मानवीची वाट बघत बस स्टॉपच्या जवळ राहुल त्याच्या गाडीत बसला होता.. तिला बस मधून उतरून तिच्या घराकडे जाताना बघून तो पटकन तिची डायरी घेऊन उतरला.. पण त्याने हाक मारायच्या आधीच मानवी त्यांच्या घराच्या दिशेने असणाऱ्या गार्डनकडे वळली होती.. आणि आता तिला समोर जाताना बघून त्याला पण अवघडल्या सारखे वाटत होते.. त्याला ठरवून पण तिला हाक मारता येईना.. तो तिच्या पाठोपाठ चालू लागला.. ती आता गार्डन मधून वळून आत जाणार इतक्यात तिचा फोन वाजला म्हणून ती चालता चालताच वाटेतल्या बाकावर जाऊन बसली.. ती एकदम बसलेली बघून राहुलला पटकन काय करावं ते कळेना पण तो हि ती बसलेल्या बाकाच्या पाठीला लागून अजून एक बाक होता त्यावर पटकन जाऊन बसला आणि त्याने त्याच्या हातातल्या मानवीच्या डायरी मध्ये डोकं घातलं.. इकडे मानवीने फोन उचलला होता.. आणि त्याला आता फोन वरच सगळं संभाषण ऐकू येत होत..
"हॅलो सर.. बोला ना.. "
"हां मानवी.. मी बोललो माझ्या त्या मित्राशी.. मी तुझा नंबर दिला त्याला आणि थोडी तुझी बॅकग्राऊंड पण सांगितलीये.. तरी उद्या तुला त्याचा कॉल येईल.. तर unknown नंबर आला तरी उचलशील फोन.. "
"हो हो सर मी उचलेन नक्की .. थँक्यू सो मच सर तुम्ही माझ्या साठी शब्द टाकलात.. मी तुमचे आभार कसे मनू तेच कळत नाहीये मला.. "
"अग त्यात काय एवढं.. जॉब लागल्यावर आम्हाला पार्टी दे एक.. " त्यांनी हसून सांगितलं तशी मानवी पण हसून म्हणाली..
"नक्की सर.. पार्टी अगदी नक्की.. "
"हो ना.. आता मग interview ची पण तयारी कर.. छोटी कंपनी असली तरी तो स्ट्रिक्ट आहे बर का.. तुला आधीच कल्पना देऊन ठेवतो.. तशी काही काळजी नाही म्हणा तू त्या राहुल सरांच्या हाताखाली एक महिना टिकलीस त्यामुळे इथे काही तेवढं पण स्ट्रिक्ट नसणारे.. " राहुलच नाव ऐकलं तसा मानवीचा चेहरा थोडा पडला.. ती म्हणाली..
"हो सर.. तुम्ही त्याची काळजी करू नका.. मी पूर्ण तयारीनिशी देईन interview.. "
"मी बोललोय त्यामुळे काम झालंय तुझं हे पकडूनच चाल.. ठीके.. मग ठेवू मी फोन?"
"हो सर.. थँक्यू सर.. ठेवते मी.. गुड नाईट.. "
मानवीला माहिती न्हवते पण राहुल हे सगळं ऐकत होता.. तिने गाड्यांच्या आवाजात ऐकू यावं म्हणून तिच्या मोबाइललाचा आवाज फुल्ल केला होता त्यामुळे त्याला शब्द न शब्द ऐकू गेला होता.. तिला असा लगेच दुसरा जॉब मिळेल असं त्याला वाटलं पण न्हवत.. पण आता त्याला सगळं ऐकल्यावर मानवी परत यायची श्यक्यता कमीच आहे हे तर कळले, पण तरी आता तिला pursue करायला आपण कमी पडायचं नाही एवढं मात्र त्याने मनोमन ठरवले.
पण तरी तिच्याशी बोलण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. त्यात त्याचा इगो आड येतो म्हणावा किंवा त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना त्यामुळे त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
तितक्यात मानवी काहीतरी आठवलं म्हणून एक क्षण थांबली तसा तो पण थांबला. आता ती मागे वळणार हे त्याच्या लक्षात आले तसा तो पटकन पाठमोरा वळला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. त्याला वाटल्या प्रमाणे मानवी मागे वळली आणि समोरच्या दुकानात गेली तिथून तिने तिच्यासाठी स्नेहलसाठी मॅगी घेतली आणि परत जायला निघाली.
राहुल तिला दुरून बघत होता. जाताना तिला आवाज द्यावा म्हणून दोन पावलं पुढे सरकला पण तरी आवाज दिला नाही. त्याच्या मनात काहीतरी होता जे त्याला थांबवत होते. मानवी घरी जायला निघाली पण तिला कोणीतरी आपल्याला बघत आहे असे वाटले म्हणून ती परत पटकन मागे वळून बघू लागली तोच तिला राहुल दिल्या सारखे वाटले. पण राहील मात्र पटकन वळाला आणि बाजूच्या बस टॉप मध्ये शिरला त्यामुळे तिला त्याचा चेहेरा नीट दिसला नाही.
ती मनातच बोलत होती. "कोण होता बरं तो? राहुल सारखा दिसला. पण तो खडूस इथे का येईल? मला भास झालं असेल की, त्याला त्याच्या चुकीची माफी मागायची असेल? मानवी तुझं आपलं काहीतरीच. तो आर्ट डायरेक्टर एका इंटर्न ची माफी का मागेल? पण तो नक्की राहुलचं होता का?" अशा विचारात मानवी घरी पोहोचली.
तिचे स्वतः चा डोक्यावर हात मारला.
"नको, परत त्यात अडकायच नाही मानवी. आता तुझा रस्ता वेगळा आहे. हा तुझा बाल पणीचा मित्र राहूल नाही. हा कोणी वेगळा आहे." मानवी मनातील विचार झटकत उद्याच्या interview च्या तयारी ला लागली.
तितक्यात तिला राहुल चा मेसेज आला.
"हाय मानवी, तुझ्याशी बोलायचे आहे. भेटशील का उद्या?"
त्याचा मेसेज वाचून तीला आश्चर्यच वाटले. तिच्यासाठी हे अगदी अनपेक्षित होते. पण मनातून कुठे तरी तिला त्याचा मेसेज किंवा कॉल यायला हवा असे वाटत होते.
तिने रिप्लाय दिला नाही. पण तिने मेसेज वाचल्याचे नोटिफिकेशन राहुलला मिळाले होते.
थोडावेळ वाट बघून त्याने परत मेसेज केला.
" प्लिज एकदा भेट."
आता मात्र तिला राहवत नव्हते. नकळत परत परत ती राहुल चा मेसेज वाचत होती. खरं तरी तिची द्विधा मनस्थिती झाली होती. राहुल तिच्याशी जे वागला त्यामुळे ती दुखावली गेली होती आणि त्याच्यात तिचा जीव सुद्धा अडकत होता. पण तरी प्रेमापेक्षा स्वाभिमान मोठा असतो. त्यामुळे परत तिने मनातील विचार बाजूला केले.
स्नेहल सुद्धा तोपर्यंत घरी आली होती. मानवीला असं विचारात बघून तिच्या मनात शंका आली नक्की काहीतरी झाले आहे.
"बायको काय झालं? कसल्या विचारात आहेस?"
"काही नाही उद्याच्या इंटरव्ह्यू ची तयारी करते आहे. मिळाला पाहिजे गं हा जॉब." मानवी फोन कडे बघून बोलत होती.
"मिळेल गं नक्की मिळेल. बरं काय खाणार आहेस?"
"आज मॅगी खायचा मूड आहे. थांब मी बनवते पटकन तू फ्रेश होऊन ये."
" नको तू, तयारी कर मी बनवते मॅगी." स्नेहल बोलून आत फ्रेश व्हायला निघून गेली.
"ठिक आहे." बोलता बोलता मानवीने राहुलला मेसेज केला.
"ठिक आहे. कळवते सर मी तुम्हाला."
राहुलने मेसेज वाचला तोपर्यंत तो त्याच्या घरी पोहोचला होता. मेसेज वाचून त्याने डोळे बंद करून घेतले. मानवीचा चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर येतं होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मानवी इंटरव्ह्यू साठी तयार झाली.
क्रमशः
सुभाषिनीच्या आठवणीत
(वर्षाराज)
प्रिय वाचक मित्रांनो. ही कथा माझी नाही सुभाशीनी मॅडम ची कथा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मूळ लेखकाच्या मनात असलेली कथा आणि एक वाचक म्हणून मनात असलेली कथा ह्यात फरक असतो. तसेच लेखन शैलीत देखील फरक असतो. मॅडमची कथा मी माझ्या नजरेतून लिहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुकल्यास माफ करा.
ती कथा लिहून त्यांना माझ्याकडून श्रद्धांजली देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे.
तुम्हाला हा भाग कसा वाटलं ते नक्की सांगा म्हणजे मी पुढील लिखाण करेल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा