Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 46

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 46


आदर्श चिडले वाटत. श्रद्धाला काही सुचत नव्हतं. तिला त्याच्या सोबत रहायच होत. पण थोडा वेळ ही हवा होता.

मीना आली तिच्या कडे बॅग होती. तिला बघून श्रद्धाला बर वाटल. "बर झाल तु आली. श्रेयु चल तुझे कपडे बदल आता. मीना आम्ही थोड्या वेळाने निघतो आहोत. तू केव्हा येशील?"

"मला अजून वेळ आहे. सरांनी अपॉइंटमेंट लेटर दिल्या वर मी इकडे रीझाईन करेन. नंतर येईल. "

" लवकर ये ना."

आदर्श आत आला. श्रेयस मीनाच्या मांडीवर बसला होता. श्रद्धा नीट बसली. आदर्श तिच्या जवळ येवून बसला.

"मीनाच काम केव्हा होईल? " तिने हळूच विचारल.

"आज देतो अपॉइंटमेंट लेटर. मीना लवकर ये तिकडे. वेटिंग पीरेडचे पैसे मी भरीन. " आदर्श बोलला.

" नाही सर दोन तीन महिन्याने येईन.थोडे काम आहेत इकडे. ते पूर्ण करून येईल. अस अर्ध सोडणार नाही. " मीना बोलली.

ठीक आहे.

अकरा वाजता कोर्टातुन माणूस आला. मीना श्रेयुला घेवून रूम मधे होती. श्रद्धा, आदर्श बाहेर कॅफे मधे आले. श्रद्धाने पेपर वाचले.

" ठीक आहे ना. अजून काही अॅड करायच का? " त्याने विचारल.

ती नाही म्हंटली. तिला हे करतांना वाईट वाटत होत. पण काय करणार आता चान्स घ्यायचा नाही. "अहो तुम्हाला राग आला का?"

"नाही. काही प्रॉब्लेम नाही."

दोघांनी सही केली. ते लोक गेले. जेवण आल. श्रद्धा बसली होती. तिला काही सुचत नव्हत. काय करू मी? आदर्श सोबत नीट रहायला हव. मीना श्रेयुला जेवायला देत होती. ते दोघ खूप बोलत होते.

" मीना, श्रेयु साठी तरी लवकर ये. तो तुझ्या अंगावरचा आहे. मला एकट वाटत ग. काही सुचत नाही."

"हो. मी येईल आणि सर आहेत ना सोबत. आनंदात रहा."

आदर्श आत आला. समोर बसला . श्रद्धा आदर्शच ताट करत होती. तो लांबून तिच्याकडे बघत होता. तिला समजत होत ते. काय करू? आता सोबत आहोत तर हे होणारच. आदर्श ऐकत नाहीत. मला काही सुचत नाही. यांच्या डोळ्यात माझ्या विषयी प्रेम आहे.

"अहो चला जेवून घ्या." तिने आवाज दिला.

"तू पण बस."

" हो. चल मीना. "

त्यांच जेवण झालं.

"आपल्याला निघायला हवं श्रद्धा आटोप."

मीना श्रेयुला समजावत होती. "तिकडे मम्मीला त्रास द्यायचा नाही. छान अभ्यास करायचा. रोज ब्रश करायचा. दूध प्यायच. स्ट्रॉग व्हायच ना. "

"हो मला डॅडी सारख मोठ व्हायच. मी पण कार चालवणार. मावशी तू पण चल ना आमच्या सोबत ." श्रेयु बोलला.

" हो मी नंतर येईल. "

ते स्वातीची वाट बघत होते. ती आली थोड्या वेळ सगळ्यांना भेटली. स्वाती, मीना गेल्या.

" आपण निघू या आता. " आदर्श आत आवरत होता. तो बाहेर आला.

श्रद्धाने बॅग नीट भरली." इथल सामान नक्की येईल ना तिकडे? महत्वाच आहे. "

"हो येईल."

"अहो श्रेयुच्या बालवाडीतुन दाखला आणावा लागेल. "

" काय काय कागदपत्र दिले होते? "

"विशेष नाही."

"ठीक आहे फोन करून बघ. सांगून दे त्याच्या टीचरला."

ते निघाले.

किती तरी दिवसानी ती अशी आदर्श सोबत प्रवास करत होती. श्रेयस पूर्ण वेळ आदर्श कडे होता. तो खूप प्रश्न विचारत होता. त्याला कार खूप आवडली.

ते एअरपोर्ट वर आले. त्यांच्या विमानात बसले. ती पहिल्यांदा विमान प्रवास करणार होती. त्यामुळे धाकधूक होती.

तेजा समोर उभा होता. तो श्रद्धा कडे बघत होता.

" तेजाभाई कसे आहात तुम्ही?"

"ठीक आहे दीदी. तुम्ही माझी आठवण काढली नाही. मला सांगून बघितल असत."

"जावू द्या जे झाल ते झाल. आता बोलून उपयोग नाही." श्रद्धा बोलली.

"या पुढे मी आहे बहिणी साठी."

"मी लक्षात ठेवेन."

आदर्श तिच्या समोरच्या खुर्चीत बसला. श्रेयु त्याच्या जवळ होता. तो त्याच्याशी बोलत होता. त्याने श्रेयुला बेल्ट लावून दिला. तो बघत होता श्रद्धा बेल्ट लावते का?" श्रद्धा हे अस." तो दाखवत होता.

तिचा बेल्ट मोठा होत नव्हता. ती ओढत होती. "एक मिनिट मी येतो तिकडे. श्रेयु इथे थांब जरा."

तो श्रद्धा जवळ गेला कमरे जवळचा बेल्ट पटकन ओढून लावून दिला. "झाल बघ. बेल्ट काढतांना ही क्लिप अशी ओढ."

श्रद्धा त्याच्या कडे बघत होती.

" इकडे खाली बघ बेल्टकडे. माझ्याकडे नाही." तो हसत बोलला.

ती थोडी लाजली. श्रद्धा आदर्श अगदी जवळ होते. त्याचा श्वास तिच्या गालाला लागत होता. तिने अंग चोरून घेतल. तो पटकन जागेवर जावून बसला. ती खिडकीतून बाहेर बघत होती. बापरे कठिण आहे. पण आदर्श जवळ छान वाटत.

" या फ्लाइट मधे बाकीचे लोक नाहीत का? विमान ही किती लहान आहे. " श्रद्धा खूप प्रश्न विचारत होती.

" नाही ही आपली प्रायव्हेट फ्लाइट आहे." आदर्शने सांगितल.

"एवढा खर्च का केला?"

"नेहमी येतो मी असा. "

छान आहे आपल्याला काय. ती गप्प बसली. इथे मी माझ्या मुलाला खेळण्यातल विमान ही घेवू शकत नव्हती. आता तो डायरेक्ट स्वतः च्या विमानात बसला आहे.

फ्लाइट सुरू झाली. श्रध्दा घाबरली होती. विमानाने खूप स्पीड पकडला. तिला भीती वाटत होती काय होईल. ती जीव मुठीत घेऊन बसली होती. एका वेळा नंतर तिला कंट्रोल झाल नाही तिने पुढे होवुन आदर्शचा हात घट्ट धरला. जरा वेळाने विमाने वरती जावून स्थिर झाल. तिने डोळे उघडले. तिला समजल. तिने पटकन त्याचा हात सोडला. आता ती बाहेर बघत होती. आदर्शने श्रेयुचा बेल्ट काढला. तो तेजा सोबत खेळत होता. आदर्श श्रद्धा जवळ येवून बसला.

बापरे मी यांचा हात धरला तर वेगळाच अर्थ नाही ना घेतला? काय करू मला सुचत नाही.

"ठीक आहे ना?" त्याने हळूच विचारल.

" हो. सॉरी."

"का सॉरी?"

"ते मी तुम्हाला न विचारता हात लावला."

"आपण पती पत्नी आहोत. तुझा हक्क आहे माझ्या वर. माझा ही हक्क आहे तुझ्यावर. एवढा विचार करायचा नाही. तुला वेळ हवा आहे तर घे. पण प्रेमाने बोल. आपल समजून रहा. "आदर्श तिच्या कडे बघत बोलला.

ती छान हसली." ठीक आहे. ऑफिस काम कस सुरू आहे?"

"छान थोड संथ होत. आता बघ मी कसा जोर पकडतो. "आदर्श आता आनंदी वाटत होता.

"आकाश अदिती कसे आहेत?"

" मजेत आहेत. "

" लग्न झालं का त्यांच? " श्रद्धाला ते दोघ आवडत होते.

" नाही अजून. "

"सुलभा? "

" हो येईल ती कामाला. "

"संग्राम भाऊजींच लग्न झाल का? "

हो.

कधी?

आदर्श सांगत होता.

" तेजा भाई तुम्ही लग्न केल का? "

" नाही अजून. " तो लाजला.

" त्याच्यासाठी आपल्याला मुलगी शोधावी लागेल ." आदर्श बोलला.

" मॅडम श्रेयु खूप हुशार आहे." तेजा त्याच्या सोबत खेळत होता.

" कोणाचा मुलगा आहे मग. माझा ना. हुशार असणार." आदर्श बोलला.

फ्लाइट खाली उतरली. ते घरी जायला निघाले. ते आधी रहात होते तोच बंगला होता. श्रद्धा खुश दिसत होती तिला ते घर आवडत होत. खूप बदल झाला होता. पुढे गार्डन होत. मागे छोटा स्विमिंग पूल केला होता. स्वयंपाक साठी त्याच बाई होत्या. सुलभा आलेली होती. ती एकदम सुलभाला भेटली.

"श्रेयू कुठे आहे? "

"हा काय किती मोठा झाला आहे. श्रेयु इकडे ये ही मावशी तू हिच्या सोबत रहायच." श्रद्धा सांगत होती.

"मीना मावशी सारख?"

हो.

आदर्श ही खुश होता. "पूजा इकडे ये. श्रद्धा ही कायम तुझ्या सोबत राहील. हिला सोबत घेऊन काम करायच. पूजा कामात हयगय चालणार नाही."

"हो साहेब. "

ती बॉडी गार्ड होती. जीन्स टी शर्ट घातलेली. डॅशिंग एकदम.

आदर्श तेजा सोबत बोलत होता. सिक्युरिटी टाईट हवी. आदर्शला खूप भीती वाटत होती श्रद्धा श्रेयस कुठे जायला नको.

श्रद्धा वरती आली त्यांची बेडरूम ती बघत होती. किती आठवणी होत्या. तिला आता घरी आल्या सारख वाटत होत.

आदर्श आला. "ठीक आहे ना हे घर? मला वाटल तुला इथे आवडेल."

"हो. खूप छान वाटत आहे. हे आपल घर आहे."

"या बेडरूम मधे आपल्या किती आठवणी आहेत. आपल्या संसाराची सुरुवात इथून झाली." आदर्श बोलला.

श्रद्धा त्याच्या कडे बघत होती. ती थोडी लाजली. ती पण हाच विचार करत होती. त्याला समजल तिला वेळ हवा आहे नको बोलायला अस. "तू श्रेयु इथे रहा. मी समोर रूम मधे राहील."

"नाही. तुम्ही रहा आमच्या सोबत." ती बोलली.

"चालेल ना तुला?

"हो. आदर्श. मला ही तुमच्या सोबत रहायच आहे पण थोड अॅडजेस्ट होऊ द्या. "

" काही प्रोब्लेम नाही. " तो खुश वाटत होता.

ती बाल्कनीत आली. श्रेयु खाली खेळतांना दिसत होता. तीला विश्वास बसत नव्हता. आपल्या मुलाला ते सगळ मिळत आहे ज्याचा मी विचार केला नव्हता. त्याच्या शाळेच काय? कुठे आहे शाळा. आदर्शला विचारू. ती फ्रेश होवुन आली चहा आला.

"श्रेयुची शाळा कुठे असेल? "

" इथे जवळ आहे. उद्या जावु."

" माझा जॉब? "

" तू फोन कर कंपनीत. मग मला दे. आपल्या कंपनीत नाही का काम करणार? छान सोबत गेलो असतो. " आदर्शने विचारल.

" नाही मी माझा जॉब करते."

आदर्श छान हसला. हिचे सगळे काम माझ्याकडे असतात. तरी माझ्याशी बोलायच नाही. माझ्या जवळ यायच नाही. छान आहे. मी वाट बघेन.

मम्मी... श्रेयू आवाज देत होता. सायकल.

"अरे वाह कोणाची आहे?"

माझी.

"कोणी सांगितल?"

"या अंकलने."

"तेजा भाई कोणाची सायकल आहे?"

"श्रेयुची आणि मी शिकवणार त्याला."

" लगेच कुठून आली."

"सरांनी ऑर्डर केली. दिल्लीला असतांना आता आली ही."

"सायकल आवडली का श्रेयु?" श्रध्दा पण खुश होती.

"हो मम्मी. मला सायकल ही डॅडी ही आवडतो. "

"मी काय सांगितल अहो डॅडी बोलाव."

रात्री जेवताना श्रेयु खूप बोलत होता. आदर्श श्रद्धा जवळ शांत बसलेला होता. ती जे देईल ते खात होता.

" ही भाजी देवू का? "

हो.

" नको का? "

" चालेल."

" काय सुरू आहे तुमच आदर्श?" शेवटी श्रद्धा बोलली.

" या पुढे तू म्हणशील ते होईल. मी घरात माझ डोक वापरणार नाही. उगीच उलट पूलट होत." त्याने धसका घेतला होता.

श्रद्धा श्रेयुला घेवून रूम मधे आली. आदर्श ही रूम मधे आला. त्याने टीव्ही लावला. बातम्या सुरू होत्या. श्रेयु कॉटवरून उठून त्याच्या जवळ गेला.

" श्रेयू नाही इकडे ये."श्रद्धा रागावली.

" श्रद्धा मी झोपवतो त्याला. "

श्रद्धा झोपली. श्रेयू खूप मस्ती करत होता. आदर्श खुश होता. दोघ झोपायला आले. "शु मम्मी झोपली ना श्रेयु. हळू बोल." पाच मिनिटात तो झोपला. आदर्श जागा होता. श्रद्धा कडे बघत होता. त्याने तिला नीट ब्लँकेट दिल. हे दोघ जवळ आहे हे खूप आहे माझ्यासाठी. त्याला शांत झोप लागली.

दुसर्‍या दिवशी शाळेत जायच होत. श्रेयु आवरून खाली गेला. आदर्श समोरच्या रूम मधे होता. श्रद्धा छान कॉटनची डार्क ब्लू साडी नेसली होती. काय काय डाॅक्युमेंट्स हवे आहेत ते ती बघत होती.

आदर्श आत आला. श्रद्धा कडे बघत बसला. साडीत खूप छान दिसत होती ती . केसांची छान वेणी घातलेली. विशेष तयारी नव्हती. साडी परफेक्ट नेसली होती. तिला जवळ घ्यायची इच्छा झाली. नाही. त्याने मनाला आवरल. आता ती स्वतः म्हटल्या शिवाय उगीच तिला जवळ घ्यायच नाही.

ती घाईत होती. "अहो श्रेयुच बर्थ सर्टिफिकेट तुमच्या कडे असेल ना? अजून काय काय हव आहे? मला काही सुचत नाही. टेंशन येत."

"बालवाडीच अ‍ॅडमिशन आहे श्रद्धा. एवढ काय? तू म्हणशील तर ते प्रिन्सिपल घरी येतील आपल्या श्रेयुची अ‍ॅडमिशन द्यायला. चल जावू नंतर देवु डॉक्युमेंट्स."

"अहो अस नको. नियमात राहू. श्रेयुला सांगायच नाही तुमच्या साठी या गोष्टी इजी आहेत. त्याला किम्मत राहणार नाही. त्याला इतर मुलांसारख वाढवु. " श्रद्धा बोलली.

" बरोबर आहे तुझं. "

ते दोघे खाली आले. श्रेयु खूप आरामात नाश्ता करत होता. सुलभा त्याच्याकडे बघत होती.

" श्रेयु मी काय सांगते आहे ते ऐक. टीचर विचारेल त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. पोएम बोलून दाखव एखादी. "श्रद्धा सिरियस होती.

आदर्श त्या दोघांकडे हसून बघत होता.

" मॅडम श्रेयुला येत सगळं. " सुलभा बोलली.

"हो मी आता मावशीला बोलून दाखवल."

"श्रद्धा त्याला नाश्ता करू दे." आदर्श बोलला.

" कुठलीच गोष्ट कधीच लाईट लाईटली घेऊ नये. "

" बरोबर आहे तुझं. श्रेयु मम्मी म्हणते ते करायचं. शाळेत व्यवस्थित वागायचं." आदर्श बोलला.

"हो डॅडी."

श्रेयुचा ऍडमिशन झालं. दुसऱ्या दिवसापासून स्कूल होती. काय काय सामान हव पुस्तक हव तिथूनच शाळेतूनच घेतले. स्कूल ड्रेस घेतले.

आदर्श बघत होता श्रद्धा छोट्या गोष्टींमध्ये रमते. तिच्या काही जास्त अपेक्षाच नाहीये जीवनाकडून. फक्त शांत आणि आनंदी राहते ती. आपणही आताच असंच करायचं कोणालाही बदलत बदल बसायच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला शांत छान वाटतं ते करायचं.

ते तिथून बाहेर जेवायला गेले. श्रेयुत खूप मजेत होता. समोर छोट गार्डन होत. तो खूप खेळत होता. त्याच्यासोबत आदर्श होता.

"सर तुम्ही बसा मी बघतो त्याच्याकडे." तेजा तिथेच उभा होता.

आदर्श येऊन श्रद्धाजवळ बसला. "याच्यात खूप एनर्जी आहे."

"हो त्याला दिवसभर जरी खेळायला दिला तरी कमी आहे. उद्यापासून बिझी होईल तो मला सुद्धा ऑफिसला जावं लागेल. तुम्हाला थोड्यावेळाने वेळ आहे का? घरी गेलं की मी ऑफिसला फोन करेल. "

" हो. मी ऑफिसला जाणार आहे त्या आधी आपण फोन करून घेऊ."

जेवण आलं जेवण झाल्यावर ते घरी आले. श्रद्धाने ऑफिसमध्ये फोन केला. एच आर मध्ये ती बोलत होती.

" अशी फोनवर बदली मिळणार नाही मॅडम. "

श्रद्धा खूप रिक्वेस्ट करत होती. आदर्शनी तिच्याकडून फोन घेतला. सरांशी बोलायचं आहे. त्यांनी फोन ट्रान्सफर केला. आदर्श आरामात बोलत होता. त्या लोकांनी सांगितल मुंबई ब्राॅचला जागा नाही थोडे दिवस थांबा .

श्रद्धा नाराज होती.

" एवढा विचार करू नकोस. आपल ऑफिस जॉईन कर. हवी ती पोस्ट घे. सोमवारी चल माझ्या सोबत ऑफिस मधे ठरवून टाकू तुझ्या कामाच. नाहीतरी मला तू हवी माझ्या सोबत तू लकी आहे मला. ठीक आहे का?"

ती हो म्हंटली.

"अजून काही?"

"हे दोन काम महत्त्वाचे होते."

"ठीक आहे तुझे तर दोघी काम झाले. माझ काय?" आदर्श तिच्याकडे बघत बोलला. तिने मान खाली घातली.

" एक तर तु किती सुंदर दिसते आहेस. त्यात ही साडी तुला छान दिसते आहे. " तो पोटाकडे बघत होता. तिने पदर सावरून घेतला. कपडे बदलायला हवे होते. ती विचार करत होती.

"या सगळ्यातून वेळ मिळाला तर आमचा पण विचार करा. हे पण काम महत्त्वाचं आहे. चल मी ऑफिसला जावून येतो."

श्रद्धा लाजली. तिच्या कडे हसून बघत आदर्श ऑफिस मधे गेला.


0

🎭 Series Post

View all