Login

मी तुला माझ्यात जपणार आहे 9

आयुष्यातील द्वंद जगण्याचे..

मी तुला माझ्यात जपणार आहे 

भाग 9

     आई श्रीला काही गोष्टी समजावून निघून गेली. श्री रात्रभर मीराचा विचार करत होता की कुठेच तर चुकले नाही मीराचे,प्रेम तर ती करतेच..आणि तारुण्य म्हटले की शारीरिक ओढ तर असणारच, हे तर अगदी नैसर्गिक आहे. आणि हे तर मला पण माहिती आहे, आजपर्यंत ती कधीच कुठल्या दुसऱ्या मुलाच्या जवळ गेली नाहीये..फक्त श्री साठीच ती थांबली आहे.. आणि त्याने शेवटी श्री आणि मीरा यात मीराचा आनंद निवडला. 

       सकाळी उठून सगळ्यात आधी तो मीराकडे गेला,काल केलेली चूक त्याला सुधारायची होती.

"I am sorry!"श्री मीराच्या रूममध्ये तिच्या पुढे उभा होता. मीराने बघून सुद्धा न बघितल्यासारखे करत पलीकडे मान वळवली. 

"Sorry,I hurt you!तुला हवी ती शिक्षा दे." 

ती रागाने त्याचाकडे बघत होती.त्याने आपल्या मागे लपवलेले लाटणं पुढे आणत आपल्या हातावर धरले. 

"तुला हवे तितके मार,तुझा राग निघेपर्यंत मार..तसेही बायको लाटण्याने आपला राग नवऱ्यावर काढत असते म्हणे,तू पण काढ..."तो पपी फेस करत म्हणाला.ते बघून तिला हसू आले,सोबतच तिचं मन सुद्धा भरून आले होते, पळत येत तिने श्रीला करकचून मिठी मारली. 

"मी तुला खूप त्रास देते ना?सॉरी!" 

"हो!" 

"काय हो?कधीतरी नाही म्हण ना.."ती त्याच्या छातीवर आपले नाक घासत म्हणाली.

त्याला ते ऐकून हसू आले. 

"काल मी तुला hurt केले..आपण आता एक आहोत..माझ्यासोबत काही पण करण्याचा तुझा हक्क आहे..तुझा हक्कच तुला द्यायला आलोय.." 

"मी तुला किस करू शकते?"तिचा निरागस प्रश्न ऐकून त्याचा डोळ्यात पाणी तरळले.

"हो.." 

"आता करू शकते?"

"हो.." 

"Lips वर करू शकते?" 

"हो,कुठेही करू शकते.." 

      ते ऐकून तिने त्याला मारलेली मिठी आणखी घट्ट केली..आणि त्याच्याकडे बघू लागली..नंतर तिने तिचे लक्ष त्याच्या ओठांवर केंद्रित केले..आणि हळूहळू त्याच्या ओठांजवळ येऊ लागली. तिला तसे करतांना बघून त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले..

        बराच वेळ झाला होता,पण त्याला कुठेच मीराचा स्पर्श झाला नव्हता..म्हणून त्याने डोळे उघडले,तर मीरा फक्त त्याला बघत होती..

"काय झालं?"श्री.

"श्री,काल तू बोललास ते अगदी योग्य बोलला. काही गोष्टी लग्नानंतरच शोभतात,आणि तसेच व्हायला सुद्धा हवे.माझं प्रेम इतकं कमजोर नाहीये, की मी स्वतःवर कंट्रोल सुद्धा ना करू शकू..मी तुझी वाट बघू शकते श्री..अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.." 

"Shhhsssss!असं नाही बोलायचं.." 

तिने परत त्याला आवळून धरले..

"आणि काल तू किती रागवलास माझ्यावर..त्याची तर शिक्षा मी तुला देणारच आहे.." 

"काय?" 

"तुला माझ्या हातचे खाऊ घालून..आयुष्यभर..!"  

     ते ऐकूण तो खळखळून हसू लागला..कारण मॅडमला मॅगी शिवाय दुसरे काही नीट बनवता येत नव्हते..

_______

        शेवटी मीराचे वाट बघणे संपले होते,आज लग्नाचा दिवस उजाडला होता..मीरा लाल शालू, सोन्याचे दागिने,सुवासिक फुले,हळदीचे तेज..वाह! तिचं ते नववधू रूप कसं खुलले होते, सगळं कसं श्रीच्या आवडीचे होते. श्री सुद्धा खूप गोड दिसत होता. 

      मंगलमय वातावरणात मंगलाष्टकांचे सुर चहूकडे घुमू लागले..आणि शुभ मंगल सावधान झालेच..मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतांना मीरा सोबतच श्रीचे डोळे सुद्धा पाणावले होते..स्पत्पदी चालतांना त्याने मीराला सगळी वचन तर दिली होती, पण त्यालाच माहिती नव्हते तो सगळे पतीधर्म निभवू शकणार की नाही.पण त्याने स्वतःला एक वचन मात्र नक्की दिले होते तो मीराची कधीच साथ सोडणार नव्हता. 

             थोरामोठ्यांच्या सानिध्यात लग्न सोहळा उत्तम पार पडला होता.श्रीचे आयुष्य मार्गी लागलेले बघून श्रीच्या आई वडिलांनी एक सुखाचा श्वास घेतला.पाठवणीच्या वेळी तर मीरा रडतांना बघून अक्षरशः श्रीला रडू आले होते. पण मुलीसारख रडतोय म्हणतील म्हणून बाथरूमचा बहाणा करत तो तिथून गायब झाला होता.  

      दुसऱ्यादिवशी आनंदात सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली होती.आतापर्यंत सगळे अवतीभोवती असल्यामुळे श्री थोडा बिनधास्त होता,पण जशीजशी संध्याकाळ होऊ लागली त्याच्या मनाची घालमेल सुरू व्हायला लागली होती.त्यात प्रसाद त्याला "मीराच्या डोळ्यात एक पण अश्रू आला तर बघ…"म्हणत त्याला धमकी देऊन गेला होता. 

      मीरा मात्र खूप खुश होती.छूईमुईशी ती आनंदाने घरभर वावरत होती.नववधू ती,तिच्या हातातील कांकण आणि पायातील पैंजनचा सुमधुर आवाज घरभर गुंजत होता..घरात खूप प्रसन्न वातावरण होते.श्री तिचं खळखळून हसणं बघत बसला होता, जणूकाही आता त्याचीच तिच्या हसण्याला नजर लागावी..इतका एकटक तो तिला बघत होता. 

"गोड आहे ना..?"श्रावणी त्याला चिडवत म्हणाली. 

"हं?"तो भानावर आला. 

"वहिनी…मीरा वहिनी.." 

"हो.."

"काय मग डॉक्टर साहेब,तयारी झाली ना?" श्रावणीचा नवरा शांतनू.

"कशाची?"श्री. 

"भोळे बाबा..जय हो..हा मासूमपणा सोडा आता.."शांतनू.. श्रावणी हसू लागले. 

      मीराची तयारी सुरू होती,श्रीला मात्र आधीच रूममध्ये पाठवण्यात आले..ती फुलांनी सजलेली रूम बघून त्याचा मनात धडकी भरली. त्याचं डोकं सुन्न झाले.काय करावं त्याला काहीच सुचत नव्हते.आता मीराचा सामना करणे त्याला अवघड जात होते.

     आज फायनली मीराचा श्री पूर्णपणे तिचा होणार होता.तयार होऊन आनंदातच मीरा रूममध्ये आली.बघते तर श्री बेडवर झोपला होता.त्याला तसे झोपलेले बघून थोडी हिरमुसली पण त्याचा गोड चेहरा बघून परत स्वतःशीच हसली.लाइट्स बंद करत त्याच्या शेजारी जात, त्याच्या गालावर किस केले.तिच्या स्पर्शाने त्याच्या श्र्वासांची गती वाढली होती,ती अजून पुढे काय करते,त्याची धडधड वाढली होती,पण तो निपचित पडून होता त्याच्या केसांत हात घालत ती बराच वेळ त्याला कुरवाळत बसली होती.थोड्यावेळाने कधीतरी ती त्याच्या डोक्याशी झोपी गेली,आणि त्याने सुटकेचा श्वास सोडला. 

        आता त्यांच्या रात्री अशाच निघत होत्या. श्रीने जास्तीत जास्त नाईट duty घेतल्या होत्या, त्याने त्याचे दुसऱ्या गावातील विझिटस वाढवल्या होत्या,खूप सेमिनार अटेंड करू लागला होता,एक्सपर्टायझेशनचे कोर्सेस करू लागला होता.त्याची परदेशवारी सुरू झाली होती की त्या निमित्याने त्याला मीराचा सामना करू लागू नये.अशातच चार पाच महिने निघून गेले. मीराची मात्र घालमेल वाढू लागली,तिला तो हवा होता,त्याचे प्रेम हवे होता,त्याच्या कुशीत तिला विसावयाचे होते,त्याच्या स्पर्शात विरघळून जायचे होते..पण असे काहीच घडत नव्हते. त्याला सुद्धा मीरासाठी खूप वाईट वाटत होते, पण तिला जवळ घेण्याची हिम्मत होत नव्हती.

     ____

आज बऱ्याच दिवसांनी रात्री दोघंही घरी होते.. 

"श्री,झोपला काय?" 

   पण श्रीचा काहीच आवाज आला नाही.तो मीराकडे पाठ करून झोपला होता, म्हणजेच झोपेचं नाटक करत होता.थोड्या वेळाने श्रीला त्याच्या पाठीवर काहीतरी जाणवत होते.. मीराच्या हातांची बोटं त्याच्या पाठीवर फेर धरून हळूवारपणे नाचत होती,हळूहळू चालत तिची बोटं त्याच्या मानेजवळ गेली..आणि मानेभोवती खेळू लागली.श्री मात्र शांत राहत स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करत होता. आता हळूहळू ती त्याच्या जवळ सरकत होती..बोटांची जागा आता ओठांनी घेतली होती..तिचं त्याला हळूवारपणे किस करणं सुरू झाले..तिला आता तो आणखी हवाहवासा वाटू लागला होता..ती स्वतःला त्याच्यात सामावू बघत होती..

आता मात्र त्याचा स्वतःवरचा कंट्रोल संपला होता…

"Oh shut up Meera..दूर हो..तुला फक्त हेच हवे असते.."त्याने तिला एका हाताने बाजूला ढकलले..

      तिला वाईट वाटले,पळतच बाहेर बाल्कनीमध्ये आली..बऱ्याच वेळ थंड हवेला कवेत घेण्याचा प्रयत्न करत होती..श्री समजून आपल्याच हातांना स्वतःच किस करत स्वतःच्याच हाताचा वेढा आपल्या शरीराभोवती घट्ट करत होती.. 

     श्रीचे आतमधून तिला न्याहाळणे सुरू होते..तिला त्याची,एका पुरुषाची किती गरज आहे त्याला हे जाणवू लागले..तिला तसे करतांना बघून त्याच्या डोळ्यात पाणी जमू लागले..तिला होणारा त्रास त्याला बघावल्या गेला नाही.. 

  

      बरीच हिम्मत करून तो जागेवरून उठला, त्याने अंगातला शर्ट काढून फेकला..एक बॉडी स्प्रे मारला..एक मोठा श्वास घेत बाल्कनीमध्ये जात तिच्या जवळ जात तिला काही कळायच्या आतच तिला उचलून घेतले..तिच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यात सुद्धा त्याच्याप्रती ओढ दिसत होती..

        श्रीने तिला बेडवर आणून झोपवले..तो तिला अगदी फुलाप्रमाणे जपत तिच्यावर किसचा वर्षाव करू लागला..आता ती सुद्धा त्याच्या स्पर्शाने मोहरुन जायला लागली होती..बऱ्याच वेळ त्याचा हाच खेळ सुरू होता..तो पुढे जात नव्हता की कपड्यांचे अडसर सुद्धा बाजूला सारत नव्हता..शेवटी त्याला तो करत असलेले नाटक असह्य झाले आणि तो ताडकन तिच्यावरून उठत शर्ट घालत तिच्याशी काहीच न बोलता रूमच्या बाहेर पडला.. 

           श्रीचे असे वागणे आता मात्र तिला असह्य झाले.माझ्यात काय कमतरता आहे की श्री सतत मला नाकारतो आहे,या भावनेने तिला रडू कोसळले..रडतच ती बाथरूममध्ये शॉवरमध्ये जाऊन बसली..शॉवरच्या पाण्यामध्ये तिचे अश्रू सुद्धा विरघळत होते..तिच्या डोक्यात श्रीचे वागणेच येत होते,ती आता त्याच्यासोबत बेडवर सुरू असलेला एक एक क्षण आठवत होती..तसे तिच्या लक्षात आले की तो जे काही करत होता,ते वर वर तिला दाखवण्यासाठी होते, ते करतांना जे नैसर्गिक बदल होतात तसे काहीच बदल त्याच्यात तिला जाणवले नव्हते..रडता रडता तिचे लक्ष बाथरूम सभोवताली फिरत होते..पिंकिष टॉवेल,तसेच रंगाचे इन्नर वीअर होते. श्री कधीच बाथरूम lमध्ये कपडे राहू देत नव्हता,पण आज त्याच्या नजरेतून हे सुटले होते..बाथरूममध्ये साबण,शाम्पू सगळं सगळं मुली वापरतात तसेच दिसत होते..ते बघून आता तिच्या लक्षात आले की श्रीने जो परफ्यूम लावला होता तो पण फिमेल होता..

"शी मीरा,तू काहीपण विचार करतेय..तो जवळ येत नाही म्हणून असं थोडी काय असू शकते?" ती स्वतःशीच बोलत होती..उठतच ती बाहेर आली,तिचे ओले झालेले कपडे बदलायचे म्हणून तिने कपाट उघडले..डोळे पुसत पुसत काड्यांची हुसकवासक करू लागली..कपडे का मिळत नाही आहे बघितले तर तिच्या लक्षात आले तिने श्रीचे कपाट उघडले आहे..आणि तिच्या हाताला पफवाली ब्रा लागली..ते बघून ती थोडी शॉक झाली..नंतर परत कपडे हुसकू लागली तर एक बॅग सापडली,त्यात बरेच बायकी कपडे,दागिने, टिकल्या, बांगड्या तिच्या हाताला लागले.. तिच्या हाताला ती ओढणी पण सापडली ज्यासाठी लहानपणी ताईची ओढणी लपवली म्हणून त्याने खूप मार खाल्ला होता,पण तो सतत ओढणी मी नाही घेतली म्हणून बोलत होता,तो खोटं का बोलला असावा...आता मात्र तिच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती..तिच्या लक्षात आले तो काहीतरी नेहमी लिहित असतो..तिने त्याची ती डायरी शोधली आणि वाचू लागली..ते वाचतांना तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले…दोन तीन पान वाचले होतेच की तेवढयात श्री रूममध्ये आला, तिच्या हातात डायरी बघून आता मात्र तो समजून गेला होता..

"श्री, तुझ्यात शारीरिक काही प्रॉब्लेम आहे काय?तू पुरुष.." तिने सरळ सरळ प्रश्न केला. 

"नाही." 

"मग हे सगळं?" 

"शरीराने तर पुरुषच आहे, पण soul चा खूप मोठा प्रोब्लेम झालाय ग..मी स्त्री आहे, माझी आत्मा स्त्रीची आहे..दुहेरी आयुष्य जगतोय..नाटक करतोय..खूप त्रास होतोय असे जगताना..जीव खूप कासावीस होतोय..

      माझ्यात ती पुरुषी भावनाच नाहीये,कसे घेऊ तुला जवळ सांग ना?घरच्या प्रतिष्ठेसाठी हा सगळा मुखवटा धारण केला आहे..पण आता सहन नाही होत आहे..मला पण तुझ्यासारखं मनसोक्त हसायचं आहे,नाचायचं आहे..हवे तसे चालायचे आहे, हे असे नाटक करत चालतांना माझे पाय खूप दुखतात ग..बोलतांना चुकीची टोन येऊ नये काळजी घेतांना गळा खूप दुखतो ग..नाही जगता येत आहे मला..आणि मरता पण नाही येत आहे..ना तुला सुख देता येत आहे, ना मला सुखी राहता येत आहे.." श्री आता मात्र अगदी मुलींसारखा बोलत होता..बोलतांना त्याचा कंठ दाटून आला होता.. मीराच्या तर पायाखालून जमीन सरकली होती..तिचे भविष्य अंधकारमय झाले होते…डोळ्यांतील अश्रू आवरत नव्हते..

"तू माझा विश्वासघात केलंय श्री.." म्हणत ती उठली आणि गाडीची चाबी घेत सरळ घराबाहेर पडली.. श्री मात्र फक्त तिला जातांना बघत होता..

________

काही वर्षांनंतर….

"अँड द बेस्ट neurologist अवॉर्ड गोज टू मिस श्री…" एका मोठ्या हॉलमध्ये टाळ्यांच्या कडकडाटात "मिस श्री" हे नाव घुमत होते..

एक ५६-५७ वर्षाची स्त्री अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर येत होती..

________

क्रमशः