माझा होशील ना? भाग -69

Maza Hoshil Na

मागील भागात आपण पाहिलं कि अजिंक्य सावनी वर रागावतो आणि तिथून निघून वर जातो... सावनी विहंग चे औषधं द्यायचे म्हणून जागे राहते... खूप वेळ वाट पाहून देखील ते खाली आले नाहीत म्हणून त्रास होत असताना देखील ती वर चढून जाते... विहंग ला औषधं देते हे सगळं अजिंक्य पाहतो आणि थोडा पिघलतो देखील.तेव्हा तो तिला तिथे झोपायला सांगतो ... आता पाहूया पुढे......,


तो भराभर खाली गेला आणि इकडे सावनी विचारात पडली....

इकडे अजिंक्य उठून प्लेट घेऊन खाली गेला, त्याच जेवण झालेले नसल्याने त्याच्या पोटात कावळे ओरडत होते. पण आज जेवायची नाही तर पोटभर गप्पा मारत सगळा शीण घालवायची इच्छा होती म्हणून त्याने मस्त दोन मग भरून कॉफी तयार केली,

खाली असणाऱ्या विहंग च्या खोलीतून सावनी साठी तिचे ठरलेले ब्लॅंकेट आणि तिची प्रेगॅन्सी मध्ये वापरायची उशी घेतली..! ज्या शिवाय तिला झोप येत नसे...! शिवाय तिची नाइटी घेतली..... तिने कपडे बदलले नव्हते म्हणून...... हे सर्व घेऊन अवघ्या दहा मिनिटात तो वर हजर झाला......

त्याने वर येऊन तिच्या हातात कॉफी मग देऊन तिला बेड ला मागे लोड लावुन टेकून बसवले..! आता पाठीला थोडा आधार मिळाल्याने ती पण थोडी शांत झाली होती.....
मागून छान गाण सुरू होते...!

जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है
जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है
गले से लगा लूं लबों पे सजा लूं
तेरे अफ़सानों को अपना बना लूं
गले से लगा लूं लबों पे सजा लूं
तेरे अफ़सानों को अपना बना लूं
दर्द है हल्का सा मगर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है
जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है
ये तुझको खबर है,
ये मुझको पता है
जो छाया धड़कन पे चाहत का नशा है
ये तुझको खबर है,
ये मुझको पता है जो छाया धड़कन पे चाहत का नशा है दीवाना तेरा बेखबर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है
जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है
जान-ए-जां दिलों पे प्यार का
अजब सा असर हो रहा है
जो हाल दिल का इधर हो रहा है
वो हाल दिल का उधर हो रहा है


हे गाणे सुरू झाले आणि पुढे येत परत एकदा अजिंक्य ने तिला आपल्या मिठीत घेतले... आज राहवत नव्हत... आणि रहायचे पण नव्हते... शांत त्याला.... भरभरून बोलायचं होत तिच्याशी आणि स्वतःला ही मोकळ व्हायचं होत..... तिच्या कपाळावर त्याने आपले ओठ टेकवले..... आणि तिला तशीच मिठीत घेऊन तिचे हात आपल्या हातात घेऊन तो म्हणाला.....,


"सावू..... माझी ही अशीच.. या गाण्या मधील जे शब्द आहेत ना.... अगदी तशीच अवस्था झाली आहे ग..... आणि मनापासून सॉरी मी मगाशी तुझ्यावर एकदम चिडलो..! पण राग तुझ्यावर नाही तर स्वतःवरच जास्त होता मला..! म्हणून.......

मीच भावनेच्या भरात वाहत गेलो...! आवश्यक काळजी घेतली नाही.. नाहीतर आता ही आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ शकलो असतो..! तू या घरात आलीस तेव्हा मनापासून तुझे माझ्यावरील प्रेम मला समजत होते. पण एकाच घरात, एकीकडे हयात नसणारी अनु आणि दुसरीकडे समोर असणारी तू या द्वंद्वात अडकलो होतो.मी.......!

पण तुझ्या गोड स्वभावाने आणि माझ्या वरील प्रेमाने पुन्हा सगळंच बदलले.... विहंग ची आणि या घराची तु घेत असलेली काळजी पाहून तुझ्या बद्दल मला आदर निर्माण झाला......खरे तर तू तुझे प्रेम, माझ्या बद्दल असणारी अटॅचमेंट दाखवायला नेहमीच पुढाकार घेतला...! मीच कमी पडलो असे वाटले होते.. म्हणून सुरवातीचे तीन महिने भरभरून प्रतिसाद दिला.. पण..!

तिने त्याला मध्ये च थांबवत त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले आणि म्हणाली.....

"अजिंक्य आता ही तेवढंच प्रेम करते मी तुझ्यावर.. आणि ते प्रेम  आता तर माझ्या कुशीत देखील वाढते आहे, आपले प्रेम दृढ झाले आहे या जाणिवेतून... मग असे का बोलत आहेस तु....???

मला माहीत आहे की तु विहंग सोबत किती एकरूप आहेस.. तू खूप चांगला बाबा आहेस..!
खुप चांगला मित्र आणि आता नवरा देखील आहेस..! पण सतत असे जाणवते की तुला हे सोडून काहीतरी बोलायचे आहे माझ्या शी ..!! हो ना....!!!!

मग बोल ना.. काय आहे तुझ्या मनात? तुला हे मुल? मी जबरदस्ती तर करत नाहिये ना तुझ्यावर...? कारण त्या दिवशी मी तुझ्या कडे हॉस्पिटल मध्ये पडले.. तिथून पुढे आपले निवांत पणे बोलणे असे झालेच नाही..!
काय सांग ना काय आहे मनात तुझ्या? तु म्हणाला होतास कि तु मला साथ देशील पण तुझ्या वागण्यातून मला ते जाणवत नाही का...... ह्या बाळा चा स्वीकार तु मनापासून नाही केलास का??? बोल.... प्लीज "


" सावनी सांगतो..सगळं सांगतो.......आधी तू कॉफी घे बर.....!"

असं म्हणून तो उठला..... तोपर्यंत सावनी ची कॉफी संपली होती........त्याने समोरील मग बाजूला ठेवत बाजूच्या कपाटाचे दार उघडले आणि मग त्यातून एक पॅकेट बाहेर काढले...! त्यात काही फोटो होते.

ते त्याने सावनी च्या हातावर दिले आणि म्हणाला.....

"हे बघ.. आपले दिल्लीत काढलेले फोटो...! खूप महिने झाले तुला दाखवायचे होते ते.....
मी ना या  फोटो मधल्या अल्लड, आमच्या सोबत धमाल करत दिल्ली ट्रीप एन्जॉय करणाऱ्या सावनी ला खूप मिस करतोय.
खरं तर तू इथे आलीस ती  अनुराधा साठी डॉक्टर म्हणून, त्यानंतर विहंग चे आजारपण, आणि लागोपाठ आता ही प्रेग्नंसी..! ह्या सगळ्या मुळे तु जणू तुझे माझ्याशी होणारे संवादच बंद करून टाकलेस .!
म्हणुन मी जास्त वैतागलो होतो.

मी तसा खूपच कमी बोलतो हे तू खूप आधी पासून ओळखून आहेस..मी इतक्या वर्षात सांगितले नाही मनातले विचार...पण आता सांगतो.....सावू .. जर अनु राधा ने पुढाकार घेऊन माझ्यावरील प्रेम व्यक्त केले नसते तर कदाचित आज तिच्या जागी तूच माझ्या आयुष्यात माझं पहिल प्रेम आली असतीस.......!


अनुराधा कडून आमचे लग्न ठरल्याचे तुला समजले तेव्हा तुझ्या चेहऱ्या वरील बदललेले भाव अनुराधा कडून समजले होते मला..! पण मला तुझ्याबद्दल तेव्हा काही वाटत नव्हतं ना.....

पण तु का कधी बोलली नाहीस???"

अजिंक्य बोलत होता पण सावनी चे त्याच्या कडे लक्ष च नव्हतं.....

अजिंक्य हे सगळं सावनी ला सांगतो पण त्याचे परिणाम काही वेगळे तर नाही होणार?
सावनी ला आठवेल का सगळं?
दोघांमधले गैरसमज होतील का दूर?
कि अजून काही बिघडेल?
Kramash

🎭 Series Post

View all