माझा होशील ना? भाग -84

Savnichi Katha
मागील भागात आपण पाहिलं की, सावनी ला अदिती आपली हकीकत सांगते.... तेव्हा सावनी तिला घरच्यांची माफी मागायला सांगते त्यावर अदिती मला हिम्मत नाही असं बोलते...त्यावर सावनी तिला हिंमत देते.... आणि छकुलीच्या बारश्या ची तयारी सुरु होते... अजिंक्य सगळे दणक्यात सुरुवात करतो.... आता पाहूया पुढे....,


एकंदरीत वातावरण खूप आनंदी होत......सगळेच खूप खुश होते सावनी आणि अजिंक्य साठी......


सगळे पाहुणे जमले..... शिवाय भटजी सुद्धा आले होते.... छकुली ची एक विधी करायची होती...... त्यामुळे शकुंतला बाईंनी अजिंक्य ला सावनी आणि छकुलीला बोलवायला वर पाठवला...... तो त्या दोघींना घ्यायला वर गेला तर सावनी आरशात पाहून तिची साडी नीट करत होती.........तो तिच्या कडे पाहतच राहिला ...तिने एकदम टिपिकल लुक मध्ये खूपच सुंदर दिसत होती.......तिने मस्त चापुनचोपुन जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती , चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि केसांचा मागे बांधलेली सुंदर हेअर स्टाईल.... त्यावर मध्ये ब्रॉच आणि बाजूला भर गच्च गजरे.......नाकात नथ आणि गळ्यात त्यावर मॅचिंग नेकलेस .......खूप सुंदर दिसत होती ती....त्याला पाहून सावनी मागे फिरली आणि तिने त्याला विचारलं ...,


"काय रे डॉक्टर......! कुठे हरवलास.....?"

"तुझ्यात..... डॉक्टर सावनी..... मी काय म्हणतो...डार्लिंग ... आपण खाली जायचंच कॅन्सल करूया......."

अजिंक्य लाडात येत म्हणाला...

"होका ....!! आणि काय करायचं? "

आपल्या गळ्यातील नेकलेस सावरत ती म्हणाली...

तस अजिंक्य ने पुढे होत तिच्या गळ्यात आपले हात गुंफळे आणि तो म्हणाला...

"काय करायचं असं......आपण आपला सेकंड हनिमून साजरा करू या.... काय म्हणतेस....?. "

तिला डोळा मारत अजिंक्य म्हणाला...
तशी लाजत सावनी म्हणाली....,

"चल काहीतरीच तुझं आपल....!"

"अग खरच किती गोड दिसतेस तू ......असं वाटतंय.... असच खावं तुला....... आणि माझीच नजर लागेल बघ तुला..."

अजिंक्य म्हणाला...

"हा....पण आजचा दिवस माझा नाही आपल्या मुलीचा आहे म्हंटल विसरू नका.... आज आपल्या मुलीच बारसे आहे..... तेव्हा चला खाली ..."


सावनी त्याचे गळ्यातील हात काढत म्हणाली...

"अरे हा....... चला मग सगळे जमलेत.....कुठे माझी प्रिन्सेस....?"

आता कुठे अजिंक्य ला आठवलं तो सावनी ला बोलवायला आलेला

तस सावनी ने तिला पाळण्यातून काढली....

ती आताच झोपे तून उठली होती आणि डोळे किलकिले करून त्या दोघांकडे टुकूर टुकूर पाहत होती ..तस अजिंक्य सावनी ला म्हणाला....,


"आई शपथ.... सावू.... माझी प्रिन्सेस तर तुझ्यापेक्षा सुंदर दिसते...... "


"हाना...!! थांब तिची नजर काढते....."

असं म्हणून सावनी ने पटकन तिची नजर काढली आणि आपल्या डोळ्याचं काजल तिच्या काना मागे लावलं.....तस तिचा तोच हात घेऊन तिच्याच हाताने अजिंक्य ने सावनी च्या कानामागे काजल लावले....त्याची ही कृती तिला आवडली तरी देखील ती म्हणाली....,

"अरे हे काय.....? "

" तुला सुद्धा नजर नको लागायला सावू..... "


असं म्हणून त्याने त्या दोघींच्या माथ्यावर आपले ओठ टेकवले आणि तो त्या दोघींना घेऊन खाली गेला ..


त्याच कलरच्या त्या पैठणी जाकीट मध्ये अजिंक्य सुद्धा खूपच हँडसम दिसत होता ...

जिन्या वरून उतरत असताना अजिंक्य ने केलेले डेकोरेशन सावनी ला खूप आवडले... ते ज्या जिन्यावरून उतरले तो सुद्धा खूपच मस्त डेकोरेट केलेला....उतरत असताना पायाला लागणारी ती फुले तिला स्पेशल असल्याची जाणीव करून देत होते...




"अजिंक्य खूप सुंदर सजवल आहेस तू..... "

सावनी म्हणाली...

"तुला आवडल ना.... मग झालं....."

ते तिघे खाली आले तसे विहंग अजिंक्य जवळ गेला.... आणि अजिंक्य त्याला उचलून गेलं ...आणि फोटोग्राफर ने त्यांचा मस्त एक फॅमिली फोटो काढला ..

" बाबा... आपण सगळे सेम सेम ना... "

विहंग त्याला म्हणाला...

"येस माय बॉय...."

अजिंक्य हसत हसत म्हणाला.... आज तोपण खूप खूष होता.....

नंतर भटजी नी छकुलीला टिळक करून तिची नामकरण विधी केली..... आणि ते दक्षिणा घेऊन निघून गेले...

इकडे जमलेल्या सगळ्यांनी सावनी ला ओवाळलं आणि साडी गिफ्ट म्हणून दिली ...तसेच पाच जणींनी मस्त पाळणा म्हणत छकुलीला पाळण्यात झुलवले......

ह्यानंतर छकुलीला सुद्धा खूप सारे गिफ्ट्स मिळाले ...


इकडे विहंग ला घाई लागली होती कि छकुलीच नाव काय असणार त्याने सावनी ला तस विचारलं.....


"मम्मा.., झालं ना सगळं..... आता सांग ना आता छकुली ला काय नावाने आवाज द्यायचा..... "

"हा विहंग कळेल आपल्याला तीच नाव लवकरच ...बाळाचं नाव आत्या ठेवते ना मग आपल्या छकुलीच नांव पण आत्याचं ठेवेल"

असं म्हणून तिने वेदिका ला आवाज दिला

"वेदिका..... या तुम्ही...... "

आणि वेदिका सोबत अदिती आत मध्ये आली तिला पाहून शकुंतला बाई आणि सतीश रावांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले तर अजिंक्य तसा च तिच्या जवळ गेला  आणि तिला आपल्या छातीशी लावलं.....
शेवटी त्याच्या पाठची बहीण होती ती.....

खर तर सावनी ने ह्या सगळ्याची कल्पना अजिंक्य आणि सतीश रावांना आधीच दिली होती.....तिच्या वर काय काय प्रसंग ओढवले होते ते सगळं तिने त्या दोघं सांगितलं होत.... ..आणि त्यांना ती आज इकडे येणार ह्याचीही कल्पना दिली होती......हाच तिचा प्लॅन होता.... कारण ती अचानक आली तर नातेवाईक ह्यांच्या समोर उगाच इशु होईल.... म्हणून तिने शांतपणे त्यांना सगळं पटवून दिल आणि तिला बोलावून घेतलं....

त्यामुळे च अजिंक्य ने तिला काही ही न विचारता सरळ जवळ घेतलं....आणि म्हणाला....

"आदू.... कसा आहेस माय बच्चा....? "

अदितीने फक्त मान हलवली आणि त्याला परत बिलगली.......थोडा रडण्याचा बहर ओसरल्यावर अदिती शकुंतला बाई आणि डॉक्टर सतीश ह्यांच्या जवळ गेली .......

आणि त्यांचे पाय धरून माफी मागू लागली...

"बाबा...., मला माफ करा.....!
माझं चुकलं......मी तुमचं ऐकायला हवं होत..... मी खर तर तुमची माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे तरी सुद्धा प्लीज मला माफ करा..."


असं म्हणून ती रडायला लागली...

तस सतीश रावांनी सुद्धा तिला उठवून जवळ घेतली आणि तिचे डोळे पुसून ते म्हणाले......,

"आपलं मूल चुकलं आणि त्याची जाणीव त्याला झाली तर आई वडिलांनी माफ करायचं असत बेटा.... आमच्या मनात तुझ्या बद्दल राग कधीच नव्हता.... उलट तू आम्हाला हवी होतीस नेहमी..... आम्ही तुला शोधायला कमी पडलो.... तेव्हाच शोधल असत तर तुझ्यावर ही वेळच आली नसती......झालं ते गेलं आता तू इथेच राहायचं...."


मान हलवून तिने शाकुंतला बाई कडे पाहिलं तर ती मातोश्री आपल्या मुलीची झालेली अवस्था पाहून खूप दुःखी झाली होती....... अदितीने आपल्या आई ला पटकन मिठी मारली आणि त्यांची सुद्धा माफी मागितली आणि म्हणाली.......

"आई त्या दिवशी मी तुझ्याशी जे पण वागली त्या बद्दल सॉरी......पण मला तुमची नेहमीच आठवण येत होती.... आणि आता मी कधीच तुला सोडून जाणार नाही..... "



सगळं एकदम इमोशनल वातावरण झाल्यामुळे सावनी पुढे होत म्हणाली.......

"अरे आत्या बाई,  आपल्या भाचीच नाव तर ठेवा....."


तस हसून ती पाळण्या जवळ गेली आणि छकुलीचा कानात फुर्रर करून म्हणाली ....

"आज पासून ह्या गोड छकुलीला अवनी म्हणायचं ...अजिंक्य आणि सावनी ची अवनी....!"


अदितीने ठेवलेलं नाव सगळ्यांना खूप आवडले ....सगळ्यांनी छोट्या अवनी ला आशीर्वाद दिले ...त्यानंतर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला व घरी जातना सावनी ने सगळ्या गुलाबी रंगाचे गुलाबाचे झाड आठवण म्हणून भेट दिले......



मग नाव आवडल का....?
पुढच्या दोन तीन भागात कथा संपेल....
तेव्हा भरभरून कॉमेंट्स करा....
क्रमश

🎭 Series Post

View all