माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 37
घरी जायचं आहे या विचाराने आदर्श खूप खुश होता. तो त्यांच्या बंगल्यावरच सामान पॅक करत होता. बाकीचे मदतीला होते. "आम्ही आता कुठे काम करू साहेब."
"तिकडे चला आमच्या सोबत. आम्ही आता तिकडे रहायला जातो आहोत. त्यामुळे सगळच सामान तिकडे न्यायला हवं."
श्रद्धाला आता इथून डायरेक्ट त्यांच्या बंगल्यावर रहायला जायच टेंशन आल होत. आपल घर शेवटी आपल असत. आदर्श सोबत त्या दुसर्या बंगल्यात मी आरामात होते. सगळीकडे फिरू शकत होती. माझ्या मनाप्रमाणे सगळं होत. तिकडे काय करणार आहे. तिला नको वाटत होत. मीना भेटायला आली. बाळ झोपलेला होता. "मीना आता आम्ही सासरी जातो आहोत. कसं होईल. सुचत नाही ग."
मीना पण काळजीत होती. पण मी काही बोलली तर श्रद्धा अजून घाबरून जाईल. "काही होणार नाही तू व्यवस्थित रहा. तेच तुझं सासर आहे. "
" मला टेन्शन आलं आहे. मोहिनी मॅडम अजूनही माझ्याशी बोलत नाही."
"तू कशाला काळजी करते. आदर्श सर आहेत ना . ते तुझी किती काळजी घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. मोहिनी मॅडम बोलतील. बाळा पासून कोणी दूर नाही राहू शकत. त्याच्या साठी तरी त्या बोलतील. " मीना समजावत होती.
श्रद्धा नुसती बसलेली होती. सकाळ पासून ती हाच विचार करत होती. मीना आल्यावर तिला किती बोलू किती नको अस झाल होत. "हो ते आहेच म्हणा. नक्की होईल ना अस. तसं आदर्श खूप चांगले आहेत. काही प्रॉब्लेम नाही. पण मला जमेल ना तिकडे?"
" हो जमेल ना का नाही जमणार? किती चांगली आहेस तु. नक्की त्या लोकांच मन जिंकशील. "
"मला काहीही येत नाही. स्वयंपाक वगैरे. ते ओरडतील मला." श्रद्धाला आता एक एक आठवत होत.
"हळू हळू शिकून घे. तिकडे कूक असेल. आदर्श सर आधी वेगळे वाटत होते ना. आता समजल अगदी साधे आहेत. तस होईल ते लोक साधे असतिल. तू उगीच एवढ टेंशन घेते आहेस." मीना बोलली.
" असच होऊ दे. सगळ नीट व्हायला हव. तू येशील ना तिकडे मला भेटायला. "श्रद्धाचा चेहरा उतरलेला होता.
" हो मग मी माझ्या बाळापासून दूर नाही राहू शकत. " मीनाने बाळाला जवळ घेतलं. ती बराच वेळ बाळाला घेऊन बसलेली होती. त्याच्याशी गप्पा करत होती. तो खुश होता. मीना असल्यामुळे श्रद्धाला बराच आराम मिळत होता.
डॉक्टर आले बाळाला तपासलं त्याला वेगवेगळे औषधे लिहून दिले." पुढच्या आठवड्यात हॉस्पिटल मधे या चेक अप साठी. बाळ व्यवस्थित आहे. "
श्रद्धाच्या डॉक्टरांनी श्रद्धाला तपासल. औषध लिहून दिले." नंतर यावे लागेल तपासणीसाठी." त्यांनी डेट्स दिले. तुम्ही आता जाऊ शकता.
आदर्श आला होता. आतापर्यंत त्याला थोडी बाळाला घ्यायची प्रॅक्टिस झाली होती. त्याने बाळाला घेतलं. तो बाळाशी छान गप्पा मारत होता.
मीनाने श्रद्धाला तयार केलं. "तब्येतीकडे लक्ष दे तिकडे. आपल समजून रहा. "
ते सगळे त्यांच्या घरी आले. मीना श्रद्धा कडे बघत होती "यांचा बंगला अतिशय सुंदर आणि मोठा आहे."
"हो. आतून बघ अजून."
" बापरे मला सुद्धा आता दडपण आल आहे. "
" इथे राहायचं म्हणून तर टेंशन येत. अगदीच हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतं. त्यात त्या मॅडम. ओह माय गॉड. खूप रागीट आहेत. "
" हळू." मीना घाबरली.
"हो ग. आदर्श फोन वर बोलता आहेत."
तिघे पोहोचले . मागच्या गाडीत सुलभा, बॉडी गार्ड होते. सुलभा बाळाला सांभाळायला होती. ती पटकन पुढे आली. तिने बाळाला घेतल. आदर्शने हात दिला. श्रद्धा हळूच उतरली. आत मध्ये मोहिनी ताई आणि आशा काकूंनी बाळाचं आणि श्रद्धाच स्वागत केलं. दोघांची आरती ओवाळली. भाकरी तुकडा त्यांच्या अंगावरून उतरवला. पाणी फिरवलं.
आकाश अदिती तर खूप खुश होते. बाळ कधी आत मध्ये येतो आणि कधी त्याला घेऊ असं त्यांना झालं होतं. बाळाला सगळे घेवून फिरत होते. आदर्श त्यांच्या मागे होता. "द्या त्याला इकडे. किती लहान आहे तो रडेल."
थोड्यावेळ हॉलमध्ये बसून श्रद्धा, मीना आत रूम मध्ये आल्या. अतिशय मोठा रूम होता. एका बाजूला मोठा काॅट होता. बाजूला बाळाचा पाळणा होता. सगळी सोय करून ठेवलेली होती. एका बाजूला मोठी बाल्कनी होती. त्यात बरेच झाडं होते. बसायला सोफा होता. समोर टीव्ही युनिट होत. आतल्या बाजूला चेंजिंग रूम होती. मोठा बाथरूम बाथ टब होता. खूपच सुंदर सोयी होत्या.
"श्रद्धा तुला जेव्हा हवं तेव्हा मला बोलव. नाहीतर मी सुट्टीच्या दिवशी बाळाला भेटायला येईल." मीना बोलली.
"असं काय करतेस मीना. येत जा ना मधून मधून."
" हो मी नक्की येईल. आधी वेगळं होतं. इथे कस येणार सारख. "
"काही नाही सगळे सारखेच आहे. नेहमी येत जा." श्रद्धा बोलली.
हो. जरा वेळ थांबून मीना वापस केली.
बाळाला घेऊन आदर्श आत मध्ये आला. " कशी वाटली आपल रूम?"
" खूप छान आहे. "
"याला घे जरा .तो कुरकुर करतो आहे. "
श्रद्धाने त्याला दूध पाजलं. तो झोपला.
" असा झोपतांना किती छान दिसतो ना हा."
"हो ना. मी तर रोज त्यालाच बघत राहते. शांतपणे मन लावून दूध पितो. एकदम आरामात झोपतो." श्रद्धा कौतुकाने सांगत होती.
"हो ना आपला राजकुमार आहे तो."
त्याने श्रद्धा आणि बाळाला दोघांना जवळ घेतलं. "थँक्यू श्रद्धा इतका छान गिफ्ट दिल्याबद्दल. तुला माझ्या कडून काय गिफ्ट हव? "
" काहीच नको. सगळं खूप भरपूर आहे. फक्त तुम्ही आमच्या दोघांवर नेहमी इतकच प्रेम करत रहा. नेहमी मला आधार द्या. मला तुमच्या शिवाय कोणी नाही हे लक्षात ठेवा. बाकी मला काही नको. " श्रद्धा बोलली.
" हे काय सांगण झाल का? मी तुमच्या दोघां शिवाय राहू शकत नाही. उलट तूच मला आधार दे. तुझ्या शिवाय मी काहीही करू शकत नाही." त्याने श्रद्धाला मिठीत घेतल. दोघ बराच वेळ तसे बसुन होते. त्याचा प्रेमात ती खुश होती. तरी मनात थोडी धाकधूक होती. या घराची सवय नाही. कस करणार मी.
" मी खूप खुश आहे आपण इकडे सुद्धा राहायला आलो आता आपण खूप छान राहू घरच्यां सोबत. " आदर्श बोलला.
" हो आदर्श मला अजून एकत्र सगळ्यांमध्ये राहायची सवय नाही. तुम्ही मला सांभाळून घ्याल ना?"
" हो काही हरकत नाही. होईल सगळं व्यवस्थित. नाही तरी तू चांगलीच आहे वागायला. काही प्रॉब्लेम नाही आणि आता तू तर बघितले आहे आईने पण राग सोडलेला आहे. काळजी करायची नाही अजिबात." आदर्श बोलला.
" मला काहीच पद्धती माहिती नाही. सगळ्यांमध्ये वागायच बोलायच कस? जेवायच कस? "
"काळजी करू नकोस. नॉर्मल रहा नेहमी रहाते तस. "
त्यांनी दुपारी जरा वेळ आराम केला. संध्याकाळी सगळे बाहेर बसलेले होते.
" आपल्याला बाळाचं वारस दणक्यात करायचा आहे.
काही नाव सुचलं आहे का तुम्हाला? " प्रभाकर राव बोलले.
काही नाव सुचलं आहे का तुम्हाला? " प्रभाकर राव बोलले.
सगळे आदर्श आणि श्रद्धा कडे बघत होते.
" तुम्ही सुद्धा सांगा काही सुचत आहे का?"
"हो आम्ही सुचवू पण तरी तुम्ही दोघांचं काय म्हणणं आहे ते लवकर सांगा."
हो.
"श्रेयस नाव कसं वाटतं आहे." आदर्शने सांगितलं. श्रद्धाचं आणि त्याच आधीच ठरलं होतं. सगळ्यांना नाव आवडल.
"खूप छान नाव आहे आणि आपल्याला खूपच यश मिळेल. आपल्या साठी बाळ लकी आहे. आपण हेच नाव ठेवु." सगळे बोलत होते.
"ठीक आहे. पण माझ्या मुलाला कोणी लकी पायगुण वगैरे बोलू नका. त्याच्या कडून कुठलीच अपेक्षा ठेवायची नाही. तो एक फक्त बाळ आहे. छोटा आहे. त्याला काही समजत नाही. निरागस आहे अगदी. नुसत रडतो, दूध पितो, आणि झोपतो. " आदर्श सगळ्यांना बोलला.
श्रद्धाला खूप छान वाटल आदर्श अस बोलला तर. अगदी बरोबर आहे.
जेवताना श्रद्धा जरा अवघडलेली होती. बाकीचे छान बोलत होते. मोहिनी ताई, काकू गप्पा मारत होत्या. बाळ सुलभा कडे होत. श्रद्धा जेवत होती. बाळ रडायला लागल. श्रद्धा उठत होती. मोहिनी ताईंनी उठून त्याला घेतल. आदर्श खूप खुश होता. आई किती चांगली आहे. त्याच्या मनात आल.
त्या बाळाला घेवून फिरत होत्या. श्रद्धाच जेवण झाल. ती बाळाला घेवून रूम मधे गेली.
मोहिनी ताई जेवत होत्या. आदर्श जावून त्यांच्या गळ्यात पडला. "आई किती चांगली आहेस तू. किती सांभाळून घेतल मला. मी नीट नाही वागत ना .
" पुरे आता आदर्श अस तेच तेच बोलायच नाही. तुझ बाळ आहे ते. माझ्या साठी तू आणि तुझ बाळ खूप प्रिय आहे . तुझ्या साठी काहीही करेन मी. "
आदर्श किती तरी वेळ आई जवळ बसुन गप्पा मारत होता. त्याचा फोन आला. तो बाहेर फिरून बोलत होता.
मोहिनी ताई, आशा काकू खुश होत्या. "बरोबर करता आहात तुम्ही वहिनी. आता आपण अस करायचं. ह्या मुलीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल. आपल्याला आदर्श महत्वाचा आहे. त्याला आपण परत मिळवू."
" हो ना नाहीतर ती मुलगी अगदी आदर्शला सुट होत नाही. मला आधी पासून आवडली नव्हती. आदर्श साठी किती चांगल्या सुंदर मुली सांगून आल्या होत्या. त्याने काय बघितलं या मुलीत काय माहिती. तिच्या विरोधात गेलो तर आदर्श दूर जातो. त्या पेक्षा राहू दे तिला इथे. बघ आता मी काय करते. " मोहिनी ताई बोलल्या.
श्रद्धा आत आदर्शची वाट बघत होती. तिला झोप लागली. रात्री बाळ उठल्यावर ती उठली. आदर्श बाजूला झोपलेला होता. हे आता हल्ली अजिबात रूम मधे येत नाही. बाहेर बसलेले असतात. आदर्श स्टडी मध्ये काहीतरी काम करत होता लॅपटॉप वर तेव्हा तिने बघितल होत. जावू दे काम असेल. इथे बाळ रडत तर डिस्टर्ब होत असेल.
तो बाळाच्या आवाजाने उठला. "किती जोरात रडतो हा. शांत कर त्याला ."
श्रद्धा त्याला झोपवत होती. दार वाजल मोहिनी ताई होत्या. "बाळ का रडत आहे इतक?"
"काही नाही आई. भूक लागली असेल."
" जा तू झोप गेस्ट रूम मधे. तुझा आराम होणार नाही. सकाळी काम असेल ना. मी बघते त्याला."
"हो आई." आदर्श चालला गेला. श्रद्धाला वाटत होत आदर्शने तिच्या सोबत थांबव. पण ती काही बोलू शकली नाही. नको यांना ऑफिस असेल. आराम व्हायला हवा.
ती बाळाला दूध पाजत होती. पाच मिनिट थांबून मोहिनी ताई निघून गेला.
बराच वेळाने तो झोपला. श्रद्धा एकटी त्याला सांभाळ होती. सुलभा सकाळी येणार होती. ती कुठे तरी बाहेर गेली होती.
आदर्शला वाटल आई आहे श्रद्धा जवळ. तो आरामात झोपला.
सकाळी आठ वाजून गेले. आदर्श आवरून ऑफिसला निघून गेला. श्रद्धा उठली. हे गेले असतिल का ऑफिस मधे? कुठे आहेत हे बघू का. तिने फोन बघितला त्यात मेसेज आलेला नव्हता. सुलभा ताई आलेल्या होत्या. "आदर्श कुठे आहेत? "
"माहिती नाही मॅडम."
इथे कोणाला विचारणार. बाहेर जावुन बघू का? नको वाटत.
अदिती आली. ती तयार होती. "गुड मॉर्निंग वहिनी मी कॉलेजला जाते. बाळ कुठे आहे?"
"तो काय झोपला आहे."
ती त्याला भेटायला गेली.
"आदर्श आहेत का बाहेर?" श्रद्धाने विचारल.
"दादा ऑफिसला गेला. महत्वाची मीटिंग होती. "
ओके." मला हे सुद्धा सांगितल नाही यांनी. " ती विचार करत होती.
"बाळ केव्हा उठेल. सगळे बाहेर वाट बघत आहेत. आकाश दादाला आत यायच होत. तू झोपली असेल म्हणून तो आला नाही. बाळाला नेवू का?"
"हो ने ना. " ती हळूच बाळाला घेवून गेली.
श्रद्धाने आवरल. सुलभाने तिला नाश्ता दिला. ती आत बसुन खात होती. बाहेर बाळाचा आवाज येत होता. श्रद्धा बाहेर गेली. मोहिनी ताई, काकू बसलेल्या होत्या. बाळ बाजूला सोफ्यावर एकट रडत होत. दोघी त्याच्या कडे बघत ही नव्हत्या. श्रद्धाला आश्चर्य वाटल काल रात्री आई किती प्रेमाने बाळाला घेवून फिरत होत्या. आज काय झालं मग? की आदर्श समोर मुद्दाम सुरू होत. कठिण आहे. नवीन पाॅलीटीक्स आहे हे. नक्की यांच काय म्हणणं आहे. ती काळजीत होती.
ती बाळाला घेवून आत आली. किती बोर होत आहे इथे. एकदम कोंडल्यासारख. बाहेर ही जाता येत नाही. कोणी बोलत नाही. अदिती, आकाश, आदर्श तिघे छान होते. पण ते घरी नव्हते.
दुपारी आदर्शचा फोन आला. तिला खूप बर वाटल." तुम्ही सांगून का गेले नाही."
"तू झोपलेली होती."
"अश्या वेळी मेसेज टाकत जा ना . महत्वाची मीटिंग होती का?"
हो.
"कशी झाली. "
" एकदम छान."
" मला काही सांगितल नाही तुम्ही." श्रद्धा बोलली.
" तू कशाला एवढ टेंशन घेते. आराम करायचा. मस्त रहायचा. आता काय करते आहेस? बाळ झोपला का? "
सांगू का यांना की आज आई आणि काकू बाळा कडे बघत ही नव्हत्या. तो एकटा रडत होता. नको यांना खर वाटणार नाही.
" श्रद्धा तु काय करते आहेस ?" त्याने परत विचारल.
"काही नाही बसली आहे. बोर होत आहे."
"बाहेर जावुन बस जरा वेळ. सगळ्यांशी बोल."
"बाळ झोपला आहे."
"सुलभा ताई सांगतील तो उठला की."
"हो बघते."
ती चहाच्या वेळी बाहेर आली. प्रभाकर राव तिच्याशी थोड बोलले. मोहिनी ताई, काकू शांत होत्या. रात्री ते बाहेर कार्यक्रमाला जाणार होते तेच बोलत होते. ती जरा वेळ बसली, परत आत आली. या दोघी बोलत नाही माझ्याशी. जावू दे या पुढे आपल्या रूम मधे मन रमवायच. आदर्शला कस सांगणार पण या गोष्टी. पुढे जावून काय होणार आहे? तिला टेंशन आल होत.
