माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 48
श्रद्धाला वाटत होत आदर्शशी बोलाव की आपण सोबत वेळ घालवू. पण बोलणार कस? ती या विचारात होती.
श्रेयु सोफ्यावरच झोपून गेला होता. आदर्श त्याला घेऊन रूम मधे आला. त्याला कॉटवर नीट झोपवलं. तो परत खाली आला श्रद्धाला घ्यायला. श्रद्धा किचनमध्ये आवरत होती.
"चल आराम कर श्रद्धा पुरे झाल काम. एक तर पाय दुखतो आहे तुझा."
" मला काहीही झालेलं नाही. आता बरं वाटतं आहे." तरी आदर्शने ऐकलं नाही. "चलते का की उचलून घेवून जावू." तो हसत होता. ती एकदम लाजली. बोलू का यांच्याशी. सुचत नाही काही.
ते दोघं वरती आले. नेहमीप्रमाणे आदर्श लॅपटॉप घेऊन सोफ्यावर बसला होता. श्रद्धा आज त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याला वेगळं वाटलं. तो थोडासा हसला.
श्रद्धा विचार करत होती कसं बोलू. आदर्शने हळु आवाजात टीव्ही लावला. बातम्या सुरू होत्या. श्रद्धाला काही सुचत नव्हतं. ती त्याच्याकडे बघत होती. "अहो मला थोडंसं बोलायचं होतं."
"बोल ना."
"काही नाही."
" काय झालं. कोणी काही बोललं का?"
नाही.
"मग मोकळ बोल."
" ते म्हणजे... आपण सोबत राहायचं का?"
अगदी एका आठवड्यात श्रद्धाच मन बदललं म्हणून आदर्श खूष होतात. आज कस काय अस बोलते आहे ही? तो मुद्दाम काही समजल नाही अस दाखवत होता. "श्रद्धा आपण सोबतच राहतो आहोत ना."
"तसं नाही ते तुम्ही म्हणत होते ना. " ती अडखळत बोलली. कस वाटत. हे समजून घेत नाही.
" काय? " त्याने लॅपटॉप वरची नजर बाजूला केली नाही.
जाऊ दे बाबा यांचं लक्ष नाही. कामावरच लक्ष आहे. मला हे अस बोलता येत नाही. कसंतरीच वाटतं. उद्या बोलु. मी झोपते. श्रद्धा उठली तिच्या जागेवर येऊन झोपली. तिला राग आला होता. यांना मेसेज करू का? की पत्र लिहू? ती विचार करत होती.
आदर्श हसत होता. आज कसं काय मला होकार देते आहे. काही कारण आहे का? की ही सुद्धा माझ्यापासून दूर राहू शकत नाही. समजत नाही. तीच ही खूप प्रेम आहे माझ्या वर. तो खूप खुश होता.
श्रद्धा कुस बदलत होती. तिला झोप येत नव्हती. आदर्श उठला लॅपटॉप समोर टेबलवर ठेवला. श्रद्धाने डोळे मिटवून घेतले. जशी काही ती झोपली आहे.
आदर्श तिच्या जवळच्या त्या बाजूने आला. तिच्याजवळ बसला. श्रेयुला एका बाजूने उशी लावली. श्रद्धा... त्याने हाक मारली श्रद्धा ऐकत होती. ती गप्प होती.
"उठ मला माहिती आहे तू झोपलेली नाहीस. काय म्हणत होतीस तू?"
"काही नाही." श्रद्धा उठून बसली.
त्याने पुढे होऊन तिला मिठी मारली. तिने काही विरोध केला नाही. त्याने तिला उचलून घेतलं या बाजूने श्रेयुला उशी लावली. तो तिला घेऊन बाजूच्या रूम मध्ये आला.
श्रद्धा आता थोडी घाबरली होती. नवखे पण नव्हतं पण बऱ्याच दिवसांनी ते दोघं असे जवळ येणार होते. श्रद्धा एकदम लाजून कॉटवर बसली होती. आदर्श तिच्याजवळ जाऊन बसला. तिचा हात हातात घेतला. त्यावर ओठ टेकवले. "आज कसा काय विचार केला आमचा? मनापासून होकार आहे ना."
" तुम्ही म्हटले होते ना वेळ मिळाला तर माझा विचार कर. म्हणून विचार केला."
"अच्छा मग काय समजल?"
" तुम्ही खूप चांगले आहात आणि मला तुमच्या पासून अजून दूर रहायच नाही."
त्याने तिला मिठीत घेतलं. "नक्की ना श्रद्धा?"
"हो आदर्श. मी तुम्हाला खूप खूप मिस केलं. मला रोज तुमची आठवण यायची. सॉरी मी तुम्हाला असं सोडून जायचा विचार केला. "
त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवला. "पुरे आता हे असं बोलायचं नाही. जुन्या गोष्टी आठवायच्या नाही." त्याने पुढे होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवले. दोघ अधीर झाले होते. त्याचा होणारा स्पर्श तिला बेभान करत होता. कितीतरी वेळ ती लांब होती. नंतर ती त्याला प्रतिसाद देत होती. दोघ बरेच वर्ष ज्या क्षणाची वाट बघत होते ते आता अनुभवत होते. सगळं कसं नवं वाटत होतं. दोघांचे तर पूर्वीपासूनच एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यात ही साथ खूप छान वाटत होती. मस्त एकमेकात रमले होते.
थोड्यावेळाने आदर्श बाजूला झाला. त्याने आता तिला मिठीत घेतलं होतं.
थोड्यावेळाने आदर्श बाजूला झाला. त्याने आता तिला मिठीत घेतलं होतं.
"श्रद्धा मला आज तुझ्यासोबत खूप बरं वाटतं आहे. प्रॉमिस कर माझ्यापासून कधीच दूर राहणार नाहीस. तुझ्या मनात काय आहे ना ते पूर्ण बोलून टाकायचं. अजिबात विचार करायचा नाही."
तिने परत त्याला मिठी मारली. "मी ही तुमच्या शिवाय राहू शकत नाही. या पुढे कोणी नको मला. फक्त तुम्ही मी आणि आपला संसार. "
" झोपते इथे की चलते तिकडे. "
" तिकडे जाऊ श्रेयु उठतो रात्री. " दोघं इकडे येऊन झोपले.
" या रूममध्ये पण आपल्या किती आठवणी आहेत ना. श्रेयु आलाच नव्हता या घरात." तो श्रेयुला बाजूला सरकवून तिच्याजवळ येऊन झोपला.
"श्रेयु तीकडुनं पडणार नाही ना?"
" नाही व्यवस्थित आहे. आपण त्याला छोटा कॉट घेऊन येऊ त्यावरून मुलं पडत नाहीत. म्हणजे मला तुझ्या सोबत झोपता येईल. "
श्रद्धा लाजली होती. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली. तिला वाटतच नव्हतं किती इतके वर्ष त्याच्यापासून दूर होते. त्याचं प्रेम आठवणी सगळ्या जशाच्या तशा तिने मनात जपल्या होत्या. आज परत तोच अनुभव आला होता. त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे दिसत होतं. खूप समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर. तिला लगेच झोप लागली.
श्रेयु रात्रीतनं उठला. डॅडी मम्मी जवळ झोपला आहे त्याला राग आला. तो उठून दोघांच्या मध्ये झोपला. जोरजोरात तो आदर्शला बाजूला सरकवत होता.
" काय चाललं आहे श्रेयु?"
"ही माझी जागा आहे ही." आदर्शने श्रेयुला जवळ घेतलं आणि झोपवल.
श्रद्धा सकाळी उठली ती आवरत होती. श्रेयु झोपलेला होता. आदर्श उठला तो श्रद्धाला आवाज देत होता. "एवढ्या लवकर का उठली आहेस? आज सुट्टी आहे ना ये इकडे माझ्याजवळ झोप."
"नाही उठा आता तुम्ही सुद्धा. मला भूक लागली आहे. आपण नाश्त्याला खाली जाऊ."
आदर्शने तिला जवळ ओढून घेतल. "आधी मी काय म्हणतो ते करू."
"अहो नको. सोडा ना आता आपण दोघेच नाही. श्रेयु आहे सोडा. तो उठेल. त्याला एक तर सवय नाही आपण दोघं सोबत असण्याची."
आदर्श ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. तो तिला मिठीत घेवून झोपला होता. ती सुटायचा प्रयत्न करत होती.
त्या दोघांची गडबड ऐकून श्रेयु उठला. आदर्श पटकन बाजूला झाला. श्रद्धा ही लाजली होती. मम्मी डॅडी सोबत आहे हे बघून त्याला आश्चर्य वाटलं. तो त्या दोघांकडे बघत होता.
"उठ श्रेयु चल आवर. " श्रद्धाने विषय बदलला. ती उठून आवरायला गेली. आदर्शने परत थोड्यावेळ झोपून घेतलं. जरा वेळाने तो नाश्त्याला आला. श्रद्धा त्याला हसत होती.
"श्रद्धा हसू नकोस नाहीतर मी तुला रात्री खूप त्रास देईन."
"अहो तुमच्यावर लक्ष देणार आहे कोणी तरी. श्रेयु. "
"हो ना. त्याला लवकर आपण दुसर्या रूम मधे शिफ्ट करू. नाहीतर एक काम करू या का त्याला बहीण भाऊ घेवून येवू ते दोघ एका रूम मधे मी तुझ्या जवळ. कस वाटल. " आदर्श मुद्दाम तिला जवळ घेत होता.
श्रद्धा खूप हसत होती." काहीही सोडा ना. नाही आता बाळ नको. "
" ते मी ठरवेन. तू ऐकायच. चला श्रेयु तयार हो. आज आपल्याला देवळात जायचं आहे. मी देवाला बोललो होतो तर आपलं सगळं नीट झालं की दर्शनाला येईल. "
नाश्ता झाल्यावर श्रद्धा तयार झाली. गोल्डन लाल साडी नेसून ती खाली आली. थोडी ज्वेलरी. सुंदर चेहरा साधा अगदी. आदर्श समोर बसला होता. ती श्रेयुच बघत होती.
" श्रद्धा इकडे ये. माझ्या तयारीच कोणी बघायच?"
"तुमचा कुर्ता काढून ठेवला आहे तयार व्हा. "
"तू चल ना." तो हळूच बोलला.
"नका ना त्रास देवू आटपा. "
ते मंदिरात गेले. नेहमीच मंदिर होतं त्यांचं. त्या दोघांच्या हातून पूजा झाली. खूप छान आणि प्रसन्न वाटतं होतं. दोघ खूप खुश होते. ते घरी आले.
आकाशच लग्न जमलं होतं. तो सांगायला आला होता. कीर्ती त्याची होणारी बायको काकूंच्या नातेवाईकांमधली होती. बऱ्याच वेळा आकाश आणि आदिती बसलेले होते लगेचच दोन-चार दिवसात साखरपुडा होता.
"वहिनी तुम्ही यायलाच पाहिजे मी ऐकणार नाही."
"तुला तर माहिती आहे ना आकाश काय परिस्थिती आहे." आदर्श बोलला.
"हो पण दादा, वहिनी माहिती आहे. तुम्ही आले तर मला बर वाटेल."
दोघे एकमेकांकडे बघत होते.
"ठीक आहे आम्ही थोड्या वेळ येऊ."
ते दोघं श्रेयु सोबत खूप खेळत होते.
" तुम्ही दोघं जेवून जा. " श्रद्धा आग्रह करत होती.
आकाशने व्हिडिओ कॉल लावला होता. कीर्ती खूप छान होतील. मस्त बोलत होती.
श्रद्धाला धडधड वाटत होती. बिचार्या कीर्तीचा किती छळ होणार आहे. नाही पण त्या दोघी नीट वागतील तिच्याशी. ती त्यांच्या पसंतीची आहे आणि श्रीमंता घरची मुलगी आहे.
जेवण झालं ते दोघं वापस गेले. श्रद्धा श्रेयुला झोपवत होती. श्रेयु झोपला. श्रद्धा आदर्श जवळ येऊन बसली. "श्रद्धा तुला बळजबरी नाही. तुला यायचं असेल तरच चल कार्यक्रमाला. "
"हो मी पण तोच तोच विचार करते आहे."
"अहो मला कीर्तीची काळजी वाटते आहे."
"काळजी करण्यासारखं काही नाही तू जास्त दुसऱ्याचा विचार करू नको."
"बरोबर आहे."
श्रद्धा विचार करत होती काय करू जावू का प्रोग्रामला? हॉटेल मध्ये आहे प्रोग्राम? बघू तरी काय होत." मी येईन. "
" ठीक आहे पण तिथे कोणी काही म्हटलं तर मनाला लावून घ्यायच नाही. आपल नात सगळ्यात जास्त महत्वाच आहे. " आदर्शने तिला आधीच सांगून दिल.
" हो मी तुमच्या सोबत राहीन. आकाश साठी येईन. "
कार्यक्रमाच्या दिवशी आदर्श आणि श्रेयसने काळा सूट घातलेला होता. श्रेयश तर खूपच गोड दिसत होता. सगळे त्याच्याकडे कौतुकाने बघत होते.
" किती छान ड्रेस आणला आहे ना मला डॅडीने. " तो सगळ्यांना दाखवत होता.
आदर्श त्याला शूज घालून देत होता." एका जागी बस श्रेयु."
श्रद्धा आतून तयार होऊन आली .ते दोघे तिच्याकडे बघतच बसले .लाल रंगाची काठापदराची साडी. केस छान मोकळे सोडलेले होते .थोडीशी ज्वेलरी मॅचिंग टिकली. खूपच सुंदर दिसत होती.
" ठीक आहे ना तयारी खूप जास्त नाही वाटत ना ?" श्रद्धाने विचारल.
आदर्श काही म्हणण्याआधीच श्रेयु बोलला." मम्मी तू छान आहेस."
आदर्श छान हसून बघत होता. "श्रेयु आम्ही आलोच. तेजा अंकल जवळ बस."
आदर्शने पुढे होऊन श्रद्धाला मिठीत घेतल. "केवढी गोड दिसते आहेस तू आज. जायचं ना कार्यक्रमाला? की.... "
श्रद्धा हसत होती. " चला लवकर अर्ध्या एक तासात परत येऊ."
ते प्रोग्रामला गेले. प्रभाकर राव, काका भेटले. श्रद्धा त्यांना भेटली ते छान बोलत होते. बाबा आपला श्रेयु. त्यांच्या डोळ्यात पाणी होत. त्यांनी एकदम त्याला जवळ घेतल.
आकाश कीर्तीचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. आदर्श, श्रद्धा त्यांना भेटून आले." चला आम्ही निघतो."
"वहिनी छान वाटल तुम्ही आल्या तर थँक्स."
ते निघत होते. आदर्श बाबांशी बोलत होता. श्रद्धा श्रेयुला सरबत देत होती.
मोहिनी ताई काकू तिच्या जवळ आल्या. श्रद्धाने दुर्लक्ष केल.
"वहिनी इकडे या. इकडे बघा कोण आहे." आशा काकू बोलल्या. मोहिनी ताई तिच्या जवळ येवून उभ्या राहिल्या.
श्रद्धाने हळूच हातातला फोन आदर्शला लावला. आदर्शने तिच्या कडे बघितल. तिने फोन उचल असा इशारा केला. आई काकू जे बोलत होत्या ते आता आदर्श ऐकत होता. त्याने तो कॉल रेकॉर्ड करून घेतला.
"कुठे पळून गेली होती ग तू? आता बरी तोंड वर करून कार्यक्रमाला आली. लाज नाही वाटत का इथे येतांना? " मोहिनी ताई बोलल्या.
"तुम्ही अस का म्हणता आहात मॅडम?"
" तुला त्या दिवशी एवढ हाकलून दिलं तरी तुझं समाधान झालं नाही का? तरी परत आलीच. आदर्शला तिकडे रहायला बोलवून घेतल. तू माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं. असा राग येतो ना हिचा. हीच तोंड बघूशी वाटत नाही. "
" मी काहीच केलं नाही. तेच मला इकडे घेऊन आले. " श्रद्धा बोलली.
"थांब थोडे दिवस मी परत आदर्शला घरी बोलवुन घेईन आणि तुझे पूर्वीसारखेच हाल करेल. आदर्शने तुला परत घराबाहेर काढलं नाही तर मी माझं नाव बदलून टाकेल. " मोहिनी ताई बोलल्या.
" चांगली गेली होती ही वहिनी. लगेच आदर्शच लग्न करायला हवं होत. " काकू बोलल्या.
" हो ना पण तो सुद्धा ऐकत नाही. ये पोरी निघ इथून. आमच्याशी अजिबात काहीही संबंध ठेवायचे नाहीत. यापुढे येथे आमच्या घरी कुठल्याच कार्यक्रमाला यायचं नाही. हीच आणि हिच्या पोराच तोंड ही पहायच नाही. ही दिसली की चिडचिड होते. कोण आहे नी काय आहे. तिचा पोरगा ही तसाच. आपल्याच नशिबी आले हे. " मोहिनी ताई बडबड करत होत्या.
त्या दोघींचे अशी भाषा ऐकून आदर्श आश्चर्यचकित झाला होता. त्याला कल्पना होती की आई आणि काकू श्रद्धाला त्रास देतात. पण हे अशा पद्धतीने ते श्रद्धाशी बोलत असतील हे त्याला वाटलं नव्हतं. तो खूप चिडला होता.
तो श्रद्धा जवळ आला. ती उठली. " चला जाऊया का घरी." तिघ कार जवळ आले.
" तेजा या दोघांना घेऊन जा .श्रद्धा मी थोड्या वेळाने येतो." आदर्श बोलला.
"अहो प्लीज. घरी चला. आता काही बोलू नका. जाऊ द्या." श्रद्धा बोलली.
"थांब तु श्रद्धा मला जरा या दोघींकडे बघायचं आहे."
"आज अस करू नका ना. आकाशचा तरी विचार करा. पाहुणे आहेत ."
"ठीक आहे." ते दोघं ते घरी आले. श्रेयु खुप बोलत होता. श्रद्धा गप्प होती. आदर्श तिच्याकडे लक्ष देत होता.
श्रद्धा विचार करत होती उगीच यांना फोन लावून दिला. हे चिडायला नको. एक तर आत्ताच थोडी तब्येत ठीक आहे.
" अहो मी तुम्हाला असं फोन नव्हता लावायला पाहिजे. तुम्ही प्लीज टेंशन घेऊ नका."
"बरोबर केलं तु. मला वाटलं नव्हतं ह्या दोघी अस बोलत असतिल. श्रद्धा मला माफ़ कर मी तुला या जाचा पासून वाचवु शकलो नाही. तुला खूप त्रास झाला."
"आधी तर मी चोवीस तास त्यांच्यासोबत असायचे. विचार करा काय होत असेल. "
"खरं आहे अशा परिस्थितीत कोणी राहू शकत नाही. मी सुद्धा तुला तेव्हा समजून घेतलं नाही. "
" अहो नको आपण या विषयावर नको बोलुया. आपण हे सगळं विसरायचं अस ठरवलं आहे ना. "
" हो. पण या प्रकारचा सासुरवास कठिण आहे. " आदर्श बोलला.
" विचार करा बर्याच बायका घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. कोणी साथ देत नाही. पदरी मुल असतात. घर सोडून जाता येत नाही. बाकीच्यांनी थोड तरी त्यांना समजून घेतल पाहिजे. कोणी सांगत आहे त्रास होतो आहे तर तीच ऐकुन घेतल पाहिजे. मदत केली पाहिजे. घरच्यांना समजून सांगितल पाहिजे अश्या प्रकारे दुसर्याला त्रास देवू नये. तीच जिवन कठिण करू नये. ती मुलगी तुमच्यासाठी तीच घर आई वडील सोडून आलेली असते. तिची अपेक्षा असते. तिला थोड प्रेम आधार तिला मिळाला पाहिजे. "
" एकदम बरोबर बोलते आहेस तू." आदर्श विचार करत होता मी पण बोलणार आहे आईशी.
" चला आता आराम करा. "
तिने श्रेयुचे कपडे बदलले. त्याला झोपवलं. ती आदर्शच्या आसपास होती. आदर्श त्याचं त्याचं काम करत होता.
" अहो आता झोपून घ्या."
"हो तू झोप मला थोडा वेळ आहे."
तिने त्याच्या हातातुन बळजबरी लॅपटॉप काढून घेतला. त्याला घेऊन ती बाजूच्या रूम मध्ये आली. दोघांनी छान सोबत वेळ घालवला. आदर्श तिच्या सोबत खुश होता. ती त्याच्या मिठीत झोपली होती.
