाबा... प्लीज... तुम्ही हात नका जोडू...."


अजिंक्य मान खाली घालून म्हणाला.....

"अरे आता तिला तुझी नवरा म्हणून सर्वात जास्त गरज आहे. गेले काही महिने ती प्रेग्नंट आहे समजल्यावर तुझ्या वागण्यात झालेला बदल ती पाहात होती.! तिचं काय आम्हाला देखील समजत होत.....मला खात्री आहे.....काल ही रात्री असेच काहीतरी झाले असणार की त्यामुळे तिला जीना चढायचा नसताना देखील वर चढून यावे लागले... बरोबर ना? "

डॉक्टर सतीश ह्यांनी अजिंक्य ला विचारले.....

"हो..... बाबा काल खरंच माझे चुकले.. मी मान्य करतो. मी तिलाही बोललो हे.... आणि माफी देखील मागितली..."


अजिंक्य म्हणाला....

"अजिंक्य ......,  अरे तुमच्या दोघांचा विरुद्ध रक्तगट आणि त्यात सावनी ची ही आधीची सिरियस बॅकग्राऊंड..! तिचे आई वडील तिच्या काळजी पोटी आपल्या कडे स्वतःहून आले नाहीत .अरे त्यांना या सावनी ने काही सांगितले देखील नव्हते. उलट मीच त्यांना, तसे सांगून बोलवून घेतले होते..! कारण ते ज्या भयानक परिस्थिती मधून गेलेत ; त्याची तुला तीव्रता समजणार नाही.....त्या गोष्टीचा सुद्धा तु राग राग केलास... तुला वाटत होत कि विहंग त्यांचा नातू नाही म्हणून ते असे वागतात... पण खरं तर विहू त्यांचाच नातू आहे.... ही गोष्ट भलेही सावनी ला माहित नाही.... पण त्यांना मात्र ठाऊक आहेच.... तरीही तुझ्या अश्या वागण्यावरून तुला त्यांनी जाब नाही विचारला...

अरे त्या सावनी ने तुला विहंग मुळे होत असणाऱ्या मानसिक त्रासाला समजून घेऊन हे मुल ठेवायचे नाही असाच विचार केला होता.! तिला तुझा त्रास समजत होता... पण तु मात्र नाही अनुराधा ला समजून घेतलंस कि नाही सावनी ला....

तिला चांगलेच माहित होते की तू आता त्या मानसिक अवस्थेत नाहीस, आणि तुला इतक्या लवकर मुल नको देखील होते.... बरोबर ना!!"

त्यावर अजिंक्य ने फक्त मान हलवली.....तेव्हा परत तेच म्हणाले.....

" तस पाहता तिच्या आधी च्या त्रासामुळे तिला ही प्रेग्नंसी एकतर आधी राहणारच नाही पण राहिलीच तर  आतातायी पणे ती टर्मिनेट देखील करता येणार नाही हे मला माहीत होते...! त्यात असणारा जीवाचा धोका आता ही तितकाच तीव्र आहे हे देखील मी जाणून होतो.

पण त्यात एवढेच समाधान की तुझ्यावर असणारे प्रेम.. त्याचे प्रतीक असणारे हे मुल आणि त्या मुलाची आई होण्याचे भाग्य राजरोसपणे तिला उपभोगता यावे..! जे विहंग बाबत कधीच शक्य होणार नाही..!

आता ही पुनश्च एकदा... ती संधी तिला मिळाली आणि तिने ती घ्यावी म्हणून मी आणि तुझी आई तिच्या पाठीशी उभे राहिलो...!

तेव्हा आता तू देखील आधी चे सर्व सोडून देऊन तिला साथ दे..! कारण तुझे आणि विहंग चे  प्रेमच तिला परत एकदा खेचून आणेल या दुव्यावर...! नाहीतर..,.. "

एवढे सगळे ऐकल्यावर अजिंक्य  समोरच्या खुर्चीत.. खिळवून ठेवल्या सारखं बसुन राहिला होता..!

अणि डॉ. सतीश  समोरच्या खिडकीतून सूर्यास्त आणि समोरून उडणारा पक्षांचा थवा पाहत.. येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायची तयारी करत होते......त्यांना सुद्धा मनातले सगळे बोलून टाकल्यामुळे खूप हलक वाटत होत...आता फक्त सावनी आणि तिच्या बाळाला काहीही होऊ नये... यासाठी ते देवाची प्रार्थना करत होते.........


इकडे अजिंक्य ला देखील खूप पश्चाताप होत होता.... तो विचार करू लागला.... मी स्वतः एक डॉक्टर असून सावनी किंवा अनुराधा ला एवढा त्रास होत असेल हे का नाही समजू शकलो..... माझ्या मनात मी एकटा पडेन हीच भावना होती.... त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे असं मला वाटत राहील... पण मी तिला समजून घेतलं पाहिजे असं का नाही वाटल मला कधी?? मागच्या वेळेस अनुराधा सुद्धा आजारी असताना मला वेळ देत नाही म्हणून स्वतःला कामात गुंतवून दुर्लक्ष केल.... आणि आता सुद्धा सावनी च्या बाबतीत तिचे प्रयत्न समजत असून तिचं दुःख समजून घेण्याचा मी मात्र कधीच प्रयत्न केला नाही....

ती रात्र मला अजून ही खूप चांगली आठवते.... आणि आजपर्यँत त्या गोष्टीच guilt माझ्या मनात आहे... पण तु  काही बोलली नाहीस म्हणून मी सुद्धा मला काही आठवतंच नाही असं दाखवत राहिलो... पण खरं तर त्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला तुला सामोरे जायची हिम्मत नव्हती सावू..... म्हणून आज पर्यंत मी कधीच ती गोष्ट ऍक्सेप्ट करू शकलो नाही... पण मला हे ठाऊक नव्हतं... माझ्या त्या एका चुकीची शिक्षा तुला भोगावी लागेल...


तु एवढं सगळं विहंग साठी करत असताना देखील माझ्या मनात असा विचार कसा आला हेच कळत नाही....तु तर त्याची आई आहेस  .... तु त्याचा वाईट विचार करूच शकत नाहीस.....

सावू पटकन ठीक हो ग... मला तुला सांगायचं आहे... विहंग तुझा न माझा मुलगा आहे.... तु माझं पाहिलं प्रेम आहेस.. ज्याची जाणीव मला नव्हती.... प्लीज लवकर बरी हो....मी तुझी आणि आपल्या बाळाची खूप आतुरतेने वाट पाहतोय....


अजून आपल्याला विहंग ला ठीक करायचं आहे....

प्लीज सावू तु लवकर ठीक हो... मी यापुढे कधीच काहीच तुला कमी पडू देणार नाही... आपले दोन्ही बाळ आणि तु..... यापुढे तुम्हीच दोघे माझे जग आहात.....

सावू मला माझी चुकी मान्य करायची एक संधी दे ग... लवकर ठीक हो please.....

आयुष्याच ओझे सावरताना.... साथ तुझी मला हवी आहे...

रिते होते माझे आयुष्य सारे
तुझ्या येण्याने ते परिपूर्ण झाले....!!!!

हीच भावना सध्या त्याच्या मनात दाटून येत होती....आणि हे सगळं आठवून त्याच्या डोळ्यातील अश्रू मात्र तुडुंब भरून वाहत होते......


नियतीच्या फास्यांना मात कुणाला देता येत नाही..... ती जसे चालवेल... जसे फिरवेल.... तसे आपण चालायचं आणि फिरायचं.......

अजिंक्य ला स्वतःची चुकी तर समजली आहे....
सावनी ठीक होईल ना?
आणि तिचं बाळ?

क्रमश

🎭 Series Post

View all