माझा होशील ना? भाग -81

सावनीची कथा
मागील भागात आपण पाहिलं की छकुली च्या आगमनाने सगळेच खूप खूष आहेत....त्यानंतर विहंग छकुली च्या नाव ठेवण्या बद्दल बोलतो.... तेव्हा अजिंक्य तिचं बारसे करायचे ठरवितो..... आता पाहूया पुढे....,


शकुंतला बाई नी एक चांगला मुहूर्त पाहून छकुलीच बारसे करायचे ठरविले.... त्यानुसार पुढच्या पंधरा दिवसात एक चांगला मुहूर्त होता..... म्हणून अजिंक्य आता पासूनच तयारीला लागला होता..... त्याने आधी त्याच्या आई सोबत बसून पाहुण्याची यादी बनवली, नंतर वडिलांना विचारलं आणि सावनी सोबत सुद्धा कुणाला बोलवायचं कुणाला नाही ह्याची लिस्ट बनवायला तो गेला...

सावनी तेव्हा छकुली ला झोपवून गॅलरी मध्ये बसून कॉफी पीत होती... तो तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिला विचारलं....,

"सावू... ही लिस्ट पहा..बारशाला कुणा कुणाला बोलवायचं ह्याची आहे.... .. ह्यात चेक करून तू सांग.... कुणाला ऍड करू आणि कुणाला नाही बोलवायचं.... "

असं म्हणून त्याने ती लिस्ट तिच्या हातात दिली.... त्या लिस्ट वर एकवार नजर फिरवून ती म्हणाली....,

"अजिंक्य एक नाव ह्या लिस्ट मध्ये ऍड कर ..."

"हा बोल ना कुणाचे ..? "

अजिंक्य तिला म्हणाला.....

"आपल्या छकुलीच्या आत्याचे ...पण ह्यात छकुलीच्या आत्याच तर नावंच नाही आहे..."

ते ऐकून त्याच्या हातातला पेन हातातच राहिला ..

" सावनी हे काय मध्येच..... तिला आत्या नाही आहे...."

अजिंक्य तिची नजर चोरत म्हणाला....

"अजिंक्य माझ्या कडे बघ आणि बोल बर ....काय लपवत आहेस तू ...मुळात तुला बहीण आहे हेच मला माहित नव्हतं आणि आता तरी सांगणार आहेस का?"

सावनी  त्याला म्हणाली....

"सावनी हा विषय नको प्लीज...."

अजिंक्य तिला अडवत म्हणाला...

"म्हणजे असं काय झाल आहे आणि कुठे आहे तुझी बहीण......??बोल ना.........प्लीज तुला छकुलीची शपथ"

सावनी काही ऐकणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.... तो काही बोलत नाही हे बघून ती म्हणाली.....,

"अजिंक्य आता तरी बोल रे ........"

तिच्यापासून काही लपवता येत नाही ते पाहून तो म्हणाला.......

"सावनी खरं तर हा विषय आमच्यासाठी ना खूप कधीच बंद झाला आहे..पण आता ती काय करते कुठे आहे? हे आमच्या पैकी कुणालाच काहीही माहिती नाही..."

तो हताशपणे म्हणाला.....त्यावर तिने त्याला विचारलं....

"अजिंक्य....., मग तुम्ही तिच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला नाही का.....?"


"केला पण तिला ते नको होत.... "


तो हताश होत म्हणाला.....

"काय झालय नेमकी कळेल का मला....? "

सावनी ने अजिंक्य ला विचारलं....

"सांगतो....अदिती माझ्या पाठची बहीण ...आमच्या घरातलं शेंडेफळ ...मुलगी म्हणून तिचे खूप लाड झाले अगदी तिच्या लहानपणापासून च..........आई बाबानी आम्हा दोघांवर कधीही कसलेही बंधन नाही टाकले कधीही ...तू हि पाहतेस ना ते दोघे किती समजूतदार आहेत ..अदिती जेव्हा कॉलेज ला गेली तेव्हा ती एका टपोरी, सिगारेट फुंकणाऱ्या,  उनाडक्या करणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली...... तस तर लव्ह मॅरेज ला घरातून कधीच विरोध नव्हता ..पण हि ऐकेनाशी झाली ...त्याच्याशीच मला लग्न करायचा आहे असा हट्ट करू लागली....आई बाबाना आणि मला तो मुलगा पसंत नव्हता ...आमचं म्हणणे होते कि तू तुझं शिक्षण पूर्ण कर , स्वतःच्या पायावर उभी राहा आणि मग तुला वाटेल ते कर .....त्यात तो मुलगा शिकलेला सुद्धा नव्हता ...पण अल्लड वयातील प्रेम ...तिला ज्या दिवशी अठरा वर्ष पूर्ण झाली त्याच दिवशी ती घरातून पळून गेली कुणाला काहीही न सांगता ...


हे सगळं ऐकून सावनी ला धक्काचं बसला... एवढ्या सुशिक्षित घरातील मुलगी विचार न करता असं कस वागू शकते.... पण मध्ये काहीही न बोलता ती अजिंक्य च बोलणे ऐकू लागली....

"आम्ही तिला खूप शोधल...... पण नाही मिळाली ती..... एके दिवशी ती बाजारात फिरताना आईला दिसली.....तिने त्या मुलासोबत लग्न केल होत.....तिला पाहून आई तिच्या जवळ गेली आणि आपल्या  घरी चल असे म्हणू लागली तर तिने तिथल्या एका पोलिसाला बोलावून थेट आई ची तक्रार केली.... की ही बाई माझ्या वर जबरदस्ती करते...तो पोलीस तिच्या तक्रारीवरून आई ला स्टेशन ला घेऊन गेला होता पण नशिबाने तिथले पोलीस कमिशनर आपल्या बाबाचे मित्र होते ....म्हणून तिला अटक केली नाही..... घरी आल्यावर तिच्या काळजीने आई आजारी पडली.... गेले पंधरा दिवस हॉस्पिटल मध्ये होती..... आई ची तब्येत बिघडले हे तिला सांगूनही ही आली नाही.....तिथून बाबांनी आम्हा सगळ्यांना बजावला की तिचं नाव नाही घ्यायचं नाही....त्या दिवसापासून तिचा आणि आमचा काहीही संबंध नाही आई सोबत तिने असं केल म्हणून आम्ही परत तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही..... हा आठवण येते पण ऑपशन नाही …"

एवढं बोलून तो शांत झाला.....त्यावर सावनी ने त्याला विचारलं.....

"समजा ती आपल्याला भेटली तर परत......?"

" पण तिलाच यायचं नाही आहे परत......तू सोड हा विषय आपण छकुलीच्या बारस्याची तयारी करूया... "


अजिंक्य म्हणाला....

"हम्म करूया...."

तेवढ्यात छोटी छकुलीच्या रडण्याचा आवाज आला तस सावनी तिच्या कडे गेली. पण तिच्या डोक्यात तेच विचार चालू होते.....


इकडे अजिंक्य तयारीला लागला... त्याने कॉल करून सगळ्यांना इन्व्हिटेशन दिले... सावनी च्या घरी, तिच्या आत्याच्या घरी, तसेच अनुराधा च्या माहेरी आणि अजून मित्र मैत्रिणींना बोलावलं...... लेकीच्या बारस्याच त्यांना खूप मनावर घेतलं होत.... त्यानंतर त्याने जेवणाची ऑर्डर सुद्धा देऊन टाकली होती....

**********************************


सावनी ची डिलिव्हरी झाल्यापासून वेदिका ला काही काम नव्हतं...कारण शकुंतला बाई कधीतरी च बाहेर पडत असायच्या.... पण तरीही वेदिका ला पगार मात्र वेळेवर मिळायचा.... त्याची जान ठेवून ती घरची कामे करायला पाहायची... पण सावनी ने तिला तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करायची सक्त ताकीत दिली होती.... पण ती सावनी साठी तिथे यायची आणि तिला हवं नको ते पाहायची... सावनी ची आणि तिची खूप गट्टी जमली होती....

एक दिवशी छकुलीला खेळवता खेळवता वेदिका सावनी ला म्हणाली......

"दीदी तुला एक गोष्ट सांगू का? "


"हा सांग ना तू परमिशन कधी पासून घ्यायला लागलीस? "
सावनी हसत हसत तिला म्हणाली....

" अग ना काही दिवसांपासून मी पाहते.... म्हणजे तू हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतीस तेव्हापासून.... एक बाई ना.... आपल्या घराच्या आजूबाजूला एका ठराविक वेळेला येते आणि काही वेळ घुटमळून निघून जाते.... तेवढा वेळ मी तिच्यावर लक्ष ठेवते... पण ती बाकी काही न करता निघून जाते..... "


वेदिका सावनी ला म्हणाली..... तशी सावनी सुद्धा विचारात पडली.....

" अग ती चोरीच्या उद्देशाने तर येत नसेल?"

सावनी ने आपली शंका व्यक्त केली....

"मला नाही वाटत कारण तस असत तर दीदी ह्या चार पाच महिन्यात मग चोरी झाली असती ना.... कारण तुम्ही हॉस्पिटल मध्ये असताना तर घर बंद असायचं....मला तर वाटत दुसरंच काहीतरी कारण असेल... पण ती आत का येत नाही हे मला पडलेले कोडेच आहे......"

वेदिका सावनी ला म्हणाली आणि का कुणास ठाऊक पण सावनी च्या डोक्यात ती अदिती तर नसावी असा विचार आला.... कदाचित ती गेल्या दोन दिवसांपासून त्याच विचारात आहे म्हणून ही असावं......काहीतरी विचार करून ती वेदिका ला म्हणाली.....


"वेदिका.... ती कोणत्या वेळेला येते.....? "


वेदिका का ने घड्याळ पाहिलं आणि म्हणाली....

अजून अर्ध्या तासात येऊ शकते ती दिदी......माझ्या अंदाजा नुसार......

"ठीक आहे.... आता आली की मला दाखव..... "

"ठीक आहे सांगते..... "

असं म्हणून वेदिकाने छकुलीला घेतलं आणि ती तिला घेऊन बाल्कनी मध्ये गेली..... इकडे सावनी जर ती अदिती असेल तर काय करायचं ह्याचा विचार करू लागली.....



कोण असेल ती व्यक्ती?

छकुली च बारसे आहे तर नक्की या हा...... परत म्हणून नका आम्हाला अजिंक्य ने इन्व्हिटेशन दिल नाही.....
Kramash

🎭 Series Post

View all