माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 34
आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. दोघे एकमेकांसोबत खूप छान रहात होते. एक वर्ष कसं गेल दोघांनाही समजलं नाही. दोघ सोबत ऑफिसला जात होते. मोठ्या मोठ्या डीसीजन मधे आदर्श श्रद्धाच मत घेत होता आणि त्याला त्यातून फायदा होत होता. घरी तिच्या सोबत आदर्श खूप खुश होता.
आदर्श सकाळीच उठून कुठेतरी निघून गेला. श्रद्धा उठली तिने बाजूला हाताने चाचपडुन बघितल. आदर्श... तिने आवाज दिला. कुठे गेले हे? बाजूला त्याच्या गळ्यातली चेन पडली होती. त्यात छोटासा दिल होता त्यात आई बाबांचा फोटो होता. किती गोड. ती तिने नीट ठेवली. ती आवरत होती.
आंघोळ झाली. तिने छान तयारी केली होती. आज तिने सुंदर अशी साडी नेसली होती. केसांची वेणी घातली. लाल टिकली गळ्यात मंगळसूत्र. कानात झूमके. ती स्वतः कडे बघत होती. मी वेगळीच दिसते आहे का? तेज आला का चेहर्यावर.
थोड्या वेळाने त्यांना मंदिरात जायच होत. दोन-तीन जणांना तिने विचारला आदर्श कुठे गेला आहे? कोणालाच माहिती नव्हतं. "तेजाभाई आदर्श कुठे आहे."
"इथेच होते साहेब बघतो."
नाश्त्याच्या टेबल वर बसून ती त्याची वाट बघत होती. तो सुंदर लाल गुलाबाचा गुच्छ घेऊन आला.
"लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा श्रद्धा."
ती पळत जाऊन त्याला भेटली. "कुठे गेले होते तुम्ही? ही काय पद्धत झाली का? मला अजिबात आवडल नाही हे. किती धडधड झाली."
"अरे मी वॉक साठी गेलो होतो. बघु कुठे धडधड झाली?" त्याने तिच्या छातीजवळ कान नेला.
" काहीही. सरका ना तिकडे. तुम्हाला माझ नाव घ्यायचा चान्स हवा असतो. चला चहा घेवू." श्रद्धा त्याचा हात धरून त्याला टेबल जवळ घेवून आली.
" तुझ्या साठी एवढे सुंदर फूल आणले त्याच काही नाही. आभार वगैरे मान. " तिच्या ओठांकडे बघत तो तिला जवळ ओढत होता. ती बाजूला पळाली.
" काही नको मला. फक्त तुम्ही हवे या. पुढे अस केल तर बघा. मी ओरडेन. मला सांगून जायच."
"बर सॉरी. हे बघ तुझ्यासाठी अजून काय आणल."
सुंदर गिफ्ट होत. ती गिफ्ट बघत होती. सुंदर असा हिऱ्याचा हार होता. कानातले होते. "इतक्या सकाळी दुकान सुरू होत?"
"नाही काल घेतला."
" का? एवढा खर्च करत जावू नका. " ती नेहमीप्रमाणे बोलली.
तो फक्त हसला. दोघांनी आत जावून देवाला नमस्कार केला.
त्याच्या हाताने तिने तो नेकलेस गळ्यात घालून घेतला. श्रद्धा खूप खुश होती. सुंदर दिसत होती.
"श्रद्धा इकडे ये तुझ्या चेहर्यावर खूप तेज आल आहे. माझ प्रेम की नेकलेस मुळे." आदर्श तिच्या कडे बघत होता.
श्रद्धा गप्प बसली. तिला काल ऑफिस मधे थोडी चक्कर आली होती ते आठवल. ते तिने आदर्शला सांगितल नव्हत. नाहीतर ऑफिस मधे जाण बंद होईल. काय करू मी दिवसभर घरी.
"चला आता चहा नाश्ता करून घ्या. मग आपल्याला ऑफिसला जायचं आहे. त्या आधी देवळात जावू. " श्रद्धा बोलली.
" नाही आज सुट्टी आहे. आपण दोघं घरीच छान वेळ घालवू."
संध्याकाळी सगळेच मित्रमंडळी येणार होते. छोटीशी पार्टी होती घरातल्या घरात. चहा नाश्ता झाल्यानंतर दोघ मंदिरात गेले. पूजारी ओळखीचे होते.
" सकाळी सकाळी किती प्रसन्न वाटत ना इथे."
हो.
" तू देवा कडे काय मागितल? " आदर्शने विचारल.
"काही नाही."
"मग इतक्या वेळ डोळे मिटून का उभी होती."
" घरातल्या सगळ्या लोकांचे नाव आठवून नमस्कार करत होती. "श्रद्धा बोलली.
" किती भोळी आणि चांगली आहेस तु. ही साडी छान आहे. कधी घेतली?" आदर्श तिच्या पदराशी खेळत होता.
" मी आणि मीना गेलो होतो ना शॉपिंगला. तेव्हा घेतली. "
" अजून घ्यायच्या का साड्या?"
नको .
"आज संध्याकाळी साठी साडी आहे ना ."
हो.
दोघ घरी मध्ये आले. आदर्श तिला हाताला धरून रूम मधे घेवून आला. तिला जवळ घेऊन बसला.
" काय हे आदर्श? "
" आज अस राहायच आपण प्रेमाने."
दोघ गप्पा मारत होते. वर्षभरात काय काय झालं हे बोलत होते.
"श्रद्धा तू माझी खूप काळजी घेतेस. थँक्स."
" उलट तुम्ही मला कोणत्या ही गोष्टीची कमी जाणवू देत नाही." श्रद्धा बोलली.
"चला बायको खुश आहे. म्हणजे मला जे हव ते मिळेल. " आदर्श हसत म्हणाला.
" तुम्ही पण ना काही काळ वेळ आहे की नाही. सोडा ना ."
आदर्शचा फोन वाजत होता. त्याने बघितल. प्रभाकर रावांचा फोन होता. आनंदाने त्यांने फोन उचलला.
" तुमच्या दोघांना हॅपी ऍनिव्हर्सरी. "
" थँक्यू बाबा. आज संध्याकाळी येणार का घरी? "
"माझ कस जमेल? पण तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आहे दारावर. म्हणजे तुझ्यासाठी नाही श्रध्दा साठी आहे. ते घ्या."
"हो बाबा बोला तिच्याशी."
" बाबा नमस्कार. " श्रद्धा बोलली.
"सुखी रहा बेटा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. "
" थॅक्यु बाबा. "
" एन्जॉय करा. अस छान एकमेकांना सांभाळत रहा. " त्यांनी फोन ठेवला.
मोहिनी ताई समोरून फोन ऐकत होत्या. त्या आदर्श सोबत बोलल्या नाही. पण त्याच्या आवाज ऐकुन त्या खुश होत्या.
इकडे फोन झाल्यावर आदर्श एकदम गप्प होता. फोन चालू असतांना आईचा आवाज येतो का ते तो बघत होता.
त्याने परत फोन लावला." बाबा आई कुठे आहे?"
"आहे ना माझ्या समोर बसली आहे."
"स्पीकर वर टाका ना. आई मला आज तुझा आशीर्वाद हवा आहे. माझ्याशी बोल ना." आदर्श बोलला.
त्या काही बोलल्या नाही.
"आई वर्ष झाल आपण सोबत नाही. मला करमत नाही तुझ्या शिवाय. प्लीज बोल ना. रागव. ओरड मला ."
तरी त्या काही बोलल्या नाही.
इतर वेळी आदर्श भेटायला जात होता. पण तो एकटाच त्यांच्याशी बोलत होता. त्या गप्प असायच्या. श्रद्धा आज पर्यंत एकदाही तिकडे गेली नव्हती. त्यांनी बोलवलं नव्हतं .
" ठीक आहे आई ठेवतो फोन. लव यु." आदर्श दुःखी होता. तो खूप आई बद्दल बोलत होता." श्रद्धा आई माझ्याशी बोलत नाही. मी मिस करतो तिला."
श्रद्धाच्या चेहऱ्यावर काळजी होती. आईंनी अजून माझा राग सोडला नाही. मी काय केल अस. काय होणार पुढे. बापरे. पण ती काही बोलली नाही. तिला आदर्शची काळजी वाटत होती.
बाहेर वकील आले होते. "श्रद्धा मॅडम कोण आहेत? "
श्रद्धा आदर्श कडे बघत होती.
" प्रभाकर सरांनी कंपनीचे काही शेअर श्रद्धा मॅडमच्या नावाने ट्रान्सफर केले आहेत. आणि एकंदरीत प्रॉपर्टीत ही फॅमिली मेंबर म्हणून नाव टाकल आहे. मॅडम इथे सही करा."
आदर्श श्रद्धा पेपर बघत होते. करोडो रुपयाचे कंपनी शेअर श्रद्धाच्या नावावर आले होते. प्रॉपर्टी ही खूप होती. इकडे आदर्शने ही तिच्या नावावर दोन तीन फ्लॅट घेतले होते.
श्रद्धाने सही केली. ते लोक गेले. ओरीजिनल पेपर आदर्शने त्याच्या कडे ठेवले." उद्या लाॅकर मधे ठेवू."
श्रद्धाने बाबांना फोन केला. "बाबा थॅक्यु."
"सगळं तुमच आहे बेटा. सांभाळा नीट."
श्रद्धाला शेअर देवून बाबांनी तिला एक्सेप्ट केल होत. मोहिनी ताईंच काय पण? मोठा प्रश्न होता.
दुपारी जेवायला श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, मसाले भात होता. आदर्शच्या आवडीच. छान जेवण झालं आदर्शचा मूड ठीक होता. दोघ आराम करायला वरती आले. आदर्श तिच्या पुढे मागे करत होता. ती हसून आवरत होती.
"काय झाल हसायला? नवरा इथे एवढ्या काळजीत आहे आणि तू हसते आहे." तो बोलला.
"कसली काळजी आहे एवढी ?"
"हेच की बायकोला आता आपल्या जवळ यायला कस तयार करायच." आदर्श मुद्दामून चिडवत बोलला.
श्रद्धा लाजली. आदर्श तसा बोलायला खूप हुशार होता. त्याने बरोबर श्रध्दाला तयार केल. त्या दोघांनी छान सोबत वेळ घालवला.
संध्याकाळी पार्टी साठी बरेच फ्रेंड्स आले होते. आदर्श खाली त्यांच्याशी बोलत होता.
"श्रद्धा वहिनी कुठे आहे?" संग्राम विचारत होता.
"हो येईलच."
डार्क ब्लू कलरच्या प्लेन साडी मधे श्रद्धा खूप सुंदर दिसत होती. केस मोकळे सोडलेले होते. थोडीशी लिपस्टिक. स्टोन टिकली. आदर्श सोबत राहून तिच्या चेहर्यावर सुंदर तेज आल होत. तिने मीनाला फोन लावला. "निघाली का?"
"हो पाच मिनिटात येते."
तिला कसतरी होत होतं. ती कॅलेंडर बघत होती. पीरीएड्स मिस झाले का? काय आहे हे. ती पाच मिनिट तिथे बसली. हो पंधरा दिवस वरती झाले. लक्ष्यात कस आल नाही. काय करू. आदर्शला सांगाव लागेल. तिने थोड पाणी पिल. ती खाली आली.
सगळे तिच्याकडे बघत होते. नेहमीच झाल होत. तीला बघून सगळे भारावून जात होते. श्रद्धा अगदी साधी गोड होती. कोणी ही लगेच इम्प्रेस होत होतं. आदर्श तर पूर्ण फिदा होता.
तो छान हसला त्याने पुढे होवुन तिला हात दिला. दोघ सोबत होते. तो बघत होता हिचा चेहरा थकलेला वाटतो आहे. बहुतेक दुपारी आपण हिला जवळ घेतल म्हणून असेल का. पण नंतर झोपली होती ती छान.
श्रद्धा सगळ्यांना भेटत होती. मीना आली. मीना तिच्या सोबत होती. संग्राम, आकाश, अदिती आलेले होते.
" वहिनी तू वेगळीच दिसते आहेस." अदिती तिच्या सोबत होती.
श्रद्धा लाजली.
मीना मैत्रिणीं सोबत बसली होती. श्रद्धा तिच्या जवळ गेली. "मीना मला ही सरबत दे."
तिने समोरचा ग्लास दिला. "काय झालं ग?"
"समजत नाही. कसतरी होत आहे." श्रद्धा तिथे आरामात बसली होती.
"खाते का तु काही?"
हो. तिने थोड स्टार्टर खाल्ले. बर वाटत होत.
" बघ भूक लागली असेल. बस थोडी." मीना तिची काळजी घेत होती.
सगळे गप्पा मारत बसले होते. केक आला. आदर्श तिला घ्यायला आला. दोघ शेजारी उभे होते. बाकीची तयारी सुरू होती.
" श्रद्धा तू मला काही गिफ्ट दिल नाही. याला काय अर्थ आहे. "आदर्श बोलला.
" काय हव तुम्हाला? मी तुमचीच आहे. मला समजल नाही काय घ्यावं. विचार केला तुम्हाला विचारून घ्याव."
" ठीक आहे मी सांगतो. मग नाही म्हणायचं नाही. प्रॉमीस."
"हो. प्रॉमीस. " श्रद्धा त्याचा हात हातात घेत बोलली.
केक कापला. दोघांनी एकमेकांना केक भरवला. आदर्शने तिला मिठीत घेतल. छान म्युझिक सुरू होत. सगळे नाचत होते. श्रद्धा आदर्श कडे बघत होती." अहो लव यु."
तो हसला. " लव यू टु. आपल्या दोघांना आता एकट रहायचा कंटाळा आला आहे. हो ना."
" मग आता काय करणार. तुमच्या घरचे आपल्याशी बोलत नाही. माझ्या कडून कोणी नाही."
"आपण खूप काही करू शकतो." आदर्शने सांगितल.
म्हणजे?
"श्रद्धा आपण बेबी साठी ट्राय करू या."
श्रद्धा खूप लाजली.
"अरे त्यात काय इतक. सांग ना. झाल आता एक वर्ष. पुढचा विचार करू या ना. " आदर्श विनवणी करत होता.
"सांगू का यांना मला खूप त्रास होतो आहे. काय आहे हे. " ती नुसती विचार करत होती. काही बोलली नाही.
"श्रद्धा प्लीज बोल. हेच एनिवर्सरी गिफ्ट हव मला."
ती हळूच हो बोलली.
जेवण झाल. सगळे गेले." कार्यक्रम छान झाला ना. "
हो.
" ही साडी तुला किती छान दिसते आहे. " तो तिच्या जवळ येत होता.
" आदर्श नाही. मी थकली आहे. मला त्रास देवू नका. "
त्याने पुढे येवून तिचा हात धरला." ही एनिवर्सरी अजून स्पेशल नको का व्हायला. "
" दुपारी झाली ना."
"हे अस आहे आम्हाला गिफ्ट नाही कोणी जवळ घेत नाही. काय करणार. कोणाला सांगणार." आदर्श बाजूला जावून बसला.
ती समोर बसली होती." आदर्श तुम्ही असा काय चेहरा केला आहे. अगदी गरीब असल्या सारख. " ती त्याला हसत होती.
"आहेच मी साधा. "
" मला माहिती तुम्ही कसे आहात ते. "
" श्रद्धा ये ना जवळ." आदर्श अजून त्याच मूड मधे होता.
"नाही. आराम करा उद्या ऑफिस आहे." बोलू का यांच्याशी." आदर्श मला एक सांगायच होत."
बोल. तो मेसेज बघत होता.
" म्हणजे मला तस फक्त वाटत आहे." ती अडखळत बोलली.
" काय?"
" अजून नक्की नाही."
त्याने फोन बाजूला ठेवला." काय झाल? पटकन बोल."
" बहुतेक तुम्हाला तुमच गिफ्ट मिळेल. "
म्हणजे?
" अजून पंधरा दिवसांनी समजेल."
काय?
"माझे पीरीएड्स मिस झाले आहेत." तिने हळूच सांगितल.
त्याच्या चेहर्यावर खूप आनंद होता. "नक्की का?"
"वाटत आहे तस. "
" हो दीड महिना झाला ना. आपल लक्ष नव्हतं. " आदर्श बोलला.
"हो. लगेच आशा बाळगू नका. काहीही होऊ शकत." श्रद्धा समजावत होती.
"असेल नक्की मला खात्री आहे. मी खूप खुश आहे. ओह माय गॉड." त्याने तिला उचलून घेतल.
"हळू.. सोडा मला. काय हे?" त्याने तिला अल्लाद कॉटवर बसवल." आपण डॉक्टर कडे जावू या का? काही त्रास होतो का?"
"हो म्हणजे थोड कसतरी होत. अजून आठ दिवस तरी थांबु मग जावू डॉक्टर कडे ."
"ठीक आहे पण आता खूप काळजी घ्यायची अजिबात गडबड नको. भरपूर जेवण करायच."
"एक मिनिट आदर्श आपण हे नंतर बोलू. "
" बर ठीक आहे." तो चेंज करून आला. श्रद्धा अजून ही कॉटवर बसुन होती.
" काय झालं? काय विचार सुरू आहे? तुला काय वाटत या बद्दल? "
" हेच की पुढे कस होईल? आपल्याला कोणाचा आधार नाही. नंतर बाळ सांभाळायला कोणी तरी हव ना. कस होईल? "
" मी आहे ना काळजी का करतेस. सगळं अरेंज करेन मी. अजिबात गैरसोय होऊ देणार नाही. तू आता विचार करू नकोस. झोप बर. शांत हो."
श्रद्धा फ्रेश होवुन आली. ती झोपली. आदर्श तिच्या जवळ बसुन ईमेल चेक करत होता. त्याला थोडी काळजी वाटत होती. हिला त्रास झाला तर आपल्याला समजणार ही नाही. पूर्ण वेळ साठी एखादी नर्स वगैरे ठेवायची का? एकदा डॉक्टर कडे जावून आल की ठरवू.
