Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 45

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 45


चहा आलेला होता. श्रद्धा आदर्श जवळ जावून बसली. त्याने तिला चहा दिला. दोघ अगदी वेगळेच शांत होते. जसे काही अनोळखी. तो तिच्या कडे बघत होता. त्याच्या नजरेत खूप प्रेम होत. तिने गडबडून खाली बघितल. थोडी ओढणी नीट केली. त्याला समजल ही कंफर्टेबल नाही. तो आता पेपर वाचत होता. चहा घेवून झाला. ती बघत होती श्रेयस केव्हा उठेल. तो उठलेला असता तर बर वाटल असत. अस यांच्या सोबत कसतरी वाटत आहे.

"तू जॉब करतेस का?" त्याने विचारल.

हो. तिने कंपनीच नाव सांगितल.

"चांगली आहे कंपनी. मुंबईत ही त्यांची एक ब्रांच आहे."

"हो तिकडे बदली करून घेईन."

ती मुंबईत यायला तयार आहे हे ऐकुन तो खूप खुश होता. काल पर्यंत नाही म्हणत होती. आमच लवकरच सगळं ठीक होईल. त्याला बर वाटल. "तुमच्या कंपनीचा ओनर माझा मित्र आहे."

" बदली कस करणार? मी ऑफिसला जावून येवु का?" श्रद्धा विचारत होती.

" नाही तुला इथून कुठे जाता येणार नाही. मी करेन फोन. लगेच काम होईल." आदर्श बोलला.

"ठीक आहे."

"आपण निघायच का थोड्या वेळाने? "आदर्शने विचारल.

" नाही. आधी तुम्ही मला लिहुन द्या की आपण तुमच्या घरी रहायला जाणार नाही. तुम्ही मला त्या लोकांकडे यायची त्यांच्याशी बोलायची बळजबरी करणार नाही. अस झाल तर मी श्रेयुला घेवून सेपरेट राहीन. मला माहिती आहे ते तुमच्या घरचे आहेत. मी ही त्यांचा रीस्पेक्ट करते. पण तरी ही त्यांच्या पासून लांब राहण चांगल आहे माझ्यासाठी. तुम्हाला आता माझ्या बोलण्याचा राग येईल. पण काही इलाज नाही. मला आयुष्यात थोडी शांती हवी आहे. परत तेच नको व्हायला." श्रद्धाने स्पष्ट सांगितल.

" तु टेंशन घेऊ नकोस. आपण सेपरेट राहू. मी लिहून देतो. तू तुझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळी आहेस. मी जावू शकतो ना माझ्या घरी?" आदर्शने विचारल.

" हो मला काही प्रॉब्लेम नाही. "

" मी एक विचारू का? काय झाल होत त्या दिवशी? " आदर्शने विचारल. श्रद्धा गप्प होती म्हणजे यांना अजूनही माहिती नाही नक्की काय झालं होत ते. सासुबाई, काकू डेंजर आहेत करून सवरून आरामात राहतात. इथे आम्हाला दोघांना किती त्रास होतो आहे.

" तुम्ही माझ्या वर रागवून दिल्लीला गेले होते का?" श्रद्धा हळूच बोलली.

"नाही. माझी फाॅरेनच्या लोकांसोबत खूप महत्वाची मीटिंग होती. मी तुला बोललो होतो मला फोन कर मला बोलायच होत तुझ्याशी. तू फोन केला नाहीस." आदर्श बोलला.

"तुम्ही त्या दिवशी घरच्यांशी बोललात. माझ्याशी नाही." ती नाराज होत बोलली.

"नाही मी घरी फोन केला नाही मी खूप बिझी होतो. काय झालं होत? सांग ना म्हणजे भविष्यात आपण काळजी घेवू. एकमेकांशी अजिबात भांडायच नाही. प्रॉमीस कर तू माझ्याशी मोकळ बोलशील. "

या गोष्टीला जरी दोन अडीच वर्ष होवुन गेले होते तरी ते दोघ तो प्रसंग विसरले नव्हते. दोघांना खूप त्रास झाला होता. त्या नंतर ते वेगळे झाले होते त्यामुळे त्या दिवशी काय झालं ते मनात साठलेल होत.

श्रद्धा शांत होती." मी काही बोलली तर तुम्हाला राग येणार नाही ना?"

नाही.

श्रद्धा सांगत होती काय काय झाल ते. कस तिला आणि श्रेयुला घराबाहेर काढल. तुमच नाव सांगितल. श्रेयुला घेवून घेतल.

"ओह माय गॉड. किती गैरसमज पसरवला या दोघींनी. मी अस कधी सांगितल नव्हत. सॉरी श्रध्दा तुला या प्रकरणात खूप त्रास झाला."

"तुमचा फोन बंद होता. त्या श्रेयुला देत नव्हत्या. मी त्याच्या शिवाय राहू शकत नाही. माझ्याकडे काही इलाज नव्हता. तुम्ही जायला सांगितल होत. अस त्या म्हटल्या. मला भीती वाटत होती मी परत आली तर तुम्ही श्रेयुला माझ्या पासून दूर कराल. मला घराबाहेर काढाल म्हणून मी लांब राहिली. " श्रद्धा बोलली.

"मी अस काही सांगितल नव्हत. मी अस का करेन? माझ खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. जावू दे या पुढे अस करायच नाही. तू आणि मी आणि श्रेयु बाकी कोणी नको. मला कोणाला काही बोलायच नाही. काही नको. शांत आयुष्य हव तुझ्या सोबत. "

श्रद्धा रडत होती. आदर्शलाही भरून आल होत. त्याने तिला जवळ घेतल." खूप त्रास झाला आपल्या दोघांना. या पुढे काहीही झाल तरी आधी एकमेकांना सांगायच. प्रॉमीस. मनात कुठलीही गोष्ट ठेवायची नाही. "

" हो प्रॉमीस. "

दोघ शांत बसुन होते.

आदर्श बाहेर गेला. तो फोन वर बोलत होता. त्याने पेपर तयार करायला सांगितला. तो आत आला. " अकरा वाजता पेपर रेडी होतील. मग आपण निघू. "

चालेल.

श्रेयस उठला. त्याला समजत नव्हत की आपण कुठे आहोत." मम्मी स्कूल आहे का आज? "

"नाही. सुट्टी आहे बेटा."

आदर्श त्याच्या जवळ आला. "आता न्यू स्कूल. न्यू घरी. डॅडी कडे येणार ना?"

हो.

" काय खायचं तुला? चला पटकन ब्रश करा. नाश्ता करा. "

" आमचा ब्रश इथे नाहिये. "त्याला आठवल काल रात्री मम्मीने अस सांगितल होत.

"आणला आहे. पटकन ब्रश कर आंघोळ कर चल. " आदर्शने त्याला उचलून घेतल.

"मी मम्मीच्या हातून करेन." त्याला डॅडी सोबत लाज वाटत होती.

श्रद्धाने त्याला आंघोळ घातली. श्रेयु मस्ती करत होता. पाणी पाणी खेळत होता." नाही श्रेयु मी ओरडेन शांत हो." टॉवेल राहिला. श्रेयू तिला सोडत नव्हता. "अहो टॉवेल द्या." तिने छान हाक मारली.

तो थोड हसला. पटकन टॉवेल घेवून आला.

" श्रेयु तुझ्यामुळे मी ओली झाली. मला ही आंघोळ करू दे. तु तो पर्यंत डॅडी जवळ थांब. "

तो हो बोलला.

ती आदर्श कडे बघत होती. "ह्याला घ्या."

आदर्शने श्रेयुला उचलून घेतल. तो श्रद्धाच्या खूप जवळ होता. ती आत जायला वळाली. तिचे केस एकदम त्याच्या चेहर्‍यावर आले. केसांचा एकदम छान वास आला. ओढणी हाताला लागली. त्याला एकदम कसकस झाल.

कस होईल माझ? हिला बघून अजिबात कंट्रोल होत नाही. पण ही प्रॅक्टीकल वागते आहे. माझ्या जवळ येत नाही. हिचा विश्वास नाही माझ्यावर. बोलून बघू का की माझ्या जवळ ये. श्रेयु होणार होता त्या आधी आम्ही सोबत वेळ घालवला होता. तीन वर्षाच्या वरती झाले. हिला नसेल वाटत का माझ्या जवळ यावास? माझी कधीच आठवण आली नसेल का? नको लगेच बोलायला. तिने सोबत यायला नकार दिला तर? हळू हळू होईल ठीक. इतके वर्ष थांबलो अजून थोडा वेळ. पण श्रद्धा खूप सुंदर दिसते आहे.

श्रद्धा आंघोळ करून आली. केस धुतलेले होते. खूप फ्रेश दिसत होती. तिने तोच ड्रेस घातला होता. श्रेयु आदर्श जवळ टॉवेल गुंडाळून बसला होता. तो त्याला हात लावू देत नव्हता. त्याच मम्मी पाहिजे अस सुरू होत.

"चल श्रेयु तयार हो."

या दोघांना कपडे नाही . आदर्श विचार करत होता. मुंबईला गेलो की आधी शॉपिंगला जावू. श्रेयु तोच ड्रेस घालायला नाही म्हणत होता.

"आमचे कपडे घरी राहिले. माझ सामान कधी मिळेल?" ती समोरच्या बिल्डिंग कडे बघत होती.

" मी सांगतो तिकडे. ते सगळं सामान मुंबईला आणून देतील." आदर्श बोलला. श्रद्धाला बर वाटल आता खात्री होती सामान मिळेल याची. आदर्श तसा डॅशिंग होता. त्याच्या एका शब्दावर मोठे मोठे काम सहज होत होते. तिला दोन मिनिट त्याचा अभिमान वाटला.

ती तिचे केस पुसत होती. आदर्श तिच्या कडे बघत होता. श्रेयु त्याच्या त्याच्या खेळत होता. "श्रद्धा तुझे केस खुप छान आहेत. धुतले का?"

"हो श्रेयुने पाणी उडवलं ना." ती सहज बोलली.

"आपला श्रेयु छान आहे."

"हो ना खूप त्रास देतो. मस्ती किती करतो." तिच्या बोलण्यात कौतुक होत.

ती तीच आवरत होती. "श्रद्धा मला खूप बर वाटत आहे तुम्ही दोघ इथे आहात तर."

मला ही आता तुमच्या सोबत छान वाटत आहे. पण ती काही बोलली नाही.

आदर्श तिच्या जवळ आला. "श्रद्धा आपण फिरायला जायच का छान?"

" बघु. " तिच्या पोटात गोळा आला. फिरायला जायच म्हणजे यांच्या सोबत रहाव लागेल.

"बघु नाही. मला तुझ्या सोबत आणि श्रेयु सोबत वेळ घालवायचा आहे." त्याला कंट्रोल झाल नाही. त्याने तिला मागून हळूच मिठी मारली. श्रद्धा दचकली. ती श्रेयु कडे बघत होती. तो खेळत होता.

" तुला माहिती नाही मी कस राहिलो तुझ्या शिवाय श्रद्धा. एक प्रकारे शिक्षा होती ती. माझ्या पासून कधीच दूर जावु नकोस. आय लव यु. " त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले.

ती घाबरली. तिने कसतरी स्वतःला सोडवल. ती एकदम बाजूला सरकली. एवढ्या दिवसांनी अचानक त्याचा स्पर्श झाला. खर तर तिला तो हवाहवासा वाटत होता. भीतीही वाटत होती. धडधड होत होती. ती पटकन श्रेयस जवळ जावून बसली. आदर्श तिथे तिच्या मागे आला. तिच्या अगदी जवळ बसला. ती श्रेयुशी बोलत होती.

"काय झालं श्रद्धा? माझ्या जवळ ये ना."

"काही नाही." ती हळूच बोलली.

"मग अशी घाबरते काय? श्रेयु समोर काय करणार आहे मी? नुसत मिठीत घेतो ना." त्याने तिचे केस कानामागे केले. गालाला हात लावला. श्रद्धा तिथून उठली खिडकी जवळ जावून उभी राहिली. तिला धडधड होत होती. आदर्श का करता आहेत अस . मला भीती वाटते आहे. इथे अस तर मुंबईला गेल्यावर काय होईल?

आदर्श परत उठत होता. श्रेयु त्याच्या जवळ येवून बसला. तो त्याच्याशी बोलत होता. श्रद्धाला बर वाटल. ती बॅग आवरत होती. फोन चार्जिंगला लावला.

श्रेयस त्याला काहीतरी सांगत होता घरच

"मम्मी रोज तुझी काळजी घेते श्रेयु? "

तो हो बोलला.

"मम्मी छान आहे ना श्रेयु." आदर्श हळूच त्याला बोलला. दोघ हसत होते. "ती माझी आहे." आदर्शने अस म्हटल्यावर श्रेयु चिडला.

"नाही माझी आहे." श्रेयु जोरात बोलला. मीना पण त्याला चिडवायची तुझी मम्मी माझी आहे तेव्हा ही तो चिडायचा. त्याला सहन झाल नाही. माझ्या मम्मीला हे का असे बोलतात.

"काय झालं बेटा? का चिडतो आहेस." श्रद्धा विचारत होती.

"काही नाही. "आदर्श श्रेयुला गप्प करत होता.

"मम्मी तू माझी आहेस ना ." तो तिला येवून बिलगला.

"हो बेटा."

"डॅडी बोलतो तु त्याची आहे." श्रद्धाने समोर बघितल. आदर्श तिच्या कडे बघत होता. ती घाबरली.

" श्रद्धा मला बोलायच आहे तुझ्याशी. तू माझ्या पासून अशी दूर दूर का राहतेस?"

"नाही ते अस काही नाही." ती गडबडली. श्रद्धा श्रेयुला घेवून सोफ्यावर बसली होती. आदर्श दोघांजवळ आला. श्रद्धा तिथून उठत होती. आदर्शने तिचा हात धरला.

" प्लीज आदर्श. "

"काय प्रॉब्लेम आहे श्रद्धा? तू माझी बायको आहेस. मला तू खूप आवडते. किती दिवसानी भेटलो आपण. तुला एकदाही माझ्या मिठीत यावस वाटत नाही का? आपल किती प्रेम आहे एकमेकांवर. मला आता तुझ्या पासून लांब राहील जात नाही. "

"नाही तस नाही. ते सगळे आहेत इथे. "

" कोण आहे? श्रेयु फक्त. तो तर आपला आहे. मला ना खर तर तुझा राग आला आहे. तुला मला सोडून जायची हिम्मत कशी झाली. तू माझा थोडा ही विचार केला नाही की तुझ्या शिवाय माझ काय होईल. आता ही कस वागतेस. माझ्या जवळ येत नाही. श्रद्धा माझ खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. अशी परक्या सारखी नको वागू. मला त्रास होतो आहे. तू माझी आहेस. मला हवी आहेस. "

" मला थोडा वेळ हवा आहे. प्लीज. तुम्ही श्रेयु सोबत कसेही रहा मला काही प्रॉब्लेम नाही. पण... "

" ठीक आहे समजल मला. कोणत्या शब्दांत माफी मागू मी तुझी. काय आहे तुझ्या मनात? "आदर्श बोलाल.

" माफी नको. तुमच्या सोबत रहायची सवय नाही. थोडा वेळ द्या. " ती शांत पणे बोलली.

"सवय? मी तर तुला विसरलोच नाही. प्रत्येक क्षणाला तू माझ्या सोबत होतीस. अजूनही आठवत मला आपले एकत्र घालवलेले क्षण. ठीक आहे माझ्या कडून तुला त्रास होणार नाही. आरामात रहा." आदर्श बाहेर निघून गेला.

श्रद्धा डोक पकडून बसली होती. काय करू मी. आदर्श दुखावले गेले. जावून बोलू का? नको ते मला जवळ घेतील. मला वेळ हवा आहे. भीती वाटते. हे अस होत सोबत राहील की.

आदर्श बाहेर उभा होता. ही निर्माण झालेली दरी कधी मिटेल. मी घाई केली का? तिला कंफर्टेबल होवू दिल नाही. पण आमच एकमेकांवर किती प्रेम आहे. अगदी एक सेकंड ही आधी माझ्या शिवाय रहायची नाही. माझा हक्क आहे तिच्यावर. काय केल मी फक्त मिठीत तर घेत होतो . ते ही ती नको बोलते.


0

🎭 Series Post

View all