Login

मी देखील तुमचीच आहे भाग २

घराण्याचा वारसा चुकीचा निर्णय घेतो.
मागच्या भागात आपण पाहिले माई परत एकदा नातच झाली म्हणून हताश झाली आहे. ती विचार करत घरातच बसते. तेव्हा तिची मैत्रीण विचारपूस करायला घरी येते. दोघींमधे मुलगा आणि मुलगी झाली तर काय होत यावर चर्चा रंगत असताना श्याम तिथे येतो. तो देखील माईला सांगून थकतो. आता पाहूया पुढिल भाग.

" मला आताच मावशीकडून समजल म्हणून. मला‌ वाटल मी कामावर गेल्यानंतर तू आधी सारखी मैत्रिणींशी बोलायला जात असशील. घरात एकटीच बसून उग नको तो विचार करत राहती."

" घरात म्हणजे घरातली काम करायला वेळ पुरत नाय बघ. आधी सूनबाई घरातल आवरायच बघ की. मला काय तवा कामच नसायच. तेव्हा जायचे बोलायला त्यांच्याकडे."

" आपलं दोघांच तर करायच माई. तूझ्या कामाचा वेग मला माहित आहे. तू पाच मिनीटांत इकडच जग तिकडे करुन टाकते. वेळ तुझ्याकडे उरत असणार खात्री हाय मला."

" माझ पण वय झाल आता. शरीर थकत चालल बघ."

" उद्या पारुला घरी आणायच आहे आपल्या. तुला म्हणजे जाता येईल मैत्रिणींशी गप्पा मारायला."

" मला खुळ समजाया का? तुलाच बायको बिगर करमत नाय. आणि माझ नाव पुढ करतो."

" माई काय झाले ओ. मी माहेरी गेल्यापासून तब्येतीकडे तुमचे अजिबात लक्ष नाही. किती बारीक दिसता आहात. चेहरा देखील सुकला आहे तुमचा."

" घरातल्या कामाची आता सवय राहिली नायतर तस वाटत असल तुला."

" मला माहित आहे. यावेळी देखील मुलगीच झाली मला. म्हणून तुम्ही विचार करत बसला आहात. पण माझ्या तरी हातात काय आहे बघा. देणारा तो आहे. मी तर सगळे प्रयत्न करत आहे. तुमच्या डोळ्यांनी पाहता तुम्ही."

" मी तुला चुकीच नाय समजत. पण काय करु मला नातूच हवा हाय."

" माई आता बास कर तुझे."

" अहो, नका ओरडू तुम्ही."

" आता डोक‌ जाम झालय. पण माईला काही कळतच नाही. जर आपल्या नशिबात पोरीच लिहल्या तर का नातूच हवा हिला. याच पोरी उद्या नाव कमावतील."

" तव्हाच तव्हा बघू."

एक वर्षानंतर,

" काय झाल सूनबाई कोरड्या उलट्या होतात का तुला."

" नाही ओ. अपचन झाल असणार. "

" डाॅक्टर कडे जावून ये तू एकदा."

" घरातल काम आवरुन जावून येते."

" राहू दे कामाच. मी आवरते. तू जावून ये."

" बर माई."

" काय म्हणाले डाॅक्टर. तब्येत बरी हाय ना."

" तुमची शंका खरी ठरली. दिवसच गेले मला."

" बास झाल आता. मला जे काय होईल ते नको आता. अजूनही वेळ गेली नाही. उद्याच आपण जावून हे मूल नको असणार आॅपरेशन करुन टाकूया."

" आर अस नग करु. या वक्ताला ऐक माझ. मला नातूच होईल बघ तू."

" तिन मुली झाल्यानंतर मुलगीच झाली तर. पुन्हा तू मुलगा व्हावा म्हणून मागे लागशील."

" आता मला समजलय. पण हे एवढ राहू दे. जे होईल ते होईल. मी काय दोष देत बसणार नाय."

" आज लय खूश दिसायली. नात चांगल्या मार्कांनी पास झाली, की श्यामला नविन नोकरी लागली."

" परत एकदा माझी सून गरोदर हाय. या वक्ताला तिला पोरगच होईल बघ तू."

" झाल का तूझ चालू परत तसे. नातूच दिसाया लागला समदीकड तुला."

" ओल्या शेंगा हाय ना माई तुझ्या शेतात आता."

" हाय ना मंदा कशाला हव ग तुला."

" माझी लेक येणार हाय तिला घ्यायच्या हायेत."

" येवू दे की कधी पण. मी श्यामला शेंगा पोत्यात भरुन ठेवायला लावते."

आठ महिन्यानंतर.

" आर तिला जपून घेवून जा दवाखान्यात. बाकीच मी संभाळते."

" पहिल्यांदा माई तू इतकी प्रेमान सांगितले."

" काय रे, श्याम काय झाल."

" शेवटी देवला बी तुझे ऐकाया लागले."

" झाल तरी काय असं. उगाच जिवाला नको घोर लावू माझ्या. बोल घडाघडा."

" अग तुला नातू झालय बघ. "

" खर बोलाया. मला नाचावं वाटत हाय आता. समद्यांना ओरोळी ठोकत ही बातमी द्यायची हाय बघ. तू पहिलं पाच किलो पेढे आण."

" एवढ काय करायचं."

" तू फकस्त आणायच काम कर. "

" माई, तू तर कमालच केली. एका पण गल्लीतला माणूस रिकार्ड सोडला नाहीस. ऐवढे पेढे वाटून संपवले पण. ते हि इतक्या लकवर. उड्या मारत दिले काय सगळ्यांना."

" मी जे बोलले तेच झाल ना. माझी मस्करी नको करु आता."

" धन्य झाली तूझी. तू जिंकली मी हारलो बास का आता."

" तू तर स्वत:हून नातवाची मालिश कराया पण लागली का?तनूला तर जवळ पण घ्यायची नाहीस. तेव्हा खाली बसल्यावर चमक निघते बोलायची. आता नाही निघत का चमक."

" काही पण काय र. माझ्या नातवाचं सार काही मीच करणार हाय बघ."

" अहो का‌ उगाच वाद करताय. कितीतरी वर्षांनी माईंच्या चेह-यावर आनंद पाहते मी. घेवूद्या त्यांना सुखाचा अनुभव."

" बरोबर आहे तुझे पारु. तिने खरतर तपश्चर्याच केली अस वाटत आहे. त्याचे फळ देखील मिळाले तिला."

" श्याम हिला जरा घे तू. मधेच आली तर तेलामुळे घसरूण पडेल बघ ती."

" बाबा मी आधीच पुसून घेतले आहे तिथे."

" माझी छकुली आता मोठी झाली काम करायला."

" आता पासूनच वळण लागल तर मोठेपणी जड जात नाही."

" बरोबर हाय सुनबाई."

पुढे माई नातींन बरोबरच नातवाला देखील समजूतीच्या गोष्टी सांगू शकतील का? पाहूया अंतिम भागात.

क्रमशः

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all