माझा होशील ना? भाग -80

सावनीची कथा
मागील भागात आपण पाहिलं की, सावनी ठीक होते ती मरणाच्या दारातून बाहेर आली ते फक्त आणि फक्त तिच्या मुली मुळे  आणि शुद्धीवर आल्यावर तिला अजिंक्य दिसतो.... त्याच्या वागण्यातला फरक सुद्धा तीला जाणवतो.... गप्पा गोष्टी करत तो तिला भरवतो..... आता पाहूया पुढे.....,


तिचं खाऊन झाल्यावर उडया मारत मारत विहंग तिथे येतो.... त्याला पाहून ती खूप खूष होते.... त्याच्या मागोमाग शकुंतला बाई, सतीश राव, गीतांजली आत्या आणि तिचे आई बाबा येतात..... विहंग येतो आणि तिच्या बेड वर एका बाजूला तिच्या साईड ने बसतो आणि फुल excitement मध्ये तिला बोलतो.....,


" मम्मा.... तुला माहित आहे आपली छकुली खूप गोड दिसते... सेम माझ्या सारखी.... आणि मी आता दादा झालो ना... मग मी आता गुड बॉय सारखं वागणार.... आणि लवकर बर होणार...... "


"होका..... शहाणं झालं माझं बाळ..... "

असं म्हणून तिने त्याला जवळ घेतलं..

त्यानंतर सगळ्यांनी तिची चौकशी केली.... आणि तिला आराम करायला सांगून ते सगळे देखील अजिंक्य च्या घरी गेले....

काही वेळात सावनी जवळ फीडिंग साठी छकुलीला आणण्यात आलं... तिला आपल्या जवळ घेऊन सावनीला जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणे जमणारच नव्हतं... ती छोटी सुद्धा आपल्या एवल्याश्या डोळ्यांनी आपल्या आई कडे टुकूर-टुकूर पाहत होती....




..ती तिच्या कडे पाहतच राहिली.... विहंग म्हणतो ते खरं आहे... ही छकुली खरंच त्याच्यावर गेली आहे... पण हे कस शक्य आहे... हा होऊ शकत ना... ही दोघ ही अजिंक्य ची मुलं आहेत म्हणून....असेल कदाचित....

छकुली च्या रडण्याने ती विचारातून बाहेर आली... आणि तिला दूध पाजलं.... ती शांत झाल्यावर तिने तिला सिस्टर कडे दिल.....त्यानंतर ती सुद्धा आराम करायला लागली....

*********************************


सावनी शुद्धीवर आल्यावर अजून दोन तीन दिवस तिला अंडर ऑबसेर्व्हशन ठेवण्यात आले ..आणि बेबी प्रि matuare असल्यामुळे तिला अजून पंधरा दिवस ठेवण्यात आले होते ...हळू हळू सावनी आणि तिच्या मुलीची तब्येत सुधारत होती ...आता पर्यंत सगळ्यांना सगळंच समजलं होत ...त्यामुळे नात्यांमधील गैरसमज दूर झाले होते ...आणि महत्वाचे म्हणजे अजिंक्य ला या सगळ्याची जाणीव झाली होती ....सावनी घरी आल्यावर त्याने तिची माफी मागायचं मनोमन ठरवलं होत .
त्या दोघी हॉस्पिटल मध्ये होत्या तेव्हा विहंग आणि अजिंक्य रोज त्या दोघीना भेटायला जायचे ..विहंग तर खूप खुश होता ....तिच्या जोडीला खेळायच म्हणून तो वेळेवर औषधे घेत होता जेवण करत होता ...ती कधी एकदा घरी येते असं त्याला झालं होत....


अजिंक्य ची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती .....काही महिन्यापूर्वी नको असलेले बाळ आता त्याला नजरेआड करायला सुद्धा होत नव्हतं ...सगळं एकदम आलबेल चालू होत ...सगळेच खुश होते ...


दरम्यान त्याने आधी झालेल्या प्रकारा बद्दल सावनी च्या आई वडिलांची सुद्धा माफी मागितली होती....त्यांच्या काळजी माग.च कारण जे त्याला समजलं होत....


सावनी सुद्धा आपल्या दोन्ही पिल्लाना पाहून खूप खुश होती

..दोन दिवसात सावनी आणि छोटीला डिस्चार्ज मिळाला ..तेव्हा तिला घ्यायला सुद्धा विहंग आणि अजिंक्य गेले होते आणि त्यांच्या सोबत होती वेदिका.........जेव्हा सावनी छोटीला घेऊन घरी आली ..दारातच एक मोठी रांगोळी काढली होती आणि ती आत मध्ये येत होती तेव्हा दरवाज्यात उभं ठेऊन शकुंतला बाईंनी तीच औक्षण केलं ...सावनी चे आणि छोट्या छकुलीचे दुधाने पाय धुतले ..


त्यानंतर तिने घरात प्रवेश केला तर ती पाहतच राहिली ...... तिचे आई बाबा आणि सासरे हातात फुल घेऊन दोघींवर वर्षाव करत होते..... पण तो वर्षाव करताना दोघीना काही त्रास नाही झाला पाहिजे..... ह्याची देखील काळजी घेत होते...... त्यांचं घर सुद्धा पूर्ण फुलांनी सजवलं होत ..मध्ये मध्ये पिंक बलून लावले होते ......अजिंक्य ने पुढे होऊन छकुलीला हातात घेतलं आणि तिचे पाय कुंकू मध्ये बुडवून एका कपड्यावर तिच्या पायाचे ठस्से घेतले ...



त्यांनतर त्या फुलांवरून चालत सावनी आत मध्ये गेली ....शकुंतला बाईंनी तिला आधी देवाचं दर्शन घ्यायला सांगितलं ...तस तिने छकुलीला घेऊन आधी दर्शन घेतलं आणि मग त्याच फुलांवरून आपल्या रूम मध्ये गेली .....तिथे सुद्धा अजिंक्य ने तिच्यासाठी सरप्राईझ ठेवलं होत ...ती रूम सुद्धा पूर्ण डेकोरेट केलेली होती... आणि वेगळ्या प्रकारे.... वेलकम बेबी असं मोठ्या अक्षरात लिहिलं होत....



बेड वर फुलांनी हार्ट शेप बनवला होता ...तो खास विहंग ने तयार केले होते त्याच्या लाडक्या बहिणीसाठी ....आणि बाकीची सगळी तयारी देखील अजिंक्य करून ठेवली होती ..छकुली साठी पाळणा, नवीन धुतलेले कपडे .., मऊ टॉवेल, खूप सारी वाजणारी खेळणी ज्याने  अर्धी रूम भरून गेली होती ...सावनी ला ते सगळं पाहून खूप भरून येत होत ....तिच्या गरोदर पणात त्याने ज्या चुका केल्या त्याची भरपाई त्याला आता करायची होती ....

सावनी ची सगळेच आपल्या परीने काळजी घेत होते ...छोट्या छकुली सोबत खेळताना विहंग सुद्धा खूप खुश असायचा आता त्या च्या तब्येतीत सुद्धा बऱ्यापैकी सुधारणा होत चालली होती .....

एके दिवशी ते सगळे नाश्ता करत बसले असताना ...,विहंग अजिंक्य ला विचारतो ...

"ड्याडा ...आपण छकुलीच नाव कधी ठेवायचं ...."

'अरे आपण तीच बारसे करू ना तेव्हा ..."

अजिंक्य विहंग ला भरवत म्हणाला....

"पण बाळाचं नाव तर आत्या ठेवते ना ...पण तिची आत्या तर ..."

असं म्हणून शकुंतला बाईनी आपल्या भरून आलेल्या डोळ्यांना पदर लावला ...कारण सतीश ह्यांनी तो विषय नको म्हणून त्यांना खुणावले होते ..पण नेमकी ते सावनी ने पहिले ...

"मग आज्जू आपण कधी करायचं छकुलीच बारसे ...?"

विहंग ने परत विचारले....

"लवकरच करू ...आपण आजीला च विचारूया ना..."

त्यांचा मूड बदलवण्यासाठी अजिंक्य म्हणाला...,

"आजी सांग ना ग ...कधी करायचं बारसे ...?"

आपल्या आजी जवळ उठून जात विहंग म्हणाला....

"आपली छकुली सव्वा महिन्याची झाली कि करूया हा ..."

त्यावर शकुंतला बाई म्हणाल्या....

"बापरे....!!!!म्हणजे आता फक्त ८ च दिवस बाकी आहेत ...आई मी तयारीला लागतो हा ...खूप जोरात बारसे करूया आपल्या छकुली चे आपण.... काय विहंग "


अजिंक्य विहंग ला म्हणाला....


" yes... ड्याडा....मीपण हेल्प करणार.... मी मोठा दादा ना..... "

त्याच ते बोलणे ऐकून सगळे हसायला लागले....

डॉक्टर सतीश ह्यांना सुद्धा खूप छान वाटत होत... खूप दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले होते....

शकुंतला बाईंना सुद्धा कुणाची तरी आठवण आली आणि त्या तिथून निघून गेल्या....

तर सावनी अजिंक्य ला बहीण आहे ह्याच shocked मध्ये होती.....अजिंक्य आपल्याला काहीच बोलला नाही ह्याच तिला राहून राहून आश्चर्य वाटत होत...


आणि अजिंक्य गेला बारस्या ची तयारी करायला.....आणि विहंग सुद्धा उड्या मारत त्याच्या मागे गेला...

छोटी छकुलीच्या बारस्याला आपल्याला सुद्धा जायचं आहे हा....

चला मला छोटी च नाव ठेवायला मदत करा...
काय नाव असेल बर तिचं....??

🎭 Series Post

View all