मी तुला माझ्यात जपणार आहे
भाग 8
त्या गुंड प्रवृत्त्तीच्या मुलांमधील एक मुलगा श्रीवर हात उचलणार,तोच कोणीतरी त्याचा हात धरुन त्याला चांगलाच जोरदार धक्का दिला, त्या मुलीला एका जागी आणून बसवले आणि नंतर बाकी दोन मुलांना सुद्धा चांगलेच चोपून काढले. सुरू असलेला गोंधळ बघून तिथे हवालदार आणि काही शिपाई आलेत.
"काय सुरू आहे?तुम्हाला काय दुसरं काम नसतं का?जिथे जाता तिथे नुसते राडे करत असता?" हवालदार ओरडला.
"हिंदी पिक्चरके माफिक तुम बराबर टाईमसे पहुचा इधर.." ती खी खी करत म्हणाली.
"तुमचे तर कामच मारामारी करायचे आहे.घ्या या सगळ्यांना ठाण्यात घेऊन चला.." हवालदार सोबतच्या शिपायांना म्हणाला,तसे शिपाई तिला पकडायला गेले..
"मै इधरीच हैं, तेरे साथीच जायेगी. तेरे मालक को पूछ,गिधडोकी जैसे भागती नही मै..पर एक काम तो निपटलू…"ती म्हणाली,तसे हवालदाराने ठीकेचा इशारा केला.
"एक…दो…तीन…चार…"तिथे जमलेल्या घोळक्यात ती बोटाने एकएक करत तिथे उपस्थिती असलेले पुरुष मोजत होती.
"दैय्या रे दैय्या…इधर तो कहणेके बहोत मर्द लोग हैं.."ती आश्चर्यचकित होण्याचे नाटक करत म्हणाली.
"साला तुम मर्दोसे तो हम नामर्द, नही क्या कहते तुम…हिजडे,है ना भाई?तो तुमसे तो हम हिजडे अच्छे, ही गलत की पेहचान भी कर सकते, आणि डोळ्यांपुढे काही चुकीचे घडतांना बघून मदत सुद्धा करता येते.या बांगड्या घाला आणि घरात बसा…साले नामर्द कहीके.."म्हणत तिने आपल्या हातातल्या बांगड्या काढल्या आणि तिथे असणाऱ्या पुरुषांच्या तोंडावर उडवल्या.. अन् परत खी खी करायला लागली.तिथल्या पुरुषांनी शरमेने मान खाली घातली..
"ओर बेहेन तुम..एक स्त्री होकर तुम दुसरी स्त्री की मदत ना कर पाई?तुम छे मिलकर अपनी जुती लेकर आती ना,तो ये छीचोरे फिर किसी लडकीको छुनेके काबिल ना होते..तुम स्त्री ही दुसरी स्त्री को समझ नही पाती, साथ खडी नही जो पाती..साली यही सबसे बडी दिक्कत हैं.." ती तिथे उपस्थित स्त्रियांना उद्देशून म्हणाली.
"कोई मरता है तो मरे,आपल्याला काय…ऐसी सोच है तुम्हारी सबकी.साला कोई ठीकसे इंसान तो नही बन पाता…येहीच औकात हैं तुम्हारी सबकी, आये बडे मुझे हिजडा कहनेवाले…"
"ओ हवालदार कभी कभी ये फोकट का शो देखणेवालो को भी अंदर डाल दिया करो..साला हम अच्छा काम करते, हमकोही जेलमे डालते… हा ये तो बावा शरीफ ओर इज्जतदार लोग हैं…."म्हणतच ती श्री पडला होता तिथे आली.
"क्या रे हिरो,रजनीकांत हैं तू? जो ये चारसे भिडणे आया?पहले खुदको तो बचाना सिख ले…" श्रीला उठवत ती म्हणाली.
"मी..ते..तिला.."श्री बोलत होता की ती बोलली.
"दूनियाकी मदत तोच करू शकतो,जो स्वतःची मदत करू शकतो.देख तेरेमे ठीकसे खडे रहनेमे तो जान नही, फू केले तर उडून जाशील.मुलगा असो वा मुलगी, आजकाल दोघांवरही वाईट वेळ यायला वेळ लागत नाही..आधी स्वतःची सुरक्षा करायला शीक,नंतर रजनीकांत बन. तू कोण आहेस हे महत्वाचे नाही, तू स्ट्राँग आहेस हे महत्वाचे आहे…"श्रीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ती म्हणाली.
"ए झालं का लेक्चर देऊन?तू केव्हापासून संत बनायला लागली?चल गाडीत येऊन बस.." हवालदार.
"सगळीच लोकं माणुसकी विसरतील तर मलाच संत बनावे लागेल.." ती परत खी खी करत गाडीत जाऊन बसली.
श्रीला तिथल्या लोकांनी थोडे पाणी वगैरे पाजले, तो थोडा रिलॅक्स झाला. त्या मुलीची नीट चौकशी करून, नंतर तो घरी निघून आला. काही दिवस त्याच्या डोळ्यांसमोर हाच प्रसंग येत होता. आणि त्याने स्वतःला आरश्यात बघितले.. आणि त्याच्या कानात "तू कोण आहेस हे महत्वाचे नाही,तू स्ट्राँग आहेस हे महत्वाचे आहे!"
"खरंच तर म्हणाली ती,स्वतःची मदत करू शकेल, तरच दुसऱ्याची मदत करता येणार..आणि मी खरंच किती नाजूक दिसतोय.." स्वतःशीच बोलत त्याने काही विचार केला. उठून धावायला जाऊ लागला,योग्य ते व्यायाम करू लागला.आता त्याचे दोनच उद्दिष्ट होते,एक डॉक्टर बनने,दुसरे स्ट्राँग बनने,ज्यासाठी तो जीव तोडून प्रयत्न करू लागला होता.
आता श्रीचे कॉलेजच्या दुसऱ्या वर्गात पदार्पण झाले होते.गोरा रंग, वडिलांनी जबरदस्ती केली म्हणून चेहऱ्यावर हलकीशी दाढी,नियमित व्यायामामुळे खूप नाही पण सुदृढ झालेला बांधा,हिरव्या डोळ्यांचा श्री आता खूपच छान दिसायला लागला होता.त्यात तो खूप हुशार,त्यामुळे कॉलेजमध्ये सतत तो कशा ना कशात झळकत राहत होता.त्याचे नम्रपणे वागणे आणि शांत स्वभाव, मुली त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागल्या होत्या.पण त्याला मात्र अशा कुठल्याच गोष्टीत काहीही इंटरेस्ट नव्हता.त्यात मुली,तो तर त्यांच्या खूप लांब राहत होता, आणि आता तर हे अख्ख्या कॉलेजला माहिती झाले होते.पण यात त्याला दोन छान मित्र मात्र भेटले होते.
_____
"पॉsssssssप…."श्री आणि त्याचे मित्र कॉलेजमध्ये आलेच होते की त्यांच्या मागून गाडीचा मोठा हॉर्न ऐकू येत होता…ते रस्त्याच्या एका बाजूला झाले.परत ती कार श्रीच्या मागे येत हॉर्न करू लागली.श्री मागे न बघता परत कारला जाण्यासाठी जागा देत बाजूला झाला.काहीतरी इंटरेस्टिंग घडत आहे बघून आता तर पूर्ण परिसरात सगळे विध्यार्थी इकडेच बघू लागले..अगदी फिल्मी वातावरण निर्माण झाले होते.
परत सेम,ती कार श्रीच्या मागे जात हॉर्न करू लागली.
"काय आहे?"श्री चिडतच मागे वळला..
डार्क पेन्सिल जीन्स,क्रॉप टॉप त्यावर जॅकेट,पायात लेदरचे शूज..हवेवर उडणारे मोकळे केस आणि डोळ्यांवर काळा गॉगल, कारचे दार उघडत अगदी स्टाईलने एक मुलगी बाहेर आली…अगदी कभी खुशी कभी गम मधील एन्ट्री होती तशी.पू ची नाही हो, हृतिक एन्ट्री होती तशी तिची एन्ट्री झाली होती. ओठांवर गोड हसू आणत ती पुढे बघत होती.
"मीरा…"श्री पुटपुटला.
जवळपास पाच सहा वर्षांनी ती त्याच्या पुढे उभी होती.आठवी मधील लहानी मीरा आणि आताची तरुणी मीरा,खूप बदल तर झाला होताच,पण तो आपल्या मीराला ओळखणार नाही,असे कसे होणार होते?तिला असे अचानक समोर बघून त्याच्या डोळ्यात पाणी जमायला लागले होते.
मीराने पळतच जात श्रीला मिठी मारली.श्रीचे सुद्धा हात आपोआप त्याच्या भोवती गुंफले गेले.
"I miss you a lot..!मला तू माझ्यासोबत हवा होतास…आता परत कधीच कुठे जाणार नाही.." मीरा त्याच्या मिठीतच कोणाला लक्षात येणार नाही असेच त्याच्या मानेजवळ किस करत म्हणाली.तो फक्तच हसला.
ते बघून त्यांच्या भोवताली सगळे अवाक् होत श्रीकडे बघत होते.
"ओssssश्रीची गर्लफ्रेंड!"
"She is so hot!"
"Very cute!"
"म्हणून हा कुठल्या मुलीला स्वतःभोवती फिरकू देत नव्हता.Great!"
घोळक्यातून असे काही काही श्रीच्या कानावर पडत होते,तसे त्याने आपले हात मागे केले आणि मीराच्या दूर झाला.
"हॅलो गाईस,मी मीरा..श्रीची मैत्रीण.."
"Hello…"सगळे म्हणाले.
"तुम्ही श्रीचे मित्र?"मीरा.
"नाही,क्लासमेट्स…श्री मित्र कुठे बनवतो.." एकजण हसत म्हणाली.
"Wow great! म्हणजे फक्त मीच याची मैत्रीण आहे तर…श्रीचे क्लासमेट्स म्हणजे माझे पण क्लासमेट्स झालात तर…" मीरा.
"काय?"श्री आश्चर्याने तिच्याकडे बघत होता.
"मी या कॉलेजमध्ये,तुझ्या क्लासमध्ये एडमिशन घेतली आहे."ती भुवया उडवत म्हणाली.
"काय?"
"हो….संगतीचा असर होणारच ना?मी पण तुझ्यासारखे हुशार झाले..थोडा उशीरच झाला, पण मला जेव्हा कळलं तू इथे आहे, मी इथे ट्रान्स्फर करून घेतली.."ती हसत म्हणाली.
"अरे वाह,आम्हाला तर भारी मैत्रीण मिळाली.." बाकी सगळे तिची ओळख करून घेण्यात व्यस्त झाले..
श्री मात्र त्याची मैत्रीण परत आली म्हणून खुश तर होताच,पण आपलं खरं अस्तित्व तिच्यापासून कसे लपवायचे या पण विचारात होता.
श्रीला तिच्यासोबत बरेच काही बोलायचे होते,पण मीरा त्याला एकट्यात सापडत नव्हती. ती अगदी कॉलेज गोईंग गर्ल सारखी खूप उत्साहात होती.कॉलेज बघणे,मित्र मैत्रिणी जमवणे..तिची सतत बडबड सुरु होती.श्री तिच्यापेक्षा दिसायला खूप सुंदर होता,पण ती सुद्धा काही कमी नव्हती..तिच्या देहबोलीतून झळकणार कॉन्फिडन्स आणि तिच्या हुशारीचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते..तशी ती दिसायला लहानपणापासून छानच होती, आणि आता तारुण्यात तर कमालीची सुंदर दिसत होती,प्रत्येक मुलाला आवडेल अशीच..त्यामुळे कॉलेजमध्ये आल्या आल्या मुलांचे तिच्या मागेमागे करणं सुरू झाले होते.
श्रीने कसेबसे तिला एकत्यात गाठले. आणि तिला घेऊन जवळच असलेल्या कॅफेमध्ये गेला.
"कधी आली?काहीच सांगितले नाही?"श्री.
"सरप्राइज…"ती हसत म्हणाली.त्याने डोक्यावर हात मारून घेतला..
"तू तरी आजकाल कुठे बोलत होतास?माहिती नाही कुठे बिझी झालास तर..लास्ट इअरच लक्षात आले तू इथे या कॉलेजमध्ये आहेस ते…मग काय केला जमुन अभ्यास,फर्स्ट इअरला अव्वल आले,आणि घेतली ट्रान्स्फर करून. अन् बाबाचा वेळ नाही,पण पैसे कधी कामी येणार?" ती हसत म्हणाली.
"हम्म.."
"पण तू दोन वर्ष कुठे घालवलीस?तू माझ्या पुढे असायला हवा होता ना..?"
"बारावीला दोन वर्ष फेल झालो होतो."
"तू..आणि फेल?क्यू दोस्त कोई लडकी वडकी का चक्कर है क्या?"ती त्याला चिडवत म्हणाली.
तो किंचितसा हसला, "काही नाही,तुझी आठवण खूप येत होती.."
"Awww.. my cutie.." म्हणत ती परत त्याला हग करायला गेली.
"काय ग सारखी सारखी चीपकत असते..? दुरून पण बोलता येतं की."
"काय रे,मोठा काय झाला,जाम खडूस झाला.. हँडसम काय झाला की फारच attitude दाखवत आहेस..मी चीपकेल नाही तर आणखी काय करेल.. who will dare to stop me?"
"तू पण फार आगाऊ झाली,आधी शहाण्यासारखं माझं ऐकायची.."
"तर मोठा होऊन काय तू एकटाच बदलणार?मी पण बदलले जरा…"ती हसत म्हणाली.
दोघांच्या खूप दिवसांच्या राहिलेल्या गप्पा सुरू होत्या.दोघं पण इथे कॉलेज हॉस्टेलला राहत होती,त्यात एकाच क्लासमध्ये होते.मीरा खूप मस्ती करायची,तर श्री शांत असायचा, पण दोघंही मात्र सोबत असायचे अगदी वडापाव सारखे.कुणी मुलाने तिला प्रपोज केलं की ती श्रीला येऊन सांगणार..मग त्याची वाट कशी लावली ते पण सांगणार..श्रीच्या खूप खोड्या काढणार, त्यावर कधी तो हसत तर कधी चिडून चालला जात असे.कॉलेज ट्रिप, सांस्कृतिक प्रोग्रॅम्स,एन्युअल फंक्शन सगळे गाजवत होती. श्री पण जीवाभावाच्या मैत्रिणी सारखी तिची खूप काळजी घेत..पण या सगळ्यात ती श्रीच्या प्रेमात कधी पडली ते तिलाच कळले नाही. आणि आता तिच्या स्पर्शातून त्याला सुद्धा मीरामध्ये होणारा हा बदल कळायला लागला होता.त्याला खूप वाईट वाटत होते, तो आता मात्र तिच्या दूर दूर राहू लागला होता.पण ते म्हणतात ना जितकं दूर गेले, तितकेच मन आणखी जवळ येते,तसेच काहीसे मीराचे होत होते.ती आणखी आणखी त्याच्या प्रेमात बुडत चालली होती.आणि आता तर पूर्ण कॉलेजला माहिती झाले होते मीराचे श्री वर किती प्रेम आहे ते..मीरा पण सतत त्याच्या समोर आपले हृदय उघडून बसत,पण श्री मात्र कधीच ते स्वीकार करत नव्हता.तिने त्याचा आयुष्यात कोणी दुसरे आहे का,हे पण शोधून काढले होते,तर असं कोणी तिला आढळलं नव्हते,त्यामुळे मीराने आपली होप सोडली नव्हती,कधी ना कधी तो तिच्या प्रेमाचा स्वीकार करेल,तिचा पूर्ण विश्वास होता..त्यामुळे त्याला आता बरीच मंडळी पाषाणहृदयी म्हणत होते.
अशातच दोघांचे एमबीबीएस पूर्ण झाले होते.दोघांचीही पोस्टिंग आता वेगवेगळ्या गावातील हॉस्पिटलमध्ये झाली होती.दोघांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले.त्यांनतर तो neurologist बनत होता,तर ती gynaecologist..
दोघांच्याही घरी आता त्यांच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू झाली होती.श्रीने तर लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता.त्याला लग्न तर करायचेच नव्हते,त्याला मुलीशी लग्न करायचे नव्हते,की कुठल्या मुली सोबत लग्न करून तिचे आयुष्य सुद्धा खराब करायचे नव्हते.लग्न, प्रेम या हव्याहव्याशा वाटणाऱ्या सगळ्या संकल्पनापासून त्याने स्वतःला बरंच लांब ठेवले होते.मीराच्या घरी मात्र आता तिच्यावर लग्नाचे प्रेशर वाढत चालले होते.पण तिला श्री व्यतिरिक्त दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचे नव्हते. घरच्यांना ते सुद्धा मान्य होते, पण श्री मानत नव्हता.
दूर आहे आणि बराच काळ लोटून गेला तर मीरा आपल्याल विसरेल आणि तिला दुसरे कोणी आवडेल, असे श्रीला वाटत होते, पण असे काही घडलेच नव्हते. आणि अशातच त्याचा लग्नासाठी नकार ती पचवू शकली नव्हती, आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर फक्त मीरासाठी त्याने लग्नासाठी होकार दिला होता.
वर्तमान…
फोटोअल्बम मधील एक एक फोटो बघत सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यांपुढे सरकत होत्या.तेवढयात दारावर नॉक झाले..त्याने लगेच आपले पाणावलेले डोळे पुसले..
"आई?तू इथे?"
"हम्म..श्री तिचा तो हक्क आहे."
"काय बोलते आहे, मला काही कळत नाहीये."
"तुझ्या प्रेमावर,तुझ्यावर आता मीराचा हक्क आहे..लग्न स्वीकार केले आहेस ना? मग आता या गोष्टींचा सुद्धा स्वीकार कर..शेवटी तुझं पण प्रेम आहेच तिच्यावर.."
"हो माझं प्रेम आहे,पण ते प्रेयसी सारखे नाही आहे…कुणी का समजून घेत नाही आहे..?"
"तुझ्या मनासारखं तर काही होणार नाही आहे, कमीत कमी तिच्या मनासारखं होऊ दे..तिला तरी खुश राहू देत.."
"आई,तू सतत अशीच बोलत आली आहे.. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी तरी जग.. आणि आतापर्यंत मी तसेच जगत आलोय.."
"आता मीरा आणि तू,एक आहात..तिला जवळ घे, तिला फक्त तुझे प्रेम हवे आहे.मी एवढेच सांगेल.." बोलून आई निघून गेली..त्याच्या डोळ्यांतले अश्रू मात्र कोणालाच दिसले नव्हते.
क्रमशः
