मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग चौथा
"बाबा, कसं सांगू कळत नाहीये. ते मगाशी मी माझ्या खोलीत गेलो तर तिथे कावेरी होती. अचानक येऊन तिने मला हग केलं आणि तेच सायली ने पाहिलं. हे इतकं सगळं अचानक झालं की मला कळलं च नाही. आणि त्यामुळेच वाटतं सायली रडत होती."
"काय..?" कावेरी च्या आई ला अभय च बोलण ऐकुन विश्वास बसत नव्हता. त्यांच्या सोबतच बाकी सगळे अवाक् झाले होते.
"अभय तु शुध्दीवर तर आहेस ना..? कावेरी अस का करेल..?" कावेरी चे बाबा त्याला काळजीने कासावीस होत विचारत होते.
"काका मी का खोटं बोलू. मी खोलीत गेलो तेव्हा कावेरी तिथे होती. काही कळायच्या आतच हे सगळं झालं आणि सायली ने आम्हाला पाहिलं. तिला समजावून सांगायला गेलो पण ती काहीच ऐकुन घ्यायच्या मनस्थितीत नव्हती."
"मला काय वाटतं कावेरी ने सहज मिठी मारली असेल. त्यात इतका गैरसमज नको करून घेऊया आपण. आफ्टर ऑल आम्ही तिघे छान मित्र आहोत. मिठी मारली तर त्यात गैर काय..?"
आभा समजावणीच्या सुरात बोलली आणि खरच ते म्हणणं पटलं देखील सगळ्यांना. पण आत्याला आभा च म्हणणं पटलं नव्हत. त्यांनी लगेचच आपलं मत मांडायला सुरुवात केली.
"हो पण आता तो फक्त मित्र नसून कोणाचा नवरा आहे हे तिला कळू नये का..? आणि हे असं कोणीच नसताना अशी कृती केली तर गैरसमज निर्माण होणारच..!"
"मला आभा च म्हणण पटतंय. आपण सगळे समजावू तिला." सायली च्या बाबांनी त्यांच्या बहिणीच मत खोडत सगळ्यांना सांगितलं.
"अरे पण दादा.."
"शांत रहा जरा. परिस्थिती चा गुंता सोडवायचा आहे. अजुन गुंता वाढवू नकोस." सायली च्या आत्याला गप्प बसावं लागलं. तितक्यात सायली बाहेर हॉल मध्ये आली. आभा ने तिला हात देत सोफ्यावर बसवलं.
"आभा.. बाळा कसं वाटतयं आता..?" आज्जीने तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारले.
"आई.. आज्जी.. प्लीज मला माफ करा." सायली रडवेल्या सुरात म्हणाली.
"अग तु का माफी मागते..? अभय ने आम्हाला सगळ सांगितलं आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. कावेरी आणि अभय यांच्यात फक्त निखळ मैत्री आहे. गैरसमज नको करून घेऊस." अभय ची आई.
"हो सायली, कावेरी मी आणि अभय लहान असल्या पासून सोबत आहोत. तु उगाच गैरसमज करतेय." आभा.
"मी त्याबद्दल नाही बोलत आहे आई. मी तर ते तेव्हाच सोडून दिलं." सायली.
"मग कश्या बद्दल बोलतेय तु..?" अभय सायली ला विचारू लागला.
"आई.. ते आज्जी ने दिलेल्या पाटल्या सापडत नाहीयेत."
"अरे बाबा हे काय चाललंय तुम्हा पोरांचं..?" आज्जी तिच्या ह्या वाक्यावर चांगलीच पेटून उठली.
"आज्जी तु शांत हो." आभा आज्जी ला शांत करत होती.
"अग कशी शांत होऊ.. त्या पाटल्या नाहीयेत फक्त मोठ्यांचा आशीर्वाद आहे तो. जो इतकी वर्षे झाली जीवापाड जपत आलोय."
"सायली तु काल कपाटात ठेवल्या होत्या ना त्या." आभा च्या आई ने सायली ला विचारलं.
"हो आई. तुम्ही समोर होतात ना. तेव्हाच तर ठेवल्या."
"मग अश्या अचानक कुठे जातील..? चल आपण शोधू सापडतील."
"आई मी अख्खी खोली पालथी घातली. सगळीकडे शोधलं. नाहीच भेटत आहे."
"तरीही एकदा आपण सगळ्यांनी मिळून शोधायला काय हरकत आहे..?" आभा चे बाबा बोलले.
सगळ्यांनी मिळून शोधायला सुरुवात केली. आभा ची खोली, आई बाबा, आज्जी आणि पुन्हा अभय सायली च्या खोलीत शोधू लागले. बाकी देशमुख कुटुंब हॉल मध्ये इथे तिथे पाहू लागले. कावेरी चे आई वडील तिथेच होते. त्यांना तिथे थांबायला खुप जड जात होते पण अश्या प्रसंगी त्यांनी झालेला प्रकार बाजूला ठेवून ते देखील त्यांना जमेल तशी मदत करू पाहत होते.
सगळ्यांनी संपूर्ण घरात शोधून पाहिलं पण पाटल्या कुठेच मिळाल्या नाहीत. सगळेजण हताश होऊन हॉल मध्ये दमलेल्या अवस्थेत बसले होते.
"सगळ्या खोल्या पालथ्या घातल्या पण कुठेच दिसेना पाटल्या. कुठे हरवल्या अचानक.."
"हरवल्या की कोणी चोरल्या..?" सायली च्या आत्या च्या ह्या प्रश्नाने सगळे अजुन काळजीत पडले.
"अभय मी काय म्हणते, आपण पोलिस कंप्लेंट करूया." आभा ने अभय ला सांगताच, अभय तिथून जाऊ लागला. तितक्यात सायली ने पुढे येऊन अभय ला थांबवलं..
"मला माहितीये पाटल्या कोणी चोरल्या असतील."
"काय बोलतेय सायली तु..?"
"हो आई माझ्या पाटल्या कावेरी ने चोरल्यात."
"हे बघ सायली आम्ही ऐकुन घेतोय म्हणून तु काहीही आरोप लावू नाही शकत आमच्या कावेरी वर. ती तशी नाहीये." कावेरी ची अगतिक होऊन म्हणाली.
"हो सायली आम्ही तिला लहानपणा पासून ओळखतोय ती असं कधीच करू शकत नाही." अभय चे बाबा सायली ला बोलले तसे सगळे त्यांच्या हो मध्ये हो करू लागले.
"आई, बाबा माझी ही ती कोणी शत्रू नाहीये. पण खोलीत कोणी नसताना ती काय करत होती आमच्या खोलीत..? त्या दिवशी सुद्धा मी पहिल्यांदा तिला भेटले तेव्हा ही मला निरखून पाहत होती. काल पर्यंत असणाऱ्या पाटल्या आज अचानक कुठे गायब होतील सांगा मला."
"तिलाच बोलवा ना इथे आणि काय ते सोक्षमोक्ष लावून टाका." सायली ची आत्या बोलली.
"ठीक आहे. आभा लाव तिला कॉल. बोलावं इथे तिला." कावेरी चे वडील जड आवाजात बोलले.
"मकरंदा अरे काहीही काय बोलतोयस. कोणी कोणालाही बोलवायची गरज नाहीये. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि राहिला पाटल्यांचा विषय तर आई, देवाने दिलेलं खुप आहे आपल्याजवळ. आपण नवीन करू."
सायली काही बोलणार, तितक्यात बाबा पुन्हा म्हणाले.
"हा विषय आता इथेच थांबला पाहिजे. ह्याची कुठे वाच्यता नाही केली तर बरं होईल."
कावेरी चे आई वडील तिथून सगळ्यांची माफी मागून निघाले. त्यानंतर देशमुख कुटुंब देखील सगळ्यांचा निरोप घेत, सायलीला भेटून निघाले. घर अगदी शांत शांत झालं होत. कोणीच कोणाशी बोलत नव्हत. कोणाची जेवायची देखील इच्छा नव्हती पण आज्जीच्या आग्रहाखातर सगळ्यांनी दोन घास पोटात ढकलले.
अभय सायली ची माफी मागावी म्हणून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण सायली ने त्याला खोलीबाहेर निघून जायला सांगितले. तो गच्चीवर आला. आजचा दिवस इतका वाईट जाईल त्याला वाटलं नव्हतं. अभय खुप डिस्टर्ब झाला होता. तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवत. तो मागे वळून पाहतो तर ती आभा होती. तिला त्याच्या चेहऱ्यावरची काळजी साफ दिसत होती.
"अभी तुझ्या हृदयावर हात ठेवून सांग मला, तुला वाटतं आपली कावेरी असं काही करेल..?"
"त्यात काय सांगायचं मी मानत च नाही असं काही तिने केलं असेल, पण मग ती आमच्या खोलीत काय करत होती..?"
आभा देखील ह्या गोष्टीचा विचार करू लागली. तिला विचारात गुंग झालेली पाहत अभय ने तिची तंद्री मोडली.
"ओ मॅडम जाऊन झोपा जा. उद्या सकाळी जायचयं ना पुण्याला."
तिने हो म्हणत अभयला सगळं सुरळीत होईल म्हणून समजावून तिथून निघू लागली. आणि मनात ह्या गोष्टींचा लवकरात लवकर छडा लावण्याचा विचार करू लागली. त्यासाठी लवकरात लवकर कावेरी ला भेटाव लागेल म्हणून तिने तिला उद्याच भेटण्यासाठी बोलवायचं होत म्हणून कॉल करायला गेली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा