माझा होशील ना? भाग -75

Maza Hoshil ना
मागील भागात आपण पाहिलं कि, अजिंक्य ला आपल्या सगळ्या केलेल्या चुकांची जाणीव होते... डॉक्टर सतीश त्याला त्याच्या सगळ्या चुका दाखवून देतात..त्याला तेव्हा खूप पश्चाताप देखील होतो.......आता पाहूया पुढे.......,


आता सगळेच जण icu च्या बाहेर डॉक्टर गीतांजली ह्यांची वाट पाहत होते ......सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसून येत होत..... त्यानंतर साधारण तीन चार तासात डॉ.गीतांजली ह्या मुंबईत पोहोचल्या..! तिथून त्या डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये आल्या......


त्यांना आलेले पाहिले तसे डॉक्टर सतीश पटकन पूढे सरसावले...... आणि म्हणाले.....,

"डॉक्टर गीतांजली.... आम्ही तिला काही इंजेकशन देऊन स्टेबल केले.... आता पुढची जबाबदारी तुमची....,.Icu इकडे आहे..आणि ...तिथेच सगळे रिपोर्ट आहेत......"

"ठीक आहे मी पाहते....."

असं म्हणून त्या icu च्या दिशेने गेल्या...

डॉक्टर सतीश त्यांच्या कडे पाहतच राहिले...... त्यांनी आधी पाहिलेल्या डॉ. गीतांजली आणि आता च्या पोक्त डॉ. गीतांजली ...! जमीन आस्मानाचा फरक पडला होता त्यांच्यात ह्या मधल्या काही वर्षात......


मागच्या कितीतरी आघातांनी, आणि नंतरही सामोरे जावे लागलेल्या राजकारणी हालचाली मुळे त्यांना आयुष्याने खूप काही शिकवले होते.....
आणि याच राजकारणाचा एक भाग म्हणून सावनी साठी तिच्या बाजूने  लढणाऱ्या त्यांच्या पतीला धीरज  चतुर्वेदी ह्यांना जीवे मारले गेले होते........! एका ठरवून घडविलेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला..! ह्यामध्ये त्या अमित मिश्राच्या वडिलांचा हात होता पण प्रकरण अजून पुढे वाढायला नको म्हणून ना त्या त्यांच्या भावाच्या संपर्कात आल्या ना त्यांना येऊ दिले..! कारण ह्या दरम्यान त्यांनी खूप काही झेलले होते ...पण त्याची झळ स्वतःच्या भावाला आणि भाचीला मात्र लागून दिली नव्हती .....

म्हणुनच एवढ्या लाडक्या भाची च्या सावनी च्या लग्ना मध्ये ह्या गीतांजली आत्या सामील झाल्या नव्हत्या. पण आज तिच्या तब्बेती चे ऐकुन मात्र एका फोन वर धाव घेतली  होती मुंबई कडे त्यांनी ..!

आल्यावर सतीश ह्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी थेट विना विलंब करता पहिले सावनी कडे धाव घेतली. आधी तिला चेक करून, नंतर सर्व रिपोर्ट तपासले, सोनोग्राफी चा रिपोर्ट पाहिला...!

मागच्याच वेळची परिस्थिती निर्माण झाली होती. पण यावेळी त्यात अजून एक गोष्ट वाढली ती ही की ती शॉक मध्ये  होती असणारच ना तिने ते फोटो पाहून काहीच आठवत नसल्यामुळे आपल्या ब्रेन वर जोर दिला होता.... आणि त्यामुळे आलेला झटका सुद्धा खूप जोराचा होता ....! त्यामुळे जो पर्यंत ती शुद्धीवर येत नाही तो पर्यंत वाट पहावी लागणार होती..! आणि तेच एक तर बाळाच्या आणि  दुसरे तिच्या स्वतः च्या  जीवाला देखील धोका निर्माण करत होते...!

डॉक्टर सतीश , डॉक्टर गीतांजली आणि डॉक्टर स्नेहा  यांनी काही एकत्र निर्णय घेऊन ट्रीटमेंट तर वाढवली होती पण पुढचा अर्धा एक  तास खूप महत्वाचा होता...! जर तेवढ्या वेळात शुद्ध आली नाही तर मात्र ऑपरेशन करून फक्त बाळाचे प्राण वाचवणे एवढेच हाती राहिले होते. ...म्हणजे सावनी च्या जीवाची काहीच खात्री देता येत नव्हती एवढ्या स्पेसिलिस्ट असणाऱ्या डॉक्टरांना....

एकूणच काय तर सर्वांचे च प्राण कंठाशी आले होते. ......सावनी चे आईवडील दोघे हि एवढे मोठे डॉक्टर पण ते देखील हतबल होऊन शांतपणे पाहत आपले अश्रु लपवायचा उगाच  प्रयत्न करत होते. पण ते त्यांनाच काय तिथे असणाऱ्या कुणालाच जमत नव्हतं ..


असाच मिनिट मिनिट म्हणत अर्धा तास संपत चालला होता पण सावनी काही केल्या शुद्धीवर येत नव्हती .....आणि इकडे सगळ्याना तो वेळ एक एक युगासारखा वाटत होता .....


आणि त्याच वेळी इकडे हट्ट करून खूप रडून , मागे लागून विहंग आपल्या आजीला शकुंतला बाईंना सोबत घेऊन हॉस्पिटल मध्ये आला..!

त्याला काहीही करून त्याच्या आईला सावनी ला पहायचे होते त्यावेळी...! इकडे लेबर रूम मध्ये असणारी सावनी  मात्र निपचित पडली होती .!

तो जेव्हा तिला आत पहायला गेला  तेव्हा ती ना हालत होती ना बोलत होती..!
तिला या अवस्थेत पाहून विहंग  ला काय वाटले असेल माहित नाही...! पण तो अचानक तिचा हात हातात धरून खूप रडायला लागला. ....कदाचित त्याला अनुराधा आठवली असेल .....त्याच अवस्थेत त्यानं पाहिलं होत... त्यामुळे त्याच्या मनात भीती दाटून आली होती...... तो तसाच रडत रडत म्हणाला.....,

"मम्मा.. बोल ना ग  काहीतरी!
मी चुकलो   ....... आय आम सॉरी मम्मा.... माझ्या वेळी माझ्या मम्मा ला एवढा त्रास झाला हे माहीत नव्हते मला... ती गेली मला सोडून..कायमची.......पण तू नको ना असे करूस...! प्लीज ......
तू सांगशील तेव्हा, सांगशील ती औषधे घेईन मी, इंजेक्शन्स साठी रडणार नाही..! ऐक ना ग मी हट्ट सुद्धा काहीच करनार नाही ....  माझ्या छोट्या बहिणी शी खूप खेळायचे आहे मला....तिला  मीच सांभाळेन  ...आम्ही दोघे ही शहाण्यासारखं वागू ...मी एका जागेवर बसून जेवण करेन ...इकडून तिकडे पळणार नाही ....माझी छोटी बहीण आली तर काय सांगणार मी तिला ..म्हणून हे सगळं  आनंदाने करून घेऊन मी लवकर बरा होऊन दाखवीन..! पण तू जागी हो ना मम्मा.! "

असं जोरात म्हणून  त्याने तिचा पकडलेला हात घट्ट दाबून धरत पुन्हा एकदा जोरदार मम्मा म्हणून हाक मारली...!

तो देखील अशक्त होता, एवढे दुःख सहन करायची ताकद नव्हती त्याच्यात...! एकतर लहान त्यात किमोथेरपी ट्रीटमेंट चालू होती त्याची.......!तो ओरडला तस त्याला चक्कर आली आणि चक्कर येऊन तो सावनी च्या दिशेने तिच्या च पायावर कोसळला...! आणि तसा तिच्या हाताला हिसका बसुन त्याचा हात सुटला गेला...,, आणि तसा च तिचा ही हात खाली पडला..आणि  कोणालाही काहीही समजायच्या आत सावनी  ने डोळे उघडून... जोरात जिवाच्या आकांताने त्याला विहंग म्हणून हाक मारली.

बापरे....!!! क्षणभर  सगळे जण या हाकेने स्तब्ध झाले होते...! कोणालाच समजत नव्हते.....काय बोलावे यावर?
आज एका मुलाने आपल्या हाकेने आईला शुद्धीवर आणले होते.. जे काम भले भले डॉक्टर देखील करू शकले नाहीत.....ते विहंग  च्या आर्त हाक मारण्याने साधले होते..! या ह्रदयीचे त्या ह्रदयी बरोबर पोहोचते झाले होते..! शेवटी आई च काळीज आहे.... शेवटपर्यंत आपल्या मुलाची काळजी करत....

दोन मिनिट सगळे खुश झाले..... पण आता थांबून चालणार नव्हतं..... घाई करणे खूप गरजेचे आहे..... हे लक्षात येताच क्षणी डॉ. सतीश आणि डॉक्टर गीतांजली ने घाई करून विहंग ला बाजूला केले.....त्याला त्याच्या वडीलांच्या अजिंक्य हाती सोपवले........ अजिंक्य ने त्याला घेऊन एका बेड वर ठेवले आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले गेले.....


इकडे लगेच सावनी ला ऑपरेशन थिएटर मध्ये दाखल करण्यात आले...... ती शुद्धीवर आल्यामुळे तिला थोडी शी तरतरी आली.... पण आपल्याच आत्याला समोर पाहून ती थोडी आश्चर्य चकित झाली...... तिने त्याही अवस्थेत आत्याला विचारले.......

" आत्तू..... तु... तु... इथे कशी काय....? "


सावनीला तिची ही अवस्था समजेल का?
तिची परिस्थिती सुधारेल कि बिघडेल?
ती आणि तिचं बाळ वाचेल ना?

क्रमश

🎭 Series Post

View all