Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 38

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस
माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 38


संध्याकाळी चौघ आई, बाबा, काका, काकू कार्यक्रमाला गेले होते. आकाश, अदिती, आदर्श, श्रद्धा चौघ होते जेवायला. सगळे श्रद्धाच्या रूम मधे बाळाच्या आजुबाजूला होते.

"आज आपण पार्टी करू या का?" आकाश बोलला.

"पण मला नाही चालत काही खायला. " श्रद्धा बाळा साठी साध जेवत होती.

"हो वहिनीच जेवण साध आहे. "

"ठीक आहे. तुम्ही करा पार्टी. मी आहे सोबत. "

चालेल.

खुप मजा येत होती. अदिती आकाशने जेवण मागवल. थोड्या वेळ ते बाहेर बागेत येवून बसले.

" बाळाला सर्दी होईल नको आत चला. " आदर्श श्रद्धा आणि बाळाला घेवून आत येवून बसला. ते छान मुव्ही बघत होते. आज खूप छान वाटत होत तिकडे . रात्री उशिरा घरचे वापस आले तो पर्यंत श्रद्धा झोपलेली होती.

बारशाचा कार्यक्रम लगेच बाराव्या दिवशी होता. मोठी पूजा होती. नातेवाईक येणार होते. खरेदी झाली. बाळासाठी दागिने केले होते. श्रद्धा साठी दागिने साडी घेतली होती.

श्रद्धा बाळाला घेवून बसली होती. आदर्श समोर तयार होत होता. बाहेर जायला किती छान वाटत असेल ना. मी किती दिवस झाले घरात आहे. "आदर्श मला घरात कंटाळा आला आहे."

"काय करणार पण बाळ खूप लहान आहे तुझी ही आता डीलेव्हरी झाली. तुला आरामाची गरज आहे." त्याने बाळाला घेतल. पापी दिली. तो बाळाशी बोलत होता. छान रहायच आईला त्रास द्यायचा नाही. रडायच नाही. "श्रद्धा आता बारशाला पाहुणे येतील तुला करमेल. "

"आदर्श काय काय असेल प्रोग्राम? मी माझ्या मैत्रिणींना ही बोलवू का?" ती थोडी उत्साही होती.

" तू आईला विचार ना. मला आता यातल काहीही माहिती नाही."

" पण मी कस विचारणार? "

" हे बघ ती तुझ्याशी बोलत नाही हे मला माहीती आहे. तुला ही प्रयत्न करावे लागतील. आपणहून बोलत जा तिच्याशी. तिच्या अनुभवाचा फायदा करून घे. बाळाला तिच्या कडे देत जा. तुमच नात तुम्ही नीट करा." आदर्श भराभर सांगत होता.

"तुम्हाला वाटत तेवढ सोप आहे का हे? " श्रध्दा नर्व्हस होती.

" अग ती खूप चांगली आहे. एकदा बोलून बघ तिच्याशी . हे नीट झाल तर किती छान होईल. तुला हे कराव लागेल."

श्रद्धा विचार करत होती प्रयत्न करायला हवा. चांगल झाल तर मला ही हव आहे ते. अस टेंशन मधे राहू शकत नाही. काय करू पण त्यांच्याशी बोलायच म्हणजे भीती वाटते.

आदर्श आवरून रेडी होता." चल येते का आई कडे मी जातो आहे."

चला.

" चला आजीकडे जावू. " त्याने बाळाला घेतल.

दोघ मोहिनी ताईंच्या रूम मधे आले. त्यांनी पुढे होवुन बाळाला घेतल.

"बस बेटा." बाबा बोलले.

आदर्श त्यांच्याशी बोलत होता. "बाबा तुम्ही येतं आहात का?"

"हो. चल निघू ."

आज महत्वाची डील होती. सगळे त्या बद्दल बोलत होते. श्रद्धाला काही माहिती नव्हत. तिला वाईट वाटल. आता हल्ली हे मला काही सांगत नाही. जावू दे आता जास्त विचार करायचा नाही. बाळ थोडा मोठा झाला की मी करेन काम.

ते दोघ निघाले. श्रद्धा तिथे बसली होती.आदर्श गेल्यावर काय होईल हेच श्रद्धाला बघायच होत. तिला वाटल होत तेच झाल. त्यांनी बाळाला सुलभा कडे दिल. त्या त्यांच्या त्यांच्या बिझी होत्या.

बोलू का? तिने हिम्मत केली. "आई बारशाच्या दिवशी काय काय प्रोग्राम आहे? म्हणजे मला तशी तयारी करावी लागेल? माझ्या मैत्रिणींना बोलवू का?"

त्यांनी तिच्या कडे रागाने बघितल. "मी बोलते का तुझ्याशी? मग कशाला बळजबरी बोलते. मी तुझी आई नाही फक्त आदर्शची आई आहे. मला मॅडम बोल. उठ इथून नीघ. परत या रूम मधे यायच नाही . नात जोडायची काही गरज नाही." त्या रागात बोलल्या.

" आई माझ काही चूकलं का? तुम्ही म्हणत असाल तर मी माफी मागते तुमची. आपण एक चान्स देवू ना आपल्या नात्याला. तुम्हाला माझा राग आला का. तुम्ही ओरडा मला. या पुढे तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. प्लीज आपण नीट राहू ना." ती हळूच बोलली.

" हे बघ मला तुझ्यात अजिबात इंट्रेस्ट नाही. तुझ्या पेक्षा माझ्या कडे काम करणारे लोक अजून चांगले आहेत. तुला मी मॅडम बोलायला सांगितल ना. आई म्हणण बंद कर. "

" सॉरी मॅडम. आता आहोत आपण सासू सून तर नीट राहू या ना."

" मला तुझ्या सोबत कोणत नात नको. तू कोण आहे काय आहे माहिती नाही. तुझा उद्देश काय आहे? का या घरात शिरली आहेस तू . पण मी सांगून ठेवते सगळे तुझ्या साध्या दिसण्याला भुलले. माझ्या समोर तुझ काहीही चालणार नाही. "

आशा काकू आल्या." वहिनी काय झाल? तब्येत सांभाळा. का चिडचिड करता आहात? ही काय करते आहे इथे? "

"आशा ही बघ सदोदित माझ्या तोंडासमोर येते. इच्छा नसून बोलते. माझी चिडचिड होते आहे. हिला जायला सांग. " मोहिनी ताई बोलल्या.

" काय ग तुला समजत नाही का? का त्रास देते वहिनींना. एक तर तुझ्या मुळे मागच्या वर्षभर त्या आजारी होत्या. ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना. काही करता काही झाल तर. कोण जबाबदार राहील. " काकू अस बोलल्यावर श्रद्धा दचकली.

सॉरी.

" नीघ इथून. "

श्रद्धा बाळाला घेवून पटकन निघाली.

रूम मध्ये आल्यावर ती रडत होती. सुलभा बाजूला उभी होती." मॅडम पोराला मांडीवर घेऊन रडू नये. डोळे पुसा बर. "

" सुलभा मी खूप वाईट आहे का? "

" नाही मॅडम. "

" मग या दोघी मला अस का करतात. "

" सासर आहे हे. इथे अस होत. जे केल नाही त्याच्या आरोप पण आपल्यावर होतो. तरी तुम्हाला घरकाम नाही. नाहीतर हे असे कडू शब्द ऐकत सगळे काम करावे लागतात. पोर लहान असतात. त्यांच्या कडे कोणी बघत नाही. त्यांचे हाल होतात. नवरा ऐकत नाही. काय काय सांगू अजून." सुलभा तिच्या अनुभवाचे बोल सांगत होती.

खर आहे. बाकीच्या बायकांना किती त्रास असेल. श्रद्धा विचार करत होती. " मला इथे आवडत नाही. मला आधीच्या बंगल्यावर रहायला जायच आहे. "

" पोरगा गोड आहे तुमचा. शांत रहा मॅडम. होईल ठीक. अस अडकुन जातो या संसारात. त्यातून सुटका नाही. एक दिवस ठीक होईल ही आशा असते. द्या त्याला इकडे मी झोपवते."

दिवस भर श्रद्धा रूम मधे होती बाहेर जायची तिची हिम्मत झाली नाही. रात्री आदर्श आला. सगळे जेवत होते. तो फ्रेश होऊन आला. श्रद्धा जवळ जावून बसला. दोघ बोलत होते. श्रद्धा आता खुश दिसत होती. ती त्याला जेवायला द्यायला उठली. मोहिनी ताई उठून आल्या. तू जेव. नंतर बाळ रडत तर नीट जेवण होत नाही. मी वाढते तुला आदर्श.

आदर्श खुश होता आई किती समजूतदार आहे. श्रद्धाला सांभाळते.

सुलभा श्रद्धा कडे बघत होती. काय बाई आहे ही. सकाळी श्रद्धा मॅडमला किती बोलली. हाकलून दिल. आता मुला समोर किती प्रेमाने बोलते आहे.

मोहिनी ताईंना तीच भीती होती श्रद्धा आदर्शला काही सांगेल त्या आधी त्यांनी त्यांची बाजू सेफ केली.

जेवण झालं. ती रूम मधे आली. तिला आता सवय झाली होती. एकट रहायची. मोहिनी ताई आदर्श सोबत बोलत बसायच्या. त्याला रूम मधे येवू द्यायच्या नाही. रात्री ही त्याला दुसरीकडे झोपायला पाठवायच्या. श्रद्धाला त्याच्याशी बोलायला वेळ नव्हता. नाहीतरी काय बोलणार आदर्श सोबत. जस या मॅडम वागता ते सांगता येणार नाही. आदर्शला विश्वास बसणार नाही. ठीक आहे मी पण आदर्श सोबत गोड वागेल. त्यांची आयडिया वापरेल.

नेहमी प्रमाणे आदर्श तिकडे गेस्ट रूम मधे झोपला होता. सकाळी तो इकडे बाळाला भेटायला आला.

"अहो माझी पाठ खूप दुखते आहे थोड बघा ना."

आदर्श ने दार लावल. तिची पाठ दाबून दिली. "तुझी एकटीची धावपळ होते ना. मला पण खुप काम आहे. नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे."

"ब्रीज प्रोजेक्टच काय झालं?"

तो प्रोग्रेस सांगत होता.

"अहो तुम्ही रात्री थोड्या वेळ बाळा सोबत वेळ घालवत जा ना. नाहीतरी तो तुम्हाला विसरून जाईल. आणि मला ही तुमच्या सोबत थोडा वेळ घालवायचा आहे. तुम्ही आमच्या सोबत असले की बर वाटत. तुम्हाला माहिती का प्रेमळ लोक आजूबाजूला असले की बाळ बाळांतिणीची तब्येत चांगली रहाते. म्हणून बहुतेक डीलेव्हरी साठी माहेरी जात असतिल. " तिला आईची आठवण येत होती. एकदम डोळ्यात पाणी आलं. आई असती तर किती खुश झाली असती. माझ किती केल असत तिने. माझ्या बाळाला कुठे ठेवू कुठे नको अस केल असत.

आदर्शला ते समजल. त्याने तिला मिठीत घेतल. "जास्त विचार करायचा नाही श्रद्धा. तुझ बरोबर आहे. मी आता तुझ्या सोबत रहात जाईल. मला तिकडे आवडत नाही गेस्ट रूम मधे. एकट एकट वाटत."

"बाळ रोज विशेष रडत नाही. लगेच दूध पिऊन झोपतो. म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही इथे रहा ना. जर बाळ खूप रडला तुमचा आराम झाला नाही तर तिकडे जा. मला तुम्ही जवळ हवे आहात. " श्रद्धाने त्याला सावकाश समजावलं

" ठीक आहे."

" अहो आपण आधी सारख रोज छान गप्पा मारत जावु. बाळाला आई बाबा दोघ हवे."

" हो ना. " आदर्श बाळा जवळ गेला त्या दोघांना एकत्र बघून श्रद्धा खुश होती.

आदर्श बाहेर आला. मोहिनी ताई दारात उभ्या होत्या. त्यांना आदर्श श्रद्धा आत होते ते सहन झाल नाही. "काय झालं रे काही प्रॉब्लेम?"

"नाही आई."

त्या आत वाकून बघत होत्या. "बाळ ठीक आहे ना."

हो.

"जा आत."

त्या आत आल्या नाही.

ह्या काय अश्या बघता आहेत. त्यांचा मुलगा बायको मुलासोबत होता. कोणी इतर लोकांसोबत नाही.

त्या दिवशी आदर्श श्रद्धा आणि बाळा सोबत होता. रात्री तो तिथेच झोपला. मोहिनी ताई बोलत होत्या गेस्ट रूम मधे जा. बाळ रडत.

" हो जातो." बोलून तो गेला नाही. श्रद्धा जवळ होता.

ती खुश होती. आदर्श माझ्या जवळ असेल तर कोणी किती त्रास दिला तरी मला फरक पडत नाही. ती त्याच्या मिठीत झोपली. बाळाने पण काहीच त्रास दिला नाही.

बारशाच्या दिवस आला. मीना आली होती . तिला बघून एकदम श्रद्धाच्या डोळ्यात पाणी आलं.

"काय झाल ग? "

"काही विचारू नकोस. मॅडम खूप त्रास देतात." श्रद्धा हळूच बोलली.

"मॅडम काय म्हणते त्यांना? सासुबाई कींवा आई म्हण."

"त्यांनी तस सांगितल आहे. मी फक्त आदर्शची आई आहे तुझी नाही. मला मॅडम म्हण. माझ तर ठीक आहे त्या बाळाचा सुध्दा राग राग करतात. मी काय करू मीना? अग आदर्श समोर त्या नीट असतात. मला एकटीला त्रास देतात. बाळ एकट रडत असत तरी बघत नाही. मी वैतागलो आहे. अस पूर्ण आयुष्य कस जाईल?"

" आदर्श सरांशी बोल या बाबत. "

" काही उपयोग नाही त्यांना खर वाटणार नाही. सासुबाई रंग बदलतात. मला ना खूप टेंशन आल आहे मीना. एक सांग काही झाल तरी तू मला सपोर्ट करशील ना. "

" हो मी आहे. " मीनाला काळजी वाटत होती.

" मी कधीही अर्धा रात्री फोन केला तरी बघ. "

"हो नक्की. आटोप आता. " ती बाळाला घेवून बसली होती ." मावशी आहे ना तुमच्या साठी. हो ना बाळा. आपण छान राहू. आईला सांग टेंशन घ्यायच नाही. आता छान छान तयार व्हा चला. "

श्रद्धा अजूनही विचारात होती.

" श्रद्धा आता मूड बदल. आज आपल्या बाळाचा छान प्रोग्राम आहे ना. आपल्या साठी महत्वाचा दिवस. चल साडी नेसून तयार हो." मीना बोलली.

"मला काही करायची इच्छा नाही. फक्त इथून जायच आहे."

"कुठे जाणार? काहीही काय विचार करते. श्रद्धा शांत हो."

"जिथे घरात शांती असेल, प्रेम असेल असेल, तिथे जायच मला. चांगली समजूतदार लोक हवी. या वातावरणात मला श्वास घेता येत नाही . तुला माहिती का डीलेव्हरी नंतर मला अगदी त्रास होतो आहे. मन प्रसन्न रहात नाही. मला आधाराची प्रेमाची गरज आहे. याच वेळी हे असे सासरचे लोक इतके त्रास देत आहेत. त्या स्वतः आई आहेत. अस कस करू शकता त्या दुसर्‍या स्त्री सोबत. " श्रद्धा खूप बोलत होती.

" मूड चेंज कर ना श्रद्धा. सुलभा ताई बाळाला घ्या मी श्रद्धा ला तयार करते." मीना कामाला लागली.

सुंदर गोल्डन कलरची सिल्कची साडी ती नेसली होती. त्याला लाल काठ होते. साधी वेणी त्यावर गजरा लावला होता. टिकली, मंगळसूत्र, हातात बांगड्या छान दिसत होत्या . डीलेव्हरी नंतर श्रद्धाच्या चेहर्‍यावर खूप तेज होत. ती खूप सुंदर दिसत होती.

सुलभा बाळाला तयार करत होती. आदर्श आधीच तयार होता. तो बाहेर बसला होता. बाहेरून बोलवण आल. ती बाळाला घेवून बाहेर गेली. मीना, सुलभा सोबत होत्या.

"वाह वहिनी किती गोड दिसते आहेस तू." अदिती तिच्या जवळ आली.

आदर्श पटकन पुढे आला. तिच्या कडून बाळाला घेतल. त्याची नजर तिच्या वरून हटत नव्हती. तिला समजल. ती लाजली होती. दोघ पूजेला बसले. आदर्श जवळ बाळ होत. थोड्या वेळाने तो रडायला लागला.

"गुरुजी अजून किती वेळ असेल पूजा? "

" तुम्ही दहा मिनिट बाळाला घ्या. आपण थांबू ."

श्रद्धा त्याला घेवून आत आली. दूध पिऊन तो झोपला. आदर्श आत आला. "झोपला का हा?"

"हो.

" चल बाहेर. "

"याला घ्या ना. "

तो तिच्या जवळ आला. तिच्या कडे बघत होता." श्रद्धा आज तू वेगळीच दिसते आहेस. एकदम सुंदर. साडी छान आहे."

"कसल काय? पोट कमी होईल का हो माझ. "

" हो बरच कमी झाल आहे. आता तो विचार तू करू नकोस. तुझी बाळाची तब्येत महत्वाची आहे. बाळ दूध पितो. आता वजन कमी करायचे नवीन प्रयोग करायचे नाहीत. तू जशी आहे तशी मला खूप आवडते. " त्याने तिला मिठीत घेतल.

" अहो सरका ना बाजूला. "

" नाही. राहू दे तुझ्या जवळ. "

"अहो काय हे? कोणी येईल ना ."

"येवू दे माझी बायको आहे. आणि आज ती खूप सुंदर दिसते आहे. डॉक्टर काय म्हंटले? किती दिवसानी मी तुझ्या जवळ येवू शकतो." आदर्श काय बोलतो आहे ते तिला समजल.

"अजून नाही. टाके ओले आहेत. आपण डॉक्टरां कडे जावू दोन महिन्यांनी." तिने सांगितल.

"नाही. काय यार इतके दिवस आहेत अजून? मला आता कंट्रोल होत नाही. श्रद्धा लव यु. "

ती लाजली.

" श्रद्धा आपण छान सोबत रहायच रोज. बाकी काही नाही तर मानसिक आधार होईल एकमेकांना." आदर्श बोलला.

"हो. चला बाहेर जावू. " माझ्या पासून हे दूर राहू शकत नाही ह्याची तिला खात्री पटली. दोघ बाहेर आले.


0

🎭 Series Post

View all