माझी होशील कां?
वृंदा बराच वेळ वाळूशी खेळणाऱ्या मुलाकडे पहात होती , छोट्या छोट्या हाताने तो वाळूचे घर बांधत होता,
वृंदा खाली बसली व त्याला मदत करू लागली. दोघं मिळून किल्ला बांधू लागले पण तो सारखा ढासळत होता.
तेवढ्यात "बंटी--- पुरे आता, चला घरी जाऊ अंधार पडायला लागला" आवाज ऐकताच छोटा उठला व हात झटकून आईकडे पळाला...
बराच वेळ मग वृंदा ते उरलेलं घर सावरायचा प्रयत्न करत होती.
हात वाळूशी खेळत होते पण-- मनांत वेगळेच विचार चालू होते..

आज ती कॅन्सर केअर डे च्या कार्यक्रमाला गेली होती. गेली दोन वर्ष ती जात होती पण आज थोड्याच वेळात तिला त्या वातावरणाचा उबग आला म्हणून मन रमवायला तिने तिच्या आवडत्या चौपाटी चा समुद्रकिनारा गाठला.
इथे माणसांचा अथांग समुद्र पसरला होता. किती नवी जुनी जोडपे, तरुण तरुणी ,लहान मुले, नारळ, भेळ विकणारे यांच्या समिश्र आवाजाने गजबजलेली चौपाटी .
पण -इतक्या गर्दीत ही-तिच्या मनाचा एकटेपणा कमी होत नव्हता.
याच ठिकाणी सोहमने व तिने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या,
एकत्र नारळ पाणी प्यायले होते .
लग्नाची तारीख ठरली होती ,त्याचे सेलिब्रेशन म्हणून आले होते.
एकत्र नारळ पाणी प्यायले होते .
लग्नाची तारीख ठरली होती ,त्याचे सेलिब्रेशन म्हणून आले होते.
त्यांच्या प्रेमाच्या भरतीला व नंतर च्या ओहोटीला हा रत्नाकर साक्षी होता.
"घर वाळूचे असो वा मातीचे त्याला ओलावा हवा त्याशिवाय नाही टिकत"--
आवाज ऐकून वृंदाने मान वर करून पाहिलं एक 30-32 च्या वयाचा स्मार्ट तरुण समोर उभा होता.
त्यांनी पुढे जाऊन एका बाटलीमध्ये पाणी आणून त्या वाळूवर शिंपडले .
"पहा बरं आताजमते की नाही"??
आवाज ऐकून वृंदाने मान वर करून पाहिलं एक 30-32 च्या वयाचा स्मार्ट तरुण समोर उभा होता.
त्यांनी पुढे जाऊन एका बाटलीमध्ये पाणी आणून त्या वाळूवर शिंपडले .
"पहा बरं आताजमते की नाही"??
वृंदा गोंधळलेल्या स्थितीत त्यांच्याकडे पाहतच राहिली.
तो खाली बसला, दोन्ही हातांनी वाळू एकत्र करून घर बांधायला लागला.
त्यांचा तो नीटनेटकेपणा वृंदा आश्चर्याने पहातच राहिली.
त्यांचा तो नीटनेटकेपणा वृंदा आश्चर्याने पहातच राहिली.
थोड्याच प्रयत्नाने त्यांनी सुंदर किल्ला बनवून टाकला त्यावरशंखशिंपले लावले होते.
" अरे वा किती छान" तुम्ही आर्किटेक आहात कां??
-- ते पुढे बोलणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला
फोनवर बोलताबोलता ते दूर निघून गेले.
" अरे वा किती छान" तुम्ही आर्किटेक आहात कां??
-- ते पुढे बोलणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला
फोनवर बोलताबोलता ते दूर निघून गेले.
बराच अंधार पडला असे पाहून वृंदा ही मग तिथून निघून घरी आली.
बेड वर पडल्या पडल्या तिच्या स्मृती जाग्या झाल्या लग्नाची तारीख ४ मे ठरली होती त्याआधीचा व्हॅलेंटाईन डे किती मस्त साजरा केला होता सोहम आणि तिने या समुद्रकिनाऱ्यावर.
" या टेडी सारखी आहे तू वृंदा, भोळी आणी आणि गोड , तिचे गाल दोन्ही हाताने कुस्करत ,तिला गिफ्ट म्हणून टेडी बियर देत सोहम तिला म्हणाला तेव्हा ति लाजून त्याच्या कुशीत शिरली होती.
आता फक्त त्या आठवणीच आहेत .
बरेच दिवस तो टेडी तिच्या बेडरूम मध्ये होता त्याला पाहून तिला सोहम आठवायचा, त्या सगळ्या चा तिला त्रास होऊ लागला.
एक दिवस तिने मन पक्कं करून तो टेडी खिडकीतून फेकून दिला..
एक दिवस तिने मन पक्कं करून तो टेडी खिडकीतून फेकून दिला..
तिच्या नकळत तिच्या शरीरात शिरलेला तो कॅन्सर त्याने तिचे सगळे विश्व कोलमडून टाकले.
सुरुवातीला तिला भूक लागत नसे खाण्याची इच्छा कमी कमी होत , थकवा जाणवत असे अंगात ताप असे.
मग ट्रीटमेंट सुरू झाली ,डॉक्टर कडे वाऱ्या सुरू झाल्या. निदान– पोटाचा कॅन्सर !सगळ्यांना आश्चर्यच वाटल इतक्या लहान वयात.?अजून तरह २२-२३ वय…..
मग ट्रीटमेंट सुरू झाली ,डॉक्टर कडे वाऱ्या सुरू झाल्या. निदान– पोटाचा कॅन्सर !सगळ्यांना आश्चर्यच वाटल इतक्या लहान वयात.?अजून तरह २२-२३ वय…..
या सर्वांत लग्नाची तारीख पुढे ढकलली गेली. दवाखान्याचे चक्कर, पथ्य पाणी या सर्वांत वृंदा भरडून निघाली. चेहऱ्यावरचे सौंदर्य कोमेजून गेले.
एक दिवस तिला कळले की सोहमला अमेरिकन कंपनीचा जॉब ऑफरआला आणि तो निघून गेला, तिला न भेटता सांगता.
काय समजायचे ते समजले तिला .पण तरीही मनाला आशा वाटायची हळूहळू ती पण मावळली.
ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती.
शरीर ही रिस्पॉन्स देऊ लागले कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला म्हणून क्युअर ही झाला
काय समजायचे ते समजले तिला .पण तरीही मनाला आशा वाटायची हळूहळू ती पण मावळली.
ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती.
शरीर ही रिस्पॉन्स देऊ लागले कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला म्हणून क्युअर ही झाला
एक वर्ष असंच गेल. मग ती जॉब वर परतजॉईन झाली. सोहमकडून काहीच रिस्पॉन्स नाही
आईला आशा होती ति अधुन मधून म्हणायची तू बोल,फोन करून विचार .
आईला आशा होती ति अधुन मधून म्हणायची तू बोल,फोन करून विचार .
आई च्या समाधाना साठी तिने सोहम ला बरेचदा काॅल केला पण नाॅट आन्सरिंग येत राहिल.. मग तिनेही त्याचा विचार मनातून काढून टाकला.
आई सोहम च्या आई बाबांना भेटून आली .त्या नंतर मग तिने सोहम चा विषय वृंदा जवळ काढला नाही.
आई सोहम च्या आई बाबांना भेटून आली .त्या नंतर मग तिने सोहम चा विषय वृंदा जवळ काढला नाही.
वृंदा ने कसेबसे हे दुःख पचवले पण आईला नाही जमले ती आजारी पडली नी त्यातच गेली.
एक भक्कम आधार गेला.
हे सगळ आठवून वृंदा ला अश्रू अनावर झाले.
एक भक्कम आधार गेला.
हे सगळ आठवून वृंदा ला अश्रू अनावर झाले.
आज ऑफिस मधल्या सुनयना
मॅडम ने घर बांधून झाल्याने पार्टीचे निमंत्रण दिलं होतं.
नव्या घरात प्रवेश, घर इतक छान व्यवस्थित बांधलेले, हाॅल ची भव्यता , किचन चा नीटनेटकेपणा सर्व खूपच आवडलं .
बॉसने विचारले कोण आर्किटेक्ट आहे?
कोणी मिस्टर वरूण-- आहे.
हे बघा आलेच ते--"या ,या मिस्टर वरूण , आपलीच आठवण काढत होतो.
अरे बापरे -- मी काही स्पेशल नाही हो ,हसत हसत मिस्टर वरूणबोलले…
तो-- आवाज कानांवर येतात वृंदाने वळून पाहिल! यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतहोत पण कुठे? ते काही आठवेना..
"पुढच्या आठवड्यात डॉक्टर देसाईकडे जनरल चेकअप साठी जायचं आहे लक्षात आहे नां?"सकाळी वहिनीने आठवण करून दिली.
"हो वहिनी मी नोट करून ठेवल आहे ".
"हो वहिनी मी नोट करून ठेवल आहे ".
वहिनी व दादा दोघे किती काळजी घेतात म्हणून तर सोहम सोडून गेल्यावर ही वृंदा तग धरून होती नाहीतर केव्हाच---.
डॉक्टर देसाईंकडे बरीच गर्दी होती.
वृंदा बाहेर वेटिंग मध्ये बसली .
आतून आवाज येत होता, डॉक्टर म्हणाले "--आता काळजीच काहीच कारण नाही! तुम्ही पूर्ण बरे आहात, तेव्हा साथीदार शोधा."
" बरा आहे हो मी एकटाच मजेत ,डॉक्टर "
" बरा आहे हो मी एकटाच मजेत ,डॉक्टर "
हा आवाज कुठे ऐकला??
नाही नाही ,मला आता भ्रम होतात की काय? डॉक्टरांना विचारायला लागेल.
तेवढ्यात वहिनी चाफोन" वृंदा ने जरा बाजूला जाऊन रिसीव्ह केला.
परत आली तो ते कोण होते ते निघून गेले होते.
नाही नाही ,मला आता भ्रम होतात की काय? डॉक्टरांना विचारायला लागेल.
तेवढ्यात वहिनी चाफोन" वृंदा ने जरा बाजूला जाऊन रिसीव्ह केला.
परत आली तो ते कोण होते ते निघून गेले होते.
वृंदा डाॅ च्या केबीन मधे गेली.
रविवारची सुट्टी ,दादा वहिनी लग्नाला गेलेले, वृंदा ला घरी कंटाळा आला म्हणून बाहेर पडली.
बाजारात फिरता फिरता दुकानात मिस्टर वरूण भेटले.
'तुम्ही?'
" तुम्हाला कुठेतरी पाहायल असं का वाटतं ?"
बाजारात फिरता फिरता दुकानात मिस्टर वरूण भेटले.
'तुम्ही?'
" तुम्हाला कुठेतरी पाहायल असं का वाटतं ?"
"नाही आठवत".??
म्हणजे सुनयना कडे पाहिलं त्या आधी?
"वाळूचा किल्ला "!आठवतंय?
"वाळूचा किल्ला "!आठवतंय?
अरे हो हो मी तोच विचार करत होते कुठे बरं--?
घरी जायची घाई नसल्यास बोलायला वेळ आहे तुम्हाला?जवळच काॅफी शाॅपआहे.
'चला.'
घरी जायची घाई नसल्यास बोलायला वेळ आहे तुम्हाला?जवळच काॅफी शाॅपआहे.
'चला.'
दोन कप ची आर्डर देत वरूण नी विचारले
आज रविवार तुम्ही एकट्याच ?रविवारी लोक फॅमिली सोबत असतात."
आज रविवार तुम्ही एकट्याच ?रविवारी लोक फॅमिली सोबत असतात."
मी एकटीच असते.
मी तुम्हाला डॉक्टर देसाई कडे पाहिलं होतं.वरुण ने काफी पीत विचारले
काही विशेष?
नाही जनरल चेकअप.
कशाच?
मला पोटाचा कॅन्सर होता आता बरी आहे पण तरी वर्षातून एकदा जाते.
"ओ ,सॉरी!"
"इट्स ओके "--म्हणत वृंदाने कॉफी संपवली
थँक्स, कॉफी छान होती . येऊ मी ?
भेटू या कधीमधी! म्हणत वरुण गेला…

कां भेटायचे आहे? आपलं मन ही गुंतत चालल आहे! पण् त्यानेफक्त मैत्री चा हात पुढे केला असेल कां?
रात्री झोपताना वृंदाला डॉक्टर देसाईंच्या कॅबिनमधले संवाद आठवला .
डॉक्टर म्हणत होते तुम्ही बरे आहात तो आवाज म्हणजे कोण ?मग ती बराच वेळ विचार करत राहिली.
एका रविवारी ती फिरायला म्हणून बाहेर आली आणि तिची पावलं चौपाटी कडे वळली. मनाला वाटतं होतं तो भेटला तर? बराच वेळ वाळूशी खेळून झाल्यावर ती उठली आणि काहिशी हिरमुसली आणि घरी परतली.

दादा वहिनी एका लग्नाच्या पार्टीला गेलेले ते बर्याच उशिरा परतले..
"वृंदा काका विचारत होते,
तू काल आली नाही लग्नाला .काय केले दिवसभर?"
काही नाही टीव्ही पाहत होते वृंदा आपल्या भावना लपवत म्हणाली.
"वृंदा काका विचारत होते,
तू काल आली नाही लग्नाला .काय केले दिवसभर?"
काही नाही टीव्ही पाहत होते वृंदा आपल्या भावना लपवत म्हणाली.
दोन दिवस कामाचा व्याप जरा जास्तच होता आज शनिवार जरा निवांतपणा.
दादा वहिनी दोघांबरोबर वृंदा गप्पा मारत बसली होती.
दादा वहिनी दोघांबरोबर वृंदा गप्पा मारत बसली होती.
"वृंदा डॉक्टर देसाई भेटले होते लग्नात ते तुझ्याबद्दल बोलत होते दादा म्हणाला.
काही विशेष वहिनी नेआश्चर्याने विचारले?
" स्थळ सांगत होते वृंदा साठी."
'दादा काय बोलतोय? त्यांना माहित आहे ना सर्व मग?" वृंदा चिडून म्हणाली.
'हो --म्हणूनच म्हणाले एक स्थळ आहे प्रधान म्हणून त्यांच्या मित्रा चार मुलगा आपल्या वृंदा करता योग्य असे ते म्हणाले. मुलाला हे सर्व माहित आहे तुझा फोटो पाठवला आहे तेही यातूनच गेले आहे .
'पण दादा'!
अगं" भेट बोल, नाही पटलं तर सोडून द्यायचे" वहिनी समजूतिच्या शब्दात बोलली.

वृंदा चा नाईलाज झाला , ठरल्याप्रमाणे ती चौपाटीवर पोचली तेव्हा सूर्य मावळतिला आला होता. पक्षी थव्याथव्याने परतत होते.
वृंदा वाळूत बसून वाट पाहत होती .मनात विचाराचे वादळ माजले होते, नकोच यायला कोण असेल ?
बराच वेळ गेला, कोणी आलेच नाही.
चला घरी जावे असा विचार करून ती उठली, आणि वळून पाहिले तर समोर वरूण उभे "तुम्ही ? तिने आश्चर्याने विचारले?"
'तुम्ही कोणाची वाट पाहत होता?
नाही म्हणजे हो-- पण ते येतील असे वाटत नाही.
'थोडे थांबा कदाचित ',
'थोडे थांबा कदाचित ',
'नाही-- मलाच नको वाटतं '.
"एक विचारू? तुम्हाला लग्न नको वाटतं कि अजून कोणी मनात?...काही विशेष कारण?
“लग्न ठरलं होतं माझं पण ह्या कॅन्सरने सर्वच संपल.”
“ परत सुरुवात होऊ शकते, जर तुमची हो असेल तर " मीच तो तुम्हाला भेटायला येणारा प्रधान .
"काय? वृंदा च्या चेहऱ्यावर आश्चर्याचे नि आनंदाचे आलेले मिश्रित भाव निरखत वरुण म्हणाले" करशील माझ्याशी लग्न"?
" माझ्याशीच का सिंपेथी म्हणून? दुखावलेल्या स्वरात तिने विचारले.
" नाही --समदुखी समज, मी सुद्धा कॅन्सरच्या विळख्यातून सुटलेला, तुझ्यासारखाच आहे, तरीअजूनही मनात धास्ती असते ,
तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मनात भरली होती पण मी असा कॅन्सर होऊन गेलेला जरी बरा झालो होतो तरी तू कां म्हणून ..
पण् डॉ देसाई नी तुझा फोटो व माहिती दिली तेव्हा वाटलं योगायोग म्हणावा कि तुझी माझी गाठ देवानी बांधली असावी.
तूही हे सर्व फेस करून चुकली आहे
तू समजून घेशील हा विश्वास वाटला म्हणून".

वृंदा चे ह्रदय वरुण ची मागणी ऐकून धडधडत होते तिने वरूणकडे पाहिले ,बोलता बोलता त्यांनी हाताने वाळूचे सुंदर घर बांधले होते. शंख शिंपले गोळा करून वरुण कडे पहात वृंदा नेघराची सजावट केली व त्यावर बोटाने”आपलघरकूल” लिहल…..
-------------------------------------------
लेखन.सौ.प्रतिभा परांजपे
-------------------------------------------
लेखन.सौ.प्रतिभा परांजपे