माझाही असावा संसार ( अंतिम भाग )

.सुरुवातीला सगळं ठीक होतं पण जसजसं वय वाढायला लागलं तसं तिच्या गप्प बसण्यामुळे तिचं शरीर मात्र बोलू लागलं.तशी ती स्वतः फीट होती.जमेल तेवढा व्यायाम वगैरे करायची पण मनाची अस्वस्थता शरीराला सुद्धा अस्वस्थ बनवते हे तिला कधी कळलं नाही.सगळ्यांची मनं सांभाळता सांभाळता तिच्या शरीरावर हळूहळू परिमाण होऊ लागला.पण छोट्या छोट्या कुरबुरीकडे लक्ष द्यायला तिला वेळच मिळत नव्हता. मुळात स्वतःसाठी वेगळा वेळ काढायला हवा हे तिला कळूनही वळत मात्र नव्हतं.पूर्वा सासू सासऱ्यांच सगळं व्यवस्थित करत असल्यामुळे त्यांच्या तब्येती ठीक होत्या पण तिला कधीकधी खूपच अस्वस्थ वाटायचं.सकाळच्या गडबडीत एक दिवस ती चक्कर येऊन पडली.सगळे घाबरले.डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या.डॉक्टर शिल्पा एक खूप छान आणि हुशार डॉक्टर होत्या. पूर्वा आणि निरजला त्यांनी नीट समजावून सांगितलं.
©® स्मिता भोस्कर चिद्रवार .
जलद कथालेखन स्पर्धा एप्रिल
विषय : नाती सांभाळताना

माझाही असावा संसार ( अंतिम भाग )
आरुषला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या.पण नेहमीसारखीच तिची नणंद समिधा येणार म्हणून आईंनी तिला माहेरी जाऊ दिलं नव्हतं.समिधा आपल्या दोन्ही मुलांना घरी ठेवून बाहेर एन्जॉय करायची.माहेरी आली म्हणून साहजिकच कुठल्याही कामाला ती हात लावत नव्हती.सगळी नाती सांभाळता सांभाळता पूर्वाची मात्र तारांबळ उडत होती.घर संसार फक्त नावालाच तिचा होता मात्र कुठलेही अधिकार तिचे नव्हते.छोट्या छोट्या गोष्टींसाठी मन मारायची तिला सवय होऊन गेली होती.सुरुवातीला सगळं ठीक होतं पण जसजसं वय वाढायला लागलं तसं तिच्या गप्प बसण्यामुळे तिचं शरीर मात्र बोलू लागलं.तशी ती स्वतः फीट होती.जमेल तेवढा व्यायाम वगैरे करायची पण मनाची अस्वस्थता शरीराला सुद्धा अस्वस्थ बनवते हे तिला कधी कळलं नाही.सगळ्यांची मनं सांभाळता सांभाळता तिच्या शरीरावर हळूहळू परिमाण होऊ लागला.पण छोट्या छोट्या कुरबुरीकडे लक्ष द्यायला तिला वेळच मिळत नव्हता. मुळात स्वतःसाठी वेगळा वेळ काढायला हवा हे तिला कळूनही वळत मात्र नव्हतं.पूर्वा सासू सासऱ्यांच सगळं व्यवस्थित करत असल्यामुळे त्यांच्या तब्येती ठीक होत्या पण तिला कधीकधी खूपच अस्वस्थ वाटायचं.सकाळच्या गडबडीत एक दिवस ती चक्कर येऊन पडली.सगळे घाबरले.
डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या.डॉक्टर शिल्पा एक खूप छान आणि हुशार डॉक्टर होत्या. पूर्वा आणि निरजला त्यांनी नीट समजावून सांगितलं.
"हे बघा स्त्री आणि पुरुष दोघांचीही शरीरं वेगळी वेगळी असतात. हर्मोनाल चेंनजेस मुळे या वयात हे होणं अगदी साहजिक आहे.आपण स्त्रिया सगळी नाती सांभाळत बसतो पण आपलं सगळ्यात जवळचं असलेलं हे शरीर याचही नातं आपण सांभाळायला हवं.आणि लक्षात ठेव पूर्वा तू मानसिक दृष्ट्या सक्षम असशील तरच शारीरिक दृष्ट्या सुद्धा नीट राहशील.सध्या सध्या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही आणि आपण योग्य असू तर आपल्यासाठी स्टँड घ्यायला विसरायचं नाही.सगळं काही आपणच करायचं याचा अट्टाहास करायचा नाही आणि थोडंसं ऍडजस्ट घरातल्या सगळ्यांनीच करायला हवं हे समजून घ्या.मी डायेट आणि व्यायाम लिहून देते ते सगळं नीट फॉलो करायचं.
आणि आता सगळ्यांनीच स्वतःचां विचार करायचा आणि स्वतःवर प्रेमही करायचं.कळलं का ?" डॉक्टरांनी बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या आणि निराजला स्वतःची लाज वाटली.पूर्वा आपली सगळी नाती जपते अगदी स्वतःला कितीही त्रास झाला तरीही आणि आपण मात्र कधीच ह्या गोष्टींचा विचार केला नाही याचे त्याला खूप वाईट वाटले.
आता मात्र त्याने स्वतः नेहेमी पूर्वासाठी स्टँड घ्यायचा आणि आपलं प्रेमाचं नातं आयुष्यभरासाठी जपायचं असं वचन पूर्वाला आणि स्वतःलाही दिलं. घरच्यानीही आता प्रेमाने आणि एकमेकांना जपायला सुरुवात केली.मग बहरलेली नाती आणि सुखाचा संसार यामुळे पूर्वाचां संसार तिला हवा तसा आपलासा वाटू लागला.