"अगं हो ना?बाई..आवरतोच आहे ना?, मलाही कळतं गं,त्याची परिस्थिती नाही म्हणून तर चारवेळा फोन करतो,तु नंबर लावलास ना?.."
"हो ना? म्हणून तर घाई करते,एका तासात आहे नंबर,दादांना केला होता मी.. टेस्ट अनशापोटी करायच्यात ना?.."
"अगं, थोडंसं काहीतरी घे ना?सोबत मग, त्याला भुक सहन होत नाही हं...!,चल झालं माझं , त्यांना फोन कर आलोच म्हणून तयार होऊन बाहेर या म्हणावं..\"
"हो करते..."
"अगं पैसे घे बरं तुझ्याकडचे ही.. लागणार नाहीत,पण असू दे मी घेतलेत,कमी पडायला नको.."
सरिताने मान हलवली,मोठ्या भावजींना व जावूया फोन केला.सोबत टेस्ट झाल्यावर दादांसाठी जेवणाचा डबाही घेतला.. दोघेही घाईत गाडीत बसलेत..
दादा व वहिनी बाहेरचं होते त्यांना घेतलं व तडक दवाखाना गाठला...पण सुमितच काम ठप्प झालं होतं.सारखे फोन सूरू होते त्याचे तोही काय?करेल,आई गेल्यानंतर सा-या परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर,सोबत शिकलेला असूनही जबाबदारीमुळे नोकरीचा राजीनामा देत त्याने व्यवसाय थाटला होता...आता त्यात छान जमही बसवला होता..मोठा भाऊ तसा नाकर्ताच पण असं कसं सोडून देणार बरं अर्धावर...दोन वर्षांची मुलगी व दोघे नवराबायको, सुमितच वर्षभरापुर्वी लग्न झालेलं अजून मुलबाळ नव्हतं...पण सरिता त्याला सर्व ठिकाणी साथ देत होती... नात्यांमध्ये कुठेच कमी पडतं नव्हती दोघं अगदी आपलेपणाने व मनापासून सगळ्यांना सांभाळून घेणं सुमित् चा स्वभाव..व सरिताही कुटूबांतून आलेली नात्यांना जपणारी..एक संस्कारी मुलगी मग काय?...सा-या ठिकाणी ही जोडगोळी मदतीसाठी सदा तत्पर... करायचं ते सार मनापासून... एकवेळ दोघ एकमेकांना वेळ देणार नाहीत पण नात्यांना वेळ देणं म्हणजे नशिब समजणारी ही जोडी... नातेवाईक म्हणाल तर कौतुकाचा वर्षाव करायचे दोघांवर.दादा तर साधाही. अजारी पडला ना?तरी समिरला फोन,वहिनी चिनूकला चिऊ तर काका काकींसाठी त्यांचं विश्वच तिला कोणतीही कमी जाणवु देत नव्हते...कालही तसच झालं...दादाला जरा अस्वस्थ वाटू लागलं.वय म्हणाल तर ३५ वर्ष ,घाम सुटला मग काय भाऊचा आरडाओरडा सुरू,
"अगं मेघा मी मरतो गं..समिरला कळवं, मारायच्या आत येतो का? बघ "
मेघाही बिनधास्त तीने लगेचच दिराला फोन केला.
"समिरभाऊ .. तुमच्या दादांना ॅअटक आला बहूतेक कसतरी करतात कळतं नाही मला काय ?करू.."
"समिरभाऊ .. तुमच्या दादांना ॅअटक आला बहूतेक कसतरी करतात कळतं नाही मला काय ?करू.."
वहिणींच रडण व तो आवाज ऐकून समिर घाबरला पटकन दादाला घेतलं व दवाखान्यात गेला.डाॅक्टरांनी टेस्ट करायला लावल्यात..तसे सिस्टिम्स हार्ट आॅटकचेच होते .
समिर घाबरला पण एक इंजेक्शन देऊन थोडा वेळात घरी सोडलं..आज काय?ते कळणार होतं..
समिर घाबरला पण एक इंजेक्शन देऊन थोडा वेळात घरी सोडलं..आज काय?ते कळणार होतं..
सरिता म्हणाली,"आज लगेचच डिसिजन घेऊन टाकू हं..!,पैशाकडे बघत बसलो काही बरवाईट झालं तर चिनू अंधारात पडेल आपण कितीही जीव लावला तरी आईबाप ते आईबाप.."
समिरने फक्त मान हलवली.टेस्ट झाल्यात सरिताने दादावहिणीला समोरच्या काॅन्टिंगमध्ये नेलं..डबा होता सोबत एक भजी व चिनूसाठी पिझ्झा मागवला पोटभर जेवू घातलं..समिर सगळं आटपून आॅफिसला गेला होता.. सरिताने रिपोर्ट घेतले पैसे भरलेत..सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडत सायंकाळी दोघांना घरी नेलं.वहिनी थोडी नाराज होती त्यामुळे स्वयंपाकही करून दिला वरून धीरही दिला..
रिपोर्ट तसा निगेटिव्ह होता.दोन व्हेन्स चाॅकअप होत्या लवकरात लवकर सर्जरी करावी लागणार होती..
"वहिनी नको चिंता करू आम्ही करतो सारं... लगेचच निर्णय घेऊ फक्त पैशांची व्यवस्था झाली कि आटपू सगळं.. फक्त आतीकाळजी करू नका बसं..."
तसं दोघेही काय?काळजी करणार होती.सर्व काळजी समिरच करणार होता...
क्रमशः
पुढे काय?रंग घेते कथा बघू पुढील भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा