माझा होशील ना? भाग -77

Maza Hoshil Na O
मागील भागात आपण पाहिलं की, सावनी बेशुद्ध झाली होती तेव्हा विहंग च्या आवाजाने तिला शुद्ध आली..... त्यानंतर डॉक्टर गीतांजली ह्यांनी तिच c सेकशन केल... सावनी ने एका गोंडस मुलीला जन्म दिला पण त्यानंतर तिची शुद्ध हरपून तिने आपले डोळे मिटले..... आता पाहूया पुढे......,

त्यांचा आवाज ऐकून डॉक्टर सतीश पटकन आत मध्ये आले..... त्यांना थोडीफार कल्पना होतीच असं काहीतरी होईल........ तस पटकन पुढे होत...... त्यांनी पटापट काही इंजेक्शन तिला सलाईन वाटे देत राहिले..... पण...... पण....... डॉक्टर गीतांजली ह्यांनी तिचे पोट क्लोज केले....... त्यानंतर त्यांनी पोटा वरून क्लीन देखील केल...... एवढं सगळं झाल्यावर त्यांनी त्यावर स्टिकिंग करून झाले तरी परिस्थितीत बदल दिसत नव्हता...! सावनी काही केल्या रिस्पॉन्ड करत नव्हती......
सगळेच हतबल झाले होते.....

तो गोंधळ अजिंक्य च्या सुद्धा कानावर पडला... मागचा पुढचा विचार न करता डॉ.अजिंक्य ने आत प्रवेश केला........! विहंग शुद्धीवर आला होता आणि शांत पण झाला होता थोडा..! म्हणुन त्याला सावनी च्या व स्वतःच्या आई कडे सोपवत त्यांनी आत ऑपेरेशन थिएटर मध्ये धाव घेतली होती.

ते आत येतानाच बाळाला बाहेर आणले गेले होते...! बालरोग तज्ञांनी त्याला काचे च्या पेटीत ठेवले होते.....पूर्ण वाढ होई पर्यंत उपचार तिला देणे आवश्यक होते. पण त्या आधी त्या छोट्या बाळाला स्वच्छ करून करण्यासाठी सिस्टर कडे देण्यात आले होते..... तेव्हा आपल्या मुलीला आधी त्यांनी पाहिलं... तेव्हा त्याला मुलीचा बाप आणि मुलाचा बाप ह्यातील फरक लगेच समजून आला .. सावनी चे आई वडील एवढे काळजी का करायचे हे त्याच्या लक्षात आले.... तिला काचपेटीतून पाहून तो सावनी ला बघायला तिकडे धावला......

पण जेव्हा तो आत आला पाहतच राहिला.......तेव्हा डॉ. सतीश सावनी च्या छातीवर  शॉक ट्रीटमेंट देऊन तिला शुद्धीवर आणायच्या प्रयत्न करत होते...!

तिचा श्वास,  नाडी पूर्णपणे थांबले होते एव्हाना..! पण शेवटचा प्रयत्न म्हणून डॉ. सतीश प्रयत्नात होते....
तीन चार वेळा स्ट्रोक देऊनही काहीही फायदा झाला नाही..! सगळ्यांनी होतील तेवढे सगळे प्रयत्न केले..... पण अखेर सर्वानीच हात टेकले नियती पुढे...!

सावनी नाही राहिली....... असे मानेने सांगत डॉ. सतीश देखील हताश होऊन बाजूला झाले..!

पण दोन वर्षा पुर्वी अनुराधा ला गमावलेल्या डॉ. अजिंक्य ना मात्र हा धक्का सहन झाला नाही..! तो तसाच थरथरत सावनी जवळ गेला.....तिच्या जवळ जात... त्याने तिला अक्षरशः गदागदा हलवले... आणि तिच्याकडे पाहत ते काय काय बोलू लागला......!

" हे.... सावनी...... सावू....... परत ये...ना ग......प्लीज परत ये...! मला आणि आपल्या दोन्ही बाळांना तुझी खूप गरज आहे ग.....

सावू हे बघ.....मला माहित आहे की मी तुझा खूप मोठा अपराधी आहे.... मग मला शिक्षा द्यायला तरी डोळे उघड ग........
सावू......, मी तुझ्या सोबत जे काही केले ते माझे प्रेम असले तरी ते अव्यक्त होते..!
आणि अजाणतेपणाने तुझ्या सोबत केलेला प्रकार, हा माझा अपराध..!
पण त्याचा परिणाम... तुझ्या पोटी असेल अशी पुसटशी कल्पना देखील आली नाही मला कधीच...!
जर तर च्या गोष्टी बोलून आता काहीच उपयोग पण नाही...!
सावू..., तुझं एवढं प्रेम होत पण कॉलेज मध्ये तु कधीच का ग एक्सप्रेस केले नाहीस.......?
मला माफ कर ग..... मी स्वार्थी झालो....... अनुराधा आपल्या मध्ये होती तेव्हा.. आणि जेव्हा ती गरोदर आहे हे समजले तेव्हा त्या आनंदात मी सारे विसरून गेलो होतो..!
तिला सारे सुख देण्याचा प्रयत्न करत होतो..! पण ती देखील अशीच फसवी निघाली...! तिला लग्नाच्या आधीपासून काही त्रास होत होता.. हे तिने आधीही सांगितले नाही आणि नंतर तो त्रास वाढल्यावर देखील माझ्या पासून लांब लांब राहत आली..... ती आधी बोलली असती तर काहीतरी केल असत ना ग....... आणि कदाचित तुझ्यावर ही वेळ नसती आली.....

सावू.....मी सगळ्यांसमोर हे मान्य करतो....... की खूप कधी पासून मी तुझ्या प्रेमात होतो हे खरे पण मी अनुराधा सोबत असताना कधीही ते तोंडातून मनातून बाहेर येऊ दिले नाही......
ती मला अर्ध्यावर सोडून गेली.. तरीही मी शांत राहिलो होतो. कारण विहंग आणि त्याच्याच मुळे पुन्हा आयुष्यात आलेली तू..!

पण आता तू देखील... मला सोडून जाऊन फसवले आहेस..! माझ्या त्या वेळच्या बेजबाबदार पणे वागण्याची एवढी मोठी एवढी मोठी शिक्षा मला देते आहेस... सावनी...... सावू....  उठ ग ...!

तु मला नेहमी म्हणायचीस ना माझा होशील ना??? पण मी पूर्णपणे तुझा झालो नाही कधीच... कधीतरी अनुराधा, कधी विहंग तर कधी परिस्थिती.... आज मी फक्त तुझा आहे..... आणि ह्यासाठी च तुला जागे व्हायचं आहे...... सावनी आज मी तुला विचारतो..... परत माझी होशील ना?


सावू..... मला कोणतीही शिक्षा दे.... पण मला एकटा पाडून आपल्या पिल्लांना पोरके करून जाऊ नकोस...
नको जाऊस..... नको जाऊस....."

असे म्हणत ढसाढसा रडत तिच्या अंगावर कोसळला.....

एव्हाना तिथे असणाऱ्या सगळ्यांना सावनी बद्दल समजलं होत....

इकडे तिचे जन्मदाते आई वडील..डॉक्टर निनाद आणि रेवती पंडित.....दोघेही हतबल झाले होते...... आपल्या डोळ्या समोर आपल्या मुलाला काही होणे कोणते आई वडील सहन करतील?? आणि ह्या दोघांनी तर किती भोगलं होत........ त्यांनी तिच्यासाठी सगळे करून... स्वतः च्या आवडी-निवडी बाजूला ठेऊन, तिला हवे तसे जगू देत होते अगदी तिच्या लहानपणापासून.....ती म्हणाली ते करू दिले, ती म्हणाली तिथे जाऊ दिले, तिला लग्न नव्हतं करायचं तेव्हाही साथ दिली..... आणि अजिंक्य सोबत लग्न करण्याच्या निर्णयाला देखील त्यांनी आनंदाने संमती दिली.......आणि तसेच आलेल्या प्रत्येक प्रसंगात तिच्यासाठी तिची साथ द्यायला  भक्कमपणे उभे राहिले,......

डॉक्टर निनाद आणि रेवती ह्यांच्या दोघांच्या ही डोळ्या समोर ते काही वर्षा पूर्वी चे प्रसंग जसे च्या तसे उभे राहिले होते........सावनी सोबत घडलेला तो प्रसंग आणि ती कोमात गेली..... तेव्हाचे ते दिवस..... रोज देवाला प्रार्थना करत त्यांचे गेले..... सावनी त्यांचे एकुलते एक अपत्य..... त्यामुळे त्या दोघांना दिवस उगवला की सावनी शुद्धीवर येईल अशी आशा लागून राहायची.... पण दिवस मावळते बरोबर ती आशा सुद्धा मावळायची.... तरी सुद्धा आपला धीर न हरता ते पुन्हा एकमेकांच्या साथीने उभे राहायचे.......विहंग चा जन्म झाला तो दिवस देखील त्यांना आता ठळकपणे आठवत होता.

सावनी ने त्या बाळाला जन्म दिल्यावर देखील ती कोमा मध्ये च होती.. तेव्हा त्या बाळाचे काय करायचे हा प्रश्न पडला होता त्या दोघांना.........! त्यासाठी ते दोघांनी डॉक्टर गीतांजली ह्यांच्याशी बोलायचं ठरवलं... ते तिला भेटायला गेले... तेव्हा त्यांनी सावनी च्या बाळाला घेतलं होत.... त्याना आत येताना पाहून त्याना आनंद झाला.....

" दादा... बाळ बघ ना.....किती गोड आहे ना...!!!!. अगदी आपल्या सावू वर गेलंय...."

त्याच्या कडे कौतुकाने पाहत डॉक्टर गीतांजली म्हणाल्या....

त्यांच्या अश्या बोलण्यावर ते दोघेही त्या बाळा कडे पाहू लागले.....

" खरंच हो... बाळ खूप cute आहे... "

आपल्या हातात त्याला घेत रेवती बाई म्हणाल्या.



आज माझ्याकडे प्रश्न नाहीत...
पण तुम्हाला पडले असतीलक्रमश
Kramsg

🎭 Series Post

View all