एकदा मराठीच्या तासाला सुनीता मॅडम निबंधाच्या वह्या तपासत होत्या. विषय होता— 'माझे स्वप्न'.
बहुतेक मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर किंवा पायलट होण्याबद्दल लिहिले होते. जेव्हा सुनीता मॅडम अवंतीच्या वही पाशी पोहोचल्या, तेव्हा त्यांना तिथे फक्त अर्धाच पान भरलेले दिसले. त्या पानावर निबंधाऐवजी एक छोटीशी कविता होती आणि खाली एका फाटलेल्या बाहुलीचे चित्र काढले होते.
सुनीता मॅडमना आश्चर्य वाटले. त्यांनी अवंतीला मधल्या सुट्टीत स्टाफ रूममध्ये बोलावले.
बहुतेक मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर किंवा पायलट होण्याबद्दल लिहिले होते. जेव्हा सुनीता मॅडम अवंतीच्या वही पाशी पोहोचल्या, तेव्हा त्यांना तिथे फक्त अर्धाच पान भरलेले दिसले. त्या पानावर निबंधाऐवजी एक छोटीशी कविता होती आणि खाली एका फाटलेल्या बाहुलीचे चित्र काढले होते.
सुनीता मॅडमना आश्चर्य वाटले. त्यांनी अवंतीला मधल्या सुट्टीत स्टाफ रूममध्ये बोलावले.
" अवंती, इकडे ये बाळा. " मॅडम प्रेमाने म्हणाल्या.
अवंती भीतीने थरथरत होती. तिला वाटले आता मॅडम तिला अपूर्ण निबंधासाठी ओरडणार. ती खाली मान घालून उभी राहिली.
" हे बघ अवंती, मी तुला ओरडण्यासाठी नाही बोलावलं. मला सांग, तू निबंध पूर्ण का नाही केलास ? आणि ही कविता तूच लिहिली आहेस का ? " मॅडमनी वही तिच्यासमोर ठेवली.
अवंतीने हळूच मान वर केली आणि दबलेल्या आवाजात म्हणाली,
" मॅडम, मला डॉक्टर किंवा इंजिनिअर नाही व्हायचंय. मला... मला फक्त गोष्टी सांगायला आणि चित्र काढायला आवडतात. पण आई म्हणते, याने पोट भरत नाही. अभ्यास केला तरच मोठं होता येतं."
मॅडमना अवंतीच्या डोळ्यांत एक प्रकारची अगतिकता दिसली. अवंतीची घरची परिस्थिती बेताची होती. तिचे वडील एका फॅक्टरीत कामगार होते आणि आई लोकांकडे शिवणकाम करायची. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे फक्त मार्क मिळवणे आणि नोकरी मिळवणे इतकेच होते.
सुनीता मॅडमना समजले की अवंती ही एक 'विशेष' मुलगी आहे. तिची प्रतिभा पुस्तकी व्याकरणात नसून तिच्या संवेदनशील मनात आहे. मॅडमनी ठरवले की या मुलीला आपल्याला बाहेर काढावे लागेल.
" अवंती, तू जे लिहिलं आहेस ना, ती खूप सुंदर कविता आहे. पण आयुष्यात आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी एका शिडीची गरज असते आणि ती शिडी म्हणजे शिक्षण. तू जर नीट शिकलीस, तर तू जगाला तुझे विचार जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकशील." मॅडमनी तिला समजावले.
पुढचे सहा महिने सुनीता मॅडमनी अवंतीवर विशेष लक्ष दिले. त्या तिला फक्त शिकवत नव्हत्या, तर त्या तिला प्रोत्साहन देत होत्या. शाळेच्या वार्षिक अंकात मॅडमनी अवंतीची ती कविता छापून आणली. जेव्हा अवंतीने आपले नाव छापलेले पहिले, तेव्हा तिच्या डोळ्यांत जो आनंद होता, तो कोणत्याही 'ए-प्लस' ग्रेडपेक्षा मोठा होता.
मात्र, खरी परीक्षा अजून बाकी होती. अवंती दहावीत आली आणि तिच्या वडिलांच्या नोकरीवर गदा आली. घरात आर्थिक संकट ओढवले. अवंतीच्या वडिलांना समजेना काय करायचं ?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा