माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 39
आदर्श श्रद्धा बाळाला घेवून बाहेर आले. अदिती ही आता पूजेच्या ठिकाणी येवून बसली होती. बायका पाळणा म्हणत होत्या.
" बाळाच नाव ठेवायच आहे. आत्या पुढे या." गुरुजी बोलवत होते.
बाळाला पाळण्यात झोपवलं. श्रद्धा आदर्श प्रेमाने झोका देत होते.
अदितीने बाळाच्या कानात सांगितल " श्रेयस. "
सगळे टाळ्या वाजवत होते. प्रभाकर रावांनी सगळ्या कंपनीत बोनस जाहीर केला. सगळे खुश होते. आदर्शने बाळाला सुलभा कडे दिल. तो आणि श्रद्धा सगळ्यांचा आशीर्वाद घेत होते. तो श्रद्धा कडे नीट लक्ष देत होता. दोघ मधून मधून बोलत होते. आदर्श तिची खूप काळजी घेत होता. श्रद्धा खुश होती.
मोहिनी ताई, आशा काकू बघत होत्या. "आदर्श नुसता श्रद्धाच्या मागे मागे करतो आहे. वहिनी बघा ना. "
" हो बघते आहे सकाळ पासून. काय करू. हिची हिस्ट्री काढा. बघू कोण आहे ही. मला तर राग येतो आहे." मोहिनी ताई बोलल्या.
जेवण झाल. आकाश, संग्राम, अदिती, आदर्श, श्रद्धा, मीना एका जागी बसले होते.
" श्रेयुला इकडे दे श्रद्धा. " मीना त्याला घेवून बसली होती.
" माझा वाढदिवस आहे चार दिवसानी. "अदिती बोलली.
कोणी लक्ष दिल नाही. मुद्दाम सगळे वेगळ बोलत होते.
" मी काय म्हणते आहे." अदिती चिडली होती .
"ये अदिती इकडे मला सांग." श्रद्धा बोलली.
"वहिनी तूच एक चांगली आहेस. आपण छान पार्टी करू. या दादा ग्रुपला बोलवायचं नाही." ती चिडली.
"सॉरी आम्हाला ही बोलव प्लीज." आदर्श बोलला.
" आम्ही कधीच पार्टीला गेलो नाही. " आकाश तिला चिडवत होता.
" आदर्श आपण मीटिंग साठी जातो आहोत दिल्लीला लक्ष्यात आहे ना . "संग्रामने सांगितल.
" ओह. हो अदिती आम्ही नसु. "
"आदर्श कुठे जाणार आहात तुम्ही?" श्रद्धा घाबरली. ती त्याच्या शिवाय या घरात कस राहणार होती. तिला एकदम सासुबाई , काकूंची भीती वाटली. " अहो नका जावू ना. "
" अजून नक्की नाही आणि गेलो तरी दोन दिवसात परत येईन मी. काळजी नाही करायची. काम करावे लागतील ना. "
" मी काय करू तो पर्यंत इथे? "ती रागात होती.
आदर्श तिच्या जवळ सरकला. हळूच तिच्या कानात बोलला. " तू श्रेयुची काळजी घ्यायची. आराम करायचा. लवकर बर व्हायच माझ्यासाठी." ती लाजली होती.
आदर्श रात्री श्रद्धा सोबत होत्या. मोहिनी ताई आल्या होत्या. "बाळ रडत असेल तर तिकडे झोप. "
" आई श्रेयस आरामात आहे. मी रूम मधे असलो की तो शांत असतो. त्याला सांभाळण माझी पण जबाबदारी आहे." आदर्श बोलला.
" कोणी सांगितल हे की तू असल्यावर तो शांत असतो. एवढ्या लहान मुलाला काय समजत?" त्या हट्टी पणा करत होत्या.
"समजत त्याला ही आजूबाजूचे लोक. त्याला प्रेमाची गरज आहे. "
" ठीक आहे आराम कर. " त्या त्यांच्या रूम मधे आल्या. वाटल नव्हत पण हुशार आहे श्रद्धा. तिने बरोबर आदर्श वर परत ताबा मिळवला. काय करू? मला खूप राग येतो आहे.
आदर्श सकाळी ऑफिस मधे गेला. श्रद्धा श्रेयस मजेत होते. ती कोणात मिक्स झाली नाही. तिचा तिचा आराम केला. आता अस करु आपण. कोणात भाग घ्यायचा नाही.
रात्री जेवण झाल्यावर प्रभाकर राव, आदर्श बोलत होते. त्यावरून श्रद्धाला समजल आदर्श खूप बिझी आहेत. संग्राम भाऊजी आधीच दिल्लीला गेले होते. उद्या आदर्श जाणार होता. तो रूम मधे आला बॅग पॅक केली. "श्रद्धा तुझी बाळाची काळजी घ्यायची. मला दोन तीन दिवस लागतील."
"अहो उद्या अदितीचा वाढदिवस आहे ना."
"असू दे माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे."
सकाळी तो बॅग घेऊन ऑफिस मधे गेला. तिथून दुपारी फ्लाइट होती. बाहेर घर आवरत होते. संध्याकाळी अदितीच्या फ्रेंड्स साठी पार्टी होती.
" आम्ही बाहेर जाणार आहोत. पार्टी साठी. घरी नको. " अदिती बोलली.
"हो. घरी औक्षण करू. केक कट कर मग जा." आशा काकू बोलल्या.
अदिती खूप खुश होती. मस्त वन पीस ड्रेसमधे खूप सुंदर दिसत होती.
"वहिनी तयार आहेस का? चल बाहेर. श्रेयू चला आत्तुचा बर्थडे आहे ना. श्रेयु पण केक कापणार. पिल्लू ला नेते मी पार्टी साठी. तो माझ्या सोबत राहीन." ती त्याच्या सोबत खेळत बसली.
श्रद्धाने ड्रेस घातला. छान तयारी केली. तयार होवुन ती बाहेर आली. हळू हळू फ्रेंड्स येत होते. ती ओळख करून देत होती. श्रेयस खूप आवडला सगळ्यांना.
" तुझी वहिनी गोड आहे. "
" हो खूप साधी समजूतदार आहे ती. " अदिती बोलली.
काकू केकची तयारी करत होत्या. श्रद्धा कोणाशी बोलायला गेली नाही. ती बाहेर सोफ्यावर आरामात बसली होती. "चला आता. "
" आई बाकीचे मित्र यायचे आहेत."
"हो येतील ते तिकडे परस्पर." एक मैत्रीण बोलली.
आकाश आला होता. प्रभाकर राव, मोहिनी ताई, काका येवून बसले. औक्षण झाल, केक कापला. खूप गम्मत येत होती. खूप फोटो काढले. सगळे श्रेयसला घेवून फिरत होते.
अदितीचे बाकीचे मित्र मंडळी आले होते. ते समोर उभे होते. दोन मुल सारखे श्रद्धा कडे बघत होते. तिने त्यांच्या कडे बघितल. ते आपापसात कुजबुज करत होते. ते आता अदितीशी बोलत होते. "कोण आहे ही?"
"माझी वहिनी आहे. या ना मी ओळख करून देते." ते श्रद्धा कडे आले.
"वहिनी हे माझे मित्र आणि ही श्रद्धा वहिनी आणि हा आमचा गोड गोड श्रेयस. आदर्श दादा, वहिनीच बाळ."
"आर यू शूअर ही श्रद्धा आहे?"
"हो काय झाल?" अदितीने विचारल.
"हिला आम्ही ओळखतो ही "रुपा" आहे."
रुपा नाव ऐकुन श्रद्धा दचकली. कोण आहेत हे मुल? काय करू मी? रूम मधे जावू का? आदर्श ही घरी नाही. तिला घाम फुटला.
" तू रुपा आहे ना. हा निरागस चेहरा मी कधीच विसरणार नाही. आठवत का आम्ही यायचो त्या हॉटेल मधे." तो मुलगा परत बोलला.
श्रद्धा गप्प होती.
अदिती चिडली." सांगितल ना ही माझी वहिनी आहे श्रद्धा. काहीही बोलू नका."
"काहीतरी गडबड होते आहे. "
कुणी तरी ते ऐकलं आणि मोहिनी ताईंना जाऊन सांगितलं. मोहिनी ताईंनी त्या दोघा मुलांना आत मध्ये बोलवलं." काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? "
" आम्ही रूपाला ओळखतो. "
" कोण आहे रूपा? " त्या बोलल्या.
" ती रुपा नाही श्रद्धा आहे. " आशा काकू इकडे येत बोलल्या.
" नाही तिचं नाव रूपा आहे. पूर्वी ती हॉटेलमध्ये बार डान्सर होती." तो मुलगा सांगत होता.
मोहिनी ताई आणि आशा काकूंना धक्का बसला. त्या सगळी माहिती विचारत होत्या. त्या दोघ मुलांनी त्यांना माहिती होत ते सगळ सांगितल.
" अस आहे का? कठिण आहे."
मोहिनी ताईंनी श्रद्धाला आत मध्ये बोलवलं. ती आत मध्ये गेली. त्या विचारत होत्या काय आहे हे प्रकरण?
श्रद्धा काहीच म्हटली नाही. "मला माझ्या रूममध्ये जायचं आहे. मला नाही माहिती हे मुलं काय म्हणत आहेत ते."
"आमच्याजवळ प्रुफ आहे." त्यांनी फोटो दाखवला. त्यात श्रद्धा स्टेजवर उभी होती. इतर मुलींसोबत मेकअप केलेली.
तिचा फोटो बघून मोहिनी ताई आणि आशा काकुला धक्का बसला. प्रभाकरराव आणि काका ही आत मध्ये आले." काय चाललं आहे तुमचं? "
मोहिनी ताईंनी त्यांना फोटो दाखवले. श्रद्धाचा खूपच घाबरली होती. ती श्रेयसला घट्ट धरून बसलेली होती.
"काय प्रकार आहे हा श्रद्धा? " प्रभाकर राव ओरडले.
"मी सांगतो काका. ही श्रद्धा नाही रूपा आहे. ती हॉटेलमध्ये बार डान्सर होती. मी बऱ्याच वेळा तिला तिकडे त्या एरियात बघितलं आहे. सतीश नानांच्या कडे कामाला होती ती."
"मी काय विचारतो आहे श्रद्धा? हे खर आहे का?" प्रभाकरराव परत जोरात विचारत होते.
" आपण आदर्श आल्यानंतर बोलू ना मला काही सांगता येणार नाही. " श्रद्धा घाबरत बोलली.
" का आदर्श आल्यावर काय आहे? आता लवकर सांग. " मोहिनी ताई चिडल्या होत्या.
" हो ती मीच रुपा आहे. पण त्या मागे खूप कारण आहेत. तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्याल का? "श्रद्धा बोलली.
"काय ऐकायचं आहे आता. पहिल का ही पोरगी कोण आहे ते? मला आधी पासून संशय होता." मोहिनी ताईंनी तोफांड करायला सुरूवात केला.
" ही असली मुलगी बरोबर आपल्या घरात शिरली." काकू बोलल्या.
" म्हणूनच मी आधीपासून या गोष्टीला विरोध करत होती. मला वाटल होत काहीतरी गडबड आहे. तुम्हा लोकांना माझं पटत नाही. बघितलं का किती भोळा चेहरा आहे. त्यामागे कसलीही हिस्ट्री. काय ग पोरी हे असले काम करते का तू." त्या तिच्या जवळ जावून उभ्या राहिल्या.
"मोहिनी शांत हो."
त्या दोघा मुलांना प्रभाकर रावांनी समजावलं की ही गोष्ट बाहेर समजता कामा नये. ते दोघं बाहेर चालले गेले.
अदिती शॉक लागून श्रद्धाकडे बघत होती. ती पण रागाने बाहेर निघून गेली. ती मुलांना घेऊन पार्टीला चालली गेली.
प्रभाकरराव, मोहिनी ताई, काका, काकूंच्या मध्ये आता श्रद्धा बसली होती. सगळ्या बाजूंनी ते तिला खूप बोलत होते. तिला काय कराव ते समजत नव्हतं. ती रडत होती.
"ए पोरी तुझी बॅग भर आणि निघ या घरातुन. नाहीतर असे लक्षण असलेली पोरगी सून म्हणून नको आहे आम्हाला. बाळ ही आपल आहे ना नक्की? या अश्या मुलींचा काही भरोसा नसतो. कुठे कुठे फिरून आली काय माहिती. पैसे बघून हिने बरोबर आदर्शला फसवलं. असे श्रीमंत मुलच बघतात या मुली. किती आरामाचा आयुष्य जगते आहे आपल्या सोबत. हाताशी नोकर नवरा ही जे म्हणेल ते ऐकतो. "मोहिनी ताई खूप बोलत होत्या.
" मोहिनी तू जरा गप्प बस. आदर्श आला की बघू आपण काय करायचं ते. " प्रभाकर राव बोलले.
" काय करणार आहे आदर्श? त्याच्या डोळ्यावर हिच्या प्रेमाची पट्टी आहे. ही तिच्या डोळ्यातले अश्रू दाखवेल. पोराला त्याच्या पुढे करेल. तो विरघळेल. परत काही होणार नाही. "
" मग आता काय करायचं? " प्रभाकर राव बोलले.
" बाबा माझ ऐकुन घ्या थोड." श्रद्धा हळूच बोलली.
" बाबा काय बाबा. तुझा आमचा काहीही संबध नाही. आदर्शला तिच्या सोबत राहायचं तर तो राहील. मी तरी हिच्याशी बोलणार नाही. "मोहिनी ताई ओरडल्या.
"आदर्शनी हिची चौकशी नव्हती केली का आधी?" काकू बोलल्या.
" काहीच माहिती नाही तो एकदमच तिला घरी घेऊन आला होता. त्या दिवशी हाताला वगैरे लागलं होतं. असेच काहीतरी नखरे करतात या मुली. दुसऱ्यांना जाळ्यात फसवतात. "
श्रद्धा तिथून उठली. श्रेयसला घेऊन रूममध्ये येऊन बसली. तिने गच्च दार लावून घेतलं. बराच वेळ ती रडत होती.
सुलभा दरवाजा वाजवत होती." मॅडम दरवाजा उघडा नाही तर मि सरांना सांगेन."
तिने दरवाजा उघडला.
" बापरे काय हाल करून घेतले आहेत. का रडता आहात तुम्ही इतक?"
"काही नाही सुलभा. माझ नशीब दुसर काय. काय करू मी तू तरी सांग."
सुलभाने श्रेयसला घेतल. श्रद्धा अजूनही रडत होती. तिने बघितलं आदर्श ऑनलाईन आहे का ? तो मोठ्या मीटिंग मधे बिझी होता. त्यानंतर सगळ्या लोकांसोबत डिनर होतं. मोठी पार्टी होती .तिने मेसेज पाठवून ठेवला की फ्री झाल्यावर मला फोन करा. पण त्याला ते जमलं नाही. तो रात्री एक दीड वाजता फ्री झाला. तोपर्यंत श्रद्धाला डिस्टर्ब करायला नको म्हणून त्यांने फोन केला नाही .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा