माझा होशील ना? भाग -83

सावनीची कथा


मागील भागात आपण पाहिलं कि सावनी आणि वेदिका ला अदिती भेटते ..ती त्या दोघीना आपल्यावर ओढवलेली परिस्थिती सांगते ते ऐकून दोघीना खूप वाईट वाटत....
.आता पाहूया पुढे.......,

"वाहिनी अग काही वर्ष तो चांगला वागला.... त्यानंतर तो मला इकडून उत्तर प्रदेश ला घेऊन गेला... पैशासाठी त्याने माझ्या शरीरा चा लिलाव केला ग..... रोज रात्री नवीन कुणीतरी..... फसली ग मी....वाहिनी.... फसली...एक ही दिवस माझा सुखात गेला नाही......"

अदिती रडत रडत म्हणाली....


"अग मग तेव्हाच इकडे यायचं ना...?"

सावनी ने तिला विचारलं......


" कस येणार वाहिनी... एक तर मी कुठे होती तेच मला माहित नव्हतं.... आणि तो मला पैसे देत नव्हता ....त्यामुळे माझ्याकडे पैसे पण नसायचे निघून यायला...मी कशी तरी काही वर्षा पूर्वी त्याच्या तावडीतून सुटली... आणि इकडे निघून आली.  ... पैसे नसल्यामुळे.... चालत, भीक मागत मी कशी तरी इकडे मुंबई ला आली... पण घरच्यांसमोर यायची माझी हिम्मत नाही... पण आई ला पाहावं म्हणून मी इथे येते.... बाकी माझा काहीच हेतू नाही आहे....."


अदिती म्हणाली... ते ऐकून सावनी ला खूप वाईट वाटल....


"मग तुला एकदा त्यांची माफी मागायची इच्छा नाही होत का....?"


सावनी ने तिला विचारलं....


"कुठल्या तोंडाने त्यांची माफी मागू वाहिनी? आणि एवढं वाईट वागून ते तरी मला माफ करतील का?"

एक मोठा श्वास घेऊन अदिती म्हणाली...

"तू प्रयत्न तर कर माफी मागण्याचा..."

सावनी तिला हिम्मत देत म्हणाली.....

" माझी हिम्मत नाही होत त्यांच्या समोर यायची वाहिनी.... "

ती सावनी चा हात हातात घेत म्हणाली....

"पळून जायला केलीस ना हिम्मत मग तिचं आता कर.... अग आई वडील आहेत ते मुलं चुकली तर ओरडणार तेच आणि माफी ही तेच देणार .."

तिने ठेवलेल्या आपल्या हातावर हात ठेवत सावनी म्हणाली.....

"पण वाहिनी...."

अदितीच्या चेहऱ्यावर असलेली भीती साफ सावनी आणि वेदिका ला दिसत होती....

"आदू...., अग मी आहे ना तुझ्यासोबत तू एकटी नाहीस.... एवढ्या मोठ्या दळदळीतुन तू बाहेर पडलीस ना... आणि आता तर स्वतःच्या माणसाने मध्ये आहेस......तरी घाबरतेस.... तुझं एक पाऊल तुला जसं ह्या घरापासून दूर घेऊन गेलं तस च तेच पाऊल तुला ह्या घराजवळ घेऊन येईल..... प्रयत्न तर करून पहा....."

सावनी च्या ह्या बोलण्यावर अदिती विचारात पडली... पण तिच्या बोलण्याचा अदितीवर पॉसिटीव्ह परिणाम देखील होत होता..... त्यामुळे सावनी परत वेदिका ला आवाज देऊन म्हणाली.....,


"वेदिका....., अदिती साठी कडक चहा कर आणि त्यात गाठी शेव घालून आण....."

ते ऐकून खाली घातलेली मान वर करून अदिती म्हणाली.....

"वाहिनी.... तुला माझी आवड कशी माहित....."

ते ऐकून हसत सावनी म्हणाली.....

"अजिंक्य ने सांगितली..... सांगत नसले तरी त्या तिघांना तुझी खूप आठवण येते...."

हे ऐकून अदितीला थोडी तरी हिम्मत आली आणि ती म्हणाली....

वाहिनी.... मला माफी मागायची आहे ग सगळ्यांची... मग कुणी स्वीकारलं नाही तरी चालेल.... मला एकदा माफी मागून मोकळ व्हायचं आहे.......

हेच ऐकायला कधी पासून आतुर असलेली सावनी तिला म्हणाली....,

"हो ना..... मग माझ्याकडे एक प्लॅन आहे.... सांगू...का
..... म्हणजे तुझी तयारी असेल तर....."

एव्हाना अदितीचा सावनी वर खूप विश्वास बसला होता... तिला कळलं होत की एक तिचं आहे जी तिची मदत करू शकेल.....आणि ती सावनी ला म्हणाली....,

"हा सांग वाहिनी तू सांगशील तस करेन...."


लगेच आपल्या भन्नाट डोक्यातून बाहेर निघालेला प्लॅन ऐकवायला सावनी तयार झाली.... तिने वेदिका ला आवाज दिला.......

"वेदिका तू पण ये इकडे.... ह्यात तूपण सामील असणार.............., तर ऐका....

...............

................समजलं ना......."

असं म्हणून सावनी ने त्या दोघीना प्लॅन सांगितला....त्यावर त्या दोघीनी आपल्या माना डोळावल्या...

छान प्लॅन आहे....... म्हणजे मला माफ करायचे चान्स आहेत तर.......पण वाहिनी तोपर्यंत मी काय करू....

अदिती तिला म्हणाली.... कारण आता परत तिला भीक मागून खायचं नव्हतं...

तोपर्यंत तू माझ्या घरी चल... चालेल ना दीदी..... नेऊ ना मी तिला...

एवढा वेळ शांत असलेली वेदिका तिला म्हणाली....

"हा का नाही चांगली आयडिया आहे.... तू वेदिका सोबत राहा.... आणि मी सांगेन तेव्हा ये....."

ते ऐकून अदिती तिच्या कडे पाहायला लागली.... तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह सावनी ला समजला होता.....


"काळजी करू नकोस.... ही वेदिका आपल्या घरचीच आहे... तिच्या कडे तू सेफ राहशील.... "

त्यावर लगेच अदितीने तिला होकार दर्शविला....

एव्हाना तिचा चहा पिऊन झाला होता.... आणि शकुंतला बाई येण्याची वेळ देखील झाली होती म्हणून अदिती वेदिका सोबत निघून गेली.... इकडे सावनी मनोमन देवाला प्रार्थना करत होती..... देवा प्लीज ठरवलंय तसच होऊ दे...आता पर्यंत तू खूप साथ दिलीस.... जशी माझी लेक मला मिळाली... तशीच आई बाबा ना पण त्यांची लेक मिळू दे प्लीज.....!!!!


------------------------------------------------------------


किती तरी दिवसांनी आज देशपांडेंच्या घरात एकदम  लगबग चालू होती..... कारण होत छोट्या छकुलीचा बारसे.......आदल्या च दिवशी अजिंक्य पूर्ण घर फुलांनी सजवून घेतलं होत ...वेगवेगळी रंगसंगती वापरून एकदम सुंदर असं डेकोरेशन केलं होत त्याने.......लग्न असल्या सारखं वातावरण तयार झालं होत .......

दारापुढे वेदिका ने सुंदर अशी रांगोळी काढली होती . जी पाहून सगळ्यांचे भान हरपत होते.....




तर सतीश रावांनी जेवणाचं सगळं सांभाळलं होत......कारण अजिंक्य ने हि जबाबदारी त्यांच्या वर सोपवली होती ...जेवणात सुद्धा व्हरायटी होती......जिरा राईस ,वेज बिर्याणी, पुरणपोळी ,श्रीखंड पुरी, मशरूम आणि पनीर ची भाजी , वेगवेगळे स्टार्टर तसेच गोड मध्ये बासुंदी आणि गुलाबजाम ठेवले होते ....सगळं एकदम फक्कड झाले होते ......

जेवणा चा आणि फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळला होता ...तर सावनी ने त्या दिवशी घालण्यासाठी म्हणून तिच्या पैठणी साडी वर म्याच होईल असा कोट अजिंक्य आणि विहंग साठी शिवून घेतला होता.......तर छोट्या छकुलीला त्याच पैठणीला मिळताजुळता फ्रॉक शिवला होता ...सगळं कस मॅचिंग मॅचिंग.......


आणि बाकी सगळ्यांना पिंक कलर चे कपडे घालून येण्याची थिम दिली होती ......( हा पिंक कलर काय अजिंक्य चा फेव्हरेट आहे की काय...... सगळंच कस ते पिंक पिंक म्हंटल ?....).


आणि ह्या समारंभाच खास आकर्षण म्हणजे.......अजिंक्य एक छानसा आणलेला पाळणा......



छकुली साठी त्याने खास चांदीचा पाळणा तयार करून घेतला होता.......त्यावर चारही कोपऱ्यांना पोपट बनविले होते......आणि पाळणा कमळाच्या फुलांनी सजवला होता..... छकुलीला आत झोपवण्यासाठी रेशीम चा कपडा सुद्धा त्याने आणला होता..... कुठेच कमी ठेवली नव्हती अजिंक्य ने.....


सगळ्या पाहुण्याचे आगमन झाले होते ...पाहुणे आत मध्ये येत असताना अजिंक्य स्वतः त्यांना पिंक रंगाचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करत होता.......



एकंदरीत वातावरण खूप आनंदी होत......सगळेच खूप खुश होते सावनी आणि अजिंक्य साठी ...

जोरदार तयारी केली आहे अजिंक्य ने..... कसली भारी रांगोळी काढली वेदिकाने.... मी तर चालली बारसं अटेंड करायला....गुलाबजाम फेव्हरेट ना..... ते खायचे आहेत...... तुम्ही येताय ना......
आणि काय आवडले ह्यातले तुम्हाला सांगा हा.....

🎭 Series Post

View all