©®स्मिता भोस्कर चिद्रवार .
जलद कथालेखन स्पर्धा एप्रिल
विषय : नाती सांभाळताना
जलद कथालेखन स्पर्धा एप्रिल
विषय : नाती सांभाळताना
माझाही असावा संसार ( भाग )
आई जेवायला बसताय ना ? " पूर्वानी सासूबाईंना विचारलं .
" नको ग आताच , इतकी सिरीयल बघते नंतर करीन जेवण . " सासूबाई म्हणाल्या .
पूर्वाला खूप भूक लागली होती . सकाळपासून फक्त चहावर होती ती .
नाष्टा करायलाही तिला वेळ मिळाला नव्हता . आरुषची बस आली नव्हती त्यामुळे त्याला शाळेत सोडायला जावं लागलं होतं .आता जेवणच करून घ्यावं म्हणून तिने दोन पोळ्या लाटल्या.एक पोळी भाजून होताच ताट वाढून घेतलं . तितक्यात आईंची हाक आली ,
" पूर्वा वाढ ग ताट बाबांच , इथेच दे सिरीयल बघत इथेच करतील जेवण ."
पूर्वाने स्वतःसाठी वाढून घेतलेलं ताट बाबांना दिलं आणि अजून एक ताट वाढून त्यात दुसरी गरम पोळी वाढली . ताट घेऊन तिने हॉलमध्ये आई बाबांच्या हातात ताट दिलं.
" अग मला नको आताच . तुला म्हणाले होते ना इतक्यात नको फक्त बाबांना वाढ म्हणत होते मी ." आई
पूर्वाने दुसरं ताट परत आणलं आणि बाबांसाठी गरम पोळी केली . आता तरी जेवायला बसावं म्हणून तिने मघाशी झाकून ठेवलेलं ताट घेतलं आणि जेवायला बसणार तितक्यात इस्त्रिवाला आला . आई बाबा सिरीयल बघण्यात गर्क होते .ती कपड्यांची बॅग घेऊन बाहेर आली तितक्यात नेहेमीप्रमाणेच आईंनी थांबवलं आणि बराच वेळ लावत स्वतःचे कपडे आणून दिले . हे नेहमीचच होतं . पूर्वाने इस्त्रीला देण्याच्या कपड्यांसाठी एक बॅग तयार केली होती.सगळ्यांनी त्यात आपले कपडे टाकायचे म्हणजे इस्त्रीवाला आला की द्यायला सोपं जायचं . पण आई बाबा नेहेमीच आपले कपडे त्यात न टाकता स्वतःच्या रूम मध्ये ठेवायचे आणि आमचे कपडे राहिले म्हणून बोलायचे
या सगळ्यात आधीच गार झालेलं पूर्वाच जेवण अजूनच गार झालं . पोळी तर वाळून गेली . आता गरम भात तरी खावा म्हणून पूर्वा भात वाढून घेऊन पुन्हा जेवायला बसली . एक घास खाल्ला की बाबांची हाक आली .
" पूर्वा, माझ्या गोळ्या आणल्यास ना काल ? कुठे आहेत ? इथेच ठेवत जा म्हणून कितीदा सांगितलं? " बाबा
पूर्वा जेवण सोडून बाबांच्या खोलीत गेली . जुन्या पाकिटात अजून दोन गोळ्या होत्या म्हणून तिने नवीन पाकीट गोळ्यांच्या बॉक्समध्ये न ठेवता कपाटात ठेवलं होतं.
" बाबा अजून दोन दिवसांच्या गोळ्या आहेत ना बॉक्समध्ये ? आणि हे काय नवीन पाकीट नेहेमीच्या जागीच तर आहे ना ? आणि या संध्याकाळच्या गोळ्या आहेत ना मग आताच का घाई ? " पूर्वा पुन्हा जेवायला येऊन बसली . तितक्यात ' मलाही वाढ जेवायला ' म्हणून आईंची हाक आली .
पूर्वा चडफडत उठली आणि ताट वाढून आईंच्या हातात दिलं . एक थंड पोळी होती ती त्यांच्या ताटात वाढली आणि गरम पोळी करायला घेतली . आता स्वतःसाठी सुद्धा गरम पोळी ती करणार होती .