माझा प्रियकर
माझ्या दारी सजले तोरण
रांगोळ्यांनी भरले अंगण
आप्तेष्टांनी भरले माझे घर
अन् नदिपल्याड माझा प्रियकर
रांगोळ्यांनी भरले अंगण
आप्तेष्टांनी भरले माझे घर
अन् नदिपल्याड माझा प्रियकर
नजर चुकवत गेले तिथे
होता माझा प्रियकर जिथे
पाहुनी मला त्याची कळी खुलली
त्याच्या प्रेमळ नजरांनी दुनिया मी भुलली
होता माझा प्रियकर जिथे
पाहुनी मला त्याची कळी खुलली
त्याच्या प्रेमळ नजरांनी दुनिया मी भुलली
थोडावेळ त्याच्या मिठीत विसावले
शहराले अंग मन माझे सुखावले
वेळेचे होता भान पुन्हा आले परतून
त्यानेही मला घेतले होते समजून
शहराले अंग मन माझे सुखावले
वेळेचे होता भान पुन्हा आले परतून
त्यानेही मला घेतले होते समजून
घरी येता कळले येणार पाहायला कोणी
साकडे घातले देवाला मनातलाच बनावा धनी
तोच प्रियकर बनला आयुष्याचा जोडीदार
भाग्यवान मी मिळाला सुखदुःखाचा साथीदार
साकडे घातले देवाला मनातलाच बनावा धनी
तोच प्रियकर बनला आयुष्याचा जोडीदार
भाग्यवान मी मिळाला सुखदुःखाचा साथीदार