दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १५
रविवारी संध्याकाळी मनोज तिला तिच्या घराच्या कोपऱ्यावर गाडी घेऊन न्यायला येणार होता. तिने आईला सांगितले की ग्रुपमधील एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे आम्ही सगळे तिच्या घरी जमणार आहोत. तिने हलक्या आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. त्यात ती एकदम आसमान की नीलपरी वाटत होती. घरातून निघाली तेव्हा आईने बोटं मोडून तिची दृष्ट काढली.
"आई तुझं आपलं काहीतरीच. मला काय अशी सारखी सारखी दृष्ट लागणार आहे का!"
"अगं तू साधी तयार झालीस तरी किती गोड दिसतेस. सगळ्या बघणाऱ्यांच्या नजरा सारख्या नसतात."
"बरं चल मी निघते आता माझ्या मैत्रिणी वाट बघत असतील."
घराच्या कोपऱ्यावरच मनोजची नेव्ही ब्ल्यू कलरची ऑडी गाडी उभी होती. समिधा तेथे जाऊन आजूबाजूला आपल्याला कोणी पाहत नाही असं पाहून पटकन गाडीत पुढच्या सीटवर बसली. ती बसल्यावर मनोजला आपल्या गाडीची पुढची सीट धन्य झाली असं वाटलं. गप्पा मारत मारत ते त्याच्या घरी पोचले. त्याची आनंदवन सोसायटी एका उच्च लोकॅलिटीत होती. समिधा सोबत चालताना मनोजला खूप भारी वाटत होतं. आपल्याबरोबा इतकी सुंदर मुलगी पाहून लोकांना आपला हेवा वाटत असेल. सोसायटीचा परिसर खूपच
आल्हाददायक होता. आजूबाजूला सुंदर रोपे लावली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन होतं. ते सर्व पाहत पाहत ते दहाव्या मजल्या वरील त्याच्या फ्लॅटमध्ये गेले. घरातून आत शिरताच मनोज अगदी उत्साहाने आईला हाक मारून म्हणाला,
आल्हाददायक होता. आजूबाजूला सुंदर रोपे लावली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन होतं. ते सर्व पाहत पाहत ते दहाव्या मजल्या वरील त्याच्या फ्लॅटमध्ये गेले. घरातून आत शिरताच मनोज अगदी उत्साहाने आईला हाक मारून म्हणाला,
"आई ए आई, समिधा आली आहे ग."
आई आणि बाबा दोघेही बाहेर आले. समिधा ग्रुप बरोबर त्याच्या घरी आली होती त्यामुळे त्याची आई लगेच बाहेर येऊन तीला म्हणाली,
"अग मीच एकदा मनोजला म्हटलं की समिधाला कधीतरी एकटीला बोलाव म्हणजे माझी तिची नीट ओळख होईल. खरं सांगू का तुमच्या ग्रुप मधून मला तू सगळ्यात जास्त आवडतेस. आलीस की कधीच बसून राहत नाहीस. आपलंच घर असल्यासारखं लगेच माझ्या मदतीला स्वयंपाक घरात येतेस. बाकीच्या मैत्रिणी इथेच गप्पाटप्पा करत बसतात."
"काकू मला कामाची सवय आहे मी घरी पण आईला सगळी मदत करतच असते."
"खरंच खूप गुणी आहेस तू."
त्यानंतर ती बऱ्याच वेळा त्यांच्याकडे येत राहिली. मनोजने आई बाबांना सांगितलं होतं की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि एकदोन वर्षांनीं तो तिच्याशी लग्न करेल. आई बाबांना काहीच हरकत नव्हती. फक्त मनोजच्या आईला मुलीची पत्रिका पाहून लग्न झालं तर बरं असं वाटत होतं. अशीच एकदा समिधा त्यांच्या घरी आली असताना आईने तिला विचारलं,
"काय गं समिधा तुझ्या घरी तुझं लग्नाचं बघतिलच ना एक दोन वर्षात. मग तुझी जन्मपत्रिका बनवली असेल ना. आता तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तुझी पत्रिका एकदा बघून ठेवलेली बरी!"
पत्रिकेचे नाव काढताच समिधा जरा गडबडली. तिच्या आईने तिची पत्रिका बनवली होती पण कडक मंगळ असल्यामुळे तिने ती कोणाला दाखवायची नाही असं सांगितले होते. ही आठवण होऊन ती पटकन म्हणाली,
"नाही आमची कोणाचीच पत्रिका बनवली नाही."
"हरकत नाही तुझी जन्मतारीख आणि जन्मवेळ मला दे मी आमच्या गुरुजींकडून बनवून घेईन."
समिधा गोंधळलेली पाहून मनोज लगेच म्हणाला,
"ए आई ती पत्रिका वगैरे बघून लग्न जमवण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आणि प्रेमविवाहात कोण ग पत्रिका बघतो. उगाच तिला भरीस पाडू नकोस."
"तू गप्प बस रे तुला काय कळतं. आम्ही दोघी बघून घेऊ ती मला देईल ना तिची जन्म वेळ आणि जन्मतारीख."
"हो देईन मी पुढच्या वेळी येईन ना तेव्हा अगदी व्यवस्थित आईला वेळ विचारून येते."
"हो काही हरकत नाही. आता तुझ्यासाठी हे गरम गरम थालीपीठ केलं आहे ते तुम्ही खा तोपर्यंत मी चहाचं बघते."
"काकू मी तुमच्या मदतीला येते ना आपण सगळे एकत्रच खाऊया." असं म्हणून समिधा त्यांच्यामागे गेली. बाबा म्हणाले,
"मनोज तुझी निवड अगदी योग्य आहे."
(समिधाने जन्मतारीख आणि जन्म वेळ दिल्यावर मनोजची आई तिची जन्मपत्रिका बनवून घेतील का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा