दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४३
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४३
अभिरामने आता असं काही करायचं नाही म्हटल्यावर समिधा हिरमुसली. अभिरामच्या आतापर्यंतच्या वागण्याला आताच म्हणणं खूपच विरोधाभास दर्शवणारं होतं. ती काही न बोलताच चहाच्या कपबश्या आवरू लागली. अभिरामला तिची मनःस्थिती कळली,
"अगं मग काय करायचं असं विचारणार नाही का?"
"तुम्ही सांगाल तेच करेन."
"आता तुझा पूर्ण पगार तू बाबांना ट्रान्स्फर करायचा."
समिधाचा तिच्या कानावर विश्वासच बसेना! ती आश्चर्याने बोलली,
"काय!"
"अगं पुढे ऐक तरी. पूर्ण पगार बाबांना दे आणि तुझ्या आणि बहिणींच्या खर्चासाठी मी दर महिन्याला तुझ्या अकाउंटला पन्नास हजार ट्रान्स्फर करेन. काय कळलं का! कसं आहे ना समिधा खरं तर इथे तुला नोकरी करण्याची गरजच नाही. पण तुझी बँकेतली इतकी चांगली नोकरी तू सोडावीस असेही मला वाटत नाही आणि इतकी शिकली
सवरलेली तू पूर्ण वेळ घरी बसून काय करणार! तुझीही काही स्वप्नं आहेतच ना! समिधा मला तुमच्या घरची परिस्थिती माहिती आहे. आता सायलीला नोकरी लागेल तेव्हा लागेल. मी तुझ्या घरच्यांशी नातं जोडलं आहे. मी ते शेवटपर्यंत निभावणार."
सवरलेली तू पूर्ण वेळ घरी बसून काय करणार! तुझीही काही स्वप्नं आहेतच ना! समिधा मला तुमच्या घरची परिस्थिती माहिती आहे. आता सायलीला नोकरी लागेल तेव्हा लागेल. मी तुझ्या घरच्यांशी नातं जोडलं आहे. मी ते शेवटपर्यंत निभावणार."
"बाबांना पैसे द्यायचं आपण ठरवलं आहे पण त्यांनी ऐकायला पाहिजे ना."
"ते तू माझ्यावर सोड. एक काम करूया उद्या तू ऑफिसमधून परस्पर तिकडेच ये. मी पण येतो. तेव्हा मीच बाबांशी बोलेन."
"हो चालेल. मी आज कला मावशींना फोन केला होता. आता काका बरे आहेत म्हणाल्या."
"अरे काय योगायोग! मी पण आज लवकर निघालो म्हणून त्यांच्या घरी जाऊन आलो. त्या म्हणत होत्या मी येते उद्यापासून. मी त्यांना सांगितलं अजून एक आठवड्यानंतर या."
"बरं केलं."
समिधाच्या मनात आलं आपण अभिरामबद्दल किती गैरसमज करून घेतला. आपण चांगल्या माणसांबद्दल नेहमी पुस्तकात वाचतो किंवा आजूबाजूला ऐकतो. आपण प्रत्यक्ष इतक्या चांगल्या माणसांचा अनुभव घेतोय खरंच आपलं भाग्य थोर. मला वाटतं अगदी लहानपणापासून खडतर आयुष्य जगत आलेले लोक जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा सगळ्यांशी खूप चांगलंच वागतात. असं वागण्यासाठी पण मन मोठं असावं लागतं.
समिधाच्या मनात आलं की आईला फोन करून आपण दोघं येत असल्याचे सांगावं पण नंतर तिने विचार केला आधीच सांगायला नको नाहीतर आई खाण्यासाठी उगाच खूप काय काय करत बसेल. दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघताना समिधा जणू पंख लावल्याप्रमाणेच वावरत होती. काका तिला म्हणाले,
"आज समिधाची स्वारी एकदम खुश दिसते. काही विशेष!"
"अरे काका तुला बोललो ना आज समिधाच्या माहेरी जायचं आहे. माहेरी जाण्यातली उत्सुकता, गंमत आपल्याला कशी कळणार! त्यासाठी पुढील जन्म स्त्रीचा घ्यावा लागेल."
"हो खरं आहे. माहेराची ओढ लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला अनुभवायला मिळते. काका तुम्ही पण याल का संध्याकाळी आईकडे?"
"अगं नाही आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सर्वांचे त्या महिन्यातले वाढदिवस एकत्र साजरे केले जातात.
या महिन्यात पाच जणांचे वाढदिवस आहेत त्यामुळे तिथे जाणं जरुरी आहे शिवाय खाणंही भरपूर होईल. त्यामुळे तुम्ही दोघे जा आणि निर्धास्त आरामात या."
या महिन्यात पाच जणांचे वाढदिवस आहेत त्यामुळे तिथे जाणं जरुरी आहे शिवाय खाणंही भरपूर होईल. त्यामुळे तुम्ही दोघे जा आणि निर्धास्त आरामात या."
समिधाला वाटलं एका अर्थी काका येणार नाही ते चांगलंच आहे कारण पैशांबद्दल बोलताना बाबांना जरा अवघडल्यासारखं वाटलं असतं.
"अभिराम तुमचा टिफिन बॅगेत भरून ठेवला आहे. काका सर्व जेवण पण तयार आहे. आता मी पळते माझी आठ छत्तीस चुकेल."
"नीट जा गं. भेटूया संध्याकाळी."
समिधाने निघायच्या थोडं आधीच आईला फोन करून सांगितलं की ते दोघं घरी येतायेत. घरी नेण्यासाठी समिधाने बरीच खरेदी केली. त्यात सगळ्यांना आवडणारा नॅचरल्सचा टेंडर कोकोनट फॅमिली पॅक घेतला. ती अभिरामच्या आधीच पोचली. घरी बाबा अजून यायचे होते. बहिणींनी तिच्याभोवती लगेच फेर धरला. आई म्हणाली,
"ताईला जरा बसू दे, पाणी पिऊ दे."
"आई तू काय बोलूच नकोस ताई आम्हाला किती दिवसांनी भेटतेय."
"सायली पळ आधी हा फॅमिली पॅक फ्रीजरमध्ये ठेव नाहीतर आपल्याला दूध प्यावे लागेल."
"समिधा तुला आधी चहा टाकू का ग."
"अग थांब आई हे येतच असतील सर्वांना एकत्र कर."
इतक्यात अभिराम पण आला. सर्वांनी एकत्र चहा घेतला. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता त्यामुळे आईने अनायसे पुरणपोळ्या केल्या होत्या. समिधाला वाल सोलून ठेवलेले दिसले.
"आई तू किती मनकवडी आहेस. तुला मी येणार ते आधीच कळलं काय ग. माझ्या आवडीचं वालाचं बिरडं."
"तुझ्या आवडीचे वालाच बिरडं आणि अभिरामच्या आवडीच्या पुरणपोळ्या. अगं आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्यामुळे उद्यापनासाठी केलं आहे. खरं तर तुम्हाला बोलणारच होते पण मधला वार तुम्हाला जमेल ना जमेल. मला त्रास होऊ नये म्हणून तू आधीच काही कळवलं नाहीस हे लक्षात आले माझ्या."
थोड्या वेळाने बाबा पण घरी आले. या दोघांना घरी पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अभिरामने मूळ विषयाला हात घालायचं ठरवलं.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अभिरामने मूळ विषयाला हात घालायचं ठरवलं.
(समिधाचा पगार पूर्वीसारखाच बाबांनी घ्यावा हे म्हणणं बाबांना पटेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा