माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 49 अंतिम
दुसर्या दिवशी श्रेयु शाळेत गेला. श्रद्धा आदर्श सोबत ऑफिसला जायला निघाली. दुपारी सुलभा घ्यायला जाणार होती. ती तिला सूचना देत होती.
श्रद्धा आदर्श ऑफिस मधे आले. "मी कोणत डिपार्टमेंट घेवू अकाऊंटंच बघू का?"
"ठीक आहे. तशी तू बॉस आहेस माझी ही कंपनीची ही." आदर्श तिच्या जवळ जावून हळूच बोलला. श्रद्धा हसत होती.
तिला एका प्रोजेक्टच हेड केल. तिचं काम सुरू झाल. बर्याच दिवसांनी ती बिझी होती. खूप छान वाटत होत.
आदर्श त्याच्या केबिन मधे बसलेला होता. तो कालचा कॉल ऐकत होता. तो खूप चिडला होता. अश्या पद्धतीने बोलता ह्या दोघी श्रद्धा सोबत. वाटल नव्हत. श्रेयू त्यांना आवडत नाही. बघाव लागेल जरा.
त्याने दुपारी घरी फोन केला. काका, काकू, मोहिनी ताई प्रभाकर राव घरी होते. अदिती सुद्धा आलेली होती. "मला तुमच्या सगळ्यांशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे मला घरी यायचं आहे."
"केव्हाही ये." प्रभाकर राव बोलले. ते खुश होते. मोहिनी ताई पण खुश होत्या. त्यांना वाटलं आदर्श घरी यायचं बोलेल.
आदर्शनी आकाशला हाक मारली. "चल जरा दोन तास घरी जाऊन येऊ. मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे."
दोघं घरी आले. मोहिनी ताई आणि काकू खुश होत्या. त्या टेबल जवळ उभ्या होत्या. "चल लवकर आदर्श तुझ्या आवडीची भाजी केली आहे. जेवून घे."
काका आणि प्रभाकर राव सुद्धा समोर बसलेले होते.
"अदिती कुठे आहे? तिला बोलवुन घ्या. मला महत्त्वाचं सांगायचं आहे." सगळे बघत होते आदर्श काय सांगतो आहे ते.
"कालचा कार्यक्रम छान झाला. तुम्ही मला आणि श्रद्धाला कार्यक्रमाला बोलावलं थँक्यू. पण यापुढे तुमच्याकडच्या कुठल्याही कार्यक्रमाला किंवा काहीही कारण असलं तर मला आणि श्रद्धाला इथे बोलवु नका. मला आई काकूशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत."
" काय झालं काही प्रॉब्लेम आहे का? " प्रभाकर राव बोलले.
" हो बाबा बहुतेक आपल्याला कुणालाच माहिती नाही आई आणि काकू श्रद्धाला खूप त्रास देतात. नेहमी ती दिसली की या तिला बोलतात. तिचा अपमान होतो. मला यापुढे हे चालणार नाही. मोठ्या मुश्किलीने आम्ही आता एकत्र आलो आहोत. दूर असतांना आम्हाला दोघांना खूप त्रास झाला आहे. या प्रकारात श्रद्धा परत रागवली तर मला भीती वाटते. आता तिला परत गमवायचं नाही. " आदर्श बोलला.
" ती तुला काहीही सांगते आणि तु ऐकतो. आम्ही काही केल नाही. बघितल का हो. कशी आहे ती पोरगी. कोणत्या गोष्टीचा सूड घेते आहे काय माहिती? याला एकच्या दोन सांगते." मोहिनी ताई बोलल्या.
"नाही आई श्रद्धाने काही सांगितल नाही. मी स्वतः ऐकल आहे .तुम्ही दोघी तिला काय बोलल्या ते. आता तरी खोट बोलू नकोस. "तो रागात होता.
त्या दोघी एकमेकींकडे बघत होत्या. प्रभाकर राव आदर्श कडे बघत होते. " काय झालं आहे आदर्श मोकळं सांग. "
" हे ऐका बाबा. " त्याने तो कॉल सगळ्यांना ऐकवला. सगळे ऐकत होते किती घाण पद्धतीने मोहिनी ताई आणि काकू श्रद्धाशी बोलत होत्या .
" या दोघींनी तिला आई म्हणायलाही म्हणायला मनाई केली आहे. ती या दोघींना मॅडम म्हणते. या नेहमी तिचा अपमान करतात. मलाही श्रद्धा विषयी दोन-चार गोष्टी कानात भरवल्या त्यामुळे मी तिच्यावर चिडून होतो. त्याचा फायदा घेऊन या दोघींनी तिला त्या दिवशी रात्री घराबाहेर काढलं. मला पूर्वीपासूनच माहिती होतं हे पण मला वाटलं एवढे काही विशेष नसेल. कशाला बोला आईला. पण अती झालेला आहे. या दोघी या गोष्टी सोडायला तयार नाही. या गोष्टीला दोन-तीन वर्ष झाले. मी नेहमी विचार करतो की नको मोठे आहेत काय बोलावं. पण या दोघींनी तिला समजून घेतलं असतं किंवा तिच्याशी नसत्या जरी बोलला तरी मला चाललं असतं. या तिचा अपमान करायचा सोडत नाही. "
" अस काही नाही. " मोहिनी ताई बोलल्या.
"आई मला बोलू दे जरा. तुम्हा दोघींना मला मी सुखी झालेल चालणार नाही का? काय केलं आहे मी किंवा श्रद्धाने किंवा आमच्या श्रेयसने? काय बोलल्या तुम्ही दोघी? हिचा पोरगा आणि नेहमी तुम्ही काय म्हणतात की हा कोणाचा मुलगा आहे? तुम्ही अशा प्रकारे श्रद्धाच्या चारित्र्यावर संशय का घेता? तिने पूर्वी हॉटेलमध्ये थोडे दिवस काम केलं होतं याचा अर्थ असा काही नाही की तिथे ती सगळ्यांबरोबर संबंध ठेवून होती. मला माहिती आहे श्रद्धा काय आहे काय नाही. तुम्ही आमच्या प्रेमावर माझ्या मुलावर या प्रकारे संशय घेता ते मला अजिबात चालणार नाही. "
प्रभाकर राव, काका, आकाश, अदिती हे सगळं ऐकून धक्क्यात होते. मोहिनी ताई, आशा काकू गप्प बसलेल्या होत्या.
" तुला काय वाटतं आहे आदर्श ती पोरगी मला कधीच काही बोलली नसेल का? " त्या हळूच बोलल्या.
" नसेल बोलली ती. मला माहिती आहे श्रद्धाचा स्वभाव अतिशय साधी आणि शांत आहे ती. एवढं झालं तर मला एका शब्दाने ही काही बोलली नाही. शांतपणे बाजूला होऊन गेली. आता ही भेटल्यावर काही बोलली नाही. की तुम्ही माझी बाजू का नाही घेतली. जे आहे ते त्यात ती खुश रहाते. यापुढे तिला कोणी काही बोललं तर मला चालणार नाही. " खूप बोलला आदर्श.
प्रभाकर राव चिडले होते ते पण खूप बोलले मोहिनी ताईंना. आकाश, अदिती तर रागाने बघत होते.
" एखाद्याच्या खुशीपेक्षा तुम्हाला गरीब श्रीमंत गोष्ट जास्त महत्वाची वाटते का? श्रद्धा गरीब आहे हीच गोष्ट तुम्हाला लोकांना खटकत होती ना. एक माणूस म्हणून कधी तिच्याशी बोलून बघितलं का आई काकू? तिचा स्वभाव किती चांगला आहे हे समजून घेतलं का? तिला आपलं मानलं का तुम्ही? सुनेला त्रास द्यायचा नादात तुम्ही तुमच्या मुलालाही गमावलं आहे. " आदर्श बोलला.
" जा बेटा आदर्श काही येऊ नको इकडे. तिकडे तुझ्या घरी सुखी रहा. या लोकांना तुझ्या बायकोची मुलाची किंमत नाही. आकाशच लग्न होत आहे आता तरी व्यवस्थित वागा. "
"आकाश लक्ष दे कीर्तीकडे. ह्या बायका डेंजर आहेत. यांच्या डोक्यात काय चालू असत समजून येत नाही. कधी पण त्या तुझा संसार मोडतील आणि स्वतः मजेत रहातील." जाता जाता ही आदर्श बोलला.
" आदर्श थांब. " मोहिनी ताई बोलल्या.
"काय काम आहे आता? तू काही जरी बोलली तरी मला फरक पडणार नाही. " आदर्श परत ऑफिसला गेला. आकाश सोबत होता. दोघ गाडीत गप्प होते.
" दादा वहिनीला खूप त्रास झाला आपल्याकडे. जर आई-बाबांनी तुम्हाला परत बोलावलं तर?"
" मी येणार नाही. मी तसं कोर्टात पेपर वर लिहून दिल आहे श्रद्धाला आणि तिचं बरोबर आहे आता माझ्यासाठी माझी बायको आणि माझा मुलगा खूप महत्त्वाचे आहे. तू पण यापुढे लक्षात ठेव. कोणी काही तुझ्या बायकोला बोललं तर तिची बाजू घे. या लोकांवर विश्वास ठेवू नको. आधी शहानिशा कर. मला माहिती आहे मोठ्यांशी असं बोलायला नको होतं पण असं झाल्याशिवाय त्यांना समजणार नाही. तुझ्या पण बायकोला असच त्रास देतील. " आदर्श बोलला.
ऑफिसला काम सुरू झालं. आदर्श संध्याकाळी घरी आला. श्रद्धा पाच वाजता घरी आलेली होती. ती आणि श्रेयु देवाला देवा लावत होते. श्रद्धा आरती म्हणत होती. श्रेयु टाळ्या वाजवत होता. आदर्श दोघांकडे बघत होता.
" अहो आज तुम्ही लवकर आले. छान वाटतय. थांबा तुमच्यासाठी चहा आणते." श्रध्दा आत जात होती.
"इकडे ये श्रद्धा मला काही नको. माझ्या जवळ बस."
"काय झालं?"
"मी आज घरी गेलो होतो. आईला खूप बोललो." आदर्श सांगत होता काय झालं ते.
"अहो तुम्ही माझ्या साठी त्यांच्याशी भांडू नका."
"थोड बोलायला हवं. नाहीतर त्यांना त्यांच्या चुका समजणार नाही. "
थोड्या वेळाने स्वयंपाक झाला. ते जेवायला बसले. आदर्श श्रेयु सोबत छान बोलत होता. तो शाळे बद्दल सांगत होता." माझी टीचर खूप छान आहे. मला आवडते."
श्रद्धा आदर्श त्याला हसत होते.
" श्रद्धा आपण फिरायला जाऊया ना. " आदर्श बोलला.
" हो चालेल. "
पुढच्या आठवड्यात श्रद्धा, आदर्श, श्रेयश स्वित्झर्लंडला फिरायला गेले. श्रद्धा तर खूप खुश होती. काय बघू काय नको असं तिला झालं होतं. श्रेयसला काही समजत नव्हतं. पण तो खूप खुश होता. आदर्श, श्रद्धा खूप छान वेळ एकत्र घालवत होते. आदर्श आता पूर्ण ठीक झाला होता.
" श्रद्धा आपण दुसरा चान्स घ्यायचा का?" त्याने हळूच विषय काढला.
"काय? नाही अजिबात नाही."
"का नाही म्हणतेस. तुला माझ्यावर शंका आहे का?"
" अजिबात शंका नाही. एक तर प्रेग्नन्सी मधे खूप त्रास होतो. नऊ महिने खूप काही काही खावसं वाटत. तुम्ही लोक आणून देत नाही. त्यात तिखट मीठ कमी. परत श्रेयु अजून लहान आहे. त्यात अजून एक बाळ. नाही. "श्रद्धा बोलली.
" तुला फक्त जन्म द्यायचा आहे घरात किती लोक आहेत कामाला. मी पण आहे . "
" काहीही. मला सांभाळाव लागत सगळं. "
" या वेळी तू म्हणशील ते खायला घेईल. मी खूप मदत करेन. हो म्हण श्रद्धा. मला एक गोड मुलगी हवी आहे. " आदर्श तिच्या मागे होता.
" नाही. मला त्रास द्यायचा नाही. नाही तर मी भांडण करेन." श्रध्दा चिडली.
" तू आणि माझ्याशी भांडतील? तुला जमणार आहे का ते. ऐक ना श्रद्धा अजून नाही थोड्या दिवसांनी श्रेयू मोठा होईल मग त्याला सगळं समजेल. तुला अस आवडेल का?"
नाही.
"म्हणून म्हणतो दुसर बाळ येई पर्यंत श्रेयु चार वर्षाचा होईल बरोबर होत अस. तू म्हणशील ते देईल मी. प्लीज ऐक ना." त्याने तिला मनवल.
थोड्या दिवसांनी मीना वापस आली त्या दोघींनी स्वातीला फोन केला. "तू पण ही कंपनी जॉईन करते का?"
हो.
तिचा पण इंटरव्यू झाला. तिला सुद्धा आदर्शने कंपनीत जॉईन करून घेतल. त्या दोघी खुश होत्या. आपण तिघी एकत्र ऑफिस मधे धमाल येईल.
" मीना आता मी थोडे दिवस ऑफिसला येईल." श्रद्धा लाजत बोलली.
"का काय झाल?" दोघी विचारता होत्या.
" तू परत मावशी होणार आहे."
"खरच का?"
हो.
"चला बर आहे. श्रेयु सोबत अजुन एक गोड बाळ येईल." मीना बोलत होती.
"तुम्ही दोघी लग्न करा ना. नुसत काय आमचे मुल सांभाळता आहात. " श्रद्धा बोलली.
" कोणाशी करू लग्न? "
"तुमचा होकार असेल तर स्थळ बघू या का?" श्रद्धा विचारत होती.
"नाही नको."
"तुम्ही दोघी काय अस करता आहात? "
" आम्ही नाव नोंदवणार आहोत. तू तुझी तब्येत सांभाळ. "
श्रद्धाला या वेळी बरी होत. ती श्रेयु मधे बिझी होती. विशेष त्रास देत नव्हती. आदर्श तिला हव ते आणून देत होता. खूप लाड करत होता.
आकाशच लग्न झाल. आदर्श, श्रद्धा गेले नाहीत. आकाश कीर्ती नंतर इकडे भेटायला आले होते.
श्रेयुचा तिसरा बर्थडे झाला. त्याचे खूप फ्रेंड्स आले होते. एवढे गिफ्ट बघून तो खूप खुश होता. "मम्मी मला डॅडी खूप आवडतो." श्रद्धा आदर्श त्याच बोलण ऐकुन हसत होते.
श्रद्धाला नववा महिना सुरू होता. तिच्या साठी हालचाल करण मुश्किल झाल होत. आदर्श खूप काळजीत होता. श्रेयुच तोच बघत होता.
तिला हॉस्पिटल मधे अॅडमिट केल. तिचे दिवस भरले होते. सकाळ पासुन त्रास होत होता. आदर्श, संग्राम, तेजा, आकाश, कीर्ती, अदिती, श्रेयु, मीना, स्वाती सगळे सोबत होते.
श्रद्धाला खूप त्रास होत होता. आदर्श सोबत होता. बाहेर बाळाचा आवाज आला. सगळे उत्सुक होते. मुलगी झाली. आदर्श बाळ घेवून बाहेर आला. सगळे गडबड करत होते. "श्रेयु चल इकडे ये तुझी बहीण बघ."
"श्रद्धा ठीक आहे का?" मीना स्वाती विचारात होत्या.
"हो एकदम ओके आहे. झोपली आहे."
अदिती तिच्या जवळ बसलेली होती. सगळे काळजी घेत होते.
चार दिवसानी तिला घरी सोडले. आदर्श खूप कामात होता. श्रेयु श्रद्धा बाळाला सांभाळत होता. बाळाची नाव श्रुती ठेवल.
श्रेयु आदर्श सोफ्यावर बसले होते त्याच्या कडे श्रुती होती. श्रद्धा जेवत होती." अहो तुम्ही स्वतः कडे ही लक्ष द्या."
"हो आता तुझ जेवण झाल की हिला घे. मग मी आणि श्रेयू जेवणार. आमचा छान बेत आहे."
"श्रेयु अभ्यास ही करत जा जरा."
"हो त्याला येत सगळं. " आदर्शने त्याची बाजू घेतली.
मोहिनी ताई आजारी होत्या. घरून फोन येत होते. आदर्श भेटायला गेला. थोडा वेळ बसला.
" आदर्श तू मला कधीच माफ करणार नाही का? "
" माझ्या मनात काही नाही आई ताण करून घेवू नकोस."
" तू आणि श्रध्दा इकडे येणार का रहायला. मी काही करणार नाही. कीर्ती आहे बघ ना."
"नाही आई. जमणार नाही." आदर्श बोलला.
"माझी दया येत नाही का तुला?"
"तो प्रश्न नाही आई. मी श्रद्धाला सोडून राहू शकत नाही. ती ठरवेल तेच होईल. "
" मी बोलू का तिच्याशी? "
" बोलायच तर बोल. मला काही प्रॉब्लेम नाही. "
त्यांनी फोन लावला.
" बोला मॅडम."
" मॅडम नाही आई म्हण. "
" नको मॅडम. काय काम आहे. आदर्श घरी नाहीत. " श्रद्धा बोलली.
" तुम्ही इकडे या रहायला. "
" नाही जमणार. "
" एका आई मुलाची तू ताटातुट करते आहेस. आदर्श म्हणतो तूच घेशील डीसीजन. "
"मॅडम दूर राहून नाते सांभाळु शकतो आपण. उलट दूर राहिल्याने प्रेम वाढत. तुम्हाला वाटल तेव्हा येत जा इकडे भेटायला. आणि मी कोणाची ताटातुट केली नाही तुमच्या कर्माची शिक्षा मिळते तुम्हाला."
"ठीक आहे मी बाळाला बघायला येते उद्या."
हो या.
मोहिनी ताई, काकू, कीर्ती आले होते. मुलांमधे मोहिनी ताईंना बर वाटत होत. हे केवढ मोठ सुख मी माझ्या हाताने दूर लोटल त्या विचार करत होत्या.
दुपारी आदर्श घरी आला. सगळ्यांच सोबत जेवण झाल. तो दोघ मुलांची छान काळजी घेत होता. श्रद्धा ही खूप सुंदर छान दिसत होती. चांगली वागत होती.
"आदर्श तू खरच एक चांगला मुलगा आहेस, नवरा आणि वडील म्हणून तू बेस्ट आहेस. असे छान रहा." ते गेले.
"श्रेयु चला होम वर्क करा." श्रद्धा श्रुतीला घेवून बसली होती.
आदर्श श्रद्धाच्या मागे मागे होता. " श्रुती झाली ना तीन महिन्याची. माझ्या जवळ केव्हा येणार?"
"तुमच काय सुरू असत नेहमी मला त्रास देण. हिला घ्या बर. " श्रद्धा मुद्दाम रागावली होती.
"श्रद्धा बोल ना. सांग तरी तुला बर वाटत का?"आदर्श परत विचारत होता.
"हो मी एकदम ठीक आहे. तुम्ही जा बर ऑफिसला."
"मी घरी थांबतो ना."
"नाही आता नाही. मुल जागे आहेत. "
" मग झोपव त्यांना. मी श्रेयुला झोपवतो तू श्रुतीला झोपाव. " त्याने अस म्हटल्यावर श्रद्धा हसत होती. तुम्ही पण ना. श्रेयु झोपला. श्रुती थोड्या वेळाने झोपली
आदर्श खुश होता. तो श्रद्धा सोबत छान रमला होता. ती त्याच्या कडे प्रेमाने बघत होती. "काय झालं? "
"थॅंक्यु."
" कशासाठी दोन दोन मुल दिले म्हणून का?" आदर्श हसुन बोलला.
"नाही माझ्या वर खूप खूप प्रेम करण्यासाठी. अश्या गरीब मुलीला इतक चांगल घर दिल. आधार दिला. आदर्श तुम्ही मला खरी साथ देत आहात. लव यु." ती त्याच्या बाहुपाशात शिरली.
"तुझ्यासाठी नाही मी हे माझ्यासाठी करतो आहे. मला आधार हवा आहे. मी तुझ्या शिवाय अपूर्ण आहे. तू माझी किती काळजी घेतेस. माझ ऐकते. लव यु. "त्याने तिला अजून मिठीत आवळून घेतल.
एक कुटुंब पूर्ण झाल होत. आदर्श, श्रद्धा, श्रेयु, श्रुती. ते खूप खुश होते.
"श्रद्धा रोज माझ्या सोबत असाच छान वेळ घालवायचा. " आदर्श बोलला.
" अहो तुम्ही खूप चांगले आहात. मला खूप आवडता."
"मला ही तू खूप खूप आवडते. "
दोघ खूप प्रेमात होते. एकमेकांची छान साथ देत होते. एकमेकांना समजून घेत होते. हेच तर महत्वाचं असत आयुष्यात.
जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस.
समाप्त.
वाचकांचे खूप आभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा