माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 36
श्रद्धाचा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम ठरला होता. सगळ्यांनी मिळून छान पार्टी हाॅल बघून ठेवला होता तो नंतर आदर्शने बूक केला. काय काय करायचं ते ठरवलं. खूप मजा करायची. श्रद्धाच्या आवडीचे पदार्थ ठेवायचे. ती खुश राहिली पाहिजे.
मीनाने श्रद्धासाठी सगळी शॉपिंग केली. फुलांच्या साजची ऑर्डर दिली. मिठाई मागवली.
दुपारच्या वेळी कार्यक्रम होता. चार वाजेपासून सुरू होऊन रात्रीपर्यंत चालणार होता.
आदर्श परत घरी जाऊन घरच्यांना सांगून आला. त्यांच्याकडून विशेष रिस्पॉन्स मिळाला नाही. पण यावेळी मात्र होईल मोहिनी ताई त्याच्याशी बोलल्या. त्याला जेवणाचा आग्रह केला. स्वतःच्या हाताने वाढून दिल. त्यामुळे आदर्श खुश होता. कधीतरी थोडं ठीक होईल अशी आशा होती. बहुतेक बाळाला बघून सगळे ठीक होतील असं त्याला वाटत होतं.
डोहाळे जेवणाचा दिवस उगवला. मुलींमध्ये खूप उत्साह होता. सगळ्यांनी ऑफिस मधून हाफ डे घेतला होता. सकाळपासून त्यांनी आदर्शला बरेच फोन केले होते.
"हो मी घरीच आहे मी तिला बरोबर घेवून येईल ."
"त्यावेळी तुम्ही पण या सर." मीना बोलली.
"नाही. मी त्या वेळात ऑफिसला जाऊन थोडे महत्त्वाच काम करून येणार आहे. मी श्रद्धाला घ्यायला आल्याशिवाय तुम्ही सोडू नका तिला."
"हो चालेल."
दुपारचं जेवण झाल्या श्रद्धाने थोडा वेळ आराम केला. तीन वाजता आदर्शनी तिला उठवलं. "चल आपल्याला थोडं महत्त्वाचं काम आहे. बाहेर जायचं आहे. "
श्रद्धाने हळूच उठून ड्रेस घातला. ती आदर्श बरोबर निघाली. ते हॉटेलमध्ये आले.
" इथे काय काम आहे? "
समोर मैत्रिणींनी उभ्या होत्या. त्यांनी श्रद्धाच स्वागत केलं. तिला खूप आनंद झाला होता. ती त्यांना भेटली तिच्या डोळ्यात पाणी होत. किती करता ग तुम्ही माझ्या साठी.
मीनाने श्रद्धाला रूममध्ये नेलं. तिला हिरवी साडी नेसून दिली. फुलांचा साज घातला. खूप सुंदर तयारी झाली होती. जरा वेळ आदर्श थांबला होता. त्या दोघांचे खूप सुंदर सुंदर फोटो काढले होते.
"आता मी निघतो तुम्ही चालू द्या तुमचा कार्यक्रम." आदर्श ऑफिसला गेल्यानंतर सगळ्यांनी कार्यक्रम सुरू केला. सुंदर गाणे म्हटले. डान्स केला. श्रद्धा खूप खुश होती. त्यानंतर पेढा की बर्फी ओळखायला सांगितलं. खूप सुंदर सुंदर पदार्थ अरेंज केले होते. श्रद्धा तर नुसती भरपूर सगळं खात होती.
दोघी वाट्यांवर हात ठेवून श्रद्धा बसलेली होती. कुठली वाटी घेऊ कुठली वाटी घेऊ असं चाललं होतं. शेवटी तिने एक वाटी निवडली. सगळ्याजणी उत्सुक होत्या काय आहे ते बघायला. पेढा निघाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या खूप छान गप्पा मारत बसल्या होत्या. जरा वेळाने जेवून घेतलं.
आदर्शला फोन केला. तो घ्यायला आला होता.
"सर तुम्ही जेवता का?"
" नाही मी घरी जाऊन जेवेन."
श्रद्धा कपडे बदलून आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. त्या किती भरपूर करतात माझं.
"असं म्हणायचं नाही. आम्हालाही तू आहे तुलाही आम्ही आहोत."
मीना तर इतकी कामात होती तिने कुठल्याच गोष्टीची कमी ठेवली नव्हती. कार्यक्रमाचा आदर्शने हिशोब ऑफिसमध्ये पाठवून द्यायला सांगितला.
सगळ्या मुली टॅक्सी करून घरी गेल्यानंतर आदर्श श्रद्धा निघाले. घरी आले. श्रद्धा सोफ्यावर बसलेली होती. " चला तुम्हाला जेवायचं आहे ना आदर्श."
"हो मी घेईन. तू खाते का?"
"नाही मी भरपूर काही खाल्ल आहे आज."
आदर्श जेवत होता. तो हसत होता. "माहिती आहे सगळे तिखट पदार्थ खाल्ले असतिल."
श्रद्धा खूप बडबड करत होती. मैत्रिणीबद्दल सांगत होती. कार्यक्रम कसा झाला सांगत होती." तुम्हाला माहिती आहे का मी पेढा निवडला. "
" म्हणजे काय?"
"पेढा आणि बर्फी असं वाटीत लपवुन ठेवतात आणि निवडायला सांगतात आपण जे निवडू ते होतं. बर्फी म्हणजे मुलगी आणि पेढा म्हणजे मुलगा. " श्रद्धा लाजली होती.
"अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे हा की आपल्याला मुलगा होणार आहे."
" हो मला तसंच वाटतं आहे. "
" जे होईल ते. आपण खूप छान सांभाळू बाळाला. एक तर तू अजून लहान आहेस त्यात बाळ. म्हणजे माझ्या वर दोन दोन जबाबदारी. " श्रद्धा चिडली होती.
"समजल हे अस आहे. "
दोघं खूप उत्साहाने गप्पा मारत होते. जरा वेळाने आदर्श तिला घेऊन रूम मध्ये गेला." आजपासून धावपळ बंद कर श्रद्धा. ऑफिस मध्ये यायचं नाही. "
" हो मी येणार नाही . "
श्रद्धा घरी रमली होती. मैत्रिणी नेहमी भेटायला येत होत्या. जसे जसे दिवस भरत होते आदर्श काळजीत होता.
रात्री अचानकच श्रद्धाच्या पोटात खूप दुखायला लागलं. खूप त्रास होत होता. आदर्श घाबरून गेला. डॉक्टरांना फोन केला. काय करू?
नर्स सोबत होती. ते तिघे हॉस्पिटलमध्ये गेले. स्वयंपाक करणाऱ्या मावशी सुद्धा आलेल्या होत्या. मीना निघाली होती. आदर्शने घरी फोन करून सांगितलं. "बाबा मला खूप काळजी वाटते आहे श्रध्दाची."
"आम्ही येतो आहोत लगेच तू काळजी करू नको आदर्श. मोहिनी चल आपल्यालाच दवाखान्यात जाव लागेल. श्रद्धाला ऍडमिट केलं आहे. कुठल्याही क्षणी डिलिव्हरी होईल. आदर्श घाबरून गेला आहे."
"नाही मी नाही येणार." मोहिनी ताई बोलल्या.
"ठीक आहे तू तुझा निर्णय घे. मी जातो आहे. पण हीच वेळ आहे मुलाला सांभाळून घ्यायला हव. नाही तर तो कायम लक्षात ठेवेल. एवढेच मी तुला सांगतो. बाकी तू तुझा निर्णय घे. " प्रभाकर राव कारमध्ये बसले, मोहिनी ताई येऊन बसल्या. त्यांना आनंद झाला. ते लगेच निघाले हॉस्पिटलमध्ये आले. आदर्श पुढे फेर्या मारत होता. तो मोहिनी ताईंना भेटला.
" कुठे आहे श्रध्दा?" प्रभाकर राव विचारत होते.
"आत नेल आत्ताच ."
प्रभाकर राव त्याच्या सोबत होते. "बाबा श्रद्धाला त्रास होतो आहे .तिला काही होणार तर नाही ना."
" होतोच अशावेळी त्रास. काळजी करायची नाही. आम्ही दोघ आहोत ना आता सोबत." तिघ सोबत बसले होते. मीना समोर बसलेली होती. मोहिनी ताईंनी आदर्शचा हात धरला. काळजी करू नकोस .
दोन तासाने तिची डिलिव्हरी झाली. मुलगा झाला. सिस्टर बाळाला घेऊन बाहेर आली. आदर्श कडे बाळ दिल. त्याला घेता येत नव्हतं. अतिशय गोड गोंडस चेहरा. रडून लाल झाला होता तो. सगळे कौतुकाने बघत होते. तो आदर्श कडे बघत होता. परत जोरात रडायला लागला. आदर्श पूर्ण भारवलेला होता. एवङस बाळ माझ. त्याने त्याला हळूच जवळ घेतल. शांत हो बेटा. तो मोहिनी ताईं कडे बघत होता आई याला गप्प कर. त्याने बाळ प्रभाकर राव मोहिनी ताईं कडे दिल. त्यांच्या पण डोळ्यात पाणी होत.
मीनाने बाळाला घेतल. मीना श्रद्धा कडे दे याला. श्रद्धा खूप थकलेली होती. तिने बाळाला श्रध्दा शेजारी झोपवल. बाळाला दूध पाजा नर्स सांगून गेली .मीना तिला मदत करत होती.
थोड्या वेळाने आदर्श श्रद्धाला भेटायला गेला. ती झोपलेली होती. "डॉक्टर श्रद्धा ठीक आहे ना?"
"एकदम ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाही."
दोन तासाने श्रद्धा उठली. सगळेच भेटायला आले होते. खूप गंमत सुरू होती. बाळ झोपलेलं होतं. मोहिनी ताईंना बघून श्रद्धा गप्प होती. बापरे या आल्या आहेत का? आता त्या इथेच थांबतील का?
आदर्श तिची खूप काळजी घेत होता. संध्याकाळी प्रभाकर राव आणि मोहिनी ताई घरी गेल्या. त्यांनी सगळीकडे मिठाई वाटली. मीना तीच्या जवळ होती ती बाळाला सोडून कुठे जात नव्हती. बाळ तिच्या जवळ शांत होता.
"मीना आता रात्र झाली बाहेर ड्रायव्हर आहे घरी जा. तुझी खूप धावपळ होते आहे ." आदर्श बोलला.
" नाही सर रात्री बाळ रडल तर श्रद्धाला अजून बसता येत नाही. मी घेईन त्याला." ती पूर्ण वेळ सोबत होती.
"मीना अग हा किती जोरात रडतो जस काही कोणी मारल आहे याला." मीना हसत होती. बाळाने आत्ताच श्रद्धाला दमवल होत. सकाळी ती घरी गेली.
बाळ दिवसभर छान झोप होता. रात्री झाली की रडायला सुरुवात करायचा. श्रद्धा घाबरली होती पण तिला बाळाला सांभाळायला नर्स होती त्यामुळे काही विशेष प्रॉब्लेम आला नाही.
सकाळी परत प्रभाकर राव आणि मोहिनी ताई आले होते. त्यांनी तिच्यासाठी खायला करून आणलं होतं. त्या तिच्याशी बोलत नव्हत्या पण बाळाला मात्र घेऊन बसत होत्या. आदर्श खुश होता. तो थोडावेळ ऑफिसला गेला होता. प्रभाकर राव श्रद्धाशी बोलत होते. आदर्श आल्यानंतर ते लोक वापस गेले.
पाच दिवस झाले. आज घरी सोडणार होते. प्रभाकर राव मोहिनी ताई आदर्श सोबत बोलत होते. "श्रद्धा तू आणि बाळ घरी चला आता."
आदर्शला विश्वास बसत नव्हता. "खरच ना. आई तुला काही प्रॉब्लेम नाही ना?"
"नाही आपल बाळ छान आहे." त्या बाळाला घेऊन बसल्या होत्या. पण त्या अजूनही श्रद्धा सोबत बोलत नव्हत्या. होईल ठीक हळू हळू. एक आशा होती.
आदर्श आत आला श्रद्धा आराम करत होती. "बाळ कुठे आहे?"
"आई कडे आहे. श्रद्धा आई खुश आहे. मला बर वाटत आहे. आई बाबा म्हणता आहेत घरी चला. काय करूया त्यांनी एक हात पुढे केला आहे. आपल्याला पण रीसपाॅन्स द्यायला हवा ."
" ठीक आहे तुम्ही म्हणाल ते करू. जावू घरी."
"नक्की ना? तुला काही प्रॉब्लेम नाही ना."
"नाही तुम्ही तुमच्या आई सोबत राहू शकाल. ठीक आहे मग मी तयारी करतो." आदर्श खूप खुश दिसत होता. तो गेला.
श्रद्धा विचार करत होती काय होईल? तस आता आदर्शच्या आई ठीक वागता आहेत. काकू पण दोन तीन दा येवून गेल्या. बाकीचे घरचे किती चांगले आहेत. काका ही छान आहेत. होईल बरोबर जास्त विचार नको करायला. आदर्श खुश आहे अजून काय हव.
बाळ रडत होत मोहिनी ताई त्याला आत घेवून आल्या. श्रद्धा कडे बाळ दिल. ती थोडीशी हसली. त्या बाहेर निघून गेल्या. श्रद्धा बाळाला दूध पाजत होती. तो झोपला. अगदी आदर्श सारखे केस आहेत याचे. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. किती गोड आहे हा. माझा लाडाचा आहे. कधीच माझ्या पासून दूर नको जायला. माझ बाळ. तिने त्याला एकदम जवळ घेतल. पापी दिली. तो दूध पिऊन नुकताच झोपला होता. परत चिडला रडायला लागला. श्रद्धा छान हसत होती. आई त्रास देते बाळाला. झोप. तिने परत त्याला दुध पाजल. तो गोड बाळ लगेच झोपला. श्रद्धाने त्याला काजळाची टीट लावली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा