Login

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे (भाग नववा)

न रंगलेल्या मेहंदी च्या जळमटांत रंग भरताना...

मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग नववा

काही महिन्यानंतर...

अनेक दोषारोपांनंतर झालेला गुंता सुटला होता पण ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडणे दोन्ही कुटुंबासाठी सोपं नव्हतं. एकमेकांना आपलं दुःख न दाखवता इतर कुटुंबातल्या सदस्याला सांभाळून घेत ते सावरत होते. मधल्या काळात सायली ने येऊन अनेकदा घरच्यांची आणि अभय हातापाया पडून माफी मागितली पण कोणीच तिला माफ केले नाही. सगळ्यांचा तिच्यावर असलेला विश्वास तुटला होता. अभय चा विश्वासघात झाल्याने माफी तर दूर आता तो इतर कोणावर विश्वास ठेवायला देखील दहादा विचार करणार होता. त्याने तिच्यावर केलेल्या निस्सीम प्रेमाचा अंत झाला होता. खुप खचला होता तो. पण आभा आणि श्रीकांत ने मिळून अभय ला ह्या सगळ्यातून सावरायला मदत केली. आभा च्या घरी येण्याजाण्या मुळे श्रीकांत ला सगळे ओळखू लागले होते. त्याच्या द्वारे सायली च्या बाबांची विचारपूस होत इतकाच आता संवाद त्यांनी देशमुख कुटुंबाशी ठेवला. अभय सोबत त्याने आभा च्या घरच्यांच्या मनात देखील जागा केली. तसे तर त्याने देखील आपल्या आईशी म्हणजेच सायली च्या आत्याशी बोलणे जवळपास बंदच केले होते. पण कितीही झाले तरी आई आहे असं समजावत आभा ने त्याला त्याच्या आईशी बोलण्यास भाग पाडले. त्यामुळे वरवर बोलत असे तो.

घटस्फोटाची प्रक्रिया चालू असताना सायली ने कावेरी च्या घरी गेली. आधी तर तिला भावनिक रित्या जाळ्यात गुंतवून अभय ला तिला घटस्फोट देण्यासाठी नकार मिळवून आणायचा विचार होता. पण ती तिथे नव्हती. तिला आधी वाटले ती त्याच्या घरी गेलीय म्हणून तिचा संताप अनावर झाला आणि मग तिच्याच मुळे सगळे झालेय हे असं म्हणत ती तिथे नसताना देखील तिच्या घरी जाऊन खुप तमाशा केला. नंतर तिला ती पुण्यात असल्याचे कळाले तेव्हा हे काय करून बसलो म्हणून तिने तिच्या घरच्यांची माफी मागितली.

घटस्फोट मिळाल्याने अभय सुटला होता पण तो मिळवताना ही सायली च्या पुन्हा विचित्र वागण्याला सामोरे जावे लागले. तिने घटस्फोट होऊ न देण्याचे भरपूर प्रयत्न केले. शेवटी श्रीकांत ने आपले ब्रह्मास्त्र काढून तिला त्यादिवशी झाल्या प्रकारची सगळी रेकॉर्डिंग ऐकवली. जी त्याने लपून आपल्या मोबाईल मध्ये कैद केली होती. ज्यात तिने तिची चूक कबूल केली होती. ते पाहून तिची दातखीळ च बसली. ह्याला सगळ्यांसोबत आता तिच्या विरुद्ध असलेले तिचे घरचे ही साक्षीदार असल्याने अभय कडची बाजू तिच्यावर भारी पडली. आणि तिचा डाव तिच्यावरच उलटला. आता इथे काहीच टिकाव लागणार नाही म्हणून तिने हात टेकवत, माघार घेतली. आणि संगमताने घटस्फोट घेतला.

खरी लढाई त्यानंतर च तर सुरू झाली. अभय ने काही विचार न करता आत्याची अट मान्य करून लग्नाला तयार झाला होता. त्या कागदांवर सही करताना त्याचे हात थरथरत होते. जिच्यासोबत आयुष्यभर साथ देण्याच वचन घेतलं होतं तिनेच आज त्याच्यावर माघार घेण्याची वेळ आणली. सगळे सोबत होते पण तिची आठवण ही त्याला येई. केवळ दुसऱ्याच्या सुखाचा विचार करून त्याने तिच्यावर विश्वास ठेवून प्रेम केले. स्वतःच्या कुटुंबासोबत तिच्याही कुटुंबाची स्वतःहून जबाबदारी घेतली. आणि याचा मोबदला असा मिळावा..? हाच प्रश्न सतत त्याच्या मनाला भेडसावत असे.

कावेरी पुण्यात आपल्या काकांच्या घरी राहत असल्याने तिने मुंबईत येणे बंदच करून टाकले. तिने तिचा फोन नंबर चेंज केला आणि जो काही कॉन्टॅक्ट होता तो फक्त तिच्या आई बाबांशी च ठेवला होता तिने. आई बाबांना देखील, त्यांच्या बद्दल काही न बोलण्याचे तिने निक्षून सांगितले. त्यामुळे तिला ह्या सगळ्या प्रकाराबद्दल जाणीव नव्हती. फक्त, सायली ने पाटल्या चोरी केल्याचे कबूल केल्याचे आभा कडून कळल्याची गोष्ट तिला सांगून तिच्या नावावर लागलेलं कलंक मिटल्याचे कावेरी च्या आईने तिला सांगितले. त्या दिवशी तिला खुप बरं वाटलं. खोटा आरोप सिद्ध झाल्याने देवाचे तिने आभार मानले. तिच्या आई वडिलांनी देखील पाटील कुटुंबाच्या घरी येणं जाणं कमी केले होते. आभा ने खुप प्रयत्न केला कावेरी शी कॉन्टॅक्ट करण्याचा पण तिला यश आलं नाही.

एकदिवस अभय असाच गच्चीवर जाऊन दूर बघत विचार करत बसला होता. मागून तोच ओळखीचा नेहमी खांद्यावर पडणारा हात पडला. हलकेच कसनुस एका बाजूने तो स्मित करत म्हणाला,

"आभा.., आता बोलण्यासारखं काही नाहीये."

"भरपूर आहे अभी. एकदा तु बाहेर डोकावून तरी बघ ना. खुप काही आहे. जर तु ठरवल तर.."

"आता काहीच ठरवायचं नाहीये मला. जे नियती च्या मनात असेल तेच होईल. नाही कोणतेच निर्णय घेऊन पच्छाताप करत बसायचा नाहीये मला."

"हा निर्णय जर का तु घेतला नाहीस तर खरच खूप पच्छाताप करशील."

"म्हणजे..?"

"कावेरी च लग्न जमतंय अभी."

"ओह्.. चांगली गोष्ट आहे."

"ह्यात काय चांगली गोष्ट आहे..? तिचं तुझ्यावर प्रेम आहे. तिने आजवर तुझ्यासाठी आपल्या घरासाठी खुप काही केलंय. खुप ऐकुन घेतलंय ते ही चूक नसताना. इतकंच काय तर आपलं प्रेम ही सॅक्रिफाय करून बसली ही वेडी. त्याच तुला काहीच वाटत नाही का..?"

"वाटत ना खुप वाटतं. कदाचित मी तिच्यावर नकळत केलेल्या अन्यायामुळे देवाने मला शिक्षा दिली. जी मी हसत भोगेन. पण आता तिच्यावर अजुन अन्याय मी नाही करू शकत. नाही. नाही. तो हक्कच नाही मला."

"जर आज तु वेळ न घालवता तिची साथ मागशील ना तर खरा न्याय भेटेल तिच्या प्रेमाला."

"आभा तु वेडी आहेस का..? आज माझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे म्हणून मी आता तिची साथ मागू..? जर का सायली चांगली मुलगी असती आणि आज आमचा संसार टिकून असता तर हे बोलली असतीस का तु..? केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मी हे असलं काही नाही करणार."

"सायली चांगली असती तर कदाचित हे इतकं सगळं झालं नसत आणि त्यामुळे मला कावेरी च्या मनातलं ही कळलं नसत. तु बोलतोयस त्या जर तर च्या गोष्टी आहेत. आत्ताची परिस्थिती बघ आणि निर्णय घे."

"ह्यात केवळ स्वार्थ दिसतोय. बाकी काही नाही."

"हो आहे स्वार्थ. मला तिचं प्रेम तिला परत मिळवून द्यायचंय. जे मला तिच्या डोळ्यांत दिसतं तुझ्याबद्दल आणि हा माझा स्वार्थ आहे."

"आणि माझा स्वार्थ माहितीये का काय आहे..?"

"काय..?"

"श्रीकांत ला त्याच प्रेम मिळवून द्यायचं. जे त्याच्या डोळ्यांत मला दिसत तुझ्याबद्दल." हे वाक्य ऐकताच आभा गोरीमोरी झाली. तिला काय बोलावे सुचत नव्हतं.

"आभा का मन मारते स्वतःच..? मला दिसत नाही का तुझ्या डोळ्यांत त्याच्याबद्दल च्या भावना..?"

"अभी प्लीज काहीही काय.. तो फक्त मित्र आहे माझा. अरे किती मदत केलीय त्याने आपल्याला. त्याला काय वाटेल मी स्वार्थी आहे."

"मी सुद्धा तेच बोलतोय. कावेरी ला माझ्याहून अधिक चांगला शोभेल असा मुलगा मिळेल. मी अजिबात तिला दिसर्व नाही करत. पण तु आणि श्रीकांत सोबत खुप छान वाटता. तुला त्याच्या सोबत असं खळखळत हसताना पाहून ना आभा माझं मन सुखावत. असच आनंदी पहायचं आहे तुला. आणि ते फक्त श्रीकांत च करू शकतो."

"अभी.." तितक्यात आई गच्चीवर येते. तिने त्या दोघांचं सगळं बोलण ऐकलं होतं.

"हो आभा. आणि म्हणूनच आज श्रीकांत येतोय घरी. तुझा हात मागायला."

"काय..? कधी..म्हणजे का आई..? कोणी सांगितलं त्याला..?" आभा कावरीबावरी झाली होती अगदी.

"अग शांत हो आभा. तो स्वतःच येतोय. आणि ह्या सगळ्याची कल्पना त्याने आधीच दिली होती मला, बाबांना आणि आज्जीला. फक्त प्रसंग तसा नव्हता म्हणून त्याने काही वेळ जाऊ दिला. तुला खरंतर हे सरप्राइज द्यायचं ठरलं होत. पण तुझ आणि अभी च बोलण ऐकता वाटलं की तु परत मोडता घालशील म्हणून तुला सांगितलेल बर."

"काय मग कसं वाटलं सरप्राइज..?" अभी डोळे मिचकावत म्हणाला.

"म्हणजे अभी तुला ही हे ठाऊक होत..?"

"अर्थात.." अभी खांदे उडवत म्हणाला. तशी आभा अभय ला मारण्यासाठी धावली आणि अभी आई च्या पाठी धावत गेला.

"अरे हो हो. थांबा आता काय हे लहान मुलांसारख." आई.

"आईSss बघतेयस ना ग, एक मुलगी किती खूष झाली ऐकुन." अभी जोरात म्हणाला.

"अभी तु जा. बोलूच नकोस माझ्याशी." आभा धावत गच्चीवरून खाली गेली.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

कावेरी च्या घरी

कावेरी आपल्या आई बाबांना पुण्यातून कॉल करून त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती.

"हो ना.. आणि बघ तुझी तब्येत किती सुधारली आहे." आई.

"हो वहिनी मी तशी काळजी घेतो तिची. पण यापुढे आपले जावई असतील त्यांना घ्यावी लागेल ना."

"काका प्लीज. बाबा सांगा ना काकांना, सारखे चिडवत राहतात."

"अग पण तो बरोबरच तर बोलतोय ना. किती दिवस अजुन त्याला अशीच वाट पाहायला लावणार आहेस. लोक समजूतदार भेटतात पण म्हणून का असं करायचं का..?"

"हो कावे बघ तुच. किती महिने झाले त्या पोह्यांचा कार्यक्रमाला. अजुनही तु विचार करते विचार करते असच बोलतेयस."

"अं..म.. हमम.. मी बोलते नंतर."

"नाही काय तो विचार आत्ताच सांग आम्हाला. मोकळं कर."

"आई पण मी काय बोलू. एकाच म्हणण आहे की त्याला परदेशी सेटल व्हायचंय आणि मी नाही जाऊ शकत. तसही तो दुसऱ्या स्थळांना भेटतोय. पण त्याला अजुनही कोणी त्याला आवडेल अशी भेटली नाही. आणि काही जणांना तर मी नोकरी न करावी अशी इच्छा आहे."

"मग आपण दुसरं स्थळ पाहूया का..? तुझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा पण आहे ना लग्नाचा, त्याच्यासाठी तुला विचारत आहेत. बोलवूया का ह्या रविवारी..?"

"आईSs.. बाबा सांगा ना ओ तुम्ही तरी." कावेरी वैतागत बोलली.

"मी आता इतकंच बोलेन की तु बघ विचार कर आणि सांग आम्हाला." मग थोडफार बोलून फोन ठेवून देतात.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

आभा च्या घरी

श्रीकांत त्याच्या मामा मामी म्हणजेच सायली च्या आई बाबांना घेऊन आभा च्या घरी तिला मागणी टाकायला आलेला असतो. सगळ्यांनी त्यांच मागील गोष्टींना बाजूला ठेवून हसत स्वागत केले. थोडफार जुजबी बोलणं करून अभय ला आभा ला बोलावून आणण्यासाठी सांगितलं तसं श्रीकांत ने मी जाऊन बोलावून आणतो म्हणत तो आभा च्या खोलीत गेला. आभा सुंदर फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घालून त्यावर साधा मेकअप करून बसली होती. ती तिच्या विचारांत इतकी गर्क होती की, श्रीकांत आलाय हे देखील तिला कळाले नाही. त्याने टिचकी वाजवली तशी ती त्याला इथे पाहून दचकली.

"तु..? आणि इथे कसा.." आभा कावरीबावरी झाली होती. तिला अशी पाहून श्रीकांत ला आपलं हसू आवरलं नाही. तो जोरात हसू लागला.

"इतकं काय झालं हसायला..? मी काय जोकर आहे का.." आभा चिडत बोलली.

"मग मी काय भूत आहे का इतकं घाबरायला..?"

"नाही ते तुला असं अचानक पाहून.."

"सवय घ्या करून मॅडम कायमची. तुम्हाला नेहमीच मला पाहत राहावं लागणार आता." तशी आभा गाल्यातल्या गालात हसते.

"श्रीकांत पण.."

"ए.. आता पण नाही काही नाही. तुला आवडतो ना मी मनापासून की फक्त मदत..?" तशी आभा त्याच्या कडे अगतिक होऊन पाहते. आणि त्याला पुढचं बोलू देत नाही.

"नाही श्रीकांत. उलट मी हा विचार करत होते की तुला मी आवडत असेल की नाही."

"अच्छा म्हणजे मी आवडतो तर.. चला मग आता लवकरच घेऊन जाईल माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी." तशी आभा थोडी उदास झाली.

"आणि अभय..? त्याच आयुष्य असं बेरंगी असताना मी नाही माझ आयुष्य रंगीबेरंगी करू शकत."

"अग वेडा बाई. माझा नाहीये का तो कोणी..? आणि तु नको काळजी करुस. माझ्यावर विश्वास ठेव मी सगळं नीट करेन."

"म्हणजे..?"

"कळेल ते नंतर. पण आता येशील का नाही. सगळे वाट पाहत बसले आहे आपली."

श्रीकांत आभा ला घेऊन येत असताना सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर पडतात. दोघे सोबत इतके छान वाटत होते की सगळे त्यांना पाहून भारावून गेले. आभा च्या घरच्यांना मनापासून खुप बरं वाटलं. आज कित्येक वर्षांनंतर त्यांना एक आत्मिक समाधान मिळाले ज्याची त्यांनी आशाच सोडून दिली होती. सगळे ठरले होते पण श्रीकांत ने थोडा वेळ मागून सगळ्यांना लग्नाची तारीख आत्ताच नको ठरवायला म्हणून सांगितले. आधी सगळ्यांना विचित्र वाटले पण ठीक आहे म्हणत सगळ्यांनी होकार दिला. सगळ्यांनी मिळून नाश्ता करत बाकी लग्नाची बोलणी केली. निरोप घेऊन ते निघणारच होते की तितक्यात घरी श्रीकांत ची आई येते. ह्या आता काय करतील म्हणून त्यांना पाहून आभा काळजीत तर बाकी सगळ्यांना ही प्रश्न पडतो. त्या आत येतात.

"खरतर मी इथे यायला नको होत पण माझ्या मुलाच्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी इथे निघून आले."

"मोडता घालायला का..?" श्रीकांत तिरस्काराने बोलला.

"नाही श्री. मोडता नाही घालणार मी. फक्त मी माफी मागायला आलेय. मला मोठ्या मनाने माफ करा सगळ्यांनी. मी पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात डोकावून सुद्धा पाहणार नाही. तुझ्याशिवाय कोण आहे मला. पण मी केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळालीच पाहिजे म्हणून मी निघून जाईल कुठेतरी." आईचं बोलणं ऐकुन श्रीकांतला धक्का बसतो. तिच्याशिवाय जगण्याचा आणि ती अस काही करण्याचा निर्णय घेईल त्याने कधी विचार ही केला नव्हता. खुप मोठ्या मुश्किलीने तो मनावर ताबा मिळवतो आणि तसाच निर्विकार चेहऱ्याने उभा असतो. आभा ला त्याच त्याच्या आईवर असलेलं प्रेम कळून होत. ती पुढे येऊन त्यांचा हात धरते.

"नुसतं डोकावून नाही तर आयुष्यभर सोबत राहायचं आहे आपल्याला आई." आभा च बोलणं ऐकून सगळे अचंबित होतात. सगळ्यात जास्त श्रीकांत, कारण त्याला वाटलेही नव्हते की आभा त्याच्या आईला इतकं सहजासहजी माफ करेल. पण तिच्या मनाचा मोठेपणा पाहून तो सुखावला.

"आभा.." तिच्या तोंडून आई हा शब्द ऐकताच त्यांना रडू कोसळत. जो त्यांनी किती दिवस झाले असतील श्रीकांत च्या तोंडून ऐकला नव्हता. त्यांना खूप काही गमावलं असल्याचे वाटत होत. त्यांच्या भावना अनावर होतात आणि त्या रडू लागतात. आभा जाऊन त्यांना मिठी मारते. त्यासोबत श्रीकांत ही दोघींना सामील होत मिठी मारतो. मग सायली चे आई बाबा हि. पुढे त्यांना माफी मागू न देता सगळे त्यांना झाल गेलं विसरून जाण्यासाठी सांगतात. आणि हसत गप्पा मारत पुन्हा सगळ्यांची मैफिल जमते. मग थोड्यावेळाने सगळे निरोप घेऊन निघतात. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर आली होती.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


कावेरी च्या काकांच्या घरी

नुकताच डोळा लागल्याने कावेरी झोपली होती पण फोन च्या रिंग मुळे कावेरी ची झोपमोड होते. अनोळखी नंबर असल्याने ती वैतागत फोन कट करते. पण पुन्हा पुन्हा फोन येत असल्याने ती रागातच फोन उचलते.

"हॅल्लो..कोण..?"

"मी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आज सहा वाजता मी पाठवतो त्या पत्त्यावर या कोणालाही काही न सांगता. नाहीतर ह्याचे परिणाम खुप वाईट होतील."

"ओ कोण आहात. भर दुपारी वेड लागलंय का तुम्हाला..?"

"मला तर नाही लागलंय पण लवकरच तुम्हाला लागेल. जर तुमचा जिवलग म्हणजेच अभय चा जीव गेला तर..."

"ही काय मस्करी आहे. कोण बोलतंय. आणि अभी तो तिथे आहे का..? प्लीज काय फालतूपणा करताय.." पण फोन कधीच कट झालेला असतो. पुन्हा ती त्या नंबर वर कॉल लावते पण तो बंद असतो.

क्रमशः

🎭 Series Post

View all