मेहंदी ची जळमटे (भाग पहिला) 

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांची कथा..

मेहंदी ची जळमटे (भाग पहिला) 

लग्नकार्य असल्याने आभाच घर पाहुण्यांनी गजबजल होत. आभाचं आणि आदित्य चं अरेंज मॅरेज होत पण लग्ना आधीच्या भेटी गाठी ने ते एकमेकांना ओळखू लागले होते आणि अनोळखी पणा त्यांच्या मधून दूर झाला होता. आभा पदवीधर होती आणि आदित्य ही बँकेत चांगल्या पोस्टवर कामाला होता. कांद्या पोह्यांचा कार्यक्रमा वेळी आभाने सगळ्यांसमोर सांगितले, मुलगा मला पसंत आहे पण ह्या एकाच भेटीवर मी माझा होकार नाही कळवू शकत. मला निदान वर्षभर तरी त्याला ओळखण्यासाठी वेळ हवाय. जेणे करुन त्याला मी आणि तो मला ओळखू शकतो आणि एकमेकांच्या आवडी निवडी, सवयीं बद्दल ही माहिती होईल. लग्नानंतर मला कोणत्याही गोष्टीचा पच्छताप नको. तिचं बोलणं ऐकून आदित्य च्या घरचे भांबावून गेले होते. कळवतो आम्ही काय ते अस बोलून निघून गेले. तिच्या घरचे तिला इतक्या चांगल्या स्थळाला आभा ने तिच्या बोलण्याने घालवून टाकले असे बोलत होते. त्यांनी आता ती आशा च सोडली होती की त्यांच काही उत्तर येईल. पण दुसऱ्याच दिवशी आदित्य च्या वडिलांचा फोन आला आणि आदित्य तयार आहे अस सांगून होकार कळवला. सगळे खुश झाले.


वर्षभर आभा आणि आदित्य च्या भेटी गाठी होत होत्या. त्यांना एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी, सवयी सगळ्या लक्षात आल्या. आभा सुद्धा त्याच्या नकळत त्याची वेगवेगळी परीक्षा घ्यायची. त्यात तो पास ही व्हायचा. एकदा आभा ने तिची खास मैत्रिण स्वरा ला सांगून त्याच्या फेसबुक आयडी ला रिक्वेस्ट पाठवायला सांगून तो काय बोलतो सगळे बोलणे तिला स्क्रीन शॉट्स काढून पाठवायला सांगितले. स्वरा ला सुद्धा गंमत वाटली म्हणून तिने ही होकार कळवला. हे सगळ आभा ने फक्त ह्याकरिता केलं की आदित्य तिच्या सौंदर्यावर भाळतो की नाही हे पहायला. पण आदित्य ने तिची रिक्वेस्ट डिलीट केली आणि दुसऱ्यांदा पाठवल्या नंतर तिला ब्लॉक करून टाकले ह्याचा स्क्रीन शॉट् स्वरा ने तिला पाठवून दिला. आभा आता निश्चिंत झाली आणि स्वतःच्या वेडेपणावर हसली. आपण काहीही विचार करतो आता पुन्हा असे करायचे नाही ठरवून तिने मनातल्या मनात त्याची माफी मागितली. आणि ती पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडली. आता दोघांना कधी एक होतो ह्याच वेध लागलं होतं. पण आभा तिच्याच शब्दांत अडकली होती. आणि. तसपण सांगितल्या सांगितल्या लगेच तयारी करणं जमणार नव्हतं म्हणून ती वर्ष संपण्याची वाट पाहू लागली.


अखेर तो दिवस उजाडला. दोघांचं आता एक शुभमहूर्त गाठून लग्न लावून देण्याचं ठरलं. आभा खूप खुश होती. आज मेहंदी काढण्याचा कार्यक्रम होता. आभा मेहंदी ला घेऊन खूप एक्साईटेड होती. लहानपणी ती हट्ट करून इवल्याश्या दोन्हीं हातावर मेहंदी काढून घ्यायची. शाळेत मेहंदी अलाउड नव्हती तरी काढायची ह्यावरून तिने कित्तेक वेळा मार ही खाल्ला होता. तिने सुंदरश्या काचेच्या प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या अंथरूण त्यावर मेहंदी चे कोन ठेवले. आणि त्याचे फोटो काढून ती आदीला पाठवत. तिची आई तिचा हा वेडेपणा बघून तिला एकटक पाहत राहायची. तिच्या आईच्या डोळ्यातून पाणी येताच ती पण आईला मीठी मारून समजावयची.


"आई नको ना ग रडू."


"आभा तुला माहितीये लहानपणी तुला मेहंदी किती आवडायची. प्रत्येक लग्न कार्या वेळीस तु हट्ट करून मेहंदी लावून घेत. नाही काढली तर अख्खं घर डोक्यावर घ्यायची. एकदा आपल्याला अचानक तुझ्या पप्पांच्या मित्राच्या लग्नाला जायचं होत पण तू तर मेहंदी काढल्याशिवाय मी येणार नाही अस म्हणून घरातून हलायला ही तयार नव्हतीस."


"मग..?"


"मग काय तुझ्या पप्पा नीं फ्रिज मध्ये एक कोन होता. त्यातून तुला कशीतरी मेहंदी काढली मग तु कुठे यायला तयार झालीस. ती मेहंदी घेऊन तू हॉलभर मिरवत होतीस. तुझे ते मेहंदी चे ओले हात तुझ्या काकांच्या शेरवानी ला लागले आणि मेहंदी चा डाग लागला होता पण ते काही बोलले नाहीत उलट तुच चिमणी ने शी केली काकांच्या शेरवानी वर असं सगळ्यांना सांगत सुटलीस. आजही तो दिवस आठवला की हे आणि मी खूप हसतो. किती लवकर मोठी झालीस ग आभा बेटा. आता हीच मेहंदी लावून तुझी पाठवणी करायची."


"आई बास ना ग आता, नको ना रडुस. हे बघ तुला पण छान मेहंदी काढू चल ये ना इथे. बघ आज्जीने किती भारी मेहंदी काढलीय." असं म्हणून ती आईला हसवायचा प्रयत्न करत होती.


आज मेहंदी काढायची होती म्हणून आज अाभाच्या खास मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या. अाभाची मेहंदी काढून झाल्या वर तिने मीना ला हाक मारली.


"अगं थांब ना, मला जरा माझा फोन दे इकडे. ह्म्म, आता जरा माझ्या मेहंदी चा छान फोटो काढ. अग काढ ना लवकर मला आदी ला सेंड करायचे आहेत."


"हो अग धीर धर काढते ना थांब, इतका काय उतावीळ पणा." असं मीना म्हणताच आभाच्या मैत्रिणी हसायला लागतात.


तितक्यात तिथून आभाची आई त्यांना खायला घेऊन येते.
"ए मुलींनो तिला छळण बंद करा आधी आणलाय ते खाऊन घ्या थंड होण्याच्या आत."


"हो काकू," म्हणत त्या गप्पा गोष्टी करत, खात होत्या सोबत आभा ला सुद्धा भरवत होत्या.


आभा च्या हातावर मेहंदी ने सुंदर अक्षरात आदीच नावं काढलं होतं. ते पाहून तिला खूप बर वाटत होत. देवाला ती मनोमन इतका छान जोडीदार मिळाला ह्याचे आभार मानत होती. एक वेगळंच समाधान तिच्या चेहऱ्यावर तरळत होत. आदिसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवतानाचे दिवस तिला आठवत होते. त्याची वचन, त्याने दिलेली प्रॉमिस, त्यांच समुद्र किनारी एकांतात तासंतास बसुन मारलेल्या गप्पा, त्याचा समंजसपणा सगळं काही डोळ्यांसमोर येत होत. आणि दुसरीकडे आता आई वडिलांना सोडून जाण्याचं दुःख ही होत. पण आदिने तिला सांगितलं होत जितकं होईल तितका वेळ आपण त्यांनाही द्यायचा. त्यांना कधीही तु अंतर देऊ नकोस. त्यांना अजिबात अस वाटलं नाही पाहिजे की तु बदलून गेलीस. दररोज व्हिडिओ कॉल करत जाऊ आपण. त्याच्या मनातले विचार बघून ती आणखीनच त्याच्या प्रेमात पडे.


ती तिच्या विचारात गुंग होती. तितक्यात आदीचा कॉल येतो.


क्रमशः

🎭 Series Post

View all