दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३५
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३५
समिधा अगदी अल्लडपणे अभिरामला म्हणाली,
"मी ऐकले आहे की विमानाने जायचं असेल तर तिथे तीन तास आधी पोहोचावं लागतं. मग आपल्याला सकाळी सहाला निघावे लागेल की काय!"
"तुझं बरोबर आहे पण परदेशात जायचं असेल तर तीन तास आधी जावं लागतं. डोमेस्टिक प्रवासासाठी इतके लवकर जाण्याची गरज नसते. आपण सव्वा आठ ला निघुया. तसं पण आपण उलटा प्रवास करणार ट्रॅफिक नाही लागणार."
रात्री जेवण झाल्यावर काका म्हणाले,
"मी सखारामला सकाळी आठ वाजता बोलावलं आहे. तो तुम्हाला एअरपोर्टला ड्रॉप करेल."
"काका आम्ही कॅबने गेलो.असतो. त्याला इतक्या लांबून घाईत यावं लागेल."
अभिराम ड्राइव्हरचा पण इतका विचार करतो ते पाहून समिधाचा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आठ वाजता तयार झाले. समिधाने लिंबू रंगावर हलकी मेंदी रंगाची नाजूक फुले असलेला पंजाबी ड्रेस घातला होता. कानात त्याच रंगाचे डूल घातले होते आणि सरळ रेशमी केस पाठीवर मोकळे सोडले होते. ती खूपच सुंदर दिसत होती. अभिराम काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काकानी हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत त्याची चोरी पकडली. दोघांनी काकांना नमस्कार केला. इतक्यात आतून कला मावशी सिल्वर फॉइल मध्ये गुंडाळून काहीतरी घेऊन आल्या,
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आठ वाजता तयार झाले. समिधाने लिंबू रंगावर हलकी मेंदी रंगाची नाजूक फुले असलेला पंजाबी ड्रेस घातला होता. कानात त्याच रंगाचे डूल घातले होते आणि सरळ रेशमी केस पाठीवर मोकळे सोडले होते. ती खूपच सुंदर दिसत होती. अभिराम काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काकानी हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत त्याची चोरी पकडली. दोघांनी काकांना नमस्कार केला. इतक्यात आतून कला मावशी सिल्वर फॉइल मध्ये गुंडाळून काहीतरी घेऊन आल्या,
"तुम्ही दोघांनी फक्त चहाच घेतलाय म्हणून हे मेथीचे ठेपले दिले आहेत. हे आता जाताना गाडीत खा."
"मावशी तुम्ही कशाला त्रास केलात आम्ही काहीतरी खाल्ले असतं."
दोघांनी त्यांना पण नमस्कार केला.
"काळजी घ्या बाळांनो."
सखारामने गाडीत बॅगा ठेवल्या. अभिराम बऱ्याच वेळा सखारामच्या बाजूलाच बसायचा तसा तो यावेळी बसला. ते पाहून सखाराम लगेच म्हणाला,
"साहेब तुम्ही वहिनींच्या बाजूला बसा. त्या नव्हत्या तेव्हा ठीक होतं."
"अरे त्या आल्या तरी आपलं सगळं पहिल्यासारखंच राहणार आहे."
अभिराम म्हणाला तसं काहीच ट्रॅफिक लागला नाही. विमानतळावर पोचल्यावर समिधा डोळे विस्फारून पाहू लागली. आयुष्यात पहिल्यांदाच विमानतळ पाहत होती त्यामुळे तिला फार कुतूहल वटत होतं. सखारामने ट्रॉलीवर बॅग्स ठेवून दिल्या आणि तो निघून गेला. समिधा विमानतळावरील वर्दळ पाहत होती. श्रीमंत, मध्यमवर्गीय सर्वच माणसांची लगबग दिसत होती. काही फॉरेनर्स सुद्धा होते. एखादी सेलिब्रिटी व्यक्ती दिसत होती तिच्याकडे सगळे टक लावून पाहत होते. समिधाच्या मनात आलं सोशल मीडियावर टाकायला नाही तरी आपल्या घरच्यांना दाखवायला विमानतळावर दोन-तीन तरी फोटो काढायला हवे. पण ती हे अभीरामला कसं सांगणार. तिच्या मनातलं जाणून अभीराम म्हणाला,
"समिधा तू पहिल्यांदाच विमानतळावर येते आहेस तुला काही घरी दाखवायला फोटो काढायचे असतील तर काढून घे."
तिला वाटलं आपल्या बाबतीत अभिराम खूपच मनकवडा आहे. आपण काही न सांगता त्याला आपल्या मनातलं सारं काही कळतं. कमाल आहे. त्याने तिचे दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढले. एक ट्रॉली बरोबर काढला. विमानतळाची चकाचौंद रोशनी पाहून तिचे डोळे दिपून गेले. अभिराम म्हणाला,
"तू जवळून विमानतळ कधी पाहिलंच नाहीस ना."
"विमानतळ पाहण्याचा प्रश्नच नाही आला. आमचं कॉलेज पार्ल्याला असल्यामुळे अवकाशाकडे झेप घेणारी विमान मी खूप पाहिली आहेत. त्या विमानांना बघताना मला, "घे भरारी" अशी कायम शिकवण देत असल्यासारखं वाटलं. आमचा पूर्ण ग्रुपच अशी विमान बघण्यात खूप धन्यता मानायचा. नंतर दोघे एंट्री गेट जवळ आले. समिधा म्हणाली,
"अय्या आपण तिकीटच घेतली नाहीत."
"अगं माझ्या मोबाईल मध्ये आहेत तिकिट्स. प्रिंटेड तिकिटाची गरज नसते."
दोघे आत मध्ये गेल्यावर अभीराम सराईतपणे वागत होता आणि समिधा बुजल्यासारखी होती. चेक इन काउंटर जवळ गेल्यावर अभिराम ने आपल्या बॅग पट्ट्यावर ठेवल्या.
"आता या आपल्या बॅग आपल्याला कुठे मिळणार."
"हे जास्त वजनाच्या बॅग कार्गो मध्ये जातात त्या आपल्याला श्रीनगर एअरपोर्टला मिळतील."
"आपल्यासारख्या इतर लोकांच्या पण बॅग यात आहेत मग आपण ओळखायच्या कशा आपल्या बॅग्स कुठच्या त्या."
"नंबरचा टॅग लावतात ते त्याच्यावरून आपल्याला कळतं. फॉरेनला वगैरे जाताना मी आपल्या बॅगला एखादी छोटीशी रिबन लावतो त्यामुळे आपली बॅग पटकन ओळखता येते."
चेक इन झाल्यावर अभीराम म्हणाला,
"आता आपण रमत गंमत सगळे शॉप्स बघत जाऊ. तुला काय आवडलं तर नक्की घे."
समिधा सगळीकडे बघत चालली होती. तिला एक कानातले खूपच आवडले. म्हणून तिने त्याची किंमत पाहिली. बापरे सहाशे रुपये. आपल्या पार्ल्याला खोका मार्केटमध्ये किती छान कानातले, बांगड्या सगळंच मस्त असतं. अभीरामने तिने किंमत पाहिलं ते लक्षात आलं तो म्हणाला,
"आवडले असतील तर घे ना."
"नाही हातात घेतल्यावर मला नाही आवडले."
(समिधाचा पहिलाच विमानप्रवास कसा असेल आणि पुढे काय होईल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा