Login

मी देखील तुमचीच आहे अंतिम भाग ३

मुलगी देखील घराला मुलांइतकीच जपू शकते. घराण्याच नाव उंचाऊ शकते.
मागील भागात आपण पाहिले की अखेर माईच्या मनासारखे घडून त्यांना नातू होतो. त्याचे सर्व कौतुक सोहळे माई आनंदाने पूर्ण केले होते. आता पाहुया पुढिल भाग.


" नाती काॅलेजला आणि नातू या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसला. तरी तुम्हांला काही टेन्शन नाही."

" माझा नातू राजबिंड आहे. त्याला ९० टक्के पडतीलच."

" पाहूया रीजल्ट लागल्यावरच."

" आई, हे बघ मला काय मिळाले."

" काय ग? "

" मला काॅलेजच्या कॅम्पस मुलाखती मधून नोकरी मिळाली आहे."

" एवढ्या लहान वयात नोकरी करायची गरज नाही. तुमचा बाप भक्कम आहे पैसे कमवायला."

" हि संधी काही निवडक मुलींनाच मिळाली आहे."

" बर. तुझी तब्येत घरी आईला मदत करुन जर नोकरी करता आली तरच तुला परवानगी मी देईल."

" नका काळजी करु बाबा तुम्ही. जास्त नाही पण थोडेफार पैशाची मदत होईलच तुम्हांला."

" आई, आज मला स्पर्धेत ट्राॅफी मिळाली."

" बाळा खूप छान. तुझ्या आवडीची बासुंदी आज रात्रीच्या जेवणात बनवून देईल . "

" माझ्याकरता तर माई सोडून कोणीच काही बनवत नाही."

" काय पाहिजे तुला मला सांग मी तुला करुन देते."

" माई तुला ठाऊक आहे. मला नाही आवडत बासुंदी. त्यापेक्षा गुलाबजाम बनवा. मला खूप आवडतात."

" माझ्या राजबिंडाकरता मी कधीही उभी असणारच आहे."

" माई त्याला तुम्ही लाडावून नका ठेवू. जबाबदारीची जाणीव त्याला देखील व्हायला हवी."

" हाय एवढी संपत्ती ती कशाकरत हाय मग. "

" फकस्त पोरीच नाय तर माझ्या तीन पोरींना पण मी संपत्तित हिस्सा देणार आहे."

आर कशाल पण. आपला पोरगा हाय ना तो पाहिल की सगळी संपत्तीच.

" माझ्याकरता सगळी मुले सारखी आहेत. माई सारख नाही फक्त उल्हासचे लाड करायचे."

" घरात याव का आम्ही."

" या की रामराव. कस काय येण केलेत."

" आपल्या थोरल्या लेकी करता स्थळ घेवून आलोय. मुलगा इंजिनियर आहे. घरी शेती, शहरात एक फ्लॅट देखील आहे. त्यांना आपली मुलगी आवडली आहे."

" इतक्यात तर तिला नोकरी लागली. नोकरी करता करता ती पुढचे शिक्षण घेत आहे. एवढ्यात लग्न नाही करायचे कोणाचेही."

" बाबा काय चालले ओ तुमचे घराच्या बाहेर पर्यंत आवाज येत आहे."

" काका कधी आलात तुम्ही. कसे आहात."

" तुझ्या करता लग्नाचे स्थळ आणले आहे."

" बाबा मी लग्न करायला तयार आहे."

" तुझे शिक्षण आणि नोकरीच काय."

" होणा-या मुलाला तुमच्या अटी देखील मान्य आहेत. तो मुलीला शिकवणार देखील आहे."

थोरलीचा विवाह संपन्न झाल्यानंतर बारक्या दोघी देखील नोकरीला लागतात. मधलीने फॅशन डिझाइन चा कोर्स पुण्यात पूर्ण झाला. धाकटीचे पेण्टिंगचे एक्झिबिशेन लागून तिला देखील पैसे मिळत होते.

आता तर घराण्याचा वारस देखील चांगल्या पगाराच्या नोकरीला लागला होता. त्याचे देखील लग्नाचे वय झाले होते. दोन्ही बहिणींची लग्न झाल्यनंतर आता वेळ होती राजबिंड्या राजकुमारची."

लक्ष्मीच्या कृपेने घरात माईच्या आवडती मंदाची नातं.नातसून म्हणून घरी आली होती."

" घरात गोकुळ नांदत होते. माझ्या सुनेच्या पायगुणान माझी तब्येत ठणठणीत झाली आहे."

" अस म्हणून औषधे घ्यायची सुटणार तुझी माई."

सण उत्सव जवळ येताच प्रत्येक सण आनंदाने साजरा झाला होता. नाती देखील आपल्या पोरांना, नव-याला कौतुकाने घेवून माहेरी पाहुणचाराला येत होत्या. यावेळी घराण्याचा राजबिंड मात्र वेगळ्याच मनसुबात होता. त्याला आहे ते कौलारु बिल्डिंग पाडून माॅल बांधयचा होता.

" काय रे आज सगळ्यांना बोलावून घेतले आहेस‌ तू."

" काय नाही एक छोटासा प्रकल्प हाती घेतला आहे. तुमची मान्यता हवी आहे. आपल घर पाडून मोठे माॅल बांधणारे बिल्डर आपल्याला राहायला अलिशान बंगला देणार आहेत. तर मी घर विकले तर चालेल ना? "

" अस काय वंगाळ बोलतो. इतकी वर्षी गुणागोविंद्यान राहिलो आणि आता मला शेवटच्या घटकात घर विकाया नका काढू."

" त्यापेक्षा बिल्डरला काम देवून एकस्ट्रा घर देखील मिळतात."

" पण मला माॅलच उभा करायचा आहे ते."

" ऐक माझ सगळे जीव आटून सांगतात दुसर काहीतरी मार्ग काढू."

" माझ ठरलय. पटतय तर बघा नाहीतर माई सकट सगळे आताच्या आता निघून जा तुम्ही."

" याकरताच का मी देवाकडे मला ना तू हवा‌ म्हणून विनवणी करत व्हते."

" बाबा माईला चक्कर आली. मी दोन दिवसात आपल्या शेंडेफळाला उत्तर देते. तोपर्यंत तुम्ही त्याला कोणत्या न कोणत्या गोष्टीत गुंतून ठेवा."

" थोरलीचा काही फोन आला व्हता का रे. अजून कशी आली नाही ती."

" मी एस के कंपनीला आपली‌ जागा विकली. मोठ‌ बिजनेस सेंटर ते चालू करणार आहेत."

" आर काय केलस तू. हा दिस दिसण्यापरी मी वरती का गेले नाही. माझ्या धन्याला काय उत्तर द्यायच."

" कोण हाय हा एस के? "

" माई काळजी‌ नको करुस. हे घे तुझे घर. एस के कोणीही तुमचे घर पाडून माॅल करणार नाही. हि जागा तुमची झाली आता."

" तू आता याकडे वर डोळे जरी उघड केले तरी माझ्याशी गाठ असेल. तुला एवढेच वाटत असेल तर स्वत: नोकरी करुन जागा घे आणि तिथे माॅल बांध."

" पोरी‌‌ मला माफ कर. आयुष्यभर मी याच्यावर जीव लावला याने त्याचे चांगले पांग फेडले. तुम्हांला बर पाहिले नाही त्यावेळी तरी तुम्ही मला बर वाटाव म्हणून आपल्या कुटूंबाकरता लग्न झाले असून देखील झटत आहात."

" पटल का आता तुला माई."

" खर बोलत होतास तू. पोरगा आणि पोरगी भेद करायचा नसतो. अतिलाडाने पोर चुकीच्या मार्गाने जातात. पण पोरी मात्र दोन्ही कुटूंब सावरत असतात. आता मला पटलय घराण्याचा वारसा वगैरे काही नसते. मुली देखील आपली इच्छा पूर्णत्वाला नेऊ शकतात."

🎭 Series Post

View all