Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 44

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस
माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 44


श्रद्धाला आदर्शची खूप आठवण येत होती. वाटायच चालल जाव त्याच्या कडे. त्याच्या साठी तिने सगळा त्रास सहन केला असता. पण आता हल्ली तोच तिच्या बाजूने नव्हता. म्हणून तिने असा निर्णय घेतला होता. ती फोन मध्ये त्याच्या फोटो बघत बसायची. खूप त्रास होत होता.

श्रेयु त्याच्या सारखा दिसायला होता . चेहर्‍यावर तेज एकदम रुबाबदार. सगळे बोलायचे तुझा श्रेयु खूप श्रीमंत असल्या सारखा दिसतो. वाटत नाही गरिबाचा मुलगा आहे.

ती मनाला आवर घालत होती. जातील हे दिवस. तिकडे नको जायला. ते एकटे नाहीत. तिकडे जायच म्हणजे ती फॅमिली आहे. नको मी इथे ठीक आहे. आदर्श चिडतील. मला पोलिसात दिल तर? श्रेयुला घेवून घेतील.

आता जवळजवळ महिना होत आला होता. श्रद्धा सापडत नव्हती. शोध कमी झाला होता. अशी एकदम कशी गायब झाली ही? काही समजत नव्हत. मीनाच्या मागे लोक होते त्यांना ही काही सापडल नाही. आदर्श तर वेड्यासारखं करत होता. सगळ्यांवर खूप चिडत होता. स्वतःला कोसत होता. ऑफिस कडे लक्ष नव्हत. संग्राम सगळ सांभाळत होता.

मी का लक्ष दिल नाही तिच्याकडे? ती बोलत होती की तिला त्रास आहे इकडे. मला का समजलं नाही. मला देवाने शिक्षा दिली. श्रद्धा फक्त एकदा फोन कर. मला तू हवी आहेस. तुला माझी दया येत नाही का. तो त्याच्या विचारात बसुन असायचा.

आकाश अदिती त्याला आधार देत होते.

आधी अदिती त्याला खूप बोलली होती. "तुझं चुकलं दादा तू वहिनीला समजून घेतलं नाही. तु आई बाबा आणि बायको मध्ये आई-बाबांना निवडल. वहिनीचा त्रास समजून घेतला नाही. तिला सगळ्यां समोर अपमानित केल. ठीक आहे आता ती चालली गेली. मी तुला मागेच म्हणत होती की वहिनीचं काकू आणि आईशी पटत नाही काहीतरी झालं असेल त्यांच. आपण कोणीच घरी नव्हतो."

"आता काय झाल, काय नाही करण्यात काही अर्थ नाही त्याने श्रद्धा परत मिळणार नाही." आदर्शने आई काकूला विचारलं नाही. जाऊ दे काय करणार आहे आता माहिती करून घेऊन. त्याने परत पोलीस स्टेशनला फोन केला.

" मॅडम बद्दल काही समजलं नाही साहेब. "

तो त्याच्या रूममध्ये रात्र रात्रभर बसून असायचं. श्रद्धा, श्रेयसचे फोटो बघत. एकटा बडबड करत. ड्रिंक्स सुरू केले होते. संग्राम, तेजा समजावत होते. तो ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. रोज रात्री तोच कार्यक्रम होता. ऑफिस झाल की बार मधे बसायच. झोपण्या पुरत घरी यायच. आज संग्रामने सगळं बाबांना सांगितल. ते त्याची रूम मधे वाट बघत होते. आदर्श आला. त्याला नीट उभ राहता येत नव्हत. एका बाजूने तेजाने धरल होत. तो बाबांना बघून दचकला.

"काय सुरू आहे हे आदर्श? तेजा कधी पासून सुरू आहे हे? तू मला का सांगितल नाही. आदर्श किती हाल करून घेतले आहेत. मूर्ख पणा आहे हा. मला हे अजिबात चालणार नाही. नीट काम करायच. व्यवस्थित घरी यायच. समजल ना? अस वागायच असेल तर घराबाहेर जायचं नाही. मी परत काम सुरू करतो. तुला त्रास होतो आहे ते समजत आहे मला पण अस ड्रिंक्स घेवून काय होईल. अजिबात शुद्धीत नाही हा तेजा. " ते जोरात बोलले. त्याला खूप ऐकवलं.

आदर्श घाबरला होता. गप्प उभा होता. ते रूम बाहेर निघून गेले. तेजा त्याला सोडून वापस गेला.

दुसर्‍या दिवशी नाश्त्याला आदर्श येवून बसला. प्रभाकर राव, मोहिनी ताई समोर होते." आई, बाबा सॉरी या मी अस वागणार नाही. भान ठेवेल. माझ्या कडून या पुढे असा त्रास होणार नाही. तुम्ही राग सोडा."

"आम्हाला तुझा त्रास वाटत नाही. काळजी वाटते समजून घे. नीट रहा. अस आयुष्य वाया घालवू नकोस. आपला कारभार किती मोठा आहे. छान काम कर. वेळ वाया घालवू नकोस. तुला हव तर चांगला डिटेक्टिव्ह घे. श्रद्धाला नीट शोध " ते समजावत होते.

" ठीक आहे बाबा. माझ चुकलं या पुढे अस होणार नाही. "

" तब्येत सांभाळ. "

आता आदर्श ड्रिंक्स घेतले की घरी येत नव्हता. प्रमाण ही खूप कमी झाल होत. संग्राम तेजा त्याला ओरडत होते.

घरात श्रद्धा, श्रेयु बद्दल कोणी बोलत नव्हत. आदर्शला त्रास नको व्हायला.
.....

मीनाने एका महिन्याने नोकरी सोडली. ती गावाला जायला निघाली. तिच्या मागे आदर्शचे लोक होते. ती तिच्या गावाला गेली. त्यांनी आदर्शला रीपोर्ट केला. ती तिथे आठ दिवस झाले आरामात रहात होती. लक्ष देणारे लोक कंटाळले. ते वापस आले.

पाठलाग होत नाही बघून मीना हळूच दिल्लीला आली. ती तीन दिवस दुसरीकडे होती. कोणी मागे नाही याची खात्री करून ती श्रद्धाला भेटली. दोघी एकमेकींना भेटून खूप खुश होत्या. "श्रद्धा ठीक आहे ना इथे?"

"हो चांगले आहेत लोक. काही प्रॉब्लेम नाही."

श्रेयस एक दोन महिन्यात छान गुटगुटीत झाला होता. "किती गोड दिसतो ग हा. राजकुमार जसा. सरां सारखा आहे."

मीना त्याचे लाड करत होती. श्रद्धाला बर वाटल मीना आली तर. तिकडे सगळे ठीक आहे ना? ती खूप चौकशी करत होती आदर्श बद्दल.

"तू जाते का वापस श्रद्धा. सर खूप त्रासात आहेत." मीना बोलली.

श्रद्धाच्या डोळ्यात पाणी होत. "नाही. मला ही त्यांची आठवण येते पण मी इथे ठीक आहे."

थोड्या वेळाने मीना गेली. ती दुसरीकडे रहायला होती. तिला चांगला जॉब मिळाला. ती मधे मधे श्रद्धाला भेटायला येत होती.

श्रेयसला ताप येत होता. श्रद्धाने मीनाला फोन केला. त्या दोघी डॉक्टर कडे गेल्या. त्याला अ‍ॅडमिट केल.

"मीना एक काम कर या बांगड्या देवून पैसे घेवुन ये ना." श्रद्धा काळजीत होती पैसे कुठून आणायचे.

"बांगड्या मोडायची गरज नाही. मी आहे ना श्रद्धा. शांत हो श्रेयु कडे बघ."

"किती बिल होईल साधारण पणे? "

"जे होईल ते होईल. बरेच वर्ष नोकरी केली मी. माझा श्रेयु मला जड नाही. "

"नाही या बांगड्या मोड."

"नाही श्रद्धा लागल तर घेईल मी." मीना बांगड्या मोडायला गेली नाही.

श्रेयस तीन दिवस अ‍ॅडमिट होता. नंतर घरी सोडल. सगळ बिल मीनाने भरल. श्रद्धा विचार करत होती मला ही चांगल्या पगाराचा जॉब हवा. आता मीना नसती तर कस केल असत.

श्रेयसचा फर्स्ट बर्थडे होता. अगदी साध्या पद्धतीने पूजा करून तो साजरा केला. मीनाने त्याच्या साठी खूप खेळणी कपडे आणले होते. श्रद्धा खूप गप्प होती.

"काय झालं ग?"

"आज आदर्शची खूप आठवण येते आहे."

इकडे आदर्श खूप दुखी होता. तो डिप्रेशन मधे गेल होता. त्याच्या वर ट्रीटमेंट सुरू होती. डॉक्टरांनी ड्रिंक्स घ्यायला मनाई केली होती. जेवण कमी झाल होत. सगळे लक्ष देवून होते.

आज त्याच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हत. श्रद्धा इतकी मोठी शिक्षा देता का एखाद्याला. कुठे आहे तू? तुला माझी आठवण येत नाही का? त्याने पूर्ण देशात तिच्या साठी न्यूज पेपर मधे अॅडवटाईज दिली.
"श्रद्धा कुठे आहे तू? झाल गेल विसरून जा. मला माफ कर. मला फोन कर."

पण काही उपयोग झाला नाही.

आदर्श घरी आला.

"वहिनी बोला ना त्याच्याशी." काकू बोलल्या.

" आदर्श इकडे ये काय सुरू आहे तुझ? तू आठवडा झाला घरी आला नाही. आमच्याशी बोलत नाही. हे अस चालणार नाही. हे बघ आता जे झाल ते झाल आपण पुढे जायला हव. आमच्यात येवून बसत जा. घरी जेवायला थांबत जा." मोहिनी ताई बोलल्या.

"माझ कोणी नाही इथे. झाल ना तुमच्या मनाप्रमाणे. श्रद्धा आवडत नव्हती ना तुम्हाला. गेली ती. तुम्ही आनंदी रहा. मला या पुढे हे कर ते कर अस सांगायच नाही. "तो आत आला. दार लावून घेतल.

मोहिनी ताई रडत होत्या. काकू त्यांना समजावत होत्या.
" इतक करून काय उपयोग झाला आशा? आदर्श कसा फाडफाड बोलला. "

प्रभाकर राव आले.

" काय झाल? "

" आदर्श माझ्याशी नीट बोलत नाही."

" त्याची अवस्था काय आहे. समजून घ्या. त्याला थोडा वेळ द्या. काही बोलू नका तुम्ही दोघी त्याच्याशी. होईल हळू हळू ठीक."
......

मीना श्रद्धाला भेटायला आली होती. "मीना मला नोकरी करायची आहे अस किती दिवस मी तुझ्यावर अवलंबून राहू."

"श्रेयूच काय?"

"तो राहील पाळणाघरात."

"त्याला कोणी त्रास दिला तर?" मीना नको म्हणत होती.

"काही होत नाही अस. चांगले लोक असतात. थोड्या वेळ ठेवू. आज काल तिथे कॅमेरा असतो. आणि पाळणाघर वाल्यांना कामाची गरज आहे. ते का अस करतील. "

श्रद्धाने अर्धा वेळ नोकरी धरली. इथून यायला जायला लांब पडत होत. ती मीना कडे रहायला आली. पाहिले सहा महिने ती बारा ते तीन कामाला जायची. तिला थोडे पैसे मिळत होते. त्या वेळेत श्रेयस बराच वेळ झोपलेला असायचा. काही त्रास दिला नाही त्याने. पाळणाघरातल्या ताई शांत छान होत्या. श्रेयुला आता तिथे सवय झाली होती.

आता तो दीड वर्षाचा झाला. तिने फूल टाइम जॉब बघितला. श्रद्धा खूप हुशार होती. तिला चांगली नोकरी मिळाली. पगार बर्‍या पैकी होती. स्वाती नेहमी भेटायला येत होती. मीना, स्वाती, श्रद्धा, श्रेयु छान रहात होते. श्रद्धा पेक्षा मीना स्वाती श्रेयुचे लाड करत होत्या. मावशी आली की तो खूप खुश असायचा. मुळातच गुबगुबीत तो एकदम गोड बोलायला लागला होता. स्वाती मीना सारखे त्याचे व्हिडिओ घेत होत्या. "कुठे शेअर करू नका ग."

हो.

श्रेयुच्या दुसर्‍या बर्थडेला मीना, स्वातीने त्याला छोटी सायकल घेतली. श्रेयू नुसता मावशी मावशी करायचा. त्याला माहिती होत जे हव ते मीना मावशी देते.

आता श्रेयस अडीच वर्षाचा होता. त्यांच छान सुरु होत. इथून लांब पडत म्हणून श्रद्धा त्या बिल्डिंग मधे शिफ्ट झाली. तिथे जवळ श्रेयु शाळेत जायला लागला. शाळा सुटल्यावर रिक्षा त्याला पाळणाघरात सोडत होती. नीट सुरू होत त्यांच. बिल्डिंग मधल घर छान होत.

श्रद्धा, श्रेयु संध्याकाळी दमून घरी आले थोड्या वेळाने बिल्डिंगला आग लागली. श्रद्धा खूप घाबरली होती. तिने श्रेयुला घेतल तो पर्यंत बचाव कार्य सुरू झाल होत. ते लोक तिला घ्यायला आले होते. ती पटकन खाली आली. खाली खूप मीडिया वाले होते.

आदर्श नुकताच घरी आला होता. जेवण करून तो टीव्ही बघत होता. त्याने श्रद्धाला टीव्हीत बघितल. तिला घ्यायला तो दिल्लीला आला. श्रद्धा सहज त्याला सापडली. तो तिला मुंबईला घेवून जाणार होता. श्रद्धा नाही म्हणत होती.

आता पुढे....

हॉटेलच्या रूम मधे श्रेयस, आदर्श एका कॉटवर झोपले होते. आधी श्रद्धा सोफ्यावर झोपली होती. ती नंतर या दोघांजवळ येवून झोपली.

आदर्श सकाळी उठला. सहा वाजले असतिल. श्रेयस छान आरामात झोपला होता. श्रद्धा सोफ्यावरून उठुन कॉटवर त्या दोघ जवळ झोपली होती हे बघून आदर्श खुश होता. तो त्या दोघांकडे बघत होता. आज खूप छान वाटत आहे. या दोघां शिवाय मी जगु शकत नाही.

श्रद्धा अगदी छान दिसत होती. निरागस अगदी. तिच्या चेहर्‍यावर केस आले होते. ओढणी बाजूला पडली होती ती श्रेयुला जवळ घेवून झोपली होती.

आदर्श तिच्या कडे बघत होता. ही आधी पेक्षा खूप बारीक झाली. आता मी हिच्याकडे छान लक्ष देईल. हिला कधी कुठे जावू देणार नाही.

श्रेयस आधी सारखं बिनधास्त झोपला होता. तो हळूच उठला. त्या दोघांच्या अंगावर ब्लँकेट टाकल. फ्रेश होऊन आला. चहा सांगितला. श्रद्धा उठली तिने श्रेयुला ब्लँकेट दिल.

" गुड मॉर्निंग." तो बोलला.

"गुड मॉर्निंग." ती त्याच्या कडे बघत होती. त्याला वाटल अस तिला छान जवळ घ्याव. त्याच्या बघण्याने ती गडबडली. मी आलेच.

ती बाथरूम मधे गेली. तिथे ती बर्‍याच वेळ उभी होती. तिने केस ठीक केले. तोंड धुतलं. मी नीट तर दिसते ना. ती आरश्यात बघत होती. आदर्शचा विचार करून ती लाजली होती. यांनी मला जवळ घेतल तर काय करू? बाहेर जाव लागेल.

ती त्याच्या जवळ सोफ्यावर येवून बसली. आदर्शने तिला चहा दिला. ती छान हसली.


0

🎭 Series Post

View all