मेहंदी ची जळमटे... पर्व दुसरे
भाग तिसरा
मनातल्या भावना स्प्रिंग सारख्या असतात, जितक्या दाबून धरू ठेवू तितक्या वेळ राहतात. एकदा का त्यावरच नियंत्रण सुटलं की त्यापेक्षा दुपटीने स्प्रिंग सारख झोकून देतात. कावेरी च सुद्धा असच काहीस झालं. तिच स्वतःवरच नियंत्रण सुटले आणि तिने जाऊन अभय ला घट्ट मिठी मारली.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गडद हिरव्या रंगाच्या पैठणी, त्यावर तिच्या आत्याने दिलेली सुंदर नाजुकशी नथ, केसांवरचा गजरा, गळ्यात हार, तीन पदरी चैन, मोठं आणि एक लहान नाजूक मंगळसूत्र, कानात झुमके, डोळ्यांत काजळ आणि लहानशी चंद्रकोर लावून सायली ह्या मराठमोळ्या सौंदर्यात तयार झाली. साडीला सांभाळत ती तिच्या खोलीत आली तर समोर च दृश्य पाहून तिच्या डोळ्यांना विश्वास बसत नव्हता. कावेरी ला अभय च्या मिठीत पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सायली ला अचानक आलेलं पाहून अभय ने कावेरी ला स्वतःपासून दूर केलं.
"सायली तु समजतेयस असं काही नाहीए.." अभय तिला समजवायला पुढे आला.
"अभय तु एक शब्दही बोलू नकोस. तुला काय समजत होते मी आणि तु.."
"सायली प्लीज माझं एकदा ऐकुन घे. ह्यात अभय चा काहीही दोष नाहीये. हे सगळ.."
"एक मिनिट. अभय माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको. त्याला काय बोलायचं काय नाही हे मी ठरवणार. तु कोण आहेस मध्ये बोलणारी..?"
"अग पण.."
"ए प्लीज हा.. तु शक्य होईल तितक्या लवकरात लवकर इथून निघ."
कावेरी ला तिला कसं समजावं काहीच कळत नव्हतं. तिला स्वतःचा खुप राग येत होता. कशी बशी ती खोलीतून निघून गेली. आईने आवाज दिल्याने अभय सुद्धा खोलीतून निघून गेला. सायलीने मोठा श्वास घेत झालेला प्रकार बाजूला करत आपल्या कपाटातील पाटल्या घेण्यासाठी गेली.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
(हॉल मध्ये)
"मी काय म्हणतेय मी जाऊन येऊ का सायली च्या खोलीत..?" सायली च्या आत्याने आज्जी ला विचारलं. तितक्यात हॉल मध्ये आभा आली.
"आत्या अहो सायली ला केलंय मी तयार. ती तिच्या खोलीत पाटल्या घालायच्या आहेत ना त्या घालायला गेलीय." पण आभाच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून आत्याने नाक मुरडल. आभा ला फार वाईट वाटलं.
"हो बाई तो आपल्या घराण्याचा फार जुना ऐवज आहे हं.." आज्जी बोलली.
"अहो पण इतकी मोलाची वस्तू तुम्ही तुमच्या जवळच ठेवायची ना.. गरज लागताच तिने घालायला मागितले असते." सायली च्या आईने आज्जींना म्हटलं.
"हो मी तिला देतानाच सांगितलं होत की घालून झाले की व्यवस्थित तुझ्या सासुकडे दे सांभाळायला."
"अग वहिनी तु का उगाच काळजी करतेय. ती सांभाळेल नीट. आपली सायली जवाबदार आहे, बेजबाबदार नाही." सायली च्या आत्याने आभा कडे पाहून तिला टोमणा मारत म्हणाली.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आपल्या डोळ्यांतल पाणी लपवत कावेरी तिथून घरी निघून जाण्यासाठी निघाली. मध्येच तिच्या आईने तिला कुठे जातेय म्हणून विचारताच तिने बरं वाटतं नसल्याचे सांगून तिथून ती निघून गेली. आईने ही जास्त काही प्रश्न न विचारता तिला जाऊ दिलं. पूजेची वेळ झाल्याने अभय येऊन पाटावर बसला. सोवळ घातलेलं पाहून सगळ्यांनी त्याच कौतुक केलं. आज्जी ने येऊन त्याची दृष्ट काढली. त्यामागून सायली सुद्धा आली. तिच रूप पाहून सगळे अचंबित झाले.
"सायली काय झालं तुला..? तु इतकी रडतेय का..?"
घरातले सगळजण सायली भोवती जमा झाले. तिच्यावर प्रश्नांचा भडिमार करू लागले. पण ती शांत होण्याच नावंच घेईना. ती खुप रडत होती. उपास असल्याने काही खाल्लं नव्हत तिने म्हणून अजूनच तिला त्रास होत होता. परिणामी तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. अभय ने आणि बाकी सगळ्यांनी मिळून तिला तिच्या खोलीत घेऊन गेले. आभा चे बाबा डॉक्टरांना फोन करण्यासाठी गेले. पूजा होणार नसल्याचे पाहून गुरुजी आणि बाकी आलेले सगळे पाहुणे निरोप घेऊन तिथून हळू हळू निघून गेले.
डॉक्टरांनी येऊन सायली ला तपासले. विकनेस मुळे चक्कर आली आणि काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे सांगून गोळ्या आणि इंजेक्शन देऊन निघून गेले.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तिथे घरी आलेली कावेरी आपल्या हातून नकळत किती मोठी चूक घडली म्हणून स्वतःला दोष देत बसली होती. अभय च्या नजरेतून खाली पडली आज. आता यापुढे त्याच्या नजरेला नजर देखील कशी देणार ह्या सगळ्याचा विचार येत होता तिच्या मनात. विचार करून करून तीच डोकं सुन्न झालं होतं. काय करावं सुचत नव्हतं म्हणून तिने आभा ला कॉल केला. समोरून फक्त रिंग वाजत होती. तिला सगळ स्वतःहून सांगून माफी मागून इथून कायमच निघून जावं म्हणून तिने मनाशी पक्क केलं, म्हणून ती वारंवार तिला कॉल करत बसली. तरीही कोणीच फोन उचलेना त्यामुळे तिला अजूनच काळजी वाटू लागली. तिला काय माहित तिच्या आयुष्यात अजुन पुढे काय वाढून ठेवलंय ते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सायली सोबत आभा आणि अभय खोलीत असून, हॉल मध्ये फक्त देशमुख कुटुंब आणि कावेरी चे आई बाबा त्यांच्या सोबत बसले होते. अभय आभा ला घेऊन हॉल मध्ये येतो. तिची तब्येत ठीक असल्याने घरच्यांची ती काळजी मिटली होती. पण सगळ्यांना तिच्या रडण्यामागच कारण कळलं नव्हतं. सगळ्यांना ते जाणून घ्यायचं होत.
"अभय काय झालं खर खर सांग. तुमच्या दोघांत काही भांडण झालं का..?" अभय च्या बाबांनी अभय ला रागात विचारलं. सायली च्या आणि कावेरी च्या बाबांनी त्यांना शांत राहण्यासाठी समजावू लागले.
"अभय तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती हा. ती नवीन आलीय ना आपल्या घरात. आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे की अस रडवल पाहिजे." अभय ची आई.
"हो ना तुम्ही मुलं कोणत्याही लहान सहान कारणांनी भांडत राहता मग त्याचे हे असे परिणाम होतात." आज्जी.
"नाही पण नक्की काय झालंय ते कळलं पाहिजे ना.." सायली ची आत्या आज्जी कडे पाहून बोलली.
"पाहिलं कसा घुम्या सारखा गप्प बसलाय. कधीचे सगळे विचारतायेत त्याला पण बघा काही बोलतोय का तुम्हीच." बाबा खुप रागात सगळ्यांकडे पाहत बोलले. सगळे अभय च्या उत्तराची वाट पाहत होते.
"बाबा, कसं सांगू कळत नाहीये. ते मगाशी मी माझ्या खोलीत गेलो तर तिथे कावेरी होती. अचानक येऊन तिने मला हग केलं आणि तेच सायली ने पाहिलं. हे इतकं सगळं अचानक झालं की मला कळलं च नाही. आणि त्यामुळेच वाटत सायली रडत होती."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा