Login

माझी मानवी... 55

A story about love, friendship, kindness and relationship

स्नेहल एकटीच त्या थेटर मध्ये वाट बघत थांबली होती.. मूवी सुरु होऊन गेला तरी राहुल आला नाही.. स्नेहल बाहेरच त्याची वाट बघत राहून गेली.. शेवटी कंटाळून ती जायला निघाली.. इतक्यात राहुल धावत पळत तिला येताना दिसला.. धापा टाकत त्याने येऊन तिला थांबवले आणि मोठा श्वास घेत म्हणाला..

"मानवी.. "

"काय रे हे किती उशीर?" त्याला बघून स्नेहल म्हणाली..

"सॉरी आग.. इकडे येताना मी एका गाडीला जाऊन धडकलो.. त्यामुळे settlement करून यायला उशीर लागला.. सॉरी.. " श्वास नॉर्मल ला आणायचा प्रयत्न करत तो म्हणाला..  स्नेहल मात्र घाबरून म्हणाली..

"म्हणजे तुझा accident झाला? तुला कुठं लागलं तर नाही ना? कुठे दुखतंय का?" त्याच्याकडे जवळ जाऊन बघत काळजीने ती पुढे बोलली..

"तू आधी हॉस्पिटल मध्ये जाऊन चेक करून यायचं ना! इकडे कशाला आला? This won't do.. चल.. आत्ताच्या आत्ता हॉस्पिटल मध्ये जातोय आपण.. " त्याच्या हाताला पकडून ती जायला निघाली इतक्यात राहुल ने तिला थांबवलं आणि म्हणाला..

"मी एकदम ठीक आहे ग.. एवढं काही सिरीयस झालं न्हवत.. पण.. आता आपण काय करायचं? (मूवी चालू झाल्याच बघून त्या बंद दाराकडे बघत तो म्हणाला) तू तर म्हणाली होती हा शेवटचा शो होता.." आता वैतागून स्नेहल म्हणाली..  

"तो मूवी गेला खड्ड्यात.. तो आत्ता issue आहे का? तुला carefully गाडी चालवायला हवी होती ना रे! असा कसा accident झाला? (तिने असं बोलल्यावर त्याला आठवलं कि कशामुळे त्याचा accident झाला..तो कुठे बघत होता हे आठवल्यावर त्याचा चेहरा पूर्ण पडला.. स्नेहल मात्र अजून बोलत होती.. ) तुला माहितीये ना कार accident मध्ये कळत नाही दुखापत झालीये कि नाही ते.. आत्ता जरी तुला सगळं ठीक वाटत असलं तरी कधीकधी नंतर प्रॉब्लेम येतो.. ते काही नाही.. doctor ने तुला चेक करून तू ok असल्याचं सांगितल्याशिवाय मी नाही तुझं काही ऐकणार.. तू आधी हॉस्पिटल ला.. " तिला अशी काळजी करताना बघून राहुल नि तिला जवळ ओढून मिठी मारली आणि म्हणाला..

"सॉरी मानवी.. तुला खूप काळजी करायला लावली ना मी? इथून पुढे मी असं काही वागणार नाही ज्याने तुला काळजी वाटेल; माझं डोकं इकडे तिकडे फिरवत मी चाललो होतो.. आता नाही.. तुला काळजी वाटेल असं आता मी काहीही करणार नाही.. कधीच नाही.. " त्याच्या आवाजातली sincerity बघून स्नेहल नि समाधानाने त्याच्या मिठीत डोळे मिटले.. राहुल ला बोलताना असं वाटत होत कि तो भरकटला होता त्याच्या मानवी पासून मात्र आता बास.. इथून पुढे नाही वागायचं तसे..

******

दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिस मध्ये काम करत बसला होता.. फोन वर बोलत बोलत त्याच काम सुद्धा चालू होत.. त्याच्या कॉम्पुटर स्क्रीन वर तो business ट्रिप वर गेले होते तिथले लोकेशन्स चे  फोटो पाहत होता..  त्याने महत्वाचं बोलून फोन ठेवला आणि तो ते फोटोज पाहत होता.. आणि त्यात मानवीचे फोटो यायला लागले.. तिचे कुत्र्याच्या बरोबर त्याने काढलेले फोटो आणि असे बरेच तिचे फोटो..तो एक एक फोटो झूम करायचा आणि पुन्हा पुढचा बघायचा..  इतक्यात त्याच्या केबिन वर कुणीतरी knock केलं म्हणून त्याने ती window minimize केली.. पण दुसरं काम चालू ठेवलं.. आत मध्ये knock करून आलेली मानवीच होती.. ती आली तरी त्याने स्क्रीन वर ची नजर काढली नाही.. मानवी नेहमीप्रमाणे हसून त्याच्याशी बोलत होती..

"राहुल सर हे लेटर आलंय तुमचं.. आणि.. तुम्ही अजून ब्रेकफास्ट केला नाही ना? हे मी तुमच्यासाठी आणलंय.. " असं म्हणून तिने त्याच्या डेस्क वर डोनट चा छोटासा बॉक्स ठेवला.. तसा त्याच्या कॉम्पुटर स्क्रीन वर ची नजर न काढता तो म्हणाला..

"मी usually ब्रेकफास्ट करत नाही.. घेऊन जा जाताना.. " त्याचा असा कोरडा रिस्पॉन्स ऐकून मानवीच्या चेहऱ्यावरची स्माईल गेली..

"पण सर.. " ती अजून पुढे काही बोलणार इतक्यात विजय सर knock करून आत आले..

"राहुल सर या documents वर तुमच्या signs हव्या होत्या.. " त्याच्या समोर १ फाईल ठेवत ते म्हणाले.. तसा राहुल अजूनही कॉम्पुटर स्क्रीन कडेच बघत म्हणाला..

"विजय सर तुमचा ब्रेकफास्ट झाला नसेल तर हे घेऊन जा खायला.. " मानवीने समोर ठेवलेल्या त्या डोनट बॉक्स कडे बोट करून तो म्हणाला.. तसे विजय सर हसून तो बॉक्स उचलत म्हणाले..

"नाश्ता झालाय पण स्वीट डिश राहिली होती.. थँक्यू सर.. " मानवी त्याचा rudeness बघत होती.. विजय सर बाहेर गेले तरी ती तिथेच त्याच्या कडे बघत उभी होती.. तिला तसे उभे बघून आता तिच्याकडे बघून तो म्हणाला..

"काय झालं? अजून काही काम होत का माझ्याकडे?"

"नाही सर.. " मानवी हसून म्हणाली आणि बाहेर गेली..

तिला जाताना बघून त्याच्या हृदयात कळ उठली पण this is the right thing to do असं ठरवून आता त्याने पुन्हा एकदा त्याने मानवीचे जे फोटो काढले होते तो फोल्डर ओपन केला.. इकडे मानवी तिच्या खुर्चीवर येऊन बसली आणि राहुल ला काय झालंय एवढा ऑफ का आहे तो आज ह्याचा विचार करू लागली.. पण तिने कामाचं टेन्शन असावे असा विचार करून तिच्या कामाला सुरुवात केली..

इकडे राहुल आता मानवीचे एक एक फोटो delete करत होता.. त्याने फोटो तर delete केले पण त्याच्या समोर त्या काचेतून दिसणारी मानवी, तीच काय करणार होता तो.. आता सुद्धा तो ते फोटो delete केल्यावर तिच्याकडे बघत होता.. ती कामात मग्न होती.. पण तिला काय वाटलं आणि तिची नजर त्याच्या कडे गेली.. आज त्याने पटकन ती काच व्हाईट करून बंद नाही केली.. त्याचा हात रिमोट कडे गेला पण आता रिमोट हातात होता तरी त्याला ती काच बंद करायचा धीर होत न्हवता.. अजून १ सेकंद फक्त.. असं म्हणून शेवटी त्याने तिला डोळे भरून बघितलं आणि काच बंद करून टाकली..

****

राहुल ला आपण आपल्या मानवी वर emotionally का होईना पण चिट करतोय असं वाटत होत.. त्याला ऑफिस मधली मानवी आवडत होती पण या उद्देशाने तर तो न्हवता ना आला भारतात, त्याच्या मानवीला शोधायला.. त्याला त्याची मानवी भेटली.. ती खूप सुंदर आहे.. सोफेस्टीकेटेड आणि fashionable पण आहे.. त्याची काळजी सुद्धा घेते.. मग असं दुसऱ्या मुलीकडे attract होणं हे त्याला morally बरोबर वाटत न्हवत.. आणि आपण या केलेल्या चुकीची भरपाई म्हणून तो आज स्नेहल ची शिफ्ट संपल्यावर तिला surprise म्हणून भेटायला गेला होता.. त्याच्या मानवीची वाट बघत तो हॉटेल च्या बाहेर च थांबला होता कारण तिने सांगितले होते, त्याने तिच्या workplace मध्ये भेटणं तिला आवडणार नाही..

स्नेहल तिची शिफ्ट संपवून बाहेर आली तर राहुल त्याची गाडी घेऊन तिची वाट बघत थांबला होता.. तीला बघून त्याने हाक मारली..

"मानवी.. " त्याला असं अचानक पाहून स्नेहल पण खुश झाली.. त्याच्या जवळ जात म्हणाली..

"अरे.. तू काय करतोयस इथे?"

"तुझ्या साठी १ surprise प्लॅन केलंय.. "

स्नेहल हसून तयार झाली.. आता एका मॉल मध्ये ते आले होते.. आणि स्नेहल च्या डोळ्यावर हात ठेवून राहुल तिला आत घेऊन जात होता ..

"काय आहे सांग ना.. " स्नेहल excited होत म्हणाली..

"हो हो.. पोहोचलोच आता आपण.. " असं म्हणत तो तिला पुढे घेऊन येत होता.. शेवटी मॉल मधल्या त्या थेटर च्या समोर आल्यावर त्याने तिच्या डोळ्यावर चा हात काढला आणि म्हणाला..

"ट डा..!! " स्नेहल इकडे तिकडे बघत होती.. आणि राहुल आता तिला त्याने काय केलं ते सांगत होता..

"तुला जी मूवी बघायची होती जी माझ्यामुळे बघता नाही आली ती आज बघुयात आपण.. I received top secret information that.. या थेटर मध्ये तो मूवी आज लास्ट टाईम दाखवणार आहेत.. माझे सगळे नेटवर्किंग स्किल्स पणाला लावून मी हि माहिती मिळवली बरं.. " स्नेहल त्याच्या कडे कौतुकाने बघत होती.. कि तिला एक मूवी बघायचा होता तर त्याने एवढी मेहनत घेतली आहे.. तरी त्याला चिडवायला म्हणून ती म्हणाली..

"म्हणजे आपण एवढ्या लांब आलो कारण तुला मला तो मूवी दाखवायचा होता?"

"हो मग! चल जाऊयात आत.. " असं म्हणून राहुल तिला घेऊन आत गेला..

लास्ट शो होता त्यामुळे आत फारशी गर्दी न्हवती.. मोस्टली कपल होते ते जिथे जागा चांगली आहे तिथे बसले होते.. स्नेहल पण राहुल च्या शेजारी बसली होती.. १ कॉमेडी सीन चालू होता.. आजूबाजूचे सगळे हसत होते पण राहुल चे मात्र लक्षच न्हवते.. हसताना स्नेहालचे लक्ष त्याच्याकडे गेले तो विचारात बुडाला आहे हे बघून ती म्हणाली..

"मूवी चांगला नाहीये का?"

"आहे ना.. बघ ना.. तुला बघायचा होता ना.. " राहुल तिला स्क्रीन कडे बघायला सांगत होता.. मात्र तिने समोर बघितल्यावर पुन्हा त्याला विचारात बुडालेला तिने पाहिले.. मूवी संपून बाहेर आल्यावर पण स्नेहल त्यातल्या सीन बद्दल बोलत होती आणि राहुल फक्त ऐकायचं काम करत होता.. शेवटी ती म्हणाली..

"तो एलेव्हेटर चा सीन छान होता ना?"

"हां ? एलेव्हेटर?" स्नेहल ने त्याच्याकडे २ मिनिट पाहिल्यावर तो तिला वाईट वाटायला नको म्हणून म्हणाला..

"ओह्ह.. एलेव्हेटर! हां.. छान च होता तो सीन.. "

"तुला नाही आवडला का मूवी?"

"नाही ग! असं कस म्हणतेस.. मी तुझ्या बरोबर बघितलंय हा मूवी.. Of course, I liked it!

तो कामामुळं दमला असेल असं समजून तिने त्याच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं.. तिला याचंच कौतुक वाटत होत कि त्याने एवढे कष्ट घेऊन तिच्या आवडीची गोष्ट तिच्या बरोबर केली होती.. भले त्याला ती गोष्ट बोरिंग वाटत असली तरी.. तिच्या साठी असं या आधी कुणी केलं न्हवतंच  कारण..

******

मानवी आत्ता एका बुकस्टोर मध्ये गेली होती.. जिथे specially त्यांचं मॅगझीन सगळ्यात आधी distribute व्हायचं.. तिने घाईघाईने एक कॉपी खरेदी केली.. आणि तिथेच त्याच्यावरच प्लॅस्टिक कव्हर काढून उघडली.. इंडेक्स मध्ये त्यांच्या डिपार्टमेंट मधल्या जवळपास सगळ्यांचं नाव होत.. तिला पहिल्यांदा वाटलं होत कि ती  इंटर्न आहे त्यामुळे तीच नाव येणार नाही.. पण जेव्हा विजय सर आणि सीमा मॅम पण म्हणाल्या केली तू या कंपनीचीच एम्प्लॉयी आहेस त्यामुळे तू इंटर्न असलीस तरी reviser च आणि प्रूफ reading च काम तूच केलंय त्यामुळे तुझं नाव असणार आहे.. पण आता तिला स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोवर चैन न्हवते पडणार.. तिने जेव्हा प्रिंट मध्ये तिचे नाव सगळ्यात खाली का होईना पण वाचले तेव्हा तिचा विश्वास बसला.. ती आनंदाने तीच नाव वाचत म्हणाली..

"मानवी कुलकर्णी.. खरंच कि.. माझं नाव छापलंय.. "

ती इतकी खुश झाली होती कि तिने तिथेच तिचा तिच्या नावाबरोबर एक सेल्फी काढला आणि तिच्या आईबाबांना पाठवला.. तिने सेल्फी बरोबर लिहिलं होत..

"i have my name printed on the magazine! आई बाबा.. तुमची मुलगी awesome आहे कि नाही?"

तिने पाठवलेला फोटो झूम करून करून तिचे आईबाबा घरी तिने पाठवलेला फोटो बघत होते..

"अहो बघा ना.. खरंच छापून आलं कि हो आपल्या लेकीचं नाव.. "

"हो कि ग.. " मेधाने मात्र तीच एवढं लास्ट ला आणि छोट्या फॉन्ट मध्ये नाव छापलेलं बघून तोंड वाकड केलं आणि म्हणाली..

"किती छोटं लिहिलंय ते नाव.. " तिचा वाकडा चेहरा बघून तिचे बाबा म्हणाले..

"एवढं सुद्धा यायला खूप कष्ट घ्यावे लागतात बरं मेधा! असं कुणाचं पण छापलं जात नाही नाव.. "

तिच्या नावाबरोबरच मानवीचा आत्मविश्वासाने चमकणारा चेहरा त्या दोघांना जास्त समाधान देऊन गेला.. कितीतरी वेळ ते तिचा फोटो झूम करून पाहत खुश होत होते..