दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ५
सुभाष राव आणि सुषमा रूम मध्ये आले.
समिधाने बाबांना विचारले,
समिधाने बाबांना विचारले,
"बाबा काय चाललंय बाहेर. नक्की काय झालंय?"
सुभाष रावांच्या मनात आलं हिला आता सगळं कसं सांगायचं. इथे बाहेर एक तास व्हायला आला तरी कुमार यायचं चिन्ह दिसेना म्हणून एकदा सुमन ताई बाहेर येऊन विशालकडून काय खबरबात मिळते का चाचपून पाहत होत्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांची मावस बहीण इंदू तिच्या शेजारी बसलेल्या बहिणीला म्हणाली,
"अगं सुलभा सुमनच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता दिसतेय. थांब मी तिच्याजवळ जाऊन विचारून येते."
"सुमन ताई भांबावलेली दिसते आहेस काही अडचण तर नाही ना!"
सुमनने तिला बाजूला घेऊन घडला प्रसंग सांगितला. तिने तिथेच डोक्याला हात लावला आणि तिला धीर दिला. सुमनने तिला शांत राहायला सांगितलं. पण इंदूने येऊन बहिणीच्या कानात ती बातमी सांगितली. असं कर्णोपकर्णी नवरा मुलगा निघून गेल्याचं सर्वांनाच कळलं. झालं! उपस्थितांच्या चर्चेला ऊत आला. एक स्त्री म्हणाली,
"मी तेच म्हणत होते फक्त वधू आणि तिचे आई वडील दिसत आहेत. ही कोणती पद्धत ह्यांच्या विधींची." कुजबुज वाढतच होती,
"अरे त्याचे बाहेर प्रेम प्रकरण असेल. हे लग्नच करायचं नसेल म्हणून पळून गेला भित्रा कुठला."
"त्याच्या प्रेयसीकडच्या कोणीतरी याला धमकी दिली असेल लग्न केलंस तर तुझा जीव घेऊ."
अशा प्रकारे दहा तोंडांनी लोक बोलत होते. हे सर्व वधुच्या आई बाबांच्या, म्हणजेच सुभाष सावंत आणि सुषमा सावंत यांच्या कानावर पण गेले. त्यांना खूप मोठा धक्का बसला. समिधा तर हे ऐकून गर्भगळीत झाली. सुभाष रावांच्या डोळ्यासमोर पुढच्या चिंता भेडसावू लागल्या. समिधा ही त्यांची सर्वात मोठी लेक होती. तिच्या पाठीवर अजून तीन मुली होत्या. समिधाच्या लग्नासाठी ऐपत नसताना त्यांनी खूप खर्च केला होता. हिचं लग्न मोडले तर आपली खूप बदनामी होईल. मुलगा पळून गेला तरी लोक मुलीलाच दोषी ठरवतात.
"बाबा तुम्ही बोलत का नाही आणि हे सर्व काय होऊन बसलं. आता काय करायचं आपण. तुमच्या माहितीतला मुलगा असून सुद्धा तो असा कसा वागू शकतो. तुम्ही मामाला घेऊन आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जा आणि जाब विचारा. यांना मुली म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या वाटल्या काय!"
समिधा संतापाने हे बोलत असतानाच श्रीरंगराव, सुमनताई आणि सारंग दारावर टकटक करून आत आले. सुभाष काही बोलण्याच्या आत सारंग म्हणाले,
"हे बघा सुभाष राव कुमार कुठे गेला किंवा तो कधी येणार हे आम्हाला कोणालाच माहीत नाही. ही गोष्ट आमच्या पेक्षा तुमच्यासाठी जास्त नामुष्कीची आहे हे आम्ही जाणतो. त्यामुळे आता बाहेर जाऊन हे लग्न मोडलं असं आपल्याला जाहीर करावं लागेल. बाहेर सगळी आपल्या दोन्ही कुटुंबातील नातेवाईक, परिचयाचे लोक बसले आहेत." इतक्यात डोळ्यात जमा झालेले अश्रू पुसत सुभाष राव म्हणाले,
"अहो तुम्हाला हे सोपे वाटतं आहे. आमच्यासाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. लग्नाच्या बाबतीत काहीही घडलं तरी मुलीवरच ठपका लागतो. घरातील पहिलंच लग्न म्हणून आम्ही झेपत नसताना इतका सारा खर्च केला." त्यांना मध्येच थांबवत श्रीरंगराव म्हणाले,
"आम्ही तुमची सगळी नुकसान भरपाई देऊ."
"अहो आर्थिक नुकसान तुम्ही भरून द्याल पण आमच्या मुलीच्या आणि आमच्या बेअब्रूचं काय!
पुढे तिचं लग्न ठरवताना हा प्रश्न आम्हाला विचारला जाईलच ना! तेव्हा मुलगा पळून गेला असा समंजस विचार कोणी करणार नाही.
तुम्ही आता इथून थोडा वेळ बाहेर जा. मला माझ्या पत्नी आणि मुलीशी जरा बोलायचं आहे."
पुढे तिचं लग्न ठरवताना हा प्रश्न आम्हाला विचारला जाईलच ना! तेव्हा मुलगा पळून गेला असा समंजस विचार कोणी करणार नाही.
तुम्ही आता इथून थोडा वेळ बाहेर जा. मला माझ्या पत्नी आणि मुलीशी जरा बोलायचं आहे."
रुम बाहेर पडताना श्रीरंग रावांना एक विचार मनात भेडसावत होता कुमारचे आणि आपले संबंध फक्त पिता पुत्राचे नाहीत तर तो आपल्याशी सगळ्याच बाबतीत मित्रत्वाच्या नात्याने, एका अलिखित जिव्हाळ्याच्या नात्याने बोलतो. आता आयुष्यातील इतक्या महत्वाच्या क्षणी त्याने असा निर्णय का घेतला असावा! मिळेल का त्यांच्या प्रश्नाचं उत्तर!
(ऐन मुहूर्ताच्या वेळी कुमार कुठे आणि का गेला असेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा