Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 47

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस


माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 47


श्रद्धाशी बोलून झाल्यावर आदर्श ऑफिसला निघून गेला. ती स्वतःला आरश्यात बघत होती. चांगली दिसते आहे का मी? हो. तिला हसू आल. ती आदर्शचा विचार करत होती. थोडे दिवस साडी नको नेसायला. पण आज शाळेत जायच होत ना. म्हणुन साडी नेसली. ती कपडे बदलून खाली आली.

"श्रेयु चल आता थोड्यावेळ अभ्यास कर. कधीच काहीही केलेलं नाहीस. तिकडे पण मीना मावशी तुला अगदी लाडात घेते. काहीही येणार नाही तुला असं केल तर. मला भीती वाटते आहे. चल लवकर इकडे ये." तिने श्रेयु कडून सगळ्या पोएम एबीसीडी म्हणून घेतली.

खूपच लहान होता तो. त्याच्याकडनं पोएम ऐकणं छान वाटत होतं.

आदर्श रात्री थोडा उशिराने ऑफिसहून आला. श्रेयु जेवून झोपला होता. श्रद्धा टीव्ही बघत होती. फोन करून बघू का. तेवढ्यात बाहेर कारचा आवाज आला. आदर्श आत आला.

" अरे तू जागी आहेस?" तो आत आंघोळीला निघून गेला. फ्रेश होऊन आला. त्याने श्रद्धाच्या अंगावर मुद्दाम केसांच पाणी उडवल. ती दचकली. आदर्श कपाटा जवळ गेला. तो टी शर्ट घालत होता. त्याची बॉडी जबरदस्त दिसत होती. तिला कसकस झाल. सुंदर बॉडी सोपचा वास सगळीकडे येत होता. ती पटकन उठली. मी खाली आहे. तिने जेवणाची तयारी केली.

आदर्श जेवायला येवून बसला. "आज श्रेयु लगेच झोपला?"

"हो साडे दहा झाले ना ."

"तू का थांबलीस इतका वेळ माझ्यासाठी? " तो तिच्या कडे बघत होता. ती ताट करत होती.

"श्रद्धा सांग? तू का थांबलीस. तुला माझी काळजी वाटली का?"

"एक वेळ तरी सोबत जेवण करायला हव ना." तिने सावकाश उत्तर दिल.

"बस इतकी सोबत पुरेशी आहे का श्रद्धा?" तो बोलला. श्रद्धा गप्प होती.

मला तुझ्या सोबत रहायच आहे. तुला समजत कस नाही. पण तो गप्प होता. त्याच त्याच जेवत होता.

"काय काम सुरू आहे सध्या? ते ब्रिज प्रोजेक्ट झालं का? तुम्ही बिझी आहात का? " तिने विचारल.

"सध्या एक महत्त्वाचा बिल्डिंगचा प्रोजेक्ट सुरू आहे आणि आपला बिजनेस अजून वाढला आहे. फॉरेनच्या कंपनी सोबत सुद्धा टायप आहे." आदर्श सांगत होता.

श्रद्धा खूपच नीट बोलत होती आधी सारखी. त्यामुळे आदर्श खुश होता. जेवण झालं. ते रूम मधे आले. श्रेयु झोपला होता त्यामुळे तिला कसंतरी वाटत होतं. सोफ्यावर बसून आदर्श त्याचे काम करत होता. त्याच्याही ते लक्षात आलं होतं. पण त्याने दुर्लक्ष केलं. शांत राहायला हवं. श्रद्धाला माहिती आहे माझ्या मनात काय आहे. तिला माझ्याजवळ यायचं असेल तर सांगेन. बळजबरी नको.

श्रद्धा विचार करत होती. काय करू. यांच प्रेमळ वागण मला समजून घेण छान वाटत आहे. थोड बोलू का. नको तिला धडधड झाल. तिला झोप येत नव्हती. आदर्श झोपायला आला. "काय झालं?"

"डोक दुखत आहे गोळी आहे का? अर्धी द्या ना."

"मी डोक दाबून देतो. शांत झोप गोळी नको घेवू." तो काॅटच्या त्या बाजूने आला. श्रद्धा उठून बसली.

"झोप. उठून बसली तर डोक कस दाबणार."

त्याच्या काळजी घेण्याने तिला बर वाटत होत. "तेल लावते का?"

"नको. "ती झोपली.

सकाळी लवकर उठायच होत. श्रेयुची शाळा होती. तिने त्याला तयार केल." नविन स्कूल आहे ही बेटा. रोज जायच."

"हो मम्मी. "

तसा तो शाळेत जायला कधी त्रास देत नव्हता. त्यामुळे बर होत.

आदर्श उठला." बर वाटतय का श्रद्धा ?"

"हो. अहो पटकन तयार व्हा. श्रेयुची शाळा आहे. "

आदर्श हसत होता. श्रद्धा म्हणजे ना अति करते.

शाळेच्या ड्रेस मध्ये श्रेयु खूप छान दिसत होता. सगळे कौतुकाने त्याच्याकडे बघत होते. श्रद्धा खूप सूचना करत होती. "डबा पूर्ण खायचा. भांडण करायच नाहीत. शाळेत कोणाला मारायच नाही. "

श्रेयु हो बोलत होता.

" आपण त्याला सोडायला जाऊ का?" श्रद्धा आदर्श कडे बघत होती.

"नाही तो सुलभा सोबत जाईल. टीचर काय म्हटली त्याला एकट सोडा थोड. एक दिवस तू गेली की तो रोज हट्ट करेल. सुलभा लक्ष दे याच्याकडे." आदर्श बोलला.

जास्त नव्हती अगदीच दोन-तीन तास शाळा होती. श्रद्धाला घरी करमतच नव्हतं. "अहो तो राहील ना. रडला तर?"

" त्याला सवय आहे ना शाळेची?"

हो .

"मग का काळजी करतेस. "

"अहो शाळेचा फोन नंबर, टीचरचा नंबर मला द्या. "

"हो घे. पण उगीच फोन करू नकोस. " आदर्शने सांगितल.

" तुम्ही जा ना ऑफिसला. मला श्रेयु साठी वरण भात लावायचा आहे." ती बोलली.

"अरे मग मी काय करतो आहे." आदर्श हसत होता.

" तुम्ही घरी असले की तुमच्या पुढे मागे करण्यात वेळ जातो."

काहीही . इथे इतका वेळ वाया जातो आहे ते नाही दिसत या श्रध्दाला . आता श्रेयु नव्हता तर छान सोबत वेळ घालवता आला असता. तो काही न बोलता ऑफिसला गेला.

तिने मीनाला फोन केला. स्वातीला फोन केला. तरी वेळ जात नव्हता. अजून श्रेयु यायला एक तास होता. ती खाली जाऊन बसली. श्रेयु साठी स्वयंपाक ही झाला. "सुलभा केव्हा जाणार आहे तू श्रेयुला घ्यायला?"

"वेळ आहे मॅडम अजून. तुम्ही काळजी करू नका. तो छान बसला आहे तिकडे. रडला नाही."

"हो श्रेयु आहेच हुशार."

तिने आदर्शला फोन केला. "काय झालं श्रद्धा?"

" मी जाऊ का श्रेयुला घ्यायला?"

"तुला जायचं तर जा पण त्याला सांगून दे तू दोन दिवसांनी ऑफिसला जाणार आहे. "

"बरोबर आहे जाऊ द्या मी घरीच वाट बघते."

श्रेयु शाळेतुन आला. तो खूप गप्पा मारत होता. त्याच्याबरोबर जेवण झाल. थोड्यावेळ आराम केला. मस्त वेळ गेला.

संध्याकाळी आकाश अदिती भेटायला आले होते. अदिती एकदम गळ्यात पडली. खूप गप्पा मारत होती. श्रद्धाने विचारलं नाही घरातल्यांबद्दल. बाकी कोणीही काही सांगितलं नाही. श्रेयु साठी खूप चॉकलेट खाऊ आणला होता. आत्या, काका त्याला आवडले. ते जेवायला थांबले होते. खूप बर वाटल आदर्श श्रद्धाला.

दुसऱ्या दिवशी श्रेयु शाळेत गेला.

श्रेयु आल्यानंतर दुपारी ऑफिसमध्ये ये श्रद्धा. नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे त्याची पूजा आहे संग्राम प्रियाच्या हातून. श्रेयु तुझ्या हातून उद्घाटन आहे.

श्रद्धाला वाटत होतं घरातले बाकीचे लोक जर नसतील ना. पण ती काही बोलली नाही. गप्प होती.

श्रेयु आल्यावर जेवण झाल्यावर ते दोघं पूजा सोबत ऑफिस मध्ये आले. आदर्श बाहेरपर्यंत घ्यायला आला होता. श्रद्धा हिरव्या रंगाची साडी नेसली होती. कानात झुमके, छान मंगळसूत्र, लाल टिकली लावली होती. आज हातात भरपूर बांगड्या ही होत्या. वाह सुंदर. आदर्श तिच्या कडे बघत होता. तिने श्रेयुचा हात धरला. चला. ती बोलली.

आदर्शला समजल. आपण केव्हाच हिच्याकडे बघत आहोत.

" मी दोन मिनिटात येऊ का अकाउंट डिपार्टमेंट मध्ये जाऊन."

हो जा. पूजा तिच्या मागेच होती. सगळ जसच्या तसं होतं. मॅडम भेटल्या. सचिन भेटला. चैतन्य आणि मनीष नव्हते.

"श्रध्दा तु परत ऑफिस जॉईन करते का?"

"हो मॅडम."

"इथे ये मग अकाऊंट डिपार्टमेंट मधे."

"हो बघते ना आदर्श काय म्हणता ते. "

श्रद्धा केबिन मध्ये आली. श्रेयु आदर्शच्या मांडीवर बसून लॅपटॉप मध्ये बघत होता.

"काय काम चाललं आहे श्रेयु?" श्रद्धाने विचारल.

"श्रेयु बॉस आहे इथला. हो ना श्रेयु." आदर्शने त्याला पापी दिली.

" हो मला पण डॅडी सारखं ऑफिस आणि लॅपटॉप हवा. " तो बोलला.

" त्यासाठी खूप स्टडी करावा लागतो. " श्रध्दाने सांगितल.

" श्रेयु करणार आहे स्टडी. तुला काय हवं श्रेयु केक खायचा का?"

चालेल.

"चल मग आपण फोनवर सांगू." आदर्शने कॅन्टीन मध्ये फोन लावला. श्रेयुने त्याच्या साठी केक सांगितला. मग फोन आदर्श कडे दिला. त्याने त्या दोघांसाठी चहा सांगितला.

श्रद्धा सोफ्यावर बसलेली होती. चहा घेऊन झाला.

"केव्हा आहे पूजा?"

"संग्राम आल्यावर."

"कुठे गेले आहेत ते भाऊजी?"

"घरी गेलाय. येईल आता." थोड्यावेळाने संग्राम आणि त्यांची बायको प्रिया आली. प्रिया छान होती. थोडी मॉडर्न होती. सहा महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. ती जॉब करत होती.

संग्रामने ओळख करून दिली. त्या दोघी खूप छान गप्पा मारत बसल्या. थोड्यावेळाने पूजा होती. संग्राम आणि प्रिया दोघं ऐकतच नव्हते. "आदर्श तू आणि वहिनी बसा पूजेला . तू मालक आहे इथला तुम्ही दोघ बर्‍याच वर्षांनी सोबत आहात."

त्यांनी ऐकलं नाही. पूजा झाली. श्रेयश आणि श्रद्धाच्या हातून उद्घाटन झालं. लगेच कामाला सुरुवात होणार होती.

थोड्यावेळाने ते घरी आले. श्रेयु दमला होता तो जरा वेळ झोपला. आदर्श नेहमी प्रमाणे घरी आला. श्रद्धा त्याच जेवण झाल. तो नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलत होता.

आज श्रेयुला शाळेला सुट्टी होती. तो मागे स्विमिंग पूल मध्ये खेळत होता. श्रद्धा बाजूला बसलेली होती. आदर्श आवरून आला. "सकाळी सकाळी गडबड आहे तुझी श्रेयु. श्रद्धा चहा घेतला का? चल आपण सोबत ब्रेकफास्ट करू."

श्रेयु पाणी उडवत होता.

"नको श्रेयु तुझं तुझं खेळ. पूजा लक्ष दे ग याच्याकडे."

बाहेर बरच पाणी पडलं होतं. श्रद्धा उठली. अचानक पाय घसरून खाली पडली. आदर्श पटकन पळत आला." श्रद्धा काय झाल? ओह माय गॉड. तू ठीक आहे ना." त्याने तिला हात दिला. तो खूप घाबरला होता.

" घाबरू नका मी एकदम ठीक आहे. थोडं पाणी होतं तर घसरली." थोडा पाय लचकला होता. विशेष काही झाल नव्हत.

आदर्शने तिला सगळ्यांसमोर दोघी हातावर उचलून घेतलं. ती खूप बोलत होती सोडा. त्याने काही ऐकलं नाही. तिला घेऊन रूम मध्ये आला. बघू पाय. तिला कसतरी वाटत होत. थोडा पाय मोडून दिला.

"बरं वाटत आहे का?"

"हो मी एकदम ओके आहे. तुम्ही काय एवढे घाबरले." ती सहज बोलली.

"श्रद्धा तू माझ्यासाठी काय आहे हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. तुला काही झालं तर मला एकदम धडकी भरते. माझ्यासाठी तरी स्वतःची काळजी घेत जा." त्याने तिला मिठीत घेतल. त्याचं प्रेम बघून श्रद्धा एकदम गप्प बसली.

त्याने पायाला मुव्ह लावून दिला.

श्रेयु आला. आदर्शने त्याला कपडे घालून दिले. तो ही घाबरला होता.

" अहो तुम्ही जा ऑफिसला मी बघते ठीक आहे माझा पाय. "

" हो थोड्यावेळाने जातो. "

त्याने वरती चहा नाश्ता बोलावला. श्रेयुला खाऊ घातलं.

"हे बघ श्रेयु मम्मीला त्रास द्यायचा नाही. तिला जरा आराम करू दे. तू टीव्ही बघ नाहीतर मम्मी जवळ बसून रहा नाहीतर याला घेऊन जाऊ का मी ऑफिसला? "

" नको तो काम करू देणार नाही. मी ठीक आहे. "

" काळजी घे. मी लवकर येईन. "

थोड्यावेळाने संग्राम आला. त्याच्यासोबत प्रिया होती.

श्रद्धा लंगड्यातच खाली गेली.

" वहिनी तू एक दोन दिवसच घरी आहे प्रियाला राहू दे आज इथे. तुमची दोघींची ओळख होईल." संग्राम बोलला.

"काय झालं पायाला?" प्रिया विचारत होती.

"स्विमिंग पूल जवळ घसरली." श्रद्धा सांगत होती

" हो डॅडी घाबरला होता. त्याने मम्मीला उचलून घेतलं." श्रेयुने जमेल तसं सांगितलं. सगळे हसत होते.

"श्रेयु गप्प बस. याला काय बोलावं ते समजत नाही. " श्रद्धा गडबडली.

" वहिनी तू आहेस तेवढी स्पेशल आदर्श साठी. तो आता ठीक आहे ना?" संग्राम बोलला.

" हो काय झाल? " श्रद्धा विचारत होती.

" तुला माहिती नाही का? आदर्श खूप त्रासात होता. आता डिप्रेशनचे औषध नाही घेत ना?"

" नाही कुठलेच औषध नाही. काय झालं होत?" तिने परत विचारल.

" तू गेल्या नंतर तो डिप्रेशन मध्ये गेला होता. ड्रिंक सुरू केले होतं. शुद्धीत नसायचा तो. दिवस दिवसभर तुझ्याच विचारात असायचा. एकदा दोनदा अ‍ॅडमिट केल होत. "

श्रद्धाच्या डोळ्यात पाणी होत.

" जेवत नव्हता. वीक नेस खूप होता. नुसत तुला शोधत फिरायचा. चक्कर यायच्या. रडायचा खूप. कुठे कुठे नाही शोधलं तुला. जाऊ दे आता तो विषय. आता तुम्ही दोघे खूप छान आणि आनंदाने राहा. "संग्राम सांगत होता.

हे सगळं ऐकून श्रद्धा शॉक मधे होती. कीती त्रास करून घेतला यांनी. आणि मी काय करते आहे. यांना अजूनही जवळ घेतलं नाही. किती कोरड वागते आहे. पुरे झाल आता. यांना माझ्या सहवासाची प्रेमाची गरज आहे.

प्रियाला सोडून संग्राम ऑफिसला गेला. त्या दोघींनी खूप गप्पा मारल्या. ती श्रेयु सोबत खूप खेळत होती. खूप चांगली होती ती स्वभावाने. दोन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून आली होती. दुपारी जेवण झाल्यावर त्यांनी थोड्या वेळ आराम केला.

उशी जवळ आदर्शच सोन्याचं लॉकेट पडलेलं होतं. श्रेयुने ते तिला दिल. श्रद्धाने ते हातात घेतलं .तिला माहिती होत त्या पेंडट मधे त्याच्या आई-वडिलांचा फोटो होता. तिने ते उघडलं त्यात श्रेयु आणि तिचा फोटो होता. तिच्या एकदम डोळ्यात पाणी आलं. हे खूपच प्रेम करतात माझ्यावर. एकदम काळजी करतात. मी आजच सांगते त्यांना ते माझ्याजवळ राहू शकतात.

विचार करून श्रद्धा लाजली होती. हा वेळ स्पेशल कसा करायचा ? श्रेयुला लवकर झोपवु का? मी साडी नेसू का ? काहीतरीच तिला तिच्या विचाराचा हसू आलं. तिला असं वाटत होतं की आता फोन करून आदर्शशी बोलावं.

संध्याकाळी श्रेयु बाहेर खेळत होता. पूजा सुलभा लक्ष देत होत्या. बाकी सिक्युरिटी गार्ड पण होते. श्रद्धा, प्रिया हळूहळू खाली येऊन बसल्या. पाय ठीक होता. थोडा दुखत होता.

थोड्यावेळाने आदर्श, संग्राम वापस आले.

"बरं वाटतं आहे का?" तो श्रद्धा जवळ येवून बसला.

हो.

त्याने श्रेयुसाठी खाऊ आणला होता. "चला श्रेयु पटकन खाऊन घ्या."

"काय आणलं आहे? आता जेवायची वेळ आहे. खाऊ खाल्ला तर तो परत पोळी भाजी खाणार नाही." श्रद्धा ओरडली.

"थोडसं खा श्रेयु."

सर वेळेवर घरी येतात. ड्रिंक्स पूर्ण बंद आहे. त्यामुळे तेजा खुश होता.

जेवताना श्रेयु नखरे करत होता. "हे बघा मी म्हणत होते ना. "

"मी खाऊ घालतो त्याला. " आदर्श बोलला.

" नको मग तुमचं जेवण राहून जाईल. "

" काही होत नाही मी थोड्या वेळाने जेवतो. "

आदर्श त्याला गोष्ट सांगत खाऊ घालत होता. श्रेयु पण शांतपणे ऐकत होता. जेवण झालं. थोड्या वेळाने संग्राम प्रिया गेले. आदर्श श्रेयुला घेवून बसला होता.

" बोलू का यांच्याशी?" श्रद्धा विचार करत होती. तिला धडधड झाल. लाज वाटत होती. अस कस बोलणार? थोड्या वेळाने श्रेयु झोपला की बघु यांचा कसा मूड आहे ते. काय होईल? विचार करून ती लाजली होती.


0

🎭 Series Post

View all