माझ्यासाठी वेळच नाही

माझ्यासाठी वेळच नाही
" निखिल हे घे गरमा गरम न्यूडलस"

" वॉव मस्त वास येत आहे."

" एकदम टेस्टी झाले आहेत." एक घास खात तो म्हणाला.

" थॅन्क्स." ती म्हणाली.

" निखिल काही तरी प्रोग्रॅम लाव ना. खाता खाता एन्जॉय करु."

" हो चालेल. काय लावु.?."

" तुला आवडेल ते लाव."

" स्टार स्पोर्ट्स का ? फूट बॉल मॅच आहे. ती बघायची ?"

" प् च्च.. निखिल आता काय मॅच बघायची आहे का. काहीतरी चांगलं लाव ना." ती रागावून म्हणाली.

" बर ठीक आहे, मग एखादी वेब सीरिज लावू. परवा अमेझॉन प्राईम वर आपण ऍड बघतली होती ती. सस्पेनस आहे. ती वेब सीरिज लावू."

" मी आता वेब सीरिज बघु, वेब सीरिज बघायला किमान एक तास लागेल. एक तास काय मी खात राहू का ? "

" अग अस म्हणत, आता काहीतरी चांगला प्रोग्रॅम बघायचं म्हणत होतीस म्हणून मी विचारलं ? मग दुसर काय बघतच ? तूझ्या आवडत्या हिरोची मूव्ही लावु. कोण अब्राहाम ची " अनुज ने विचारलं.

" प्लिज हा. गिव्ह मी ए ब्रेक, तो पिचर् मी दहा वेळा बघितला आहे. त्याचे डायलॉग पण पाठ झाले आहेत! "

" मग तूच सांग काय बघायच आहे तुला ? "

" तूझ्या आवडीच काहीतरी चांगलं "

" त्या पेक्षा आपण कार्टून लावु या का ? "  तो विचारतो

" कार्टून बघायला मी काय लहान मुलगी आहे का ? " तिने विचारलं. अनुजला समजत नव्हत काय करायचं !

" चल राहू दे , तुला ना माझ्या सोबत टीव्ही बघायचाच नव्हता. तुला फक्तं माझ्याशी भांडता येत . "

" काय..?"

" मग.. हे बघ "
ती तिच्या रिकाम्या प्लेट कडे इशारा करत म्हणाली.

" माझे न्यूडलस खाऊन झाले तरी देखील तुला माझ्या सोबत एखादा चांगला प्रोग्रॅम नाही बघता आला." ती चिडून म्हणाली.

" आता आण ती डिश, गरम करून आणते. मग बघ तुला जे बघायचं आहे ते." ती त्याच्या कडची प्लेट गरम करून आणण्या साठी घेउन गेली.

"हे नाही बघायच , ते नाही बघायच , हिच ठरत नव्हत काय बघायचं आहे, आणि मला म्हणते मला तिच्या सोबत टीव्ही बघायचा नाही आहे."


🎭 Series Post

View all