Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 41

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस
माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 41


मोहिनी ताई, काकू बोलल्या नंतर आदर्श रागारागाने आत मध्ये आला. श्रद्धा बसलेली होती. आदर्शला बघून ती खुश झाली. आज कसे काय हे लवकर आले? बोलू का यांच्याशी. ते आज तरी बोलतील का माझ्याशी? मी परत माफी मागू का? श्रेयसला त्यांच्या कडे देवून बघू का? एक आशा होती आज तरी हे नीट बोलतील. मला जवळ घेतील म्हणतील आपण नको भांडू या. ती उठून उभी राहिली. त्याला पाणी दिल. हसून त्याच्या कडे बघितल.

तो रागात होता. "श्रद्धा तू नेहमी आत का बसलेली असते? घरच्यांमध्ये मिक्स का होत नाही? बाहेर जेवायला का जात नाही? तुला घरात काही काम नाही का? काय आहे हा प्रकार? तू नीट वागायचं नाही अस ठरवल का?"

"सॉरी. चला तुम्हाला जेवायला देते." तिने शांततेने घेतल.

"नुसता मी नाही बाकीचे लोक आहेत घरात त्यांच काय? ते काम तू कधी करणार? "आदर्श अगदी भांडणाच्या मूड मधे होता.

काहीही झाल तरी मी भांडणार नाही यांच्याशी. श्रद्धा तरी समजुतीने घेत होती. " मला वाटल सगळे माझ्यावर चिडले आहेत अजून त्यांच्या समोर जावून बसा. असे वाद वाढतात. म्हणून मी आत होते. त्या दिवशी पासून कोणी माझ्याशी बोलत नाही . ठीक आहे काही हरकत नाही. मी तुम्हाला यातलं कधीच काही सांगत नाही . बाहेर जावुन काय करू. त्यांना मी आवडत नाही. "

" अस चालणार नाही. तू स्वतः जाऊन बोल त्यांच्याशी . खराब झालेले संबध नीट करायचा प्रयत्न तर कर. दहा वेळा नाही बोलणार कधी तर ऐकतील ना."

आदर्शच्या बोलण्याच श्रद्धाला आश्चर्य वाटल. हे सारख मला माफी मागायला सांगता. मी काय केल अस? " अहो मी किती प्रयत्न केले. नाही बोलत कोणी माझ्याशी. काही हरकत नाही. आता मला काही फरक पडत नाही. उगीच स्वतः चा सारखा अपमान करून घ्यायचा." ती बोलली.

" पण मला फरक पडतो. हे मला असं बरोबर नाही. इथे रहायच असेल तर व्यवस्थित राहायचं. घरात सगळ्यांशी बोलायचं. मान द्यायचा. आणि तू श्रेयसला का देत नाही तिकडे? " त्याचा आवाज वाढला होता.

बापरे यांना अजून काय काय खोट सांगितल त्या लोकानी काय माहिती. "तेच कोणी घेत नाही. त्याला भेटायला येत नाही. मी एक आठवडा झाला इथे या रूम मधे एकटी आहे. तुम्ही पण अस करतात. घरचे ही तसेच. अहो आपण आधी सारख प्रेमाने राहू ना. प्लीज राग सोडा ." ती अगदी कंटाळली होती या भांडणाला.

"उठ इथून. चल बाहेर. आता श्रेयस मोठा झाला आहे जरा घरकाम शिकून घे. किचनमध्ये मदत करायची. आई काकूला काय हवं ते बघत जा. नुसतीच रूम मध्ये बसलेली असते तू. काही येत नाही तुला. आले गेलेल्यां कडे लक्ष देत जा." आदर्श कंट्रोल मधे नव्हता.

"त्या मला येऊ देत नाहीत किचनमध्ये. त्या म्हणतात कुठल्या गोष्टीला हात लावायचं नाही. हे तुझ घर नाही." श्रद्धाने खर सांगितल.

"चल माझ्यासोबत. सुलभा बाळाकडे बघ." आदर्श तिला हाताला धरून बाहेर घेऊन आला. सगळे त्या दोघांकडे बघत होते .

"आई काकू तुम्ही श्रद्धाला किचन मध्ये येऊ देत नाही का? तुम्ही कोणी का बोलत नाही तिच्याशी?" आदर्शने विचारल.

"आम्ही का करू असं? उलट तीच काही जबाबदारी घेत नाही." काकू बोलल्या.

" श्रद्धा सांगते आहे."

"ती काहीही सांगेल. तीच किती ऐकायचं ते तू ठरव. तुझी बायको नीट वागत नाही. घरात कोणाशी बोलत नाही. ती श्रेयसला घेवून आत बसुन रहाते. बाळाला आम्ही चार-पाच दिवसापासून बघितलं नाही." मोहिनी ताई बोलल्या.

त्याने बाबांकडे बघितलं. त्यांनी हो सांगितलं.

आदर्श खूप चिडला होता. सगळ्यांसमोर श्रद्धाला खूप बोलला." फालतू गोष्टीचे लाड होणार नाहीत श्रद्धा आधीच सांगून ठेवतो. उद्यापासून घरातल्या सगळ्यांचं चहा नाश्त्याच तू बघायचं. जेवायला वाढायचं. जर यावेळी तू रूम मध्ये बसलेली दिसली तर बघ माझ्याहून कोणी वाईट नाही. मी काही बोलत नाही या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा नाही. यात चूक झाली तर मग तू आहे मी आहे. "

आकाश, अदितीने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. आदर्शने त्यांना गप्प बसायला सांगितलं.

श्रद्धा डायनिंग टेबल जवळ उभी होती . तिची अवस्था बिकट झाली होती. सगळ्यांसमोर रडता ही येत नव्हतं आणि आत मध्ये जात येत नव्हतं. ती तिथे काय काम करू ते बघत होतो. कोणाला काय हव ते विचारत होती. तिने आदर्शला जेवायला दिल. तिचे हात पाय भीतीने थरथरत होते. या आधी अश्या पद्धतीने आदर्श कधीच चिडले नाहीत. ते ही माझ्यावर प्रेम करत नाहीत. ती दुःखी होती.

आदर्श त्याच त्याच जेवत होता. जेवण झाल्यावर आदर्श आत निघून गेला.

मोहिनी ताई, आशा काकू खुश होत्या.

"बरी अद्दल घडली हिला. जास्त शहाणपणा करते. आता कस आदर्श समोर ततफफ झाल. छान बोलला तो तिला. आता हिची हिम्मत होणार नाही आपल्याला उलट बोलायची." काकू हळूच बोलली.

"तेच तर. अस करु आता आपण. आदर्शने हिला त्रास दिला तरच ती जाईल इथून." मोहिनी ताई बोलल्या.

श्रद्धा टेबल आवरत होती. तिला सुचत नव्हत. हे अस अचानक काय झालं? आदर्श का इतके चिडले आहेत. आत जावून बोलू का त्यांच्याशी? नको मला अजिबात आता कसली इच्छा नाही.

"तुम्ही राहू द्या मॅडम जा बाळाकडे बघा. " तिथल्या बाई बोलल्या.

" नको राहू द्या मी करते. " तिने टेबल आवरला. किचन मधे झाक पाक केली. ती आत आली. आदर्श आत बसला होता. तिने सुलभा कडून श्रेयसला घेतल. त्याला झोपवल. ती पण त्याच्या बाजूला झोपली. आदर्श तिच्याशी बोलला नाही. तो तिथे सोफ्यावर झोपला.

सकाळी ती लवकर उठली श्रेयसला सुलभा कडे दिल. बाहेर किचन मधुन नाश्ता डायनिंग टेबलवर आणून ठेवला. ती सगळ्यांना नाश्त्याला देत होती. आतून चहा करून आणला.

आदर्श आवरून बाहेर आला. त्यांने बघितलं श्रद्धा काम करते आहे. तो सुलभा कडे गेला. "श्रेयु ठीक आहे ना?"

" हो साहेब."

"तो रडला तर श्रद्धा कडे दे त्याला." श्रेयु त्याच्या कडे येत होता. आदर्श त्याला घेवून बसला.

श्रद्धा तीच तीच आवरत होती. चेहर्‍यावर काहीच भाव नव्हते. आदर्श नाश्ता करून निघून गेला. ती दुपारी आत रूम मधे होती.

"वहिनी मजा येते ना घरात. कशी खाली मान घालून काम करते आहे ती." आशा काकू बोलल्या.

"हो पण हे आपण उद्दिष्ट नाही. ती या घरातून बाहेर जाईल तेव्हा ठीक होईल. मग मी माझ्या मनाची छान सून या घरात आणेन." मोहिनी ताई बोलल्या.

" कस करू या पण?"

"जे होत आहे ते बरोबर आहे आपल्या मना प्रमाणे होत आहे. आपण आदर्शला सांगायच. तोच ठीक करेल हिला " दोघी खुश होत्या.

दोन दिवस आदर्श बिझी होता. तो श्रद्धाशी बोलत नव्हता. श्रेयसला ही घेतल नाही. दुसर्‍या रूम मधे रहात होता.

श्रद्धा काळजीत होती. माझ्याशी ठीक आहे कस ही वागतात पण या एवढ्याशा लहान मुलाने काय केल आहे? आदर्श याच्याशी का बोलत नाही? ती विचार करत होती. माणस कसे बदलतात ना . आज पंधरा दिवस झाले आदर्श रागावलेले आहेत. काय काय नाही केल मी. परिस्थिती ठीक होत नाही. उलट अजून गैरसमज होत आहेत.

तिने मीनाला फोन करून सगळ सांगितल. "मला तिकडे यायच आहे मीना इथे रहायचा नाही. माझ्याशी कोणी बोलत नाही. खूप कंटाळा आला आहे."

" रडू नकोस श्रद्धा. असा धीर सोडून कस होईल. आदर्श सर असे वागता आहेत? काय म्हणण आहे त्यांच? " मीना समजावत होती.

"तेच तर मला काही समजत नाही काय सुरू आहे. मी किती सॉरी बोलली तरी माझ्याशी बोलत नाही. श्रेयु लाही भेटायला येत नाही. त्याने काय केल आहे."

"शांत हो. होईल ठीक. "

"मला नाही वाटत आता हे ठीक होईल. त्यांच्या घरच्यांना छान वाटत असेल माझे हाल बघून. त्यांना तेच हव होत. "

" आता काय पुढे?"

" काहीच माहिती नाही. चल थोड काम आहे. मी फोन ठेवते. " तिने फोन ठेवला. मीना सुद्धा काळजीत होती.

रात्री बाकीचे जेवत होते. श्रद्धा बाजूला उभी होती. ती वाढत होती. श्रेयस खूप रडत होता.

सुलभा त्याला घेवून आली. "मॅडम याला घ्या."

तिला भीती वाटत होती. मी श्रेयु सोबत रूम मधे गेली आदर्श आला तर? तो ओरडेन." सुलभा थांब ना दहा मिनिट. सगळ्यांच होत आल आहे."

"वहिनी श्रेयु रडतो आहे. जा आत बस. मी बघते इकडे."

ती आत गेली. आदर्श आला. परत श्रद्धा तिथे नाही बघून तो चिडला. आत आला. त्याने सुलभा कडे रागाने बघितल. ती पटकन बाहेर निघून गेली. श्रद्धा दचकली. ती श्रेयसला दूध पाजत होती.

"श्रद्धा तू काय करते आहे इथे? तुला काय सांगितल होत सगळे जेवताना बाहेर थांबायच. मी सांगतो ते का ऐकत नाही तू. सांगितलेले काम का करत नाही. तुला हे सगळ नीट व्हायला नको का? तुझ्यासाठी करतो ना मी. " त्याच्या आवाज वाढला होता.

"झाल आहे एक मिनिट. श्रेयू दूध पितो आहे. तो सोडत नाही मला. झोपतो आहे तो." श्रेयस आरामात दूध पीत होता. काय अस आता बाळाला घेता येत नाही. घरचे महत्वाचे की बाळ? जावू दे पाच मिनिटांनी जावू.

अदिती आत आली." सॉरी दादा मी मधे बोलते आहे. वहिनी बाहेर होती. श्रेयु खूप रडत होता म्हणून आता वहिनी आत आली आणि तु अस का वागतो आहेस तिच्याशी? तीने काही केल नाही. आई आणि काकू ही तिला त्रास देतात. मला हे अजिबात आवडलं नाही."

"अदिती तू यात पडू नकोस. मी बरोबर करतो आहे. तू बाहेर जा. " आदर्श तिला बोलला.

" दादा तू चुकतो आहेस. वहिनीच बाळ लहान आहे. या काळात वहिनीला तुझी जास्त गरज आहे तू तिला स्वतः पासून दूर करतो आहेस. " ती बाहेर निघून गेली.

श्रेयस झोपत होता. श्रद्धाने त्याला बळजबरीने बाजूला केलं. तो परत रडायला लागला.

आदर्श बघत होता." श्रद्धा नको अस करु. त्याला घे. दूध पिऊ दे. "

" नको थांबेल तो. तुमच्या लोकांचे जेवण व्हायला हवे. " ती बाहेर गेली. आदर्शला कसतरी वाटल.

"सुलभा याला घे."

"मॅडम त्याच पोट भरल नाही. चिडचिड करतो तो." ती श्रेयसला घेवून फिरत होती.

"दहा मिनिट थांब. ताट करते." ती पटकन कामाला लागली.

सगळ गेल माझ्या हातातून .काही नाही माझ इथे. मला अजिबात आवडत नाही इथे. आदर्श का अस करता आहेत? मला अजिबात त्यांच्याशी बोलू वाटत नाही. आधी सारख प्रेम आपुलकी नाही आमच्यात. मी दिसली की ते नुसते बोलतात.

तिने आदर्शला जेवायला दिल.

" वहिनी तू जेव ना. " अदिती बोलली.

"हो नंतर बसते."

"तुझ जेवण झाल नाही अजून श्रद्धा? "आदर्श बर्‍याच दिवसांनी तिच्याशी नीट बोलला. तिने उत्तर दिल नाही. तिने श्रेयसला घेतल. रूम मधे आली. त्याला झोपवल. बाहेर येवून पटकन किचन मधे उभ राहून जेवण करून घेतल.

ती रूम मधे गेली. ती पण डोळे मिटून पडली.

आदर्श बघत होता. हिचे हाल होत आहेत. बहुतेक घरचे अजिबात सपोर्ट करत नाही. काय कराव. दिल्लीला जावून आलो की ठरवु. ती म्हणते तस दुसरीकडे रहाव लागल तरी चालेल. या पुढे तिला काही बोलायच नाही. आज माझ्या मुळे तिने श्रेयुला दूध पिता पिता बाजूला केल. त्याला जास्त गरज आहे आईची. मी माझ्या हाताने घेवू शकतो जेवण.

जरा वेळाने आदर्श आत आला. तो श्रद्धा, श्रेयस कडे बघत होता. श्रद्धा... तो हाक मारत होता. ती जागी होती तरी मुद्दाम उठली नाही. तिला खूप भीती वाटत होती. नको बोलायला यांच्याशी. काय असेल उगीच मला दोन शब्द ऐकवतील. नको वाटत. मी इथून निघून जाईल. नाहीतर वेड लागेल मला.

कॉटवर जागा नव्हती. श्रेयस आता हल्ली तिच्या बाजूला झोपत होता. तो दुसर्‍या रूम मधे झोपायला निघून गेला. ती नंतर खूप रडत होती. खूप उशिरा ती झोपली. सकाळी लवकर जाग आली नाही.

आदर्श बॅग घेऊन दिल्लीला निघून गेला त्याने तिला मेसेज केला. "थोड काम आहे दिल्लीला जातो आहे. काळजी घे. उठली की मला फोन कर मला महत्वाच बोलायच आहे तुझ्याशी."

तिने उत्तर दिलं नाही. काही बोलू नका माझ्याशी. माझी अजिबात इच्छा नाही. नको वाटत आता. दिवस भर ती रूम मधे होती. कस करू या ती विचार करत होती. मीना कडे जावू का? तिथून बघू काय करायच ते.

काकु मोहिनी ताई पुढे बसलेल्या होत्या. "वहिनी आदर्श येणार नाही एक आठवडा. बाकीचे पण बिझी आहेत. आकाश, अदिती आज पार्टीला जाणार आहेत. सुलभा आलेली नाही. आज योग्य वेळ आहे श्रद्धाला काढा घरा बाहेर."

"हो बरोबर बोलते आहेस तू. पण सांगायचं काय बाकीच्यांना?"

"हेच कि तीच पळून गेली. एक तर ती कशी आहे आता सगळ्यांना माहिती आहे. त्यावरून सांगायचं. "काकूंनी आयडिया दिली.

" हो आणि आदर्श आपल ऐकतो तो तीच नाव घेणार नाही आपोआप मुक्त होऊ आपण हिच्या पासून. " मोहिनी ताई खुश होत्या.

या दोघं पुरुषांना झोपू दे जरा. आपण अकरा वाजता भेटू.


0

🎭 Series Post

View all