"मे आय कम इन सर??" सौमित्र
"येस मिस्टर सौमित्र.. प्लीज कम.. अॅन्ड हॅव अ सीट.." अद्वैत
"थँक्यू सर.. हे शर्मा आणि मेहता कंपनीचे रिपोर्ट्स..दोन्ही ही अगदी रेडी आहेत." सौमित्र
"ओह्ह दॅटस ग्रेट.. वेल डन..! " अद्वैत
"सर दॅटस माय प्लेजर." सौमित्र
"ओके..सो उद्याचे सगळे रेडी आहे ना?? मिस्टर सौमित्र मी सांगितले तसे सकाळी बरोबर नऊ वाजता हजर रहायचं उद्या ऑफिसमध्ये. तुम्ही न्यू जॉईन आहात सो तुम्ही ईरा मॅडम ना नीट ओळखत नाही म्हणून सांगितले. त्यांना वेळेच्या बाबतीत कुठलेही रिझन नाही चालतं आणि जर कोणी एक सेकंद ही लेट केला तर त्यांना लगेचच आपली नोकरी गमवावी लागते. लक्षात आले का सगळे?? " अद्वैत
" येस सर.. आय वील बी देअर ऑन टाईम (मी वेळेत येईन) " सौमित्र
" गुड.. यू मे लिव्ह नाऊ (तुम्ही जाऊ शकता) " अद्वैत
सौमित्र अद्वैतच्या केबिनमधून बाहेर पडतो.. अद्वैत म्हणजे चं आय. एन. कंपनीचा मॅनेजर आणि सौमित्रचा बॉस. पंधरा दिवसांपूर्वी सौमित्रने या ऑफिसमध्ये जॉईन केले होते आणि उद्या त्याची या ऑफिसची सर्वेसर्वा/ ओनर सोबत भेट होणार होती.
त्याने ऑफिसमध्ये जॉईन केलेले तेव्हा ती ऑफिसच्या कामानिमित्त नुकतीच अमेरिकाला गेली होती आणि आता ती उदया परत येणार होती.
त्याने ऑफिसमध्ये जॉईन केलेले तेव्हा ती ऑफिसच्या कामानिमित्त नुकतीच अमेरिकाला गेली होती आणि आता ती उदया परत येणार होती.
'बापरे या ईरा मॅडम जरा जास्तच स्ट्रिक्ट आहेत वाटतं, उद्या ऑफिसला लवकरच जायला हवे' घरी जाताना सौमित्र स्वतःशीच बोलत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच अगदी लवकर उठून सौमित्र ऑफिसमध्ये पोहचतो तेव्हा सगळा स्टाफ त्याला एकत्र उभा दिसतो आणि अगदी दरवाज्याच्या जवळ अद्वैत हातात फुलांचा बुके घेऊन उभा असतो. सौमित्र ही सगळ्या स्टाफ सोबत उभा राहतो. इतक्यात ऑफिसच्या दरवाज्यात एक मोठी कार येऊन उभी राहते. ड्रायव्हर लगबगीने खाली उतरून कारचा मागचा दरवाजा उघडतो.
कारमधून एक पंचवीस वर्षाची तरूणी बाहेर येते. अंगात व्हाईट फॉर्मल शर्ट त्याखाली गुडघ्यापर्यंत ब्लॅक स्कर्ट, केसांची हाय पोनी, ओठांवर न्यूड शेडची लिपस्टीक आणि डोळ्यांवरचा गॉगल काढत ती तरूणी ऑफिसमध्ये येते आणि सगळ्या स्टाफकडे एकवार नजर फिरवते.
"अ बिग कॉंग्रॅच्युलेशन ईरा!" अद्वैत हातातील फुलांचा बुके ईराच्या हातात देतं तिचे अभिनंदन करतो तशी ईरा तो बुके जोरात खाली फेकून देते.
"व्हॉट ईज धीस अद्वैत? तुला माहित आहे हे असले काही मला आवडत नाही आणि बाकीचे सगळे तुम्हाला काम नाहीत का?" ईरा मोठ्याने ओरडते तसा सगळा स्टाफ शांत होतो.
अद्वैत चा अपमान करून ईरा सरळ तिच्या केबिनमध्ये निघून जाते.. सौमित्र मात्र ईरा च्या पाठमोर्या आकृतीकडे पाहंत राहतो नुसता एकटक.
ईरा तिथून गेल्यावर अद्वैत तो बुके उचलतो आणि पिऊनला डसबीनमध्ये टाकायला आणि फ्लोअर साफ करून घ्यायला सांगतो.
सर्वजण काहीच झाले नाही या अविर्भावात पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागतात सुद्धा आणि ते पाहून सौमित्रला खूप विचित्र वाटते.
तो सुद्धा आपल्या डेस्कवर जाऊन बसतो आणि त्याचे काम करू लागतो. आज ऑफिसमध्ये अगदी स्मशान शांतता असते.
" मिस्टर सौमित्र, शर्मा आणि मेहता कंपनी चे रिपोर्टस घेऊन ईरा मॅडम च्या केबिनमध्ये चला.." अद्वैत
"ओके सर" असे म्हणतं चं तो अद्वैत पाठोपाठ ईरा च्या केबिनमध्ये जाऊ लागतो.
"मे आय कम इन मॅडम" अद्वैत त्या दोघांना आत येण्यासाठी परमिशन घेतो ईरा ची.
"येस अद्वैत प्लीज कम.. " ईरा लॅपटॉप मधून डोके वर न काढताच त्यांना आतमध्ये येण्याची परमिशन देते.
दोघेही आतमध्ये जाऊन बसतात. पाच मिनिटांनी ईरा तिचे डोके लॅपटॉप मधून बाहेर काढते.
"व्हू इज ही??(हा कोण आहे??) " ईरा
"मॅडम ही इज मिस्टर सौमित्र.. न्यु जॉईनिंग आहे. पंधरा दिवसांपूर्वीच शेखर सरांनी अपॉइंट केले आहे. शर्मा आणि मेहता कंपनीच्या फाईल्सवर सध्या हेच काम करत आहेत." अद्वैत
"ओह्ह.. शेखर सरने अपॉइंटमेंट केले आहे यांना आय सी.. ओके गिव्ह मी दॅट फाईल्स.. " ईरा फाईल हातात घेते आणि दोन्ही कंपनीचे रिपोर्ट्स चेक करू लागते.
" ओके ऑल गुड.. दोन्ही कंपनी सोबत नेक्स्ट मिटींग्स कधी आहेत?? " ईरा प्रश्न विचारते तसे अद्वैत आणि सौमित्र एकयेकांकडे पाहू लागतात कारण ईरा ने नेमका प्रश्न त्या दोघांपैकी कोणाला विचारला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
"डोन्ट यू हॅव टंग टु स्पीक?? हे न्यू कमर आय एम आस्कींग टू यू..?? (तुम्हाला तोंड नाही दिलं आहे का?तुम्ही आत्ताच जॉईन केले आहे ना, तुमच्याशी बोलतेय मी. " ईरा जरा मोठ्यानेच बोलते तसा सौमित्र जरा चाचरतो.
"स.. सॉरी मॅम.. नेक्स्ट मिटींग्स मंडेला आहेत.." सौमित्र
" ओके..अद्वैत यू कॅन कम लॅटर(मिस्टर अद्वैत तुम्ही जरा नंतर या.. " ईरा
" ओके मॅम.. " असे म्हणून अद्वैत फाईल्स तिथेच ठेवतो टेबलवर आणि केबिनमधून बाहेर पडतो.
"सो मिस्टर सौमित्र.. तुम्ही या अगोदर कुठल्या कंपनी मध्ये काम करत होता?? " ईरा
" मॅम मी एच. आर कंपनी मध्ये ज्युनियर क्लार्क या पोस्टवर काम करत होतो. " सौमित्र
" ओके.. जस्ट गिव्ह मी फाईव्ह मिनिट्स न वील स्टार्ट युअर इंटरव्यूह.. (एक पाच मिनिटे थांबा, आपण तुमची मुलाखत सुरू करूया) " ईरा च्या बोलण्याने सौमित्र गोंधळतो.
" मॅम वीच इंटरव्ह्यू यू आर टॉकिंग अबाऊट?? (तुम्ही कुठल्या मुलाखती बद्दल बोलत आहात??) " सौमित्र
"लिसन मिस्टर सौमित्र सध्या ही कंपनी मी हँडल करते सो शेखर सरांनी तुम्हाला अपॉइंट केले आहे त्यामुळे आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे परत.. आणि मी डिसाईड करेल की तुम्ही इथे काम करण्यासाठी राईट पर्सन आहातं की नाही ते. " ईरा
" बट मॅम मला शेखर सरांनी माझा इंटरव्ह्यू घेऊनच मला अपॉइंट केले मगं पुन्हा इंटरव्ह्यू?? " सौमित्र ईराला विचारतो ईराचा चेहरा रागानै लाल होतो.
ती रागारागाने टेबलवर हात आपटते तेव्हा आपण हा प्रश्न विचारून खूप चं मोठी चूक केली आहे हे लक्षात येते सौमित्रच्या.
" मिस्टर सौमित्र.. डोन्ट एव्हर ट्राय टु क्रॉस युअर लिमिटस..?? आय एम युअर बॉस डोन्ट फरगेट दॅट (मिस्टर सौमित्र तुमच्या मर्यादा ओलांडायचा प्रयत्न ही करू नका आणि मी तुमची बॉस आहे हे लक्षात ठेवा)
इथे लास्ट डिसीजन माझा असतो आणि मला कोणीही त्याला अपोज केलेले आवडत नाही.. तुम्ही न्यू आहातं सो ही फस्ट वॉर्निंग होती तुमच्यासाठी.. इथून पुढे तुम्ही अशी चूक करणार नाहीत हे लक्षात ठेवा.. आदरवाईज तुम्हाला तुमचा जॉब गमवावा लागेल.. " ईरा प्रचंड रागाने बोलते तेव्हा तिचे डोळे अक्षरशः आग ओकत असतात आणि ते पाहून सौमित्र चांगलाच घाबरतो. त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागतातं.
" सॉरी.. आय एम व्हेरी सॉरी मॅम.. मी पुन्हा अशी चूक नाही करणार.. " सौमित्र ईरा ची माफी मागतो.
" ह्म्म दॅटस बेटर.. ओके सो आर यू रेडी..?? लेटस स्टार्ट द इंटरव्यूह (ओके हे ठीक आहे.. तुम्ही तयार आहातं का?? मी मुलाखतीला सुरूवात करतेय.)" ईरा इंटरव्यूहसाठी सुरूवात करते.
ती सौमित्रला कंपनी रिलेटेड काही प्रश्न विचारते आणि सौमित्र त्याची उत्तरे देत राहतो.
"व्हेरी वेल.. मिस्टर सौमित्र यू आर एबल टु वर्क हिअर (तुम्ही इथे काम करण्यासाठी पात्र आहातं)..
जस्ट कीप वर्किंग.. " ईरा सौमित्रची मुलाखत घेते.
जस्ट कीप वर्किंग.. " ईरा सौमित्रची मुलाखत घेते.
सौमित्र केबिन बाहेर पडतो आणि एक निश्वास सोडतो.
"हुश्श.. सुटलो बाबा एकदाचा.. वीर खरचं बोलला होता. या अँग्री यंग लेडी पासून खूप सावध रहावं लागणार आहे आणि बोलताना खूप विचार सुद्धा करावा लागेल.
हिचा राग त्या हिटलर पेक्षा ही भयानक आहे रे देवा. आतमध्ये काही वेळ बसलो असतो अजून तर नक्की चं जीव गेला असता माझा. देवा सांभाळून घे रे बाबा पुढेही"
क्रमशः
तर अशी होती आपल्या नायक आणि नायिकेची पहिली भेट.. पहिल्या चं भेटीत आपल्या नायिकेने जो काही सिक्सर मारला आहे त्यामुळे आपल्या कथेचा नायक एकदम घाबरला आहे. आता त्यांच्या प्रेमाची मॅच पुढे कशी रंगतेय हे पाहणे खूप उत्कंठावर्धक ठरणार आहे त्यासाठी कथा वाचत रहा.
सदर कथेचे रोज भाग येतील..कथा वाचण्यासाठी पेजला आजच फॉलो करा
©®ऋतुजा कुलकर्णी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा