Me Too Movement ( मराठी नाटक )

Me Too Movement ( मराठी नाटक)
पात्र ५

काव्या - बोल्ड डॅशिंग पण तितकीच समजूतदार

निता - काव्या ची मैत्रीण

मोनिका - नुकतीच ग्रॅज्युएशन केलेली मुलगी

गौरव - सिनियर सर (पाच वर्षांपेक्षा जास्त कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा अनुभव)

साकेत - सुपरसिनियर.( म्हणजे दहा वर्षांपेक्षा जास्त कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा अनुभव)

प्रियांका - कलिग ( एक सहकारी)

सगळ्यांचा कॉन्फरन्स कॉल चालु होणार आहे. विषय आहे गेट टू गेदर चा, या वर्षी कंपनीची अन्युअल पार्टी आहे. तर सगळे जण जमणार आहेत. पार्टी लोणावळ्याच्या रिसॉर्ट वर अरेंज केली आहे. तर ते सगळे जण एकाच कार ने शेरिंग मधे जाणार आहेत.

तर कोण कुठे भेटायचं, काय कपडे घालायचे, खर्चाचे पैसे काँट्रीब्युशनचे पैसे कोणाकडे जमा करायचे या विषयावर चर्चा करण्यासाठी कॉन्फरन्स कॉल अरेंज केला आहे. सुरवातीला फक्त निता आणि काव्या जॉईन होतात. मग बाकीचे मेंबर जॉईन होतात.

" हॅलो , आय एम प्रेझेंट ." निता उत्साहात म्हणाली.

" हाय , "

" काव्या, मी लवकर जॉईन केल का.? "

" नाही ग  , मी पण आताच जॉईन केलं आहे." काव्या हातातला न्यूज पेपर वाचत, समोरच्या स्क्रीन कडे बघत म्हणाली.

" ओह, म्हणजे मी वेळेत जॉईन केलं आहे तर साकेत तर मला नेहमी ओरडतो, मी लेट कमर आहे म्हणून " निता हसुन म्हणाली. काव्या फक्त स्मित हास्य करते.

" काव्या, तू काय करत आहेस, पेपर वाचत आहेस का ? " संभाषण सुरू ठेवण्यासाठी निता म्हणाली.

" अन्. अं .. सॉरी, काय बोलतं होती." हातातला पेपर बाजुला ठेवत काव्या ने विचारलं.

" काही नाही. मी फक्त विचारत होती , तू काय वाचत आहेस. माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही." निता हसुन म्हणाली.

" काही खास नाही. ती आजची बातमी वाचत होती."

" कोणती ? " निता ने उत्साहाने विचारले.

" एका महिलेने तिच्या बॉस विरोधात कंप्लेंट केली. त्याने तिच्या कडे तिच शिल मागितलं म्हणून. तेच वाचत होती. तिच्या हिंमती बद्दल, तिच्या धाडसा बद्दल वाचत होती." काव्या म्हणाली.

" वॉव, खुपच धाडसी पाऊल टाकल आहे तिने." निता कौतुकाने म्हणाली.

" हम्म्म. खरचं खुप धाडसी निर्णय घेतला आहे तिने."

" कुठे आली आहे हि बातमी, आजच्या न्यूज पेपर मध्ये आहे का ? " नीताने विचारले.

" हो आजच आली आहे." काव्या म्हणाली.

" मी तिच वाचत होती."

" तू आजचा कॉल कशा बद्दल आहे माहित आहे ना, अन्यूअल पार्टी आहे. मेल आला आहे. लोणावळ्याला रिसॉर्ट वर" निता विषयाला बगल देत म्हणाली.

" हो, तेच सगळं प्लॅनिंग करायला कॉन्फरन्स कॉल अरेंज केला आहे."काव्या.

" हो सगळ्याची जॉईन होण्याची वाट बघत आहे."

निता म्हणाली. पण काव्या आपल्या विचारात गर्क होती. तिने नीताला पुन्हा एकदा प्रश्न विचारला.

" अग आजची बातमी वाचलीस ?." काव्या

" कोणती ? " प्रियांका

" महिलांच्या सोबत असभ्य वर्तन करण्यासाठी त्या पुरुषाला शिक्षा झाली. त्या महिलेने हिंमत केली, स्वतः वर बेतलेला प्रसंग उघड पणे सांगून " निता

" काय ग  ! काय बोलत आहात ? "

मोनिका ने नुकतच जॉईन केलं होतं. त्याचं बोलणं ऐकून तिने विचारलं.

" कोणी हिंमत केली ? " गौरव , तो देखील आता जॉईन झाला होता. त्याने शेवटचं अर्धवट बोलणं ऐकल होत.

" कसला प्रसंग? कुणावर बेतला ? " साकेत ,

ज्याने सुरवाती पासुन बोलणं ऐकल होत. पण बोलतं काही नव्हता.

" पल्लवी नावाच्या मुलीने तिच्या बॉस बद्दल तक्रार केली. तिचा बॉस तिला प्रमोशन मिळवुन देण्यासाठी तिला क्रॉमप्रो करायला सांगत होता." काव्या

" क्रॉमप्रो ? " प्रियांका आणि मोनिकाने विचारलें.

" क्रॉमप्रो म्हणजे त्याने तिला प्रमोशन मिळवून देण्यासाठी तिला त्याच्या सोबत क्वालिटी टाइम घालवावा लागेल."

" म्हणजे डिनर? " प्रियांका

" त्याला काय प्रमोशन मिळण्याआधी पार्टी हवी आहे का ?" मोनिका बालिश पणे प्रश्न विचारते.

" मोनिका तू आताच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहेस. त्यामुळें तुला या गोष्टी माहीत नाही." गौरव ने तिला समजावले.

" पण क्रॉमप्रो म्हणजे नक्की काय ? "

" त्याला तिच्या सोबत संबंध ठेवायचे आहेत. ठरकी साला " साकेत ने स्पष्ट शब्दात सांगितल.

" शी.. हे तर फार भयानक आहे." निता

" ही तर लाच झाली प्रमोशन मिळवून देण्यासाठी " काव्याने मत मांडलं.

" हा तर वन नाईट स्टॅण्ड झाला." मोनिका

" तसचं काहीसं.." काव्या म्हणली.

" मग त्या लेडी ने कंप्लेंट केली नाही का ? " गौरव

" हो. केली ना. त्याचीच बातमी वाचली आज पेपर मध्ये. तेच सांगत होती मी. " निता

" हो तिने वुमन सेल मधे तक्रार केली. त्याने तिला जेव्हा कॉम्प्रो बद्दल विचारलें तेव्हां तिने त्याचं बोलणं रेकॉर्ड केलं. त्याने तिला डबल मिनिंग असणारे मेसेज पाठवले होते.

काही सेक्युअल लिंक पाठवल्या होत्या. व्हॉट्स ॲपवर वर त्या सगळ्यांचे रेकॉर्ड पण जमा केले. त्यामुळे तर त्या नराधामावर कारवाई झाली."काव्या

" हो. पोलीसांनी तिच्या कंप्लेंट ची दखल घेतली. पुरावे तपासून बघितले. आणि आज तो माणूस जेल मध्ये आहे. त्याची नोकरी गेली आहे. त्याचं संदर्भात न्यूज पेपर मध्ये न्यूज वाचली." निता.

" आजकाल महिलांना लहान मुलांच्या साठी सुरक्षित अशी जागाच शिल्लक नाही आहे."गौरव

" म्हणून तर मी टू मूव्हमेंट सुरू झाली आहे." निता

" महिला त्यांच्या सोबत घडलेला अनैतिक वर्तन उघडपणे व्यक्त करत आहेत. हॅश टॅग मी टू मूव्हमेंट " काव्या

" तुला सांगते काव्या, मी जेव्हा नवीनच नोकरीला लागली होती तेव्हां मी पण एकदा असा प्रसंग अनुभवला आहे."

सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

" काय ? " भीती

" खरं ! " आश्चर्य

" तू जर आमच्या सोबत बोलण्यासाठी कंफर्टेबल असशील तर तू तुझं मन मोकळं करू शकते." काव्या ने तिला धीर दिला.

"  मला स्पष्ट पणे आठवत आहे. दोन हजार नऊ ची गोष्ट आहे. ऑक्टोबर महिना होता. कंपनी मध्ये दिवाळी साठी बोनस जाहीर करण्यात येणार होता. मी अकाऊंट डिपार्टमेंट मध्ये नुकतीच जॉईन झाली होती. त्या आठवड्यात खूप काम होत. त्यामुळे घरी जायला उशीर होत होता. तर आमचे सिनियर सर आम्हाला त्यांच्या कार ने घरी सोडवत.

माझा स्टॉप शेवटून दुसरा किंवा तिसरा असायचा. पण आमचे सर मुद्दामहून मला शेवटीं सोडायचे. मी पाठीमागे बसलेली असेल तर ते मी तुझा ड्रायव्हर नाही म्हणून पुढच्या पॅसेंजर सीट वर बसायला सांगायचे. सुरवातीला मी नकार देत होते. पण त्यांनी रागाने बघितलं, तशी मी घाबरून पुढच्या सीट वर बसले.

तेव्हा त्यांनी माझ्या बाजूचा आरसा अडजेस्ट करायचा आहे, किंवा मग दरवाज्याच लॉक लावयच आहे अशा कारणाने ते माझ्या अंगावर झुकायचे.

आधारासाठी मांडीवर हात ठेवायचे. नंतर सॉरी म्हणुन विक्षिप्त पणे हसायचे. मुद्दामहून कार हळु चालवायचे . ते जवळ आले की माझा तर घासा कोरडा पडायचा. शब्द मुके व्हायचे. मेंदू तर गोठून जायचा. कशी बशी स्वतः सावरलं.

देवाकडे प्रार्थना करत होती. लवकरात लवकर घर येऊ दे. त्या दिवशी मी त्यांच्या कार मध्ये बसली ती शेवटची. त्या आठवड्यात नंतर मी त्यांना टाळू लागले. बाबांना मला घ्यायला बोलवत होती. पुढचा आठवडा भर. दिवाळी नंतर नोकरी सोडली ती. दोन महिने लागले मला त्या ट्रॉमा मधून बाहेर पडायला.

आज देखील ते सगळं आठवलं तरी अंगावर सरसरून काटा येतो. हे सगळं आज पर्यंत कोणालाही सांगण्याची हिंमत नव्हती. आज पहिल्यांदा मन मोकळं केलं आहे. तुमच्या समोर." निता म्हणाली .

" मला पण काहीतरी सांगायचं आहे." प्रियांका  म्हणली.

" मी मूळची कोल्हापूरची. मी शिकायला नुकतीच पुण्याला आली होती. सुट्टी साठी कोल्हापूरला गेली होती. त्या दिवशी रविवार होता. म्हणून मी दुपारच्या एशियाड ने पुण्याला येत होते. त्यावेळी एशियाड च तिकीट जास्त असायचं. त्यामुळे गर्दी कमी असायची. मी एकटीच त्या दोन माणसांच्या सीट वर बसलेली. मी खिडकी जवळच्या सीट वर बसली होती.

माझ्या सीट च्या मागे एक जाड जुड माणूस त्या दोन माणसांच्या सीट वर पसरलेला होता. त्याने आधाराला म्हणून समोरच्या सीट ची बाजु पकडली होती. त्याची बोट नेमकी माझ्या बगलेत पोचत होती. मी एक दोनदा त्याचा हात झटकला. पण त्याने चिवट पणे तसाच ठेवला. मी त्याच्या कडे चिडून बघितलं तसं तो इतका किळस वाणा हासला, की काही विचारू नको.

त्याला बघून माझी तर भंबेरी उडाली होती. मी बाजूच्या सीटवर बसली. तर तो नालायक माणूस, त्याने त्याचे पाय मागच्या सीट वर दाबले. त्या कुशन असलेल्या गुबगुबीत सीट मधून देखील त्याचा पुरुषी स्पर्श जाणवतं होता माझ्या पाठीला.

त्या दिवशी तो पुण्या पर्यंतचा प्रवास जीव मुठीत घेऊन केला होता. हॅश टॅग मी टू मूव्हमेंट " निता ने तिला धीर दिला.

" मला पण काहीतरी सांगायचं आहे." गौरव म्हणाला.

" असे प्रसंग काय फक्त महिलांनी अनुभवले आहेत अस नाही ना  ! मी पण या प्रसंगातून एकदा गेलो आहे ."

" त्यावेळीं मी नववीला होतो. कॉम्प्युटर क्लासेस करत होतो. तिथं एकदा ते घडल.मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायची प्रॅक्टीस करत होतो. माझ्या सोबतचे क्लास मेट त्यांचं प्रॅक्टिकल संपवून निघून गेले होते.

मी आणि आमच्या मॅडम दोघच तिथे होतो. मला स्पष्ट आठवत आहे. मला क्लिप आर्ट मधुन इमेज कॉपी पेस्ट करता येत नव्हती. म्हणून मी मॅडम ना विचारलं. तेव्हा त्या अगदी माझ्या जवळ आल्या.

माझ्या पाठीमागे उभ्या राहिल्या होत्या. माझ्या हातात माऊस होता. त्या हातावर त्यांनी त्याचा हात ठेवला होता. स्किन नीट जवळून बघण्यासाठी त्या पुढे वाकल्या होत्या.त्यांच्या अप्पर बॉडी पार्ट माझ्या पाठीला चिकटला होता. त्यांचा गाल माझ्या खांद्याजवळ चिकटला होता. त्यांचा तो स्पर्श खुप विचित्र होता. माझं तर डोकं काम करायचं बंद पडल होत. त्या काय शिकवतात ते समजत नव्हत.

मी काहीच बोलत नव्हतो. तेव्हा त्या चिडल्या नाहीत. त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला. गाल गुच्चा घेतला. मला नाही आवडल त्याचं ते वागणं. त्यावेळीं मला काही समजत नव्हत. पण एक स्त्री आपल्या इतक्या जवळ येते. ती आपल्याला आवडणार नाही असं स्पर्श करते. तेव्हा घाण वाटतं.

मी कसा बसा तो क्लास कोर्स पूर्ण केला. त्या प्रसंगातून बाहेर पडायला सहा महिने लागले. आता देखील ते सगळं आठवलं तरी घसा कोरडा पडतो. हॅश टॅग मी टू मूव्हमेंट "

" मला पण काहीतरी सांगायचं आहे." गौरव म्हणाला.

" पाच वर्ष झाली या घटनेला. मी जॉईन होऊन तीन साडे तीन वर्ष उलटून गेली होती. आमची सिनियर मॅडम माझ्या कामावर खुप खुश होती. त्यावेळी टीम लिड पोस्ट साठी प्रमोशन ड्यू होत. चार पाच नाव नॉमिनेट होती.

मी पण त्यातला एक होतो. मॅडम ने मला केबिन मध्ये बोलावल होत. त्यांनी मला प्रमोशन आणि बोनस मिळवण्यासाठी एक्स्ट्ट्रा मॅरीटल अफेअर ची ऑफर दिली होती. त्यांचा नवरा प्रोजेक्ट साठी यू के ला गेलेला.

त्यांना त्यांचा नवऱ्या बद्दल काय इशू होता माहित नाही. पण त्यांनी ऑफर दिली होती. याशिवाय प्रॉजेक्ट साठी त्या त्यांच्या सोबत बँगलोर मधे पण नेणार होत्या. मला तर काय रिॲक्ट करावं तेच समजेना. मी गप्प बसलेला बघून त्या मलाच समजावत होत्या.

अरे तुझ लग्न झालेलं आहे. मला माहित आहे. पण आजकाल हे कॉम्प्रो कॉमन आहे. तुला प्रमोशन पाहिजे असेल तर त्या बदल्यात मला पण तुझ्याकडुन काहीतरी मिळालं पाहिजे ना !

एक्स्ट्रोरा मॅरिटल अफेअर खुप नॉर्मल आहे. मला वाटलं होतं, मला वेड लागलं आहे का?

माझा नकारच होता. परिणामी माझं प्रमोशन नाही झालं. पुढचे सहा महिने कसे बसे ढकलले मी त्या कंपनीत मध्ये."

" बापरे ! हे अस काही घडलं असेल.? कल्पना करवत नाही." प्रियांका

" मग तू कंप्लेंट करायची होती ना ! लगेचच रेझाईन करायच." निता

" कंप्लेंट!  हा हा हा, कोणाकडे कंप्लेंट करायची? कोण ठेवणार माझ्या वर विश्वास?

आमच्यातल् बोलणं बाहेर समजलं असत तर, छीथू झाली असती माझी.

लोकांच्या टिंगलीचा विषय झालो असतो मी ! "

" मग रीझाईन करायचं ना ! तूझ्या टॅलेंट वर तुला सहज जॉब मिळाला असता." गौरव ने मत मांडलं.

" त्यावेळी माझ्याकडे जास्त एक्सपीरीअन्स नव्हता. मला हातातली नोकरी सोडण शक्य नव्हत. नुकतच घर घेतलं होत. घराचे हप्ते चालु होते. स्वानंदीची डिलिव्हरी झाली होती. एकट्याच्या पगारावर सगळं मॅनेज करताना तारेवरची कसरत चालु होती. जॉब सोडण तर अशक्य होत.

शिवाय माझ्या एक्सपेरीएन्स लेटर सिनियर मॅडमच्या हातात होत. त्यांना नाकारून चुक केली होती, तर त्या निगेटिव्ह मार्किंग लिहून मोकळ्या झाल्या असत्या. फ्युचर बरबाद झाल असत. एक निगेटिव्ह मार्किंग ने.

हे काय कमी होत, की जॉब सोडण्या आधी सहा महिन्याच्या नोटीस पिरियड होता. दुसरा जॉब इतक्या लवकर मिळणं कठीण नाही अशक्य होत. कसे तरी दिवस ढकलले.

तिचं ते सगळं बोलणं, तिचे ते अचात विचार, ऐकून कानात कोणी तरी गरम लाव्हा रस ओतल्याचा भास होत होता. मी ना हि गोष्ट माझ्या मनात ठेवू शकत होतो. ना स्वानंदीला सांगू शकत होतो. काय इमेज झाली असती माझी माझ्या बायको समोर, विचार करून देखील शिसारी येते स्वतः ची हॅश टॅग मी टू मूव्हमेंट "

" मला पण बोलायचं आहे." मोनिका हळू आवाजात म्हणली.

" मी तर दोन वेळा असे अनुभव घेतले आहेत."

" दोन वेळा ?."

" हम्म्म, दोन वेळा." काही क्षण पॉझ घेउन ती म्हणाली,

" मी त्यावेळीं दहा वर्षांची मुलगी होते. मला पप्पांनी अबोली रंगाचा, फ्रिल फ्रील वाला छान फ्रॉक आणला होता. माझा बर्थ डे होता. मी फॅमिली सोबत डॉमीनोज ला पिझ्झा खायला गेले होते.

त्यावेळीं आम्ही त्या कॅफे मध्ये एंटर केल्या पासुन एक मुलगा माझ्या कडे टक लावून पाहत होता. त्याचे डोळे मला एक्स रे मशीन सारखे वरून खाली स्कॅन करत होते. मी खूप घाबरली होती.

मी सारखी आई बाबा यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचे डोळे माझ्यावरच टिकून राहीले होते. मान वाकडी तिकडी करून तो मला स्कॅन करतच होता. माझ्या तर अंगावर सरसरून शहारा आला होता.

घसा कोरडा पडला होता. मी घाबरून गेली होती. आई बाबा कोणालाही काही सांगायला घशातून शब्द फुटत नव्हते.

त्या दिवशी रात्री आम्ही गच्ची वर झोपायला गेलो होतो. उन्हाळा सुरू झाला की आम्ही सगळे गच्ची वर झोपायला जात. रात्री उशिरा मला अस जाणवलं कोणी तरी माझ्या अंगावरून हात फिरवत आहे.

माझ्या मांड्यांच्या मधला भाग स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. मी खूप घाबरली होती. स्वतः पांघरुणात शिरुन लपवत होती. झोपली नव्हती रात्रभर. पहाटे जेव्हा उजाडलं तेव्हा मी डोळे किलकिले करून बघितलं तर बाजुला आमचे घर मालक काका झोपले होते.

त्यावेळीं मी रात्री झोपताना अबोली रंगाचा नाईट सूट घातला होता. वाढदिवसाला पप्पांनी अबोली रंगाचा फ्रॉक आणला होता. त्या दिवसा पासून मला अबोली रंगाचा तिटकारा आहे. एक प्रकारची भिती वाटते त्या रंगाचे कपडे घालायला.

तुला सांगु काव्या, मी आज पर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. हिंमत झाली नाही काही बोलायची. आज तुम्हीं सगळ्यांनी तुमचं मन मोकळं केलेल बघून सांगायचं धाडस केल आहे.
काव्या, तो फ्रिल फ्रिल् चा फ्रॉक मी त्या दिवसा नंतर कधीच अंगाला लावला नाही. त्या दिवशी घातला होता तो पहिला आणि शेवटचा. हॅश टॅग मी टू मूव्हमेंट." मोनिका म्हणाली.

" खरं म्हणजे काय म्हणायचं काय बोलायचं, कसं रिऍक्ट व्हायचं तेच कळेना." काव्या

" आपण हे सगळ बदलण्यासाठी कोणते प्रयत्न करू शकतो? " साकेत ने विचारलं.

" सर्वात आधी नो म्हणायला हवे. इट इस नॉट ओके. हे सगळं जे काही चालु आहे ते मला पटत नाही, रुचत नाही ते नाकारणे." साकेत

" स्वतः चा माईंड सेट केला पाहिजे. जे वागणं , बोलणं, स्पर्श करण जर स्वतः आवडत नसेल, त्रास दायक वाटतं आहे तर ते स्वतःशी मान्य करण. समोरचा माणूस कोणीही असू दे,

त्याला स्पष्ट शब्दात नकार देणं. नाही आवडत मला तुझं अस वागणं बोलणं स्पर्श करण हे सांगणं. ऐकत नसेल तर त्याची ती ॲक्शन लोकांच्या नजरेला आणण ." गौरव

" स्वतः स्वतः चे मित्र मैत्रिण बना. हो स्वतः ला त्या वाईट आठवणी मध्ये अडकवू देवू नका. स्वतः ची रक्षा स्वतः करण्याचा प्रयत्न करा. कोणताही प्रसंगात सावध रहा. धीर धरा. हिंमतीने संकटाचा सामना करा." प्रियांका म्हणाली.

" मदत मागायला लाजू नका. आपल्याला आपल्या हक्काची जाणीव हवी. अन्याया विरुद्ध योग्य त्या अथॉरिटी कडे तक्रार करा. महिला आयोग पोलिस, कामाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या केसेस सोडवण्यासाठी स्पेशल टीम असते. त्यांची मदत घ्या." निता.

" मदत घ्या. हो स्वतःला सावरण्यासाठी मदत घ्या. मुलांशी संवाद साधा. त्यांना त्यांच्या शरीराच्या अवयावंच्या बद्दल माहिती दया. इंटरनेट मुळे सगळी महिती इझी मिळते.

पण मुलांशी सोप्या भाषेत बोला. त्यांनी दुसरी कडून चुकीची माहिती गोळा करण्या ऐवजी त्याना त्यांचे प्रश्न तुम्हाला विचारता येतील अस मोकळं निर्मळ नात तयार करा.

जर कधी त्यांना असा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं तर त्यांनी आई वडिलांशी या विषयावर मोकळे पणाने संवाद साधता आला पाहिजे. संकोंच वाटायला नको , आपल्या पायाच्या मधल्या अवयव बद्दल बोलताना . " मोनिका

" हो. आपण आपल्याला जमेल तितकं एकमेकांना मदत करू शकतो." काव्या म्हणाली.

" अरे यार, आपण काय डिस्कस करायला कॉन्फरन्स कॉल केला होता, आणि कोणत्या विषयावर चर्चा करत बसलो." गौरव म्हणाला

" नाही रे, चांगला विषय निघाला, खुप छान बोलता आलं. मनातलं ओठावर कधी आलं ते समजलंच नाही." प्रियांका म्हणाली.

" हम्म्म खरं आहे."

" बरोबर आहे."

" मला वाटतं आता आपण आपल्या अन्यूअल पार्टी बद्दल नको डिस्कस करायला. उदया भेटल्यावर बोलू. आता खुप उशीर झाला आहे. तर नंतर कॉल करायचा का ?

भूक लागली आहे. पोटात उंदीर नाचत आहेत. आताचा विषय डोक्यातून जाई पर्यंत कोणालाही काही बोलायला सुचणार नाही."

" हो. मला पण काही बोलायची , डिस्कस करायची इच्छा नाही. नंतर बोलू " मोनिका म्हणाली.

" चलो फ्रेंड्स, उदया भेटू, गूड नाईट." गौरव म्हणाला. तो ऑफ लाईन गेला.

" गुड नाईट. बाय बाय " प्रियांका आणि निता पण ऑफ लाईन गेल्या.

" गुड नाईट साकेत " काव्या म्हणाली.

" वेट ए मिनिट काव्या,"

" काय झालं साकेत, ? " काव्या ने विचारलं.

" काव्या आम्ही सगळ्यांनी आपले आपले अनुभव मांडले. तुला देखील असं काहीसं अनुभवलेल सांगायचं आहे. पण तू नाही सांगितल. मी तुझ्या मोठया भावासारखा आहे.

तुला वाटतं असेल तर तू तुझ मन मोकळं करू शकते. तुला काही प्रोब्लेम आहे का? कंपनी मध्ये कोणी त्रास देत आहे का ?. तू मला सांगू शकते. मी तुझा सिनियर आहे. तुला मदत करू शकतो." साकेत प्रांजळ पणे म्हणाला.

" हम्म्म. थँक्यू साकेत. मला कंपनीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला पण काहीतरी सांगायचं आहे. पण हिंमत होत नाही."

" काव्या, एक मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या सोबत नेहमीच उभा आहे." साकेत म्हणाला.

" मला काही तरी सांगायचं आहे. साकेत माझा नवरा सिद्धार्थ, मला क्रॉम्प्रो करायला सांगत आहे. त्याच्या बॉस ने त्याला ऑफर दिली आहे, जर त्याची वाइफ एक रात्री साठी क्रॉम्प्रो करायला तयार असेल तर ,

तो सिद्धार्थला मॅनेजर म्हणून प्रोमोट करेल. याशिवाय यू एस ए मध्ये प्रोजेक्ट पण देईल .ऍज हेड ऑफ द प्रोजेक्ट म्हणून अमेरिकेला सेटल पण करून देणार.सिद्धार्थ ने मला क्रॉम्प्रो बद्दल सांगितल आहे.मी काय करू, " काव्या रडत रडत बोलतं होती. साकेत तर ऐकून अचंबित झाला होता. त्याला ही सुचत नव्हतं काय बोलावं, काय सल्ला द्यावा, कशी मदत करावी.

" त्यानें सांगितल्या पासुन मला स्वतःची स्वतः लाज वाटते आहे. लोकांच्या नजरेला मी एक खेळणं वाटते आहे. कोणीही येत आणि काहीही बोलून जातं. किळस येत आहे माझ्या गोऱ्या रंगाची, या फिट फिगरची. पुरुषांना बाई म्हणजे काय कचकड्याची बाहुली वाटते का ? की एखादं खेळणं, मनाला येइल तसं खेळा, तोडा, मोडा, वाकवा, मन भरे पर्यंत उपभोग घ्या, नंतर कंटाळा आला की, फेकून दया. शी . हॅश टॅग मी टू मूव्हमेंट ."  काव्या म्हणाली.

" काव्या, मी आहे तूझ्या सोबत, सिध्दार्थ च वागणं चुकीचं आहे, तू स्पष्ट शब्दात नकार दे. आपण उद्याच पोलिसांच्या कडे तक्रार करायला जात आहोत. चुकीचं वागणं सहन करायच नाही. एक मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू चाल पुढं."

" हो . मी उदया कंप्लेंट करणार. इट इज ओके टू से नो." काव्या हसुन म्हणाली.

" ऑल द बेस्ट."साकेत म्हणाला.

काव्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत त्याने लॉग आउट केले.

" मला न पटणाऱ्या गोष्टी विरोधात मी तक्रार करणारं."

काव्या हातातला न्यूज पेपर कडे हसऱ्या चेहऱ्याने बघत स्वतःशी म्हणाली.काव्या आरश्यातील काव्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत गात होती.मनात म्हणत होती.

' मी आहे माझी मैत्रीण, मी आहे माझ्या सोबत.'

पाठी मागे गाणं वाजत होत,

" जब कोई बात बिगड जाये,
जब कोई मुश्किल पड जाये,
तुम दे ना साथ मेरा,
ओ .. हमनवा "

समाप्त.

©️®️ वेदा (सोनल जोशी)


🎭 Series Post

View all