माझे जीवन गाणे (आत्मचरित्र)

Mazeatmchritra
माझे जीवन गाणे (आत्मचरित्र)


आत्मचरित्र लिहण्याची फेरी आली आणि डोक्यात आतापर्यंत झालेल्या गोष्टी येऊ लागल्या. याआधीच्या माझ्या कथा मालिका मध्ये काही प्रसंग लिहले काही लेखात मी माझ्या बद्दल यापूर्वी लिहले आहे. मग आता काय लिहू आणि काय लिहता येणार नाही. फारच अवघड वाटले सगळ्या समोर ओपन बूक होणे. तरी फेरी अनिवार्य आहे. घेतले हातात लिहायला.

आईची आई, मोठा भाऊ, वहिनी, मुले मुंबईत. आणि आईची डिलिव्हरी अवघड म्हणून मुंबईला आई डिलीव्हरी साठी गेली. 13 जून 1984 ला वटपौर्णिमेचा. रात्री जन्म झाला. के ई एम हॉस्पिटलमध्ये मी साडे सात महिन्यांची प्री मॅच्युअर्ड झाले. एखाद किलोची मी झाले. माझ्या सोबत माझा जुळा भाऊ होता तो एक महिन्याचा होऊन दवाखान्यातच गेला. मी सिरीयस होते. कावीळ झाला होता. पिवळी धमक आई आणि मी झालो होतो. काचेच्या पेटीत होते मी. आईचे तीन वेळा टाके निघाले तीन वेळा घातले. आई खूप सिरीयस होती. रोज मृत्यूशी झुंज देत होतो. मी रडायचे खूप आणि डॉक्टर सांगायचे नर्सला बेबी रडली नाही पाहिजे. दोन महिने दवाखान्यातच होतो. कसे बसे आई आणि मी वाचलो. संघर्ष जन्मा पासूनच.....


मी माझ्या आई आणि बाबांना लग्नाच्या नंतर सतरा वर्षांनी झाले आहे. आई आणि बाबा दोघांचे वय जास्त होते. माझ्यापेक्षा साडे अकरा वर्षांनी मोठी सख्खी एकुलती एक बहिण मला आहे. मी प्री मॅच्युअर्ड झालेली डोळ्याच्या बुबुळाची वाढ झाली नाही. माझ्या दोन डोळ्याचा आकार वेगळा आहे. मोठ्या बहिणीची शारदा मंदिर शाळा बुडू नये म्हणून तिला नंदू आत्याकडे औरंगाबाद मध्ये ठेवले होते. ती आधी अकरा वर्षे एकुलती एक होती. आणि मी झाले तेव्हा 2 महिने आत्या कडे रहावे लागले आत्या नी जेवायला कमी देणे, जास्त काम करून घेणे असा काही त्रास झाला. तिची शाळा दुपारी वाजता तिला आत्या घरातून आठ वाजता काढून द्यायची हि रडत आई जिल्हा परिषद ज्या शाळेत शिकवायची त्या शाळेत जायची झाडाखाली बसून रोज आईला पत्र लिहून पाठवायची. आज आत्या ने हा त्रास दिला आज तो त्रास दिला. बहिणीच्या शाळेची फिस भरली गेली नाही. तिला वर्गाबाहेर तास न तास उभे रहावे लागले. मुंबईत पत्राचा ढिग मामाच्या घरी जमा झाला. आईच्या आईने तो माझ्या आई कडे दवाखान्यातून येताच दिला. आई, मी. लगेच गाडी. करून औरंगाबाद ला निघालो. बहिणीला आत्याच्या घरून घेतले आमच्या स्वतःच्या हडकोच्या घरी गेलो.


बहीण मोठी तिने आयुष्यभर माझ्यावर राग धरला तू झाली मला त्रास झाला. तू झाली कशाला? वाटेकरी. याआधी साडे अकरा वर्षे पूर्ण माझे होते. मी एकुलती एक होते. तू झाली मला आत्या कडे रहावे लागले. आत्याने त्रास दिला. आई तुझ्यावरच प्रेम करते माझ्यावर नाही. असे ती अजूनही बोलते. आजही ती कधीच मला फोन करत नाही. ती आता मुंबईत रहाते. मी फोन केला घेत नाही.


आई जिल्हा परिषद शाळेत औरंगाबाद माहेरच्या जपे आडनावाने फेमस होती. चांगली शिक्षिका म्हणून गणित आणि खेळ. नंतर आईने खेळांच्या ऑफिस मध्ये क्रिडा ऑफिस मध्ये बदली करून घेतली.


आई ऑफिस मध्ये गेल्यावर मी घरी, बाबा आणि मोठ्या बहिणी सोबत. बाबा सुधाकर विठ्ठल चाटी माझे बाबा खूपच हुशार, ज्ञानी ज्योतिषी आणि बाबाचे मराठी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत, साऊथ इंडियन भाषा यावर खूप जास्त प्रभुत्व. शर्ट हँड आणि टायपींग मध्ये खूपच पारंगत. खूप नोकऱ्या केल्या आणि सोडल्या. घरी द हिंदू, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत तीन पेपर यायचे बाबा वाचणार ज्ञान खूपच होते त्यांना. बाबा मूळ सोलापूरचे. कोणत्याही इंग्रजी शब्द विचारा लगेच 4-5 अर्थ सांगणार तो शब्द कसा कुठे वापरायचा हे सांगणार चालती बोलती माझी डिक्शनरी म्हणायचे कधीच मला डिक्शनरी बघावी लागत नव्हती. बाबा ऊंच, धिप्पाड 6 फुटांच्या वर.. नाक सरळ. खुप भारदस्त आवाज मला खूपच धाक बहिण आणि बाबांचा दोघे कडक आई ऑफिस मध्ये. बाबा कडे दिवसभर लोक चालू रहायचे ज्योतिष पहायला. पत्रिका करणे ती पत्रिका चेन्नई वरून बनून यायची. बाबा कधीच त्यातून पैसे कमवायचे नाही. एक छंद म्हणून ज्योतिष पहायचे. खुपच परफेक्ट सांगायचे मला खूप किस्से पण आठवतात त्यांनी सांगितले तसेच झाले. मी विचारले माझे नाही सांगायचे. तुझे सगळे चांगले आहे बस्स. बाबांना चहा खूपच आवडायचा जे लोक येतील त्यांच्या सोबत चहा मला करावा लागायचा मी कंटाळून जायचे. बाबा सिगरेट ओढत होते.


बाबा बाहेर गेले. हि बहिण उन्हात रिंगण करायची त्याच्या बाहेर आली की तुला जीवंत जाळेन. मग दिवसभर उन्हात मी. हे माझ्या औरंगाबाद च्या लहान मामी ने पाहिले आई ला सांगितले माझ्या. आई बहिणीला रागवली बहुतेक तर मला परत मी सांगितले म्हणुन मार बसला बहूतेक. बहिणीचा खूपच मार खाल्ला होता लहानपणी.


मी बाबा आणि ताई यांच्या तावडीत सापडायला नको म्हणून दिवस दिवस बाहेर खेळायचे मैत्रिणी सोबत गल्लीत विटी - दांडू,, पकडा पकडी, खेळ भांडी म्हणजे भातुकली, माती आणि चिखल. सातवी पर्यंत खूप खेळले. मी सहावीत असताना माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. मिलिटरी मॅन सोबत. रमेश कुलकर्णी भावजीचे नाव.


एकदा मी साडी घालून टिपऱ्या खेळायला गेले टिपऱ्या हौसेने मी बनवल्या होत्या. त्याच टिपरी ने बहिणीने मारले. मारत घरी नेले. हे रमेश भावजी मध्ये पडले वाचवायला त्याच्या हातावर टिपऱ्या पडल्या होत्या. टिपऱ्या खेळती, नाचायला जाते, नाचरी व्हायचे का तूला? टिपरी चे वळ आले होते. तेव्हापासून परत कधी टिपरी खेळली नाही. आवड हि राहिली नाही. साडी घातली नाही. काही वाटेना त्या टिपरी बद्द्ल.कायमची सुटली टिपरी.


आई मात्र लाड करायची डब्यात रोज सकाळी हवा तो पदार्थ चिवडा, गूळ पापडी, तिखटा मीठाच्या पुऱ्या... अजून शाळेच्या मैत्रीणी व्हॉटस् अँप गृप वर आईच्या चिवड्याची आठवण काढतात. गुळ पापडी ची आठवण काढतात. बाबा पण जशी मी मोठी झाले तसे मारत नव्हते. बाबांनी लहानपणी, मोठेपणी लाड पण खूपच केले आहे. चॉकलेट जादूने बाबा आणायचे. गमाडी गम्मत. जंझाड..म्हणायचे. आई मला लाडाने सोन माझे सोनूली, सोनु, सोनी म्हणायची.. टि व्हि पहायला आईच्या मांडीवर डोके ठेवून पडून पहायचे. आई बाबा दोघांनी लाड खूप केले. अगदी फुलात ठेवले. परीस्थिती ची जाणीव होऊ दिली नाही. आई ऑफिस मध्ये जायची मग धुण्यासाठी, भांडी घासायला कामवाली बाई असायची. आई स्वयंपाक करणार. मी कधीच एक पोळी लाटली नाही. आई बाबा दोघे अभ्यास कर, ट्यूशन शाळा, कॉलेज बुडवू नको. खूप अभ्यास कर. आई पहाटे अभ्यासाला उठवायची.


शाळा आनंद कृष्ण वाघमारे त्याच शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंत. पाचवी ते सातवी माझी सख्खी लहान मामीच इंग्रजी शिकवायला. ती कधीच चांगली माझ्याशी बोललेली आठवत नाही. " मेली म्हशे, मेली डांबरट" हेच शब्द ठरलेले. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न शाळेत गेले नाही. हि मामीच टाईमटेबल परीक्षेचे तयार करणार लग्नात इतक्या वेळेला विचारून मला सांगितले नाही ना टाईम महित ना उद्या कोणता पेपर महित. ट्रिपचे 300 - 400 माझे पैसे भरून टाकायची. नंतर मी आई कडून घेऊन देऊन टाकायचे. ट्रिप मध्ये जाताना आई लाडू, चिवडा बनवून देणार. खर्चायला पैसे आणायला विसरले की मामी द्यायची नाही हे कशाला घ्यायचे ते कशाला घ्यायचे. सातवीत 3 दिवसांची ट्रिप गेली होती. पहिल्याच दिवशी रात्री उशिरा पहिल्यांदा मला एम सी आली. मामीच सांगायला मला मला काहीच माहित नाही. ट्रिप कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर दर्शन घेतले नाही. नंतर आई घ्यायला आली होती ट्रिप ला आईला सगळ्या मॅडम सांगू लागल्या तेव्हा कुठे फोन, मोबाईल काहीही नाही. मग चौथ्या दिवशी आईने घरी नेले बांगड्या, नवीन ड्रेस घेतला गोड केले. न्हाऊ घातले.


सातवीच्या सुट्टीत आई, बाबा आणि मी ताई कडे अयोध्या मिलिटरी क्वार्टर मध्ये रहायला गेलो होतो. काशी झाली. गंगेत स्नान केले. घाट पाहिले. काशी. विश्वेश्वराचे दर्शन झाले. शरयू नदी पाहिली. राम तंबू मध्ये पाहिला लांबूनच दर्शन झाले. .

आठवीत मी मावशी झाले. बहिणीला पहिली मुलगी झाली. गल्लीत बर्फी वाटली होती मी. आई गेली 3 महिने अयोध्येत. मी आणि बाबाच इकडे औरंगाबादला. माझे 3 किलो वजन कमी झाले. मेस चे बाबा आणि मी खायचो.


आईने मला नववी आणि दहावीच्या वेळी चाटे कोचिंग क्लासेस लावले होते. चाटे ची फिस 15 हजार रूपये एक रक्कमी भरणे शक्य नाही तर आईच्या ऑफिस च्या मैत्रिणीने मेहमूदा खानने भरली होती. आईने तिचे सोन्याचे मंगळसूत्र पैसे परत करेपर्यंत खान ताईला दिले होते. पैसे दिल्यावर परत नंतर घेतले होते. पण आईने माझ्यासाठी केले होते. आई आपल्या साठी नोकरी करते हि जाणीव मला होती. सेकंड आणि फोर्थ सॅटरडेला आईला सुट्टी म्हणून अर्धी शाळा असली की कधी घरी जाते असे व्हायचे. अगदी लहानपणी रविवार सुट्टी आई भेटणार सोहळा असायचा. रंगोली, कृष्णा सिरीयल लागायच्या. आई ऑफिस हून येण्याची वाट पहायची लहान असताना कोपर्‍यावर आप्पा चे किराणा दुकाना च्या जवळ उभे राहून आई येताना दिसते का पाहायचे किती तरी वेळ आई आली की पळत जाऊन तिला मिठी मारायची.


शाळेत जायला पहिल्या दिवसापासून एस टी बस नी जाणे येणे. लांब होते हडको ते औरंगपूऱ्यात जाणे येणे रोजचे. बसचा पास काढलेला. बहिणीने सगळे स्टॉप पाठ करून घेतले. बस कोणत्या मार्गे जाते आणि येते. या स्टॉप नंतर कोणता स्टॉप. बसला गर्दी खूप कसे पटकन चढायचे कशी जागा मिळवायची. बहिणीचे ट्रेनिंग.... बसचे अंकल ओळखीचे. कुठेही दिसले बस थांबवायचे. पहिल्या पायरीवर उभे राहून प्रवास केला आहे. त्यात पक्की झाली होती. एकट्याने जाणे येणे पहिलीत असताना. हि बहिण मोठी कॉलेज ला जायची ती सोबत स्टॉप वर असायची मुद्दाम मला म्हणायची बस आली का पहा बघेपर्यंत हि स्टॉप वर च्या गर्दी मध्ये मुद्दाम गायबच व्हायची स्टॉप वर, बस मध्ये दिसायची नाही डायरेक्ट घरी गेले की घरी सापडायची.

दहावीच्या सुट्टीत आई माझी रिटायर झाली. 18 ते 58 चाळीस वर्षे पूर्ण नोकरी केली. सरकारी नोकरी. आईला ऑफिस मधल्या मैत्रीणीनी सोन्याची अंगठी, बूके, दिला. सगळ्यांनी हॉटेल शांताई पैठणगेट इथे जेवण दिले. लक्की ज्यूस सेंटर ला नेले पार्टी सेंड ऑफ दिला आईने मला नेले होते.

आईला शेवटी सुट्टी मिळत नव्हती शेवटी नोकरी करणे हजर रहाणे कम्पल्सरी आहे बॉस म्हणाले. बहिणीला दुसरी मुलगी झाली. आईला जाणे शक्य नव्हते. मग बहिण आली माहेरी बाळंतपणासाठी भावजी सुट्टी वर महिनाभर यायचे. बहिण मला म्हणायची माझ्या पोरीला हात लावू नको म्हणायची. मी कायम तिला मोठी बहिण म्हणून मान दिला. ताई म्हणते.


कॉलेज मध्ये अकरावीत असताना आईने मला लाल स्कूटी घेऊन दिली होती कॅश 30 हजारांची. आठवीत असता लेडी बर्ड सायकल घेतली होती. सायकल तिसरीत असताना आईकडून एक रूपया घेऊन एक तास भाड्याने सायकल आणून ओळखीच्या संतोष बोबडे कडून शिकले होते. सायकल चा बॅलन्स येत होता त्यामुळे गाडी लगेच आली. मोठ्या बहिणीला सुपर स्टार लुना घेतली होती कॉलेज मध्ये जायला ती मी सहावीत असताना भावजी कडून शिकले.
भावजीशी. बोलायचं नाही मोठी बहिण मला सांगायची.


आई आणि बाबांचे वय जास्त असल्याने त्यांना मला दहावी आणि बारावीच्या परीक्षा सेंटर ला सोडणे आणि आणणे हे जमले नाही. मी माझी. बस किंवा स्कूटी वर जायचे मी माझी यायचे. एवढ पक्कं मला केले होते.


रिक्षावाला आला नाही म्हणून शेजारी रडणार्‍या मेघाला माझी बारावी असताना स्कूटी वर शाळेत नेले आणि आणले होते.

बी ए फस्ट. ईयरला माझी मैत्रीण झाली दिप्ती कुलकर्णी आणि श्रध्दा चांदराणी सोबत. अर्थशास्त्र विषय होता प्रॅक्टीकल बुक सबमिट करायची होती. माझी तयार होती दिप्ती ला मी तयार करायला दिली. दिप्ती ने तयार केली आणि अगदीच एका दिवसात घनिष्ठ मैत्री झाली. दिप्ती आणि श्रध्दा माझ्याच शाळेत होत्या. पण कॉलेज मध्ये जास्त जिवलग मैत्रीणी झाल्या.. आमचे विषय सारखे होते. एकाच कॉलेज मध्ये, एकाच इंग्रजी च्या ट्यूशन मध्ये शेख सरांकडे , श्रध्दा आणि मी एकाच कॉम्प्युटर क्लास मध्ये. दिवसभर सुरू कॉलेज, ट्यूशन, कॉम्प्युटर क्लास मधल्या वेळेत श्रद्धा आणि दिप्तीच्या घरी डबा खायचा. त्या दोघी औरंगपूऱ्यात रहायच्या.. श्रध्दा च्या आत्या ला माझ्या आईने जिल्हा परिषद शाळेत शिकवले होते. ती जूनी ओळख होतीच.


बी ए सेकंड इयरला मला टायफॉईड, अँनिमिया. झाला होता. एक महिना कॉलेज बुडले श्रध्दा आणि दिप्ती घर शोधत येऊन गेल्या. मी रक्त चेक करायला गेले होते.

बी ए थर्ड इयरला ताई आणि भावजी नोकरी संपून रिटायर झाले भावजी. औरंगाबाद मध्ये रहायला आले.


शाळा आणि कॉलेज मध्ये मुले मागे लागायचे प्रपोज करायचे. पण बाबांचा धाकच इतका होता की बस्स. लव्ह वगैरे शक्य नाही. मैत्री ठेव फार तर. हुशार मुलांशी मैत्री होती तो नोट्स देत होता. चांगल्या हस्ताक्षरात आईला नोट्स पाहून त्या मुलाचे कौतुक वाटले होते. पण माझ्या कडुन निखळ मैत्री असायची. बाबांना शेजारी मुलीशी बोलले तर चालत नव्हते. खुपच कडक वातावरण. त्यांचा खूप धाक होता भिती होती. आणि लव्ह मॅरेज करून आपल्या आई आणि बाबा चे नाव खराब मला करायचे नव्हतेच. माझे ठरले होते आई आणि बाबा म्हणतील तोच मूलगा.

पण मला केस वाढलेला धोनी हेलिकॉप्टर शॉट मारलेला आवडायचा नंतर बातमी आली औरंगाबाद मध्ये माझ्याच शहरात येऊन धोनी हॉटेल मॅनेजमेंट वाल्या मैत्रिणी सोबत येऊन भेटला. झाले... गंमत.. आपली..

वडीलांना टि बी झाला. बाबा खूप सिरीयस होते आणि त्यावेळी औरंगाबाद मध्ये 2006 ला कर्फ्यू लागला होता. ज्या दवाखान्यात त्यांची ट्रिटमेंट चालू होती. तो डॉक्टर दवाखाना उघडत नव्हता. मग बाबांना श्वास घ्यायला त्रास होत होता तेव्हा 4 जण पुरूष जाऊन डॉक्टरांना घरी घेऊन आले. डॉक्टर म्हणाले मोठ्या हॉस्पिटल मध्ये हलवा सध्या पूरता गोळ्या दिल्या.


दुसऱ्या दिवशी रात्री खूप पाऊस आला डिसेंबर मध्ये. घोट्याच्या एवढ पाणी बाबाच्या पायाला जखम झाली आणि त्याला मुंग्या लागल्या पण बाबांना जाणवत नव्हत्या मी पाण्यातून दुकानात रात्री उशिरा सामसूम रस्त्याने गेले. दुकान बंद मुंग्या मारायचा खडू नाही मिळाला. अचानक मुंग्या मारायचा खडू घरात सापडला आईला. असे प्रसंग असतात

माझे एम ए. इंग्रजी वर्ष एकच दिवस फी भरून परीक्षा फॉर्म भरून देण्यासाठी. बाबांना मोठ्ठ्या दवाखान्यात अ‍ॅडमिट केलेले. बाबांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी आईने. तिच्या पाटल्या मोडल्या. पैसे नव्हते रोजचा बाबाचा गोळ्या,, औषधांचा खर्च खूपच. माझी फीस भरली नाही तर माझे वर्ष वाया जाणार. 3--4 तास बाकी अचानक दिप्ती कुलकर्णी मैत्रीणीचा फोन आला. शेजारच्या कडे अग ये ना तुझ्यासाठी पैसे मी माझ्या बाबांकडून घेतले तुझे आणि माझे. फीचे मी तिला मागितले नव्हते तिने स्वतः हून माझ्यासाठी घेतले. ती फॉर्म भरण्यासाठी माझ्या करता थांबली. घरून कॉलेजला जाण्यासाठी पेट्रोल भरायला पैसे दुसर्‍या मैत्रीणीने श्रद्धा चांदराणीने दिले होते. वेळेला मदतीला धावून येणाऱ्या मैत्रीणी दोन दिप्ती आणि श्रध्दा देवासारख्या धावून आल्या. एम ए इंग्रजी परीक्षेचा फॉर्म भरला आम्ही तिघींनी सोबतच.


नर्स म्हणत होती स्ट्रॉंग नाश्ता द्या बाबांना. मी चिमणी आणि कावळ्याचा घास तोंडात भरवला. बाबा खूप रडले होते त्याच्या समोर माझे लग्न झाले नाही म्हणून. तेव्हा मला कळलं नाही आज त्यातले प्रेम, काळजी, दुःख, पश्चाताप कळला तर बाबा नाही. बाबा गेले मी बावीस वर्षाची होते एम ए इंग्रजी बाकी होते.

बाबा गेले आई काही बोलत नव्हती. रडत नव्हती. मी एकटीने आईला जवळ घेतले. आणि नातेवाईकांना फोन केला दवाखान्यात कॉईन बॉक्स फोन वरून. बाबा गेले त्यांचे वय 72 माझे 22 मी उशिरा झाले.
फार लवकरच बाबा गेले. मोठे छत्र हरपले माझे.

आई मात्र खंबीर भूमिका घेतली होती. माझ्या समोर कधी रडलेली पाहिली नाही. एम. ए. इंग्रजी रिझल्ट च्या दिवशी 13 जूनला वाढदिवस आईच्या डोळ्याचे मोतीबिंदू ऑपरेशन झाले होते. 1 डोळ्याचे तीन वेळेस प्रॉब्लेम झाल्यामुळे. आई आत बाहेर मी एकटीच. नुकतेच बाबा गेलेले.


बाबा गेले आम्ही पेपर मध्ये दिले होते. ते पाहून एका मोठय़ा कंपनी च्या मालकाला समजले. माझे बाबा त्यांच्या कंपनी स्थापन मध्ये मालकाचे सेक्रेटरी म्हणून काम करत होते. मालकांनी 2 माणसे घरी पाठवली 2 साहेब घरी आले. बाबा गेल्यावर माझ्या आईला म्हणे काहीही मदत लागली तर कळवा. हि मुलगी काय करते. आई म्हणे शिकते आहे. शिक्षण झाले की आणते हिला नोकरी लावतो त्या फार्मा कंपनीत. माझे. एम. ए. इंग्रजी रिझल्ट लागला आणि काही दिवसांनी आईने नेले त्यांनी माझा इंटरव्ह्यू पण घेतला नाही. मला टेलिफोन ऑपरेटर नोकरी मिळाली 7/7/2007 मध्ये. माझ्या वडीलांची पुण्याई मी तिथे पर्मनंट झाले.



गल्लीत एका मैत्रिणीच्या सोबत पहाटे चालायला जात होते. तिचे लग्न जमले आत्ये भावासोबत. तिला आलेली स्थळ तिच्या वडिलांनी माझ्या आई कडे आणली माझ्या साठी. मग एक स्थळ होते त्या मुलांच्या मामा ना आई नोकरी करत असताना ओळखत होती. तो नंबर यांना लागला. यांनी मामाचा नंबर दिला आणि आईने फोन करून बोलणी झाली हे रविवारी पहायला आले. 3 फेब्रुवारीला आणि 8 फेब्रुवारी मला शुक्रवारी सुट्टी होती. अचानक आईने ठरवले सासू आणि दिर फार मागे लागले आमचे नातेवाईक येणार. मी पोस्टपोन करत होते झाले नाही. 8 फेब्रुवारी 2008 साखरपुडा. हे रोज भेटायला यायचे पिक्चर ला, गार्डन ला जाणे. 25 एप्रिल 2008 ला लग्न झाले.

3 ऑगस्ट 2010 ला मुलगा झाला. 3 ऑगस्ट 2018 मुलगी झाली. 2 सीझर खूप अवघड होते. आई पाहिल्या वेळी म्हणाली खंबीर वाहायचे सोनी. रामाचे नाव घे. एक बळ मिळाले. मी घाबरले नाही.

आई 10 एप्रिलला 2017 मध्ये गेली. आई 1 महिना आय सी यू मध्ये होती. आई अंघोळी साठी कडक तापलेल्या पाण्याने भाजली. श्रीमंत नातेवाईकांनी 1 रूपयांची मदत केली नाही. मोठ्या बहिणीने 5 पैसे लावले नाही. माझे सोने मोडले. बहिणीच्या घरी 23 दिवस होती. आई बाबा आणि माहेर नाही. यामुळे रामाच्या जवळ गेले. ज्याचे कोणी नाही त्याचा राम आहेच.

सासरी सासूरवास कोणाला चूकला आहे. मला पोळ्या येत नव्हत्या माहेरी लाडके शेंडेफळ. आता सासूबाई म्हणतात माझ्या पेक्षा पोळ्या चांगल्या करते. मी भाज्या छानच करते न भाज्या खाणारा दिर माझ्या हातच्या भाज्या खाऊ लागला.


हे शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरी ला मामाची शाळा आहे यांच्या. सचिव विरोधात गेला. त्यांच्या काय पोटात दुखते. महिती नाही. कोर्ट, कचेऱ्या, वकील, पोलीस, जेल, फरार यांच्या मागे काही चूक नसताना. पगार नाही वर्षानुवर्षे. घर कसे चालवायचे मग मला नोकरी करणे कम्पल्सरी झाले.


मी 3 कंपन्या मध्ये नोकरी केली. इन्शुरन्स एजंट म्हणून काम केले आहे. आता एनजीओ मध्ये एच आर असिस्टंट काम करते. माझा पगार पोरांची फिस भरायला कामाला येतो. उन्हात इन्शुरन्स सांगत मी आणि हे माझा नवरा फिरत होतो. मला डेंग्यू ताप मी डॉक्टर आणि रक्त तपासणी करणारे यांना इन्शुरन्स प्लॅन सांगितला आहे 4 वेळेस साडे पाच लाखांच्या वर प्लॅन काढला आहे..


सासू आणि सासरे दोघांना शूगर, इन्शुलिन बी. पी. सासूबाई 2 डोळ्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. सासऱ्यांना गँगरीन. झाले होते. सासूबाई चे खांदे दुखतात.


मी कंपनी, घर, मुलगा तान्हा सासूबाई घरी पहायच्या ए. पी. एम केले. अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता रात्री मुलगा जागवायचा त्याला पाजताना, झोका देताना रात्री अभ्यास करून एम. पी. एम मध्ये 64%मिळवले. एका कंपनीत एच आर मध्ये नोकरी मिळाली. आता पण एच आर मध्ये आहे.

अजून खूप संघर्ष केला आहे करत रस्ता शोधून ध्येय गाठू.


वाटेत काटे वेचीत चाललो
वाटले फुला फुलात चाललो..


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे