Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 35

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस
माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 35


सकाळी श्रद्धा रेडी होती. ती नाश्त्याची तयारी करत होती. आदर्श जॉगिंगला गेला होता. बाहेर पुशअप करून तो आत आला. श्रद्धा त्याच्या कडे बघत होती. त्याने टी शर्ट काढून मानेवर टाकला होता. त्याची परफेक्ट बॉडी जबरदस्त दिसत होती. त्याने आत येवून पाणी पिल. श्रद्धा हातातलं काम थांबवून त्याच्या कडे बघत होती. त्याने तिच्या अंगावर पाणी उडवल. ती दचकली. तो हसत होता.

"कुठे चालली आहेस मॅडम? तयारी छान झाली."

"ऑफिसला. जा ना आवरुन या पटकन ." श्रद्धा हसत होती.

" तू नाही येणार आहेस. घरी आराम करायचा." आदर्श बोलला.

"नाही. मला याची भीती होती. मी एक्टीव रहाणार. काम करणार."

"तुझी तब्येत खूप महत्वाची आहे. बाळ महत्वाच आहे."

" हो मला ही काळजी आहे. मी लक्ष देईल." श्रद्धा बोलली.

"जेवणाच काय? ऑफिस मधे आली की वेळ पाळता येणार नाही. परत थोड्या दिवसानी त्रास सुरू होईल. का एवढा त्रास करून घेतेस. आरामात रहा. "आदर्श तिच्या जवळ येवून उभा राहिला.

" मला जेव्हा वाटेल तेव्हा घरी राहीन. प्लीज अजून काही वाटत नाही. मला यायच आहे. ऑफिस मधे छान वाटत. इथे खूप एकट वाटत. अस राहता येणार नाही. घरी काय करू मी दिवस भर." श्रद्धा तिची बॅग भरत होती.

" बरोबर आहे. चल. पण मी सांगेन ते करायचं. "

" ठीक आहे."

" दुपारी दोन तास केबिन मधे येवून आराम करायचा. घरून आणलेल जेवण माझ्या सोबत करायच. बाकीच्यां सोबत वडा पाव इतर पदार्थ खायचे नाही. सारखा चहा घ्यायचा नाही. एवढे नियम पाळावे लागतील. " आदर्श बोलला.

" ठीक आहे मी लक्ष्यात ठेवेन. जा ना आंघोळ करून या. "

तो आत गेला.

किती काळजी करतात हे. वडा पावच्या नावाने तिच्या तोंडाला पाणी सुटलं होत. ती किचन मधे आली. मावशी उपमा करत होत्या." मावशी बटाटे वडा आहेत का?"

"काय? आता इतक्या सकाळी मॅडम." त्या आश्चर्याने बघत होत्या. झाल काय हिला?

हो.

" नाहिये. "

श्रद्धाचा चेहरा पडला. "आता होतील का?"

" एक काम करते बटाट्याची भजी काढू का? "

" हो पण पटकन. पाच मिनिटात. " श्रद्धा खुश होती.

हो.

ती डायनिंग टेबल वर बसुन वाट बघत होती. दोन तीनदा तिने आत डोकावलं. अरे यार आटपा ना. हे येतील मग खाता येणार नाही.

आदर्श आवरून आला. त्याला बघून श्रद्धा दचकली. तो नेहमी प्रमाणे डॅशिंग दिसत होता. त्याची लॅपटॉपची बॅग भरत होता.

तिला वाटत होतं हे येण्या आधी भजी यायला हवी होती. आता काय होईल. त्या मावशी उपमा घेवून आल्या." पाच मिनिट मॅडम होत आहे."

दोघ नाश्ता करत होते.

"श्रद्धा दिवसातून एक फळ कंपलसरी आहे. हेल्थी खायच. भाजी पोळी सॅलड. तळलेले पदार्थ अजिबात चालणार नाही. मी कालच वाचल या बद्दल." आदर्श बोलत होता.

"झाल. आता काही खर नाही. ती विचार करत होती मला ओरडतील हे."

मावशी भजी घेवून आल्या. अतिशय सुंदर वास सगळीकडे पसरला. श्रद्धाने पटकन एक दोन भजी घेतल्या. न जणो नंतर खाऊ दिल नाही तर. अहाहा काय चव आहे.

" काय आहे हे? सकाळी सकाळी भजी? मावशी का केली आत्ता?" आदर्श विचारत होता.

" मॅडम मागत होत्या. "

तो श्रद्धा कडे बघत होता. तिने तो पर्यंत अजून दोन तीन भजी खाल्ल्या ही.

"श्रद्धा ठेव ते. भजी खायची नाही. मावशी फळ कापून आणा. "

"नाही मी हे खाणार. घरचे पदार्थ खाऊ शकते ."श्रद्धा हट्ट करत होती.

"पण सकाळी सकाळी अति होतय. अॅसिडीटी वाढली तर. अजून डॉक्टर कडे जायच आहे. मी डॉक्टरला तुझ्या बद्दल सगळं सांगणार आहे. "त्याने धमकी देवून बघीतली.

श्रद्धा वर विशेष परिणाम झाला नाही. ती मस्त नाश्ता करत होती." ठीक आहे पुरे आता मावशी ही डिश न्या." त्याने डिश वापस दिली. "उपमा संपव. आपण निघू या. "

" हो." यांच ऐकाव लागेल नाहीतर हे चिडतील. पण अचानक वडा खावसा वाटला. एवढ्या लवकर अस होत? काय माहिती? यांच्या मुळे झाल ते. हे का बोलले वडा पाव बद्दल.

रस्त्याने आदर्श श्रद्धाला तेलकट खाण्या बद्दल लेक्चर देत होता. ती बाहेर बघत होती.

"समजत ना काय सांगतो ते."

तिने मान डोलवली.

"त्रास झाला तर मला सांगू नकोस."

ऑफिस मधे आल्या आल्या आदर्शने श्रद्धा साठी बसायला आरामशीर खुर्ची पाठवली. श्रद्धा आरामात काम करत होती. "आज काय स्पेशल इतकी आरामशीर खुर्ची?" सगळे विचारत होते. श्रद्धा काही बोलली नाही.

लंच ब्रेक मधे मीना आली. तिच्या मागे आदर्श आला." चला श्रद्धा, मीना जेवायला."

यांच्या सोबत नको. मीना विचार करत होती. "सर मी बाकीच्या मैत्रिणी सोबत जेवते. तुम्ही श्रद्धाला घेवून जा."

"तू चल मला काही प्रॉब्लेम नाही." आदर्श बोलला.

"नाही सर. मी नंतर भेटते श्रद्धाला." ती गेली.

श्रद्धा, आदर्श जेवायला आत आले.

"काय झाल श्रद्धा? पकडून आणल्या सारखा काय चेहरा केला आहे. तु आनंदी नाही का ? बघ तुझ्या आवडीची भाजी आहे. "

"मला फ्रेंड जवळ जायच आहे. "

" नाही इथे जेव चुपचाप. मग भेटायला जात जा. मला माहिती आहे काय करणार तू तिकडे." तो तीच ताट करत होता.

" मी घेते माझ माझ."

"बस आरामात. "

संग्राम आला. "अरे वाह आज जोडीने जेवायला. वाह खूप सेवा सुरू आहे वहिनीची. "

आदर्श श्रद्धा हसत होते. श्रद्धा जेवली." मी जाते."

" थांब एक मिनिट ."

" हो माहिती आहे मला. काळजी घेईन मी. " हे अगदी अति करता आहेत. अजिबात इकडे तिकडे जावू देत नाही. मला कंटाळा आला आहे. मी बोलणार आहे यांच्याशी.

आदर्श संग्राम जेवत होते.

मीना तिच्या जागेवर बसलेली होती. श्रद्धा तिच्या डिपार्टमेंट मधे गेली. डिझाईन डिपार्टमेंट नेहमी बिझी असायच. आपली डिझाईन कोणाला कळू नये म्हणून नेहमी काळजी घेत होते ते. सगळे श्रद्धाला ओळखत होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. अस बाकीच्या लोकांना तिथे एंट्री नव्हती.

"आज काय ग सरां सोबत जेवण? आदर्श सर तुला आता लंच टाइम मधे ही सोडत नाही." मीना हसत बोलली.

"हो ना किती बोर झाल मला. संग्राम भाऊजी होते तिथे. ते रोज सोबत जेवतात ना. आदर्श ऐकत नाही. काय करू."

"पण काय विशेष." मीना तिच्या कडे बघत होती.

श्रध्दा लाजली. "कोणाला बोलू नकोस. तू मावशी होणार आहे बहुतेक. "

" काय? " ती मोठ्याने ओरडली. आजूबाजूचे दोन तीन लोक बघत होते.

"बहुतेक म्हणते आहे मी. अग अजून डॉक्टर कडे जाऊन आलेलो नाही आम्ही. त्यानंतरच फिक्स समजेल. "श्रद्धा बोलली.

" असेल ग काळजी करू नकोस. "

" त्या आधी आदर्शने स्ट्रीक्ट वातावरण करून टाकल. "

मीना हसत होती." बरोबर आहे त्यांच. मला खूप खूप आनंद झाला आहे. काय म्हणताय आमचे बाळ राजे."

मीना पुरे. श्रद्धा लाजली." मला पाणी पुरी आणशील का? मी सांगेन तेव्हा. आता नाही. "

" पाणी पुरी खावीशी वाटते का?"

"हो पाणी पुरी तर मला नेहमीच आवडते ."

"नाही. तू सरांना विचार आधी. माझी नोकरी जाईल अश्याने. आदर्श सर चिडतील." मीना बोलली.

श्रद्धा, आदर्श सोबत घरी आली. ती बाहेर वॉक घेत होती. आदर्श बिझी होता. तेजा तिच्याशी बोलत बसला.

आज डॉक्टरची अपॉइंटमेंट होती. आदर्श तर खूपच उत्साही होता. तिला अगदी फुलासारखं जपत होता. दोघं दवाखान्यात गेले. डॉक्टर श्रद्धाला तपासत होत्या. "अभिनंदन आनंदाची बातमी आहे. श्रद्धा आता काळजी घ्यायची. " त्यांनी औषध लिहून दिले. सकाळी त्रास होतो. दोन-तीन महिने ही गोळी घ्यावी लागेल.

आदर्श सुद्धा सगळं डॉक्टरां कडून समजून घेत होता. रस्त्याने पण दोघेजण एकदम भारवल्यासारखे होते.

घरी आले. आदर्शने तिकडून पळत येऊन दार उघडलं तिला हळूच उतरवलं.

" एवढी काळजी करायची गरज नाही आदर्श. काही झालेलं नाही मला."

आदर्शने लगेच तिच्यासाठी एक नर्स मागवून घेतली. जी तिच्या सोबत राहील. ऑफिसमध्ये सुद्धा कोणीतरी तिच्यावर लक्ष द्यायला ठेवलं होतं.

"जेवढं जमेल तेवढं काम. कर तुझा हट्ट आहे म्हणून ऑफिसमध्ये येऊ देत आहेत. नाहीतर घरी आराम केला तरी चालेल. " आदर्श बोलला.

आदर्श आज त्याच्या घरी गेला होता. घरी आनंदाची बातमी दिली. नेहमीप्रमाणे मोहिनी ताई ऐकत होत्या. पण त्या काही म्हटल्या नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो मोहिनी ताईं जवळ जाऊन बसला." आई माझ्याशी बोल ना. "

" पहिल्यांदा मोहिनी ताईंनी त्याला जवळ घेतलं." दोघेजण खूप रडत होते.

"आई श्रद्धा एकटी आहे तिला आधाराची गरज आहे."

तरी मोहिनी ताई काही म्हटल्या नाही. जरा वेळ बसून गप्पा मारून आदर्श घरी आला.

प्रभाकर मोहिनीताईंशी बोलत होते. "आता आपल्याकडे आनंदाची बातमी आहे मोहिनी. राग सोड. "

" मला राग आला नाही. पण मला काही त्या मुलीशी बोलूच वाटत नाही. " मोहिनी ताई बोलल्या.

" आता ती या घरची मेंबर आहे. आपली सून आहे. आपल्या मुलाची बायको आहे. त्याच्या बाळाची आई होणार आहे. राग सोड. " ते नेहमी समजावत होते त्यांना. मोहिनी ताई विचार करत होत्या.

आदर्श घरी आला तो शांत बसला होता. आईला मी श्रद्धा बद्दल सांगितल तरी ती काहीच म्हटली नाही. जावू दे या पुढे मी लक्ष देईल तिच्याकडे. यापुढे काहीही श्रद्धाला सांगायचं नाही. तिला टेन्शन येईल असं वागायचं नाही.

त्यात दोन-तीन महिने गेले. श्रद्धाला बराच त्रास होत होता. ऑफिसला ती जेव्हा जमेल तेव्हा जात होती. पण घरीही करमत नव्हतं. नर्स तिच्यासोबत असायची. ती समजूतदार होती. श्रद्धाला छान सांभाळायची. ती खूप ती बोलत बसायची नेहमी.

श्रद्धा सोबत मीना आणि इतर मैत्रिणी सुद्धा मदतीला होत्या. ऑफिसमध्ये पण सगळ्यांना समजलं होतं. सगळे श्रद्धाची काळजी घेत होते. मेन म्हणजे तिला त्रास होईल असं काहीही खाऊ देत नव्हते. सगळ्यांचं लक्ष होतं.

श्रद्धाला पाणी पुरी हवी होती. ती सगळ्यांना विचारत होती. आदर्श तिच्या डिपार्टमेंट मधे आला. "चल श्रद्धा. भेळ, पाणी पुरी खायची ना ."

हो. ती खुश होती. तो पार्सल घेवून आला होता. अगदी कमी तिखट साधी पाणी पुरी होती. एक पुरी खाल्ला नंतर श्रद्धा त्याच्या कडे बघत होती.

"काय झालं?"

"किती साधी आहे."

"बरोबर आहे हे."

"थोड तिखट, मीठ द्या."

"नाही हेच खाव लागेल . नाहीतर मी तुला डॉक्टरां कडे नेईन. त्या ओरडतील. आधीच पापड लोणचे नाही सांगितले होते. तरी तू खाते." आदर्श बोलला.

श्रद्धा रुसली होती. आदर्शने तिला अजून रागावल. ती तिच्या जागेवर येवून बसली.

मीनाचा मेसेज आला. " पाणी पुरी आणली आहे. ये."

ती खूप खुश होती. "येते. थोड्या वेळाने आदर्श मीटिंग साठी जाणार आहे. "

ती मीना कडे गेली .

"आटोप खा आता पटकन."

" बाकीचे लक्ष देत होते. सर जर चुकून आले तर ते सांगणार होते."

" याला म्हणतात पाणी पुरी. अहाहा काय छान आहे. मीना थॅन्क्स. उद्या पण आण. " श्रद्धा बोलली.

" नाही. एकदा ठीक आहे. तुझ्या पिल्लू वर माझा जीव आहे म्हणून आणल. सारख मागू नकोस. नाहीतर मी सरांना सांगेन. "मीना ओरडली.

श्रद्धा घरी आली. आज ती खुश होती तोंडावर अजून पाणी पुरीची चव होती.

आदर्श तिच्या कडे बघत होता." आज काय खुश एकदम. "

" हो मनासारखा पदार्थ मिळाला. "

" हो ना चांगली असते ती पाणी पुरी. तुला उगीच साधी लागत होती. "

श्रद्धा छान हसत होती.

आज श्रद्धा घरी होती. इकडे ऑफिस मधे तिच्या मैत्रिणी मिळून श्रद्धाच डोहाळे जेवण करायचा कार्यक्रम ठरवत होत्या. त्या सगळ्या जणी आदर्शच्या केबिनमध्ये गेल्या.

"काय झालं आज एकदम सगळ्या मुली इकडे कश्या? "

" आम्ही श्रद्धासाठी आलो आहोत. आम्हाला तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे."

"काय असतं ते?"

" सातव्या महिन्यात ओटी भरायचा कार्यक्रम असतो." मीनाने सांगितल.

" चालेल करूया आपण. तुम्ही सांगा काय काय करायचं आहे. आपण अरेंजमेंट करू. "

" हॉटेलवर कार्यक्रम ठेवू. आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. "

" कॉन्ट्रीब्युशनच राहू द्या आपण छान कार्यक्रम करू. तुम्हाला वाटलं तर जमा केलेल्या पैशातून तुम्ही सगळ्यांसाठी काही तरी घ्या."

सगळ्या मुली आनंदात होत्या. काय काय करायचं ते ठरवत होत्या. मीना त्यांची लीडर होती." पण हे श्रद्धाला समजू देऊ नका. "

" तिला न सांगता खरेदी कशी करणार. हिरवी साडी घ्यावी लागेल ना. " एक मैत्रिण बोलली.

" अरेंजमेंट करावी लागेल. आपण त्या दिवशी तिला इकडे घेऊन यायचं. इथे तयारी करू."

चालेल सगळ्या आनंदात होत्या. आपण छान कार्यक्रम करू. कुठलीच गोष्ट बाकी रहायला नको.

आदर्श ही खुश होता. श्रद्धाला आई नाही. माझी आई ऐकत नाही. बर झाल मैत्रिणींनी पुढाकार घेतला.

श्रद्धाला सातवा महिना लागला होता. तिला काम करायला सुचत नव्हतं. ती अतिशय सुंदर दिसत होती. सगळे खूप काळजी घेत होते. रोज ती थोडावेळ ऑफिसला जाऊन बसायची. दुपारनंतर घरी यायची. जेवण झाल्यावर घरीच आराम करायची. ती आदर्श मीनाला खूप त्रास देत होती. दोघ तिला समजवून थकले होते. ती वेगवेगळे पदार्थ मागत होती. कोणी दिले नाही तर आहेच तेजा भाई. तो बिचारा ऐकायचा.

डोहाळे जेवण झाल्यानंतर आदर्श तिला ऑफिस मधे पाठवणार नव्हता. आता हल्ली तो पण बरेच वेळा घरून काम करायचा. फक्त महत्त्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसमध्ये जायचा.

या आठवडय़ात थोडी बिझी आहे. जस जमेल तस पोस्ट करेन. वाचकांचे खूप आभार.


0

🎭 Series Post

View all