Login

माझ्याशी ही बोला भाग 4 अंतिम

माझ्याशी ही बोला मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे
माझ्याशी ही बोला भाग 4 अंतिम
मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे

©️®️शिल्पा सुतार

कार्यक्रम झाला मुलाकडचे लोक गेले. राखीने निघायची तयारी केली.

" थांबली असती एक दोन दिवस." आई बोलली.

"नाही आई सासूबाई नाही म्हटल्या. जाते मी लग्नाच्या वेळी येईल आठ-पंधरा दिवस." राखी बोलली.

"मी बोलून बघू का जावई बापूंशी? "

"नको आई ."

ते दोघ निघाले नेहमीप्रमाणे त्यांच्यात अबोला होता. गावा बाहेर आल्यानंतर तिला तिची मैत्रीण दिसली.

" अहो जरा थांबा ना पाच मिनिट. " ते तिथेच टपरीवर चहा घ्यायला थांबले. तिची मैत्रीण खूप बोलत होती. घरी चल आग्रह करत होती. थोडं बोलून ती गेली.

संतोष तिच्याकडे बघत होता. "झालं का सगळं? जायचं का आता घरी." तो चिडलेला दिसत होता. तिने उत्तर दिल नाही. तो चिडला तिला हाताला धरून स्वतःकडे फिरवल. "काय सुरू आहे तुझ तू बोलत का नाही माझ्याशी?"

"मी दुर्लक्ष करते तर कस वाटत? मी किती दिवसा पासुन तुमच अस वागण सहन करते आहे. " राखी बोलली. आज तिने ठरवल होत यांनी विषय काढला तर सोडायच नाही.

"म्हणजे काय? तुला काय कमी आहे आपल्या घरी. काहीही समज करून घ्यायचा. कसही वागायचं." तो चिडला.

"हेच तर तुम्हाला लक्ष्यात येत नाही. माझ्या घरी आल्यानंतर तुम्ही माझ्याकडून फाईव्ह स्टार ट्रीटमेंटची अपेक्षा करतात आणि तुमच्या घरी माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. हे अस वागण बरं आहे का? आता कसं वाटलं तुम्हाला? तसंच मला वाटतं नेहमी तुमच्या घरी. मी किती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काही सांगितलं की म्हणतात मला विचारू नको आईला सांग. तसेच तुम्ही मला सामान मागितल्यावर मी सांगितलं मला सांगू नका पिंटूला सांगा. "

"माझी पिंटूशी ओळख आहे का?" तो वैतागला होता.

"मग माझी पण तुमच्या आई-वडिलांशी ओळख होती का? बोलायच तसच. मी करतेच आहे ना रोज ऍडजेस्ट. एखाद्या दिवशी तुम्ही ही करून बघा अस. शेवटी जे पेरू तेच उगवतं. तुम्ही मला कसे तुमच्या घरच्यांवर सोपवून मोकळे होतात. तसेच मी केलं. माझ्या घरचे होते की तिकडे तुमच्या कडे बघायला. तुम्ही थोडी वनात पडले होते. आता का त्रास झाला?"

तो तिच्या कडे बघत होता.

"मी पण तुमच्या घराची एक मेंबर आहे. पण तुम्ही सगळे तसे वागत नाही. मला एकटीला पाडतात. विचार करा मला कस वाटत असेल. तुमच्या घरचे चांगले आहेत तरी पण मला तुमची ही साथ हवी आहे. आपल नात वेगळ आहे. पती पत्नी मधे नुसत शारीरिक संबध असून उपयोग नाही तर ते दोघ मानसिक रित्या ही तितके जवळ हवे. एकमेकांना आधार ही देण गरजेच आहे. मला प्रेमळ समजून घेणारा जोडीदार हवा आहे. एवढ मोठ आयुष्य मी एकट कस काढु?"

तो विचार करत होता. "या पुढे अस होणार नाही. मला हे लक्ष्यात आल नाही. मी मुळात शांत आहे पण तुझ्यासाठी नाही. थोडा वेळ लागेल पण या पुढे तुला तक्रार साठी जागा ठेवणार नाही."

"मी पण तुम्हाला माझ्या माहेरी एकट सोडणार नाही." ती बोलली.

तो थोडं हसला.

"चल वडा पाव खाते का?" तो टपरी कडे बघून बोलला. दोघ अगदी नवीन ओळख झाल्या सारखे खुश होते.

हो.

आपला नवरा आपल्याला समजून घेत असेल, प्रेमाने वागत असेल तर स्त्रीला कोणती गोष्ट अशक्य नाही. ती आहे त्या परिस्थितीत रहाते. अजिबात तक्रार करत नाही.

आज संतोष लवकर घरी आला. आई बाबा मंदिरात जायच्या तयारीत होते. त्याने स्वतः किचन मधे येवून डबा घासायला दिला. ती छान हसली.

"हे घे तुझे आवडते समोसे. जिलेबी."

तिने छान चहा ठेवला. सगळ्यांना दिला. ती उभी होती.

"तुझी प्लेट कुठे आहे." संतोषने विचारल.

"हो घेते."

"आमच्यात येवून बस."

ती खुश होती. थोडा का होई ना बदल झाला होता. हळू हळू होईल ठीक तिला आशा होती. संतोष नीट वागत होता.

तिने स्वयंपाक करून घेतला. सासू सासरे आले. जेवण झालं.

"राखी चल आपण थोड फिरून येवू." संतोष बोलला. सगळ्यांमधे बोलता येत नव्हत.

ती नणंदेला सोबत घेत होती सासुबाई बोलल्या. "अग तिला अभ्यास करू दे . तू जा संतोष सोबत."

ती खुश होती. चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होत. तो तिच्या खुललेल्या चेहर्‍या कडे बघत होता. किती छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो हिला.

" अहो थँक्यु."

तो हसला. "बर झाल तू आत्ताच मला जाणीव करून दिली. नाहीतर दोन मुल झाल्यावर म्हटली असती हे बोलत नाही माझ्याशी."

"तुम्हाला राग नाही ना आला माझा."

"नाही मला एवढ्या सहजासहजी राग येत नाही."

ती खुश होती त्याला बिलगून चालत होती. तो माझा आहे. तिला खूप छान वाटत होत.

बर झालं ना तिने परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला. आता ती खुश होती.
******** कथा — पूजा

"अगं काही खात पीत नाहीस का? किती रोडावली आहेस?"

पुजाची मैत्रीण तिला अचानक रस्त्याने जाताना भेटली आणि तिने पूजाला बघितल्या बघितल्या हे उद्गार काढले. पुजाचा नवराही सोबत होता,

"काय हो जीजू? माझ्या मैत्रिणीला उपाशी ठेवतात की काय?" मैत्रिणीने हसूनच विचारलं.

शेखरला काय बोलावं कळतच नव्हतं. दोघेही घरी आले तेव्हा शेखरने पूजाला विचारलं,

"येणारा जाणारा प्रत्येकजण हेच विचारत असतो तुला, तू खरंच इतकी रोडावली आहेस?"

"नाही ओ.. खूप दिवसांनी बघतात ना ते मला म्हणून..बाकी काही नाही.."

"मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो, तू वेळेवर आणि पोटभर जेवतेस ना? नाष्टा करतेस ना?"

हे ऐकल्यावर मात्र पूजाला भरून आलं, तिला बोलताही येईना..

"काय गं काय झालं?"

"काही नाही.."

पुजाचं एकंदरीत वागणं बघून शेखरला कळलं की काहीतरी बिनसलं आहे. हिचं कृश होणं यामागे काहीतरी कारण आहे. पूजाही नीट सांगत नव्हती मग शेवटी त्यानेच छडा लावायचा ठरवला.

घरात पुजाचे सासू सासरे आणि शेखर एवढीच माणसं. त्यामुळे रोज वेळेवर नाष्टा आणि स्वयंपाक होतच असे. मग नेमकं पाणी कुठे मुरतंय हे शेखरला आज बघायचंच होतं. सुट्टीचा दिवस असल्याने त्याने घराकडे लक्ष द्यायचं ठरवलं.

सकाळी सर्वांचा चहा झाला तेवढ्यात सासूबाईंनी आवाज दिला.

"दूध तापव गं सुनबाई परत एकदा, नाहीतर खराब होईल.."

शेखर किचनमध्ये गेला, कोमट दूध त्याने दोन कपात घेतलं आणि एक पुजाकडे दिला.

"अहो हे कशाला?"

"मी सांगतो म्हणून..घे.."

शेखरने कप पुजाच्या हातात दिला आणि तो हॉलमध्ये बसला. पूजा उभ्या उभ्या दूध घेत होती, सासूबाईंनी ते पाहिलं आणि म्हणाल्या,

पूर्ण वाचा लिंकवर

0

🎭 Series Post

View all