Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 43

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 43


आदर्श पटकन फ्लाईटने निघाला. पूर्ण वेळ तो विचारात होता. माझी चुकी झाली. मी निघण्या आधी श्रद्धाशी बोलायला हव होत. काय विचार केला असेल तिने? एवढा राग येतो का तिला? तिच घरच्यांसोबत नीट व्हाव म्हणून मी हे करत होतो. तिला राग आला होता तर बोलली असती मला. अस माझ्या शिवाय रहायचा विचार येवू कसा शकतो तिच्या मनात. तीच प्रेम नाही का माझ्यावर? काय झाल असेल नक्की? आम्ही आधी वेगळ रहायचो तर किती सुखी होतो. श्रद्धा सापडायला हवी.

तो चार-पाच तासातच घरी आला. रस्त्याने तो फोन वर सूचना करत होता. संग्राम, तेजाने पूर्ण टीम कामाला लावली होती . श्रद्धा, श्रेयस दोघांचे फोटो सगळीकडे पाठवले होते. हॉलमध्ये सगळे बसलेले होते. पोलीस आलेले होते.

"कुठे गेली श्रद्धा? श्रेयस कुठे आहे?" आदर्श आत आला.

"माहिती नाही." मोहिनी ताई बोलल्या.

"सीसीटीव्ही कॅमेरा मधे बरोबर रात्रीचे दोन तीन तास रेकॉर्डिंग बंद होतं साहेब ." पोलिस बोलले.

"कोणी केला आहे हा प्रकार? अदिती आकाश तुम्ही कुठे होता?"

"आम्ही पार्टीला गेलो होतो. उशिरा आलो. " अदिती बोलली.

"घरी कोण होत? आई बाबा श्रद्धा कुठे आहे?" आदर्श विचारत होता.

"आम्हाला काही माहिती नाही. आम्ही सकाळी उठलो तर ती गायब होती. निघून गेली असेल ती. हे अस वागते. काळजी आहे की नाही तिला काही. आणि सोबत एवढ लहान बाळ. काय करेल काय माहिती? " मोहिनी ताई चिडल्या होत्या.

" आता काय करायच साहेब? तुमचा घरात कोणावर संशय? " पोलिस विचारत होते.

" नाही कोणावर नाही. "

" कंप्लेंट रजीस्टर करायची का? "

नाही.

" ठीक आहे आम्ही येतो मग काही वाटल तर फोन करा. "

कोणावर संशय घेणार? उगीच जगभर होईल. कोणी केल असेल हे सीसीटीव्ही वगैरे. कोणाला हॅन्डल करता येत असेल. काय आहे हे? सगळे घरचे आहेत . की श्रद्धा स्वतः निघून गेली? श्रेयु आहे तिच्याकडे काय होईल?

आदर्शला आता एकदम भीती वाटत होती. तो देवाला हात जोडुन उभा होता. श्रद्धा कुठे आहेस तू. एकदा फोन कर. मी काहीच म्हणणार नाही तुला. गडबड झाली. एकतर गेल्या महिन्या भरापासुन माझ श्रद्धाच भांडण होत होतं. काय विचार केला असेल तिने. तो खूप काळजीत होता. तो रूम मधे आला. श्रद्धाचे कपडे दागिने जसेच्या तसे होते तिच्या कडे पैसे नाहीत. काय केल असेल? कुठे असेल ही?

तो घरातून निघाला. त्याने मीनाला फोन लावला." श्रद्धा कुठे आहे? "

मीना शांत पणे बोलत होती." ती तुमच्या घरी असेल? मला माहिती नाही सर . मी ऑफिसमध्ये आलेली आहे. "

" मीना प्लीज सांग कुठे आहे श्रद्धा. हे बघ मी माफी मागतो तिची. ती म्हणेल ते करेन. सेपरेट राहिलं. तिला सांग. प्लीज मला मदत कर." आदर्श एकदम रीक्वेस्ट करत होता.

"सर मला ही खूप काळजी वाटते आहे. मला खरच माहीत नाही कुठे आहे श्रद्धा, श्रेयस. " तिने फोन ठेवला.

" संग्राम मीनाकडे लक्ष दे. तिला नक्की माहिती असेल श्रद्धा बद्दल. ती कुठे जाते ते बघा. श्रद्धा पूर्वी रहायची त्या बाजूच्या मावशी तिथे बघ. पीजीत चौकशी कर. विक्रांत कुठे आहे ते बघ. "

" त्याच्यावर संशय आहे का?"

"नाही. पण लक्ष दे. "

आदर्शने वॉचमनला विचारल. तो बोलला कोणी बाहेर गेल नाही मी इथे होतो. जो वॉचमन मोहिनी ताई, काकूं सोबत होता तो रात्री गावाला निघून गेला होता. त्या नंतर हा आला होता.

आदर्श ऑफिसमध्ये आला मीनाला आत मध्ये बोलवलं. "मीना बस झाल. खरं सांग श्रद्धा कुठे आहे? तुला माहिती नाही असं शक्य नाही. "

" मला खरंच माहिती नाही सर. मी नाहिये या मागे. जो असेल तो श्रद्धाचा डीसीजन आहे. ती कुठे आहे ते मला माहिती नाही. मला ही आत्ताच समजल." मीना बोलली.

आदर्श तिला बरेच प्रश्न विचारत होता. तिने काहीही माहिती दिली नाही.

"ठीक आहे मीना तु चांगल्या शब्दात सांगणार नाही तर. पोलीसच विचारतील आता तुला काय आहे ते. " आदर्श रागाने बोलला.

" काही हरकत नाही सर. मला पोलिसात द्यायचं तर द्या. मला खरंच काही माहिती नाही. " तिच्या डोळ्यात भीती नव्हती. एक लेडीज पोलीस तिथेच केबिनमध्ये तिला प्रश्न विचारत होती. मीना त्याचे उत्तर देत होती. काहीच माहिती मिळाली नाही.

पोलिसांनी आदर्शला बाहेर बोलवलं. "सर हिला खरंच माहिती नाही. तुम्ही म्हणाल तर फटके मारून बघू का? "

" नाही. अजिबात नाही ती खूप चांगली मुलगी आहे. फक्त तोंडी विचारा ते ही माझ्या समोर." आदर्श बोलला. तो केबिन मधे येवून बसला. जे झाल त्यात माझी चूक आहे बिचारी मीना तिची चौकशी करतो तिथे पर्यंत ठीक आहे. पण आता मला कोणाला त्रास द्यायचा नाही.

संग्रामने मीनाचा फोन घेऊन घेतला. तिचा फोन चेक करा फोन मध्ये पण काहीच नव्हतं.

एक आठवड्यापूर्वी श्रद्धाचा फोन येऊन गेला होता तेवढाच होतं. इतर वेळी श्रद्धा मीनाला दुसर्‍या नंबर वर फोन करत होती. घरचे लोक ही दुसर्‍या नंबर वर कॉल करत होते. तो फोन घरी असायचा. हा ऑफिसचा फोन ती कमी वापरत होती.

मीना अजिबात घाबरली नाही. ती आरामात बसलेली होती. जे विचारायचं ते विचारा. फोन घ्या काहीही करा.

थोड्यावेळाने आदर्शने तिला जायला सांगितले.

"सर मला ही श्रद्धाची काळजी वाटते आहे. काय झालं अस? श्रद्धा का घर सोडून गेली याची एकदा नीट घरी चौकशी करा. त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्‍नाच उत्तर मिळेल. " ती बोलली. तीच म्हणण होत की मला विचार यापेक्षा तुमच्या आई काकूला विचारा श्रद्धा कुठे आहे ते. ती बाहेर आली. आदर्श विचार करत होता .

"हिच्यावर लक्ष द्या. एक माणूस हिच्या पाळतीवर ठेवा. कुठे जाते ती लक्ष द्या. तिचा फोन टॅप करा. "

मीना तिच्या जागेवरून बसली. ती तिचा तिचा काम करत होती

ऑफिस सुटल मीनाला घरी जायला बंदी केली. ती आदर्शच्या केबिन मधे आली. "सर मला ऑफिस मधून का जावु देत नाही. मी काय केल आहे."

" बस इथे. श्रद्धा कुठे आहे सांग."

" मला नाही माहित. "

" तिच्या सोबत श्रेयू आहे ती कस सांभाळणार आहे त्याला." आदर्श काळजीत होता.

"ह्या गोष्टीचा तुम्ही ही विचार करायला हव होता. श्रद्धाला तुमच्या कडे त्रास होता. किती सांगायची ती. " मीना आता चिडली होती.

"हे बघ झाल ते झाल मी नीट वागेन आम्ही दुसरीकडे जावू रहायला फोन लाव तिला." आदर्श बोलला.

" सर मला नाही माहित काही."

" बस मग इथे तुला जाता येणार नाही."

साडे आठ झाले. मीना अजून आदर्शच्या केबिन मधे होती.

" ठीक आहे मीना तू काही बोलत नाही. इंस्पेक्टर हिला थोड्या वेळाने घेवून जा. पोलीस केस करा हिच्यावर. " आदर्शने मुद्दाम धमकी दिली

तिच्यावर काही परिणाम झाला नाही. तिचा फोन वाजत होता. स्वातीचा फोन होता. स्वाती, श्रद्धा तिची वाट बघत होत्या. मीना घाबरली काय करू तिने पटकन फोन कट केला. परत फोन आला. संग्रामने तिचा हातातून काढून घेतला. फोन स्पीकर वर टाकला.

" हॅलो मीना कुठे आहे? तु अजून इकडे आली नाहीस?"

" ऑफिस मधे आहे काम आहे थोड. "

स्वातीला समजल. नक्की गडबड आहे. "ठीक आहे जेवायला जाते आहे मी म्हणून फोन केला होता." तिने फोन ठेवला.

काही खर नाही मीना घाबरली.

" कोण आहे ही? " संग्रामने विचारल.

" स्वाती. आपल्या ऑफिस मधे आहे. पीजीत रहाते माझ्या सोबत." मीनाने बंडल मारली.

एवढे लोक आहेत या ऑफिस मधे या लोकांना कुठे माहिती असणार नक्की कोण ते. एम्प्लॉईज लिस्ट दाखवली तरी एक दोन स्वाती माहिती होत्या तिल्या.

"दहा वाजले. ठीक आहे आता तुम्ही मीनाला अॅरेस्ट करा. किती विचारल तरी ती बोलत नाही."

आदर्शने सांगितल्यावर पोलिस तिला घेवून काॅन्फरन्स रूम मधे गेले. मुद्दाम प्रेशर देत होते. मीना शांत बसलेली होती.

आदर्श, संग्राम सीसीटीव्ही तून बघत होते. "हिला काही माहिती नाही वाटत. सोड तिला."

हो.

मीना घरी निघाली. ती पीजीत आली. तिने श्रद्धाचा फोन नीट लपवला. ते लोक शोधायला येतील सांगता येत नाही. तिने दुसर्‍या फोन वरून स्वातीला फोन केला.

"काय झाल मीना? काही प्रॉब्लेम?" श्रद्धाने विचारल.

"आदर्श सर घरी आले. तुला खूप शोधता आहेत. श्रद्धा तुझी खूप काळजी करत आहेत. मला बोलले तू सांग श्रद्धाला तू म्हणशील ते करेन. सेपरेट राहीन माफी मागेन. तू जाते का त्यांच्या कडे परत?" मीना बोलली.

हे ऐकुन श्रद्धाला कसतरी वाटत होत. वाटल की जाव परत आदर्श कडे. ते म्हणता आहेत माझ ऐकतील. पण नको आधीचा अनुभव भयानक होत. नुसत एकट रडत रूम मधे बसा. घरचे भांडतात आदर्श ही अगदी मारायला करतात. तिच्या अंगावर काटा आला. त्या काकू, मॅडम मला तिथे राहू देणार नाही. श्रेयूला घेवून घेतील. नको ते लोक मला.

"नाही मीना मला अजिबात इच्छा नाही. थोडे दिवस तरी नको वाटत मला. परत तेच सुरू होईल. तुला माहिती नाही कशी राहिली मी तिकडे."

"एकदा विचार कर. बोलून तर बघ सरांबरोबर." मीना परत बोलली. ती बघत होती आदर्श सर त्रासात होते ते खूप प्रेम करतात श्रद्धा वर.

"नको परत तेच होईल. आदर्श सेपरेट राहिले तरी खुश नसतात. नुसत आई आई करतात. राहू दे त्यांना त्यांच्या आई जवळ. सेपरेट राहून सारख मला वाटेल माझ्या मुळे हे इथे आहेत. मला आता नको वाटत आहे. ते खूप बोलतात मला. त्यांना वाटत मी समजुतीने घेत नाही. त्यांच्या घरचे सपोर्ट करत नाही. नको आता. तुमचे तुमचे नीट रहा म्हणा. मला ही शांत राहू द्या. माझा निर्णय झाला आहे. मला नाही राहायच त्यांच्या सोबत. "

"एकट राहण सोप नाही श्रद्धा. त्यात तुझ्या सोबत बाळ आहे. मी पण अजून सहा महिने तुझ्या सोबत येवू शकत नाही." मीना समजावत होती.

"जमेल तितक काढेन मी. मला घरी वापस नाही जायच. प्लीज मीना."

"बर ठीक आहे स्वाती आहे तिकडे. हिला सांभाळून घे. उद्या निघताय ना तुम्ही?" मीना विचारत होती.

" हो आज रात्रीच."

" रेल्वे स्टेशनवर काळजी घे. आदर्श सर शोधत असतिल तुला. "

हो.

" एकदा श्रेयुला भेटायच होत. पण मला येता येणार नाही नाही तर तू सापडशील. "

" नको येवु तू. मला इथून जायच आहे. " श्रद्धा ठाम पणे बोलली.

" श्रद्धा हे तुझ्या साठी श्रेयु साठी कपडे. हा तुझ्या साठी फोन . " स्वातीने श्रद्धाला सामान दिल.

" याचे किती पैसे झाले? "

" तू जास्त विचार करू नकोस श्रद्धा. मीना मी केल हे. हे घे थोडी कॅश असू दे तुझ्याकडे ही. " तयारी करून श्रद्धा झोपली.

रात्री तीन वाजता टॅक्सीने स्वाती श्रेयस श्रद्धा निघाले. तिने चेहरा झाकलं होता. स्वाती कडे श्रेयस होता. तो झोपला होता. श्रद्धा दूर एकटी बॅग घेवून होती. ट्रेन लागली दोघी आत बसल्या श्रद्धा लांब बसली होती. नशीब कोणी आल नाही ट्रेन निघाली. ती स्वाती जवळ येवून बसली. श्रेयुला घेतल तिच्या डोळ्यात पाणी होत. तीच शहर दुर जात होत.

बरोबर करते ना मी? सॉरी आदर्श. तिने विचार करण बंद केल. श्रेयूला घेवून झोपून घेतल. अजूनही धोका होता. कोणत्याही क्षणी कोणीही तिला शोधू शकत.

प्रवास व्यवस्थित झाला. त्यांना वाटल नाही श्रद्धा एवढ्या लहान मुलाला घेवून बाहेर गावी जाईल. स्टेशन ही गावा बाहेरच निवडल होत.

स्वाती श्रद्धा व्यवस्थित दिल्लीला पोहचल्या . मेन स्टेशनच्या अलीकडे त्या उतरल्या. श्रद्धाला खूप बर वाटत होत.

स्वाती श्रेयूला छान सांभाळत होती. "खूप गोड आहे तुझ बाळ."

त्या दोघी स्वातीच्या घरी गेल्या. दुसर्‍या दिवशी त्या दोघी संस्थेत पोहोचल्या. त्यांना श्रद्धाची कहाणी सांगितली. आधार नाही. रहायला जागा नाही. तिला तिथे अ‍ॅडमिशन मिळाली. रहायला जागा मिळाली.

"इथे काम कराव लागेल. त्या बदल्यात तुला थोडा पगार ही मिळेल. "त्या मॅडम बोलल्या.

"हो तुम्ही म्हणाल ते."

छान जागा होती. शांत. स्वच्छता होती. श्रद्धाने फाॅर्म भरला. स्वाती आणि ती तिच्या दिलेल्या रूम मधे आल्या. "स्वाती खूप थँक्स."

"काही हरकत नाही मी येईल शनिवारी रविवार इकडे माझ्या श्रेयुला भेटायला. तो पर्यंत नीट रहायच श्रेयु. याला काही हव असेल तर सांग मी. येतांना घेवून येईल. मागे पुढे पाहू नको."

"स्वाती पैशाच काय?"

"नंतर घेईन मी तुझ्या कडून. श्रेयु मोठा झाला की त्याच्या कडून घेईन. काळजी करू नकोस. आता श्रेयु साठी हयगय करायची नाही. " स्वाती गेली.

श्रद्धा कामाला लागली. तिथे अकाउंटचं काम बघत होती. त्या कामा सोबत तिथल्या लहान मुलांनाही सांभाळत होती. थोडे फार पैसे मिळत होते. साध होत सगळ पण मनःशांती होती. रूम मध्ये तिच्या सोबत अजुन दोन लेडिज होत्या. दोघी खूप चांगल्या होत्या. त्या सांभाळून घ्यायच्या. श्रेयू सगळ्यांचा लाडका झाला होता.