माझाही असावा संसार ( भाग 3 )

आरुषच्या जन्मानंतर तर पूर्वाची खूपच तारांबळ उडत होती . घरात माणसे असूनही नसल्या सारखी होती . नीरज उशिरा घरी यायचा . त्यामुळे त्याच्याकडून मदतीची काहीच आपेक्षा करता येण्यासारखी नव्हती . घरात मदतनीस ठेवली तर आई काही ना काही कुरबुरी करून तिला जायला भाग पाडत . काही दिवस पूर्वाची माई मदतीला आली . पण तीच्याशीही आई फारच तुसडे पणाने वागत . पूर्वासाठी ती सगळं सहन करत असे पण आपल्या आईचा वेळोवेळी होणारा अपमान तिला सहन होणारा नव्हता . यापुढे माईला घरी आजिबात बोलवायचं नाही असा तिने पक्का निर्धार केला . ' मला आता होत नाही ' असं म्हणून काहीच न करणाऱ्या आई दोन वर्षांनी आपल्या लेकीच्या छोट्याश्या ऑपरेशनच्या वेळी महिनाभर राहून सगळं काम अगदी व्यवस्थित करत होत्या . त्यानंतर एक वर्षांनी आपल्या लेकीचं बाळंतपण सुद्धा त्यांनी त्यांनी अगदी छान केलं होतं . पूर्वाला या गोष्टींनी नेहेमीच आश्चर्य वाटायचं.
©®स्मिता भोस्कर चिद्रवार .
जलद कथालेखन स्पर्धा एप्रिल
विषय : नाती सांभाळताना

माझाही असावा संसार ( भाग 3 )

न राहवून शेवटी थोड्याशा मिळालेल्या एकांतात पूर्वाने अडून चाचरत हनिमूनचा विषय निरजकडे काढला .
" मला कळतंय पूर्वा आपण हनिमूनला जायला हवं. मलाही खूप इच्छा आहे पण झालंय अस की मी माझी जुनी कंपनी सोडली म्हणून तिथलं अकाऊंट क्लोज केलं आणि सगळे पैसे काढून आईकडे दिले होते .आपल्या हनिमूनसाठी खास पैसे ठेवले होते पण आई ते आपल्या गावच्या घरीच विसरली . आता आपण इतक्या नवीन वस्तू घेतल्या त्यामुळे खरंच शक्य नाही सध्या . एक दोन महिन्यात नक्की जाऊ . तू नाराज होऊ नकोस प्लीज ." निरजने सांगितले तशी पूर्वा शांत झाली . तिच्या मनातली खळबळ बंद झाली . तशीही ती समजूतदार होतीच . तिने हसून मान डोलावली आणि निराजच्या कुशीत शिरली .
पूर्वा सासू सासऱ्यांसोबत अगदी मोकळेपणाने राहत होती . तिने त्यांना स्वतःच्या माई अप्पांपेक्षा कधीच वेगळं समजलं नव्हतं . पण आईंना मात्र फक्त समिधाचं , आपल्या मुलीचचं कौतुक होतं . सतत माझी समु अशी , माझी समी इतकं करते , इतकी हुशार असच सुरू असायचं दिवसभर . पूर्वाला मात्र त्यांनी जाणीवपूर्वक अंतरावर ठेवलं होतं .
' कौतुक केलं तर सून डोक्यावर मिरे वाटेल ' अश्या समजुतीच्या होत्या त्या .
पूर्वा सगळं आनंदाने करायची . घरात सगळं अगदी व्यवस्थीत लागायचं सगळ्यांना . प्रत्येकाच्या हातात गरम चहापासून प्रत्येक गोष्ट पूर्वाला हातात द्यावी लागायची . प्रत्येकाची जेवणाची वेळ वेगळी पण तव्यावरची गरम पोळी वाढायची असा दंडक असल्यामुळे पूर्वाची खूप दमछाक व्हायची . आई आजिबात कामाला हात लावत नसत . पण प्रत्येक गोष्टीसाठी टोमणे ठरलेले असायचे . पूर्वा दुखावली जायची पण तिच्यावरचे संस्कार तिला सगळं सहन करायला भाग पाडायचे .
आई , बाबा नीरजसमोर मात्र अगदी छान वागायचे . त्यामुळे घरात ते पूर्वाशी कसे वागतात याबद्दल तो अनभिज्ञ होता . त्यांचं छान जमतंय हे बघून त्याला बरच वाटायचं . त्याला उगीच त्रास नको म्हणून पूर्वा छोट्या छोट्या गोष्टी त्याला सांगत नसे .
अश्यातच पूर्वाने गोड बातमी दिली . सगळीकडे आनंद पसरला .
आरुषच्या जन्मानंतर तर पूर्वाची खूपच तारांबळ उडत होती . घरात माणसे असूनही नसल्या सारखी होती . नीरज उशिरा घरी यायचा . त्यामुळे त्याच्याकडून मदतीची काहीच आपेक्षा करता येण्यासारखी नव्हती . घरात मदतनीस ठेवली तर आई काही ना काही कुरबुरी करून तिला जायला भाग पाडत . काही दिवस पूर्वाची माई मदतीला आली . पण तीच्याशीही आई फारच तुसडे पणाने वागत . पूर्वासाठी ती सगळं सहन करत असे पण आपल्या आईचा वेळोवेळी होणारा अपमान तिला सहन होणारा नव्हता . यापुढे माईला घरी आजिबात बोलवायचं नाही असा तिने पक्का निर्धार केला .
' मला आता होत नाही ' असं म्हणून काहीच न करणाऱ्या आई दोन वर्षांनी आपल्या लेकीच्या छोट्याश्या ऑपरेशनच्या वेळी महिनाभर राहून सगळं काम अगदी व्यवस्थित करत होत्या . त्यानंतर एक वर्षांनी आपल्या लेकीचं बाळंतपण सुद्धा त्यांनी त्यांनी अगदी छान केलं होतं . पूर्वाला या गोष्टींनी नेहेमीच आश्चर्य वाटायचं.