मेघू ताई

This is little blog about my One Of The Favorite Person
लेखिका म्हणजे लेखणीची राज्ञी
लेखिका म्हणजे शब्दातून दरवळणारी अंगणातली जाई
लेखिका म्हणजे अंतरंगातील भावना मांडणारी एक तरल अभिसारिका

मला याचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा माझी ओळख मेघा ताईशी झाली. बाकी सगळ्यांसाठी ती असेल मेघा मॅडम किंवा ईरा व्यासपीठावरील सुप्रसिद्ध लेखिका मेघा अमोल. पण माझ्यासाठी, माझी सगळ्यात फेवरेट मेघू ताई. आता तिच्याबद्दल बोलणे म्हणजे एका एल. इ. डी. बल्बने चंद्राविषयी बोलावे.
पहिल्यांदाच जेव्हा मी एक शंका विचारायला तिला मेसेज केला तेव्हा मनात खूप धाकधूक होती. एवढ्या मोठ्या लेखिका मला भाव तरी देतील का? तो दिवस आणि आजचा दिवस आहे, मला कोणतीही शंका आली किंवा कोणतेही टेन्शन आले तर पहिला मेसेज मेघू ताईला जाणार म्हणजे जाणार. ती पण काय करणार बिचारी? आलिया भोगासी असावे सादर असे म्हणून का असे ना मला सर्वतोपरी मार्गदर्शन करत असते. आता सगळ्यांना वाटत असेल की आम्ही दोघी दोन विरूद्ध टोक असून आमचे कसे जमते? ऑपोझीट ॲट्रॅक्ट असेल. तर असेच आहे. पण तरीही आमच्यात दोन गोष्टींत खूपच साम्य आहे. त्यातील एक म्हणजे नाकावरचा गोल गोल चश्मा आणि दुसरी म्हणजे भरधाव वेगात गाडी चालवणे पण तेही कुणालाच इजा न होऊ देता. हे सांगणे काही वावगे ठरणार नाही की माझी मेघू ताई खूप सुंदर दिसते, खूप गोड हसते तो विषय निराळा आहे. पण कसं आहे एखादी खूप गोड व्यक्ती सगळ्यांना आवडते.

आता तिच्या स्वभावाने तर तिने मला आपलेसे केलेच पण मला ती खूप आधीपासूनच आवडते, जेव्हापासून मी तिचे लिखाण वाचले तेव्हापासून. आपल्याला ह्या लेखिकेशी बोलता येईल का? ह्या आपल्याशी बोलतील का? असे नानाविध विचार माझ्या मनात रुंजी घालत होते, पण मेघू ताईने सारे भ्रम माझ्या मनातून चुटकीसरशी काढून टाकले.

अशा एव्हरग्रीन विचारांनी बहरलेली लेखिका म्हणजे माझी लाडकी मेघू ताई ईरा व्यासपीठावर आपल्या लेखणीची करामत दाखवत आहे. वेळात वेळ काढून घरची, नोकरीची, जबाबदारी नेटाने सांभाळून तिने आपली शब्दांनी सजलेली लेखणीवजा भावना जीवापाड जपली आहे. शांत व सोज्वळ स्वभाव, मीतभाषी, वदनी सुहास्य, कमालीची जिद्द व कष्ट करण्याची तयारी, दूरदृष्टीता, चौफेर ज्ञान, कुशाग्र बुध्दीमत्ता या अशा अनेक गुणांनी संपन्न अशी माझी मेघू ताई एक लेखिका म्हणून प्रभावी आहे. तिने लिहीलेल्या नंदिनी ..श्वास माझा, तु ही रे ... कसं जगायचे तुझ्याविना, दुर्गा ... या कथामालिका ईरा व्यासपीठावर गाजल्या आहेत. सहज सोपी भाषा, काळजाला भिडणारे प्रसंग, गोड संवाद, लेखनातील सातत्य, विषयानरुप योग्य हाताळणी यामुळे तिच्या लेखनक्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे आणि सगळीकडे तिचीच चर्चा होत आहे. तिने नव्वद लाख वाचसंख्येचा जादुई आकडा पार केलेला आहे आणि तिने अजुनही तिच्या लेखणीची मशाल अजुनही तेवत ठेवली आहे. तिने लिहीलेली कथा "मला बाळ नकोय" ही वरकरणी जरी विचित्र वाटली तरी त्यातला मर्म खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी वाचली नसेल तर आवर्जून वाचा आणि वाचली असेल तर पुन्हा वाचा. मी तर तीन वेळा वाचली. स्त्रीच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या भावनांचा मागोवा घेणारी ही कथा आहे आणि सध्या ती लिहीत असलेली ज्वलंत अशी कथा म्हणजे "ज्युलिया राघव शास्त्री" अशा नानाविध विषयावर कथा लिहीणेच काय तर प्रत्येकाला त्याच्या लिखाणात सुधारणा करणे इथपर्यंत ती मोकळ्या मनाने मदत करते. माझ्या कथेत तर एकदा तिने खूप छान चुक शोधून काढली. "डोक्यावर पाय" आठवले का काही मेघू ताई? मी तर केवळ तिच्या लिखाणाविषयी आणि स्वभावाविषयी बोलत आहे. तसे तिला खूप काही येते. तिच्या रांगोळ्या पण खूप सुरेख आहेत. त्याच बघून तर मी आता रांगोळी काढायला शिकते आहे. तिला कधी मी प्रत्यक्षात भेटले नाही पण तिच्या शब्दातून, आमच्या मेसेजेसवरील संवादातून तिचा सहवास मला लाभला आहे. अशी गोड, गोंडस, प्रेमळ अशी माझी मेघू ताई मला तर खूप आवडते. मेघू ताई अशीच हसत रहा.. लिहीत रहा.. आणि माझ्या चुका दुरुस्त करत रहा...चला तर आता निरोप घेते. बाय!

~ऋचा निलिमा