©®स्मिता भोस्कर चिद्रवार .
जलद कथालेखन स्पर्धा एप्रिल
विषय : नाती सांभाळताना
माझाही असावा संसार ( भाग 2 )
जलद कथालेखन स्पर्धा एप्रिल
विषय : नाती सांभाळताना
माझाही असावा संसार ( भाग 2 )
" काय ग हे ? थंडगार पोळी ? तुझ्या पोळ्या थंड झाल्या की आजिबात खाववत नाहीत तुला माहिती आहे ना ? गरम नाही का पोळी ? " आई म्हणाली तशी पूर्वाने त्यांच्या ताटातली थंड पोळी काढून घेतली आणि त्यांना गरम पोळी वाढली . आईंच जेवण झालं आणि पुर्वाने आपलं गारढोण झालेलं जेवण कसबस पूर्ण केलं .
दहा वर्ष झाली होती पूर्वा आणि नीरजच्या लग्नाला . आठ वर्षांचा आरूष, सासू , सासरे असा तिचा परिवार होता . पूर्वा शिकलेली , हुशार मुलगी होती .तिचं लग्न ठरलं आणि निरजला मोठ्या शहरात दुप्पट पगाराची नोकरी मिळाली .पूर्वाच्या पायगुणाने निरजची झालेली बढती बघून सगळ्यांनाच खूप आनंद झाला . सासर जरी खेड्यात असलं नीराजच्या नोकरीमुळे तरी पूर्वा मेट्रो सिटीमध्ये राहणार होती .तशी ती लहानपणापासून शहरातच वाढलेली होती पण तिच्यावर तिच्या अप्पा माईंनी संस्कार मात्र अगदी छान केले होते .लग्नात हौस मौज सुद्धा अगदी भरपूर केली होती . निरजच्या घरच्यांनी सुद्धा पूर्वाला भरपूर दागिने केले . पूर्वाला इतकं चांगलं सासर मिळालं म्हणून सगळेच खुश होते .
लग्नानंतर लगेचच निराजला नोकरीच्या ठिकाणी जावं लागणार होतं.तिकडे त्याने आधीच भाड्याचं घर घेऊन ठेवलं होतं .
' आता आपल्या राजा राणीचा नवलाईचा संसार सुरू होईल , किती छान आयुष्य असेल आपलं? नीरज फारसा बोलत नाही पण आता हळूहळू आपले बंध जुळतील . ' हनिमूनच्या विचाराने ती मनातल्या मनात लाजत होती .
नवीन शहर , नवा संसार म्हणून आई बाबा पूर्वा आणि निरजच्या सोबत येणार होते .इथलं घरातलं वातावरण तितकस मोकळं नव्हतं. पण पूर्वा आपल्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलंसं करून घेणार होती .
प्रवासात जोखीम नको म्हणून आईंनी पूर्वाला सगळे दागिने काढून ठेवायला सांगितले . तिने फक्त छोटं मंगळसूत्र ठेवून बाकी सगळे दागिने काढून दिले . आईंनी ते लॉकरमध्ये ठेवले ते आजतागायत पूर्वाला मिळालेच नाहीत .
नवीन शहरात सगळी मंडळी आली . घरातल्या आवश्यक सामानाची खरेदी झाली . हळूहळू घर नीटनेटकं लागलं . आई बाबा सतत सोबत असल्यामुळे पूर्वा आणि निरजला हवा तसा एकांत मिळत नव्हता .
'आता हनिमूनला गेलो की आपण एकमेकांच्या सहवासात अजून जवळ येऊ , एकमेकांना छान ओळखू . प्रेमाचे क्षण अलगद साठवू ...' पूर्वा स्वप्न बघत होती पण नीरज मात्र हनिमूनच नावही काढत नव्हता. मित्रमैत्रिणी, घरचे सगळेच आडून आडून विचारत होते पण पूर्वा काहीच सांगू शकत नव्हती.
नक्की काय कारण असेल निरजच्या वागण्याचं ? याचं कोडं काही सुटत नव्हतं.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा